When To Cut Hair And Nails या दिवशी केस आणि नखे कापल्याने होईल धनाची बरसात Nail Cutting Hair Cutting Astrology

0
28
When To Cut Hair And Nails

When To Cut Hair And Nails या दिवशी केस आणि नखे कापल्याने होईल धनाची बरसात Nail Cutting Hair Cutting Astrology In Marathi

नमस्कार मित्रानो, ग्रहांचा प्रभाव व्यक्तीच्या आचार-विचार आणि व्यवहारावरही निर्भर करतो. तुम्ही कधी, कोणत्या दिवशी काय करता यानुसार हि ग्रह परावर्तित होत असतात. मित्रानो आजच्या या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत केस आणि नखे कोणत्या दिवशी कापावेत.

आयुर्वेदानुसार हाता-पायांची नखे नियमित कापल्याने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. नखांच्या रंगानुसार विविध आजार ओळखता येतात. सध्याच्या धावपळीच्या काळात नखे कापायला एखाद्या ठराविक दिवशी वेळ मिळतोच, असे नाही. बर्‍याच जणांना रविवारी सुटी असल्याने बहुतेक जण रविवारीच नखे कापतात. काही जणांना ‘नखे कोणत्या वारी कापल्यास योग्य ?’, अशी जिज्ञासा असते.

Best Time For Hair Cut According To Astro

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्योदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा होरा असतो, (होरा म्हणजे अहोरात्र. याचा अर्थ सूर्योदयापासून दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत, असा आहे.) त्या ग्रहाचे नाव त्या वाराला दिलेले आहे, उदा. रविवारी सूर्योदयाच्या वेळी रवि ग्रहाचा होरा असल्याने त्याला ‘रविवार’ असे नाव आहे. नखे वाढवल्याने देहात तमोगुण वाढतो. वार हे होर्‍यानुसार ठरत असल्याने होर्‍यानुसार करावयाची कृत्ये पाहिल्यास लक्षात येते की, नखे कापण्यासाठी शनिवार आणि रविवार सोडून इतर सर्व वार योग्य आहेत. कोणत्या दिवशी नखे कापल्यास नक्की काय लाभ होतो ?
विशिष्ट अशा दिवशी केस आणि नखे कापल्याने काय लाभ होतात.

लोकमान्यतेनुसार अधिकांश लोक मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी केस नाही कापत. ज्योतिष शास्त्रा नुसार ते बरोबर देखील आहे. परंतु मित्रानो आपल्याला माहित नसेल कि सोमवारी आणि रविवारी देखील केस कापू नयेत. रविवारी अधिकांश लोकांना सुट्टी असते या सुट्टीचा उपयोग बरेच जण शरीराची साफ-सफाई करण्यासाठी करतात.

Nail Cutting Hair Cutting Astrology

मित्रानो रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आहे. यादिवशी केस कापण्यामुळे धन आणि बुद्धीचा नाश होतो. त्यामुळे रविवारच्या दिवशी केस कापू नयेत. तसेच सोमवार या दिवसावर चंद्राचे अधिपत्य असते. त्यामुळे सोमवारच्या दिवशी केस कापणे म्हणजे समस्यांना खुले आमंत्रण देण्यासारखे आहे. याच बरोबर या दिवशी दाढी देखील करू नये.

मित्रानो बुधवार आणि शुक्रवारी केस कापल्याने घरामध्ये धनाची भरभराट होते. आपल्या घरामध्ये, तिजोरीमध्ये स्थिर स्वरूपात माता लक्ष्मी स्थापित होतात. आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होऊ लागते आणि माता महालक्ष्मीच्या कृपेने धन प्राप्तीचे वेगवेगळे मार्ग मिळायला लागतात. शुक्रवार हा भौतिक सुखसुविधांचा दिवस मानला जातो. या दिवशी केस कापणे शुभ ठरते.

Hindus Cut Their Nails Or Hair On Specific Days

मित्रानो शनिवार, मंगळवार आणि गुरुवार च्या दिवशी काही विशिष्ट अशा प्रकारची किरणे केसांच्या सुरक्षा कवचा मुले मस्तिष्काला काही इजा पोहचू शकत नाहीत. त्यामुळे या तीन दिवशी जर का केस कापले तर त्या किरणांचा सरळ प्रभाव आपल्या मस्तिष्कावर पडेल, यामुळे मस्तिष्क प्रभावित होईल. म्हणून या तीन दिवशी केस न कापण्याचे विधान आहे.

शास्त्रानुसार दैनंदिन जीवनात अशा अनेक परंपरा आहेत ज्यांचे पालन आपण करत असतो. अशाच काही परंपरांचे पालन आपण दाढी, केस, नखे कापताना करतो.

The Best Days To Cut Hair & Nail

सोमवार – सोमवारचा संबंध चंद्राशी आहे. केस कापल्याने तणाव कमी होत असला तरी त्यामुळे आरोग्यहानीही होते. या दिवशी केस कापल्याने संतानाचे आयुष्य कमी होते.

मंगळवार – मंगळवारी केस कापणे हे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी केस कापल्याने व्यक्तीचे आयुष्य घटते.

बुधवार – बुधवारी केस कापल्याने घरातील समृद्धी वाढते. बुधवारचा दिवस केस कापण्यासाठी जास्त शुभ मानला जातो.

गुरुवार – गुरुवार हा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी केस कापल्याने माता लक्ष्मी रुष्ट होते. तसेच मानसन्मानाचीही हानी होते.

शुक्रवार – शुक्रवार हा भौतिक सुखसुविधांचा दिवस मानला जातो. या दिवशी केस कापणे शुभ ठरते.

शनिवार – शनिवारी केस कापणे, वज्र्य करावे. या दिवशी ही कामे मृत्युकारक मानली जातात.

रविवार – रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आहे. यादिवशी केस कापण्यामुळे धन आणि बुद्धीचा नाश होतो.

याच प्रमाणे नखे कापण्यासाठी रविवार आणि शनिवार सोडून बाकी सर्व दिवस चालू शकतात.

सोमवारी नखे कापल्याने आरोग्याची प्राप्ती होते, सोम म्हणजे चंद्र. आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. मनाच्या स्थितीवरच आपले आरोग्य अवलंबून असते, या दिवशी नखे कापल्याने मनावरील तमोगुणाचे आवरण दूर होण्यास साहाय्य होते.

Which Days Are Best For Hair And Nail Cutting

मंगळवारी नखे कापणे हे कर्जमुक्तीसाठी सहाय्यक असते. कर्ज फेडल्यास होणारे सम्भाव्या वादविवाद टाळण्यासाठी मंगळवारी नखे कापू शकतो.

बुधवारी नखे कापल्याने धनप्राप्तीचे मार्ग उघडतात. बुद्ध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. यादिवशी नखे कापल्याने बौद्धिक यशाने नोकरी अथवा व्यवसायामध्ये धनप्राप्ती होते.

गुरुवारी नखे कापल्याने घरात घडणाऱ्या अशुभ गोष्टीना आळा बसतो, आणि चित्त गुरुउपासनेत लागते. गुरु हा अध्यतिक ग्रह असून उपासनेचा कारक आहे. या दिवशी नखे कापल्याने सत्वगुण वाढण्यास साहाय्य होते.

शुक्रवारी नखे कापल्याने प्रिय व्यक्तीच्या गाठी भेटी होतात. शुक्र हा कलेचा आणि प्रीतीचा कारक आहे. या दिवशी नखे कापल्याने प्रिय व्यक्तीच्या भेटीसाठी प्रवास होऊ शकतो.

Right Day To Nail Cutting Hair Cutting Days In Hindi

शनिवारी नखे कापल्याने विषयाची आसक्ती वाढते आणि मानसिक स्थैर्य न्यून होते. यामुळे शनिवारी नखे कापू नयेत.

रविवारी नखे कापल्याने राजा गुण वाढतो व कामामध्ये अडथळे येतात. यामुळे रविवारी नखे कापू नयेत.

कापलेली नखे घरात पडू नयेत, याची काळजी अवश्य घ्यावी. नखे एका कागदात गुंडाळून काळजीपूर्वक कुणाच्याही हातात पडणार नाहीत, अशा प्रकारे टाकून द्यावीत.’

Hair And Nail Cutting Best Days In Week

तर मित्रानो हि होती केस आणि नखे कापण्याच्या दिवसांविषयीची माहिती. आपणही शास्त्र मध्ये सांगितल्या प्रमाणे बुधवार आणि शुक्रवार या दिवसांमध्येच केस आणि दाढी कापण्याची सवय लावून घ्या. या एका छोट्याशा सवयीने आपण अगदी सहजपणे महालक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकता.

विडिओ कसा वाटलं अवश्य कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here