Vyapar Vridhi Upay | व्यवसाय वाढविण्यासाठीचे उपाय | Astrology Tips For Success In Business

0
38
vastu tips for business growth

Vyapar Vridhi Upay | व्यवसाय वाढविण्यासाठीचे उपाय | Astrology Tips For Success In Business

नमस्कार मित्रानो, मित्रानो या संसारामधील प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते कि त्याची त्याच्या व्यवसायामध्ये , कारोबारामध्ये, रोजगारामध्ये प्रगती व्हावी. त्याच्या कार्य मध्ये त्याला श्रेष्ठतम यश मिळो, कारोबारामध्ये श्रेष्ठतम यश मिळो. परंतु काहीवेळा लाख प्रयत्नाच्यानंतरही व्यवसायामध्ये अस्थिरता असते. मित्रानो ज्योतिष शास्त्रामध्ये कित्येक असे उपाय सांगितले गेले आहेत कि जे उपाय केल्याने कोणी हि व्यक्ती निश्चितपणे आपल्या रिजगारामध्ये, कारोबारामध्ये उन्नती करू शकतो, आपला व्यवसाय वाढवू शकतो. त्याच्या व्यवसायामध्ये लाभ मिळवू शकतो.
तर मित्रानो आज आपण असेच काही व्यवसाय वाढविण्यासाठीचे, रोजगार मिळविण्यासंबंधीचे उपाय पाहणार आहोत.

मित्रानो आपल्या व्यवसायामध्ये लाभ मिळविण्यासाठी आपण प्रत्येक शुक्रवारी गुळ आणि चणे, जे आपण महालक्ष्मीला नैवद्य म्हणौन ठेवतो, ते गुळ आणि चणे प्रसाद म्हणून वाटावेत. तसेच बुधवारच्या दिवशी एक वाटी बासमती तांदुळाचे दान एखाद्य गरजू व्यक्तीला करावे. या उपायाने आपल्यावर, आपल्या व्यवसायावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि आपल्याला व्यवसायामध्ये लाभ होतो.

Vyapar Vridhi Ke Upay

जर का आपल्याला वाटत आहे कि कैक प्रयत्नाच्या नंतरही आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये मनोवांछित यश संपादन होत नाहीये. तेंव्हा कोणत्याही गुरुवारी एखादया मंदिरामध्ये लावलेल्या तुळशीच्या आवती भोवती जे तण आलेले असेल, ते तण एका नवीन कपड्या मध्ये बांधून आपल्या कार्यस्थळावर एखाद्या स्वच्छ जागी ठेवून द्या. आणि याला दररोज पूजा करतेवेळी धूप अगरबत्तीच्या आवश्य दाखवावी.

तसेच प्रत्येक महिन्यातील पहिल्या बुधवारी पाच मुठी साबूत हिरवे मूग, एका नवीन हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून वहत्यापाण्यामध्ये प्रवाहित केल्याने जीवनामध्ये यश प्राप्त होते. हे प्रवाहित करतेवेळी देवाचे स्मरण करत आपली मनोकामना अवश्य बोलावी.

Astrology Business Tips

मित्रानो शुक्ल पक्षातील सोमवारी संध्याकाळच्या आधी एक मूठ बासमती तांदूळ माता लक्ष्मीचे स्मरण करत वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावेत, यामुळे आपल्याला नक्कीच धनलाभ होईल.

याच बरोबर मित्रानो आपण एक पक्की मातीची कळशी घ्यावी व हि कळशी लाल रंगाने रंगवावी. आणि मग यावरती एक केसरासहित पाणी असलेला नारळ ठेवावा. व मग तो नारळ आणि कळशी लाल कालव्याने बांधावेत. त्याचे तोंड बंद करावे. आणि हा कळस वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करावा. यामुळे अतिशीघ्र उत्तम अशा लाभांची प्राप्ती होते.

मित्रानो दररोज जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी, निदान घराच्या प्रामुख्याने तर आपल्या ताटातील एक एक घास गाय आणि पक्षांसाठी काढून ठेवून मगच जेवायला सुरुवात करावी. यामुळे ईश्वराच्या आणि पितरांच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि यशाची प्राप्ती होते.

Vastu Tips For Business

कोणत्याही शुभ दिवशी सात गोमती चक्र आणि काली हळद याना धूप दीप दाखवून, टिळक करावा आणि एखाद्या रेशमी पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या धन स्थानी ठेवल्याने धन आपल्याकडे आकर्षित होत. धनाची भरभराट होते.

एक तांब्याभर पाणी घेउन त्यामध्ये थोडे दूध, चंदन, फुल आणि अक्षत घालून सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाच्या मुलामध्ये अर्घ्य द्यावे. यामुळे आपले घर धन धान्याने सदैव भरलेले राहील.

व्यापार वृद्धि साठी श्रीयंत्रा बरोबरच थोडी नागकेसर (नागकेसर आपल्याला कोणत्याही पूजेच्या दुकानांमध्ये किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये मिळून जाईल.) ठेवल्याने श्रीयंत्राचा प्रभाव वाढतो.

Astrology Tips For Success In Business

थोडेसे कच्चे सूट घेऊन ते केसराने रंगवून घ्यावेत, आणि हे रंगविलेले सूट आपल्या व्यापाराच्या जागी बांधावेत. यामुळे आपल्याला व्यापारामध्ये चांगले यश मिळत राहील. तसेच नोकरी करणार्यांनी याला आपल्या कपाटामध्ये, टेबलावर, टेबलाच्या कप्यामध्ये अगदी कुठेही ठेऊ शकतात. यामुळे प्रगतीचे योग प्रबळ बनतात.

मित्रानो शुक्ल पक्षातील शुक्रवारी आपल्या व्यापार स्थळामधील गल्ल्यामध्ये ११ काळ्या कवडी अभिमंत्रित करून ठेवाव्यात, यामुळे आपल्याला उत्तोमोत्तम लाभ मिळायला लागतात.

Vyapar Me Vraddhi Ke Upay

जर कोणाव्यक्तीकडे आपले धन अडकलेले असेल आणि ती व्यक्ती पैसे देण्यास समर्थ असताना देखील तुमचे पैसे परत करत नसेल. तर दोन राजा कवडी ( राजा कवडी आपल्याला कोणत्याही पूजेच्या दुकानांमध्ये मिळून जाईल ) त्या व्यक्तीच्या घरासमोर फेकून द्या. त्या व्यक्तीचे मन बदलून जाईल. आणि तो लगेचच आपले पैसे आपल्याला परत करेल. परंतु हा उपाय अगदी एकांतामध्ये कोणाचाही दृष्टीस पडणार नाही असा करावा.

तर मित्रानो हे होते व्यापार वृद्धी करण्यासंबंधीचे काही उपाय, या उपायांनी आपण आपल्या व्यवसायामध्ये नक्कीच उन्नती कराल हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. विडिओ कसा वाटला अवश्य कळवा, धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here