Vastu Shastra For Home Upay घर बांधताना वास्तूचे हे नियम पाळा Marathi Vastu Shastra Tips

0
139
vastu shastra upay in marathi

Vastu Shastra For Home Upay घर बांधताना वास्तूचे हे नियम पाळा Marathi Vastu Shastra Tips

आपण पाहतो की, आजकाल कोणीही घर, फ्लॅट, प्लॉट वास्तू घेताना जागेच्या बाहेरील तसेच आतील सजावटीकडे बरेच लक्ष देतो व त्याद्वारे जास्तीत जास्ती सुखसुविधा कशा मिळतील याची काळजी घेतो. परंतु, या वास्तू घेताना ती वास्तू त्या व्यक्तीला जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य देईल की नाही, याचा विचार केला जात नाही. जर लाखो, करोडो रुपये खर्च करून त्या वास्तूत मन:शांती नसेल, निरनिराळ्या संकटांनी तेथे राहायला आलेले लोक त्रस्त झाले असतील, कौटुंबिक जीवन दु:खी व ताणतणावांचे असेल, तर जीवनात एकापाठोपाठ एक क्लेशदायक घटना त्या कुटुंबात घडत असतील, तर पैसे खर्च करून असे फ्लॅट, घर, प्लॉट घेऊन दु:ख का विकत घ्यावे?

Vastu Shastra Upay In Marathi

माणूस जास्तीत जास्त वेळ आपल्या घरी किंवा कामाच्या जागेवर असतो. त्यामुळे घराचा, कार्यालयाचा वास्तुपुरुष, वास्तुदेव प्रसन्न राहणे आवश्यक असते. जीवनातील यश-अपयश, जन्मकुंडलीतील ग्रहांप्रमाणेच काही प्रमाणात यावरसुद्धा अवलंबून असते.परंतु, पूर्वजन्मातील कर्म, प्रारब्ध याचाही परिणाम जीवनावर पडतोच.

आपण नवीन घर बांधताना, भाड्याने घेताना किंवा इतर कोणतीही वास्तू विकत घेताना, बांधताना काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.

Vastu Shastra For Flat In Marathi

वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घर बांधताना पाच नैसर्गिक तत्वांचे प्रमाण व्यवस्थित राखल्यास आपल्याला प्रत्येक तत्त्वाचा यथायोग्य लाभ मिळू शकतो. अर्थात, या पाच तत्त्वानेच मानवाचे शरीर बनले आहे. ही तत्वे म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू. संपूर्ण ब्रह्मांडात अनेक ग्रह आहेत,परंतु फक्त पृथ्वीवरच जीवन आहे. पृथ्वीवरच पंचमहाभूतांचे संतुलन आहे, असे विज्ञान सांगते.

वास्तुशास्त्रानुसार आकाशतत्त्वाने उत्तम विचार करण्याची क्षमता यते. पृथ्वीतत्वाने घराचे स्थैर्य, कामाचे स्थैर्य नेहमीसाठी चांगले राहते. जलतत्त्वाने गृहशांती टिकून राहते. अग्नितत्वाने घरातील कलहाची कल्पना येते, तर वायुतत्वाने भ्रमण करण्याची सवय व चंचलता वाढते. थोडक्यात सांगायचे म्हणजे, या तत्त्वांचे महत्व जीवनात अनमोल आहे.

Vastu Dosh Remedies

घर बांधताना, फ्लॅट घेताना, घरातील, कार्यालयातील रचना करताना ज्या आठ दिशा आहेत त्याचा विचार करावा.या ठिकाणी लक्षात घ्यावे की, आकाशतत्व घराच्या मध्यभागी असते. इतर तत्त्वांचे या जागेवर प्रभुत्व असते.

उत्तर दिशा – उत्तर दिशेचा स्वामी धनाचा देव कुबेर आहे. याचा प्रतिनिधी ग्रह ‘बुध’ हा आहे. वास्तू बांधताना उत्तर दिशेकडे जास्तीत जास्ती मोकळा भाग घ्यावा, यामुळे जीवनभर आर्थिक स्थिती चांगली राहते. हे आपल्या ‘मातेचे’ म्हणजे आईचे स्थान आहे. हा भाग घरातील इतर स्थानांच्या मानाने उंच आणि घाणेरडा नको, नाहीतर घरच्या स्त्रीला नेहमी शारीरिक व मानसिक त्रास होत राहतो.

Vastu Shastra For Flat Main Door

उत्तर, ईशान्य, पूर्व या कोनांमध्ये पाण्याची टाकी, स्विमिंग पूल, तलाव असल्यास घरची इतर मंडळी संवेदनशील, बुद्धिमान राहतात. त्यामुळे सुखी, समृद्ध जीवन प्राप्त होते. या भागात स्वयंपाकघर, कोठीघर (स्टोअर रूम), नोकरांसाठी राहाण्याची जागा धोकादायक आहे. तसेच कार, वाहने, स्कूटर्स वगैरे ठेवण्याची जागा नसावी. मुख्य दरवाजा, व्हरांडा, बैठकीची खोली, बाल्कनी असणे योग्य राहील.

पूर्व दिशेच्या खालोखाल या दिशेला महत्त्व आहे. उत्तर याचा अर्थ अतिउत्तम, नेहमी वाढणारा असा आहे. कुबेराच्या स्वामित्वामुळे या दिशेकडे धनसंपत्तीची रेलचेल आहे. म्हणून वास्तूतील पैशांचे कपाट किंवा तिजोरीचे तोंड उत्तर दिशेला करून ठेवण्याचा सिद्धांत आहे. उत्तर दिशेकडून येणार्‍या स्पंदनलहरी पूर्वदिशेच्या खालोखाल मानवी जीवनात पोषक व श्रेष्ठतम आहे. उत्तरचा दुसरा अर्थ प्रश्‍नांचे उत्तर हा आहे. म्हणून अडचणीच्या वेळी उत्तरेकडे तोंड करून बसल्यास प्रश्‍नांचे उत्तर मिळते, असे वास्तुशास्त्र सांगते. उत्तरेकडे आकाशात ध्रुवतारा आहे. तो नेहमी स्थिर असतो. म्हणून स्थिरतेच्या दृष्टीने ही दिशा महत्त्वपूर्ण आहे. जेवताना, घरी विचारविनिमय करताना, आंघोळ करताना, कारखान्यात वगैरे काम करताना, कार्यालयात बसताना लाभदायक उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे.

Vastu Shastra Tips For Home In Marathi

ईशान्य – ईशान्यचा स्वामी महादेव (शंकर) आहे, तर प्रतिनिधी ग्रह ‘गुरू’ आहे. ईशान्यला सूर्याची महाशक्तिमान किरणे सूर्योदयानंतर फेकली जातात.या दिशेला घराचे मुख्य द्वार असणे अतिशय शुभ मानले जाते. विहीर, बोअरवेल, जमिनीखाली पाण्याची टाकी या बाजूला असल्यास शुभ फळे मिळतात. या भागात देवघर, पूजास्थान असणे चांगले. विद्यार्थ्यांनी या दिशेला बसूनच अभ्यास करावा, वयोवृद्ध व्यक्ती, विधूर-विधवा येथे राहू शकतात. या बाजूला शौचालय नसावे. विवाहित दाम्पत्याने राहू नये. या कोपर्‍यात घराच्या आवारात उंच झाडे नसावेत.घराचा ईशान्य कोपरा तुटलेला असू नये. कारखान्यातील संचालक मंडळींनी या दिशेला बसू नये.तसेच माल ठेवणे, पहारेकर्‍यांची जागा, कामाची जागा न ठेवणे चांगले. वास्तूतील हा भाग, कोन हलका पाहिजे. या बाजूला मोठमोठी कपाटे वगैरे ठेवणे चांगले मानले जात नाही. या बाजूला स्वच्छतागृह, स्वयंपाकघर नसावे.

कार्यालय किंवा कारखानदारांनी या बाजूला स्वागतकक्ष, पिण्याचे पाणी, मंदिर, तळघर, संगणक ठेवावेत, पण स्वच्छता या भागात ठेवणे फायदेशीर राहील. दुकानदारांनी या भागातून प्रवेश ठेवावा. कापड, शिक्षण, सोने-चांदी, आध्यात्मिक वस्तूंसाठी दुकाने या भागात ठेवणे इष्ट राहते. कारखान्यात प्रशासन, तांत्रिकी विभाग, दुचाकी ठेवण्याची जागा, तयार माल ठेवायला हरकत नाही.

Vastu Shastra Home Plan In Marathi

ईशान्य दिशेला जर दोष असतील, तर माणसाला अतिशय त्रास होतो. वंशवृद्धी होत नाही, चिंता लागून राहते, मुलांच्या शिक्षणात अडचणी येतात, आर्थिक बाजू कमकुवत होते इत्यादी.

पूर्व – पूर्वेची देवता सूर्य व इंद्र. या भागात जास्तीत जास्त खिडक्या असाव्यात.या बाजूला काही मुख्य वास्तुदोष असल्यास घरातील कर्त्या पुरुषाला खूप कष्ट पडतात.पश्‍चिम बाजूच्या तुलनेत जागा उंच नसावी. नाहीतर घरातल्या स्त्रीला समृद्धी मिळत नाही. संतान मंदबुद्धी, अस्वस्थ असतात. घराच्या या बाजूला कचरा वगैरे असल्यास घरची गृहिणी मुला-मुलींकडून दु:खी असते. या बाजूला चपला, बूट वगैरे ठेवू नये. झोपण्याची खोली ठेवू नये, तब्येत बिघडण्याची शक्यता असते. या बाजूला गाडीचे गॅरेज, स्वयंपाकघर, पाहुण्यांची खोली असणे योग्य तसेच कार्यालयातील लेखा विभाग, गार्डची खोली ठेवावी.

Vastu Shastra Building Plan

आठ दिशांपैकी मानवाला सर्वांत अधिक फायदे देणारी ही दिशा आहे. या दिशेला प्राची असेदेखील म्हणतात. ही दिशा सुख, समाधान, शांती, आनंद, ऐश्‍वर्य, समृद्धी, विजय, स्वास्थ्य इत्यादींचा शक्तिस्रोत आहे.

पूर्व दिशेकडून येणारी सूर्यकिरणे सकाळच्या वेळी आपल्या घरात अधिकाधिक प्रमाणात घेता यावीत व त्या दिशेकडून येणार्‍या स्पंदनलहरी व सुपरनॅचरल पॉवर आपल्या घरात भरपूर प्रमाणात यावी म्हणून सर्वात मोठा दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा या दिशेला ठेवण्याचा संकेत वास्तुशास्त्रात आहे.

थोडक्यात म्हणजे या बाजूला तेल, तूप साठवण्याची जागा, कार्यालयातील मानवी संशोधन विभाग,लेखन-साहित्य, मुख्य प्रवेशद्वार, दुकानात विक्री कर्मचारी तोंड पूर्वेला, कारखान्यात चर्चाकक्ष, शोरूम असणे योग्य राहते.

आग्नेय दिशा – या दिशेचा स्वामी अग्निदेव आहे. गणपतीपण आहे. वास्तूतील हे अग्नीचे स्थान आहे. या भागात स्वयंपाकघरातील गॅस, स्टोव्ह, चूल ठेवावी. स्वयंपाकघराजवळ विहीर नसावी. नाहीतर घरातील गृहिणी सदैव आजारी राहण्याची शक्यता असते. सासू-सून, जावा-जावा यांची भांडणे व्हायची शक्यता असते. घरात चोरी होऊ शकते. घरात सासू-सून असल्यास सासूने या दिशेच्या खोलीत राहणे योग्य नाही. देवघर, शयनकक्ष, बैठकीची खोली, प्रवेशद्वार या बाजूला करणे टाळावेच. जमिनीच्या खाली टाकी नसावी. मुलींसाठी शयनगृह असणे ठीक राहील. कारखान्यात, कार्यालयात विजेचे मीटर, स्वच्छतागृह, वातानुकूलित यंत्र, ट्रान्सफॉर्मर, बॉयलर, उपाहारगृह असावे. वास्तूच्या या भागात ब्युटीपार्लर, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने चांगली चालतील.

Vastu Shastra For Plot In Marathi

दक्षिण दिशा – या भागाचे स्वामी देवता ‘यम’ आहे, तर ग्रह मंगळ आहे. ही दिशा तिच्या वाईट गुणधर्मांमुळे कुठल्याही शुभकार्यास वर्ज्य मानली गेली आहे. या बाजूने मनुष्याच्या कल्याण करणार्‍या लहरी (स्पंदन) येत नाहीत म्हणून दक्षिण बाजूला घराचा मुख्य दरवाजा करू नये, असा संकेत आहे. दक्षिण बाजू इतर बाजूंपेक्षा थोडी उंच ठेवावी, त्यामुळे घरादाराला सुख मिळेल. मुलांच्या अभ्यासाची खोली या बाजूला नको. लागेल तर कोठीघर (स्टोअर रूम) ठेवा. झोपण्याची खोली असल्यास नुकसान नाही. विहीर नको, जिना, लिफ्ट चालेल. कार्यालयात विक्री व्यवस्थापक, कामगार व्यवस्थापक, हिशेब तपासनीस, उच्चस्तरीय अधिकारी यांनी बसणे चांगले राहील. दुकानात या बाजूला तळघर असल्यास मंदिरगृह, क्लब, इतर कारखान्यात विश्रांतीची खोली, अर्धा तयार माल, वाहन तळ ठेवावे.

नैर्ऋत्य – या भागात पृथ्वीतत्त्व व राहू-केतूंचे स्थैर्य असते. हा कोपरा घरात सर्वात उंच ठेवावा. संडास या दिशेला बांधणे योग्य. इथे पाण्याची भूमिगत टाकी बांधू नये. लहान मुलांना या भागात झोपवू नये. नोकर माणसांना चुकूनही या भागातील खोली देऊ नये. फक्त कोठीघर असल्यास चांगले. मास्टर बेडरूम ठेवावी. कार्यालयात संचालक मंडळींनी या कोनात बसावे. माल ठेवण्याचे गोडाऊन या भागातच ठेवावे.

Vastu Shastra Tips In Marathi

पश्‍चिम – या दिशेचा स्वामी वरुण आहे. या दिशेला वास्तुशास्त्रानुसार योग्य बांधकाम केल्यास घरमालकास धन, समृद्धी, यश, सफलता मिळते. हा भाग पूर्वेच्या बांधकामापेक्षा खाली असल्यास घरमालकाला नेहमी अपयश, आर्थिक नुकसानी पदारात पडते. पश्‍चिम-नैर्ऋत्य बाजूला मुख्य प्रवेशद्वार नको. उंचावरील पाण्याची टाकी नको. भोजनकक्ष चांगला राहतो.

वायव्य – या कोनात वायुदेव व चंद्राचा प्रभाव असतो. या भागात हँडपंप नसावा. पाण्याची भूमिगत टाकी, हौद नसावा. स्वयंपाकघर चालेल. या बाजूच्या खिडक्या व दरवाजे जास्तीत जास्त वेळ उघडे ठेवावेत, मुख्यत: कारखानदारांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. विहीर नसावी. नवविवाहितांचे शयनगृह नसावे. कार्यालयात विक्री कर्मचारी बसणे योग्य. दुकानात जाहिराती, वाहनप्रदर्शन जागा ठीक राहील. कारखान्यात जावक विभाग ठेवावा.

Vastu Dosh Dur Karne Ke Upay In Marathi

मध्य भाग – घराचा, प्लॉटचा मध्य भाग नेहमी मोकळा असावा. म्हणजे या भागात घरातील सामान, फर्निचर ठेवू नये. येथून सांडपाणी वाहणे बरोबर नाही. संडास बिलकूल नको. घराच्या मध्य भागात मंदिरसुद्धा नको. पूर्वीच्या वास्तू, प्रामुख्याने राजेरजवाडे यांच्या जागा, महाल, कोठ्या या ठिकाणी वास्तूच्या मध्य भागी मोकळी जागा पाहण्यात येते.

वास्तुशास्त्राचे नियम – शक्यतो चौरसाकृती किंवा आयताकृती प्लॉट घ्यावा. ईशान्य कोपरा कट झालेला नसावा. प्लॉटच्या पूर्वेला, उत्तरेला डोंगर, उंच टेकडी नसावी. या दिशेला जर तलाव, नदी, तळे, विहीर असेल तर प्लॉट घ्यायला हरकत नाही. ज्या प्लॉटचा नैसर्गिक उतार पूर्वेकडील आहे तो प्लॉट मालकास लाभदायक राहतो. प्लॉट घेताना काळजी घ्यावी, वास्तुपरिसरात कोणतेही शल्य नसावेत.

Vastu Shastra Ke Upay

ज्या प्लॉटच्या पूर्व व उत्तर दिशेला रस्ते असतात, असे प्लॉट अत्यंत शुभ असतात. प्लॉटच्या कोपर्‍यावर वक्र होणारे रस्ते नसावेत.

घराची, फ्लॅट, अपार्टमेंटची पूर्व व उत्तर दिशेकडील भिंत कमी उंचीच्या व कमी जाडीच्या असाव्यात, तर दक्षिण-पश्‍चिम दिशेकडील भिंती जास्ती उंच, जाडीच्या असाव्यात. कंपाऊंड वॉल बांधताना खोदकामाची सुरुवात सर्वप्रथम प्लॉटच्या ईशान्य कोपर्‍यापासून वायव्य कोपर्‍यापर्यंत करावी,पण बांधकाम करताना सर्वप्रथम नैर्ऋत्य-आग्नेय अशी भिंत बांधून मग नंतर पश्‍चिम बाजूची भिंत उचलावी.

घराच्या, अपार्टमेंट किंवा फ्लॅटच्या मुख्य दरवाजााला श्रीफळ, पाने, वेली इत्यादी मंगलचिन्हांनी नेहमी सजवावे. मुख्य द्वार- घरातील, फ्लॅटमधील इतर दारांपेक्षा थोडे मोठे व चांगले असावे.सर्वांत महत्त्वाचं म्हणजे घराच्या प्रवेशद्वारासमोर मंदिर नसावे, स्मशानभूमी, दफनभूमी नको. मुख्य दरवाजावर झाडाची सावली पडता कामा नये. मुख्य म्हणजे अगदी दारासमोर विहीर नसावी.

Vastu Dosh Ghar Ka Naksha

फ्लॅट किंवा घराच्या उत्तर-पूर्व बाजूला व्हरांडा असावयाला पाहिजे. ईशान्य बाजू महादेवाची असल्यामुळे या भागात गणेश अथवा शंकराचा फोटो लावावा, यामुळे सकारात्मक ऊर्जा वास्तूत येईल. व्हरांडा राहत्या जागेच्या चुकीच्या दिशेस बनवल्यास घरात अनेक समस्या, अडचणी निर्माण होऊन वास्तूत कलह व भांडणे जास्तीच होतात.

ड्रॉईंग रूममध्ये उत्तर-ईशान्य दिशेला पाण्याचा धबधबा व वाहते पाणी दाखवणारे चित्र लावणे फायदेदायक असते. या चित्रात पांढरा, निळा, हिरवा व काळ्या रंगाच्या शेड्‌स असाव्यात.रडणार्‍या लहान मुलांचे चित्र, लढाईचे सीन्स, हिंस्रप्राण्यांची चित्रे नसावीत. बाहेरची पाहुणेमंडळी वगैरे आल्यास त्यांचे चेहरे पश्‍चिम-दक्षिण दिशेकडे, तर घरात राहाणार्‍यांची तोंडे उत्तर-ईशान्य-पूर्वेकडे राहतील, अशी बैठकीत बसण्याची जागा ठेवावी. टेलिफोन करताना घरातील लोकांचे तोंड याच दिशेकडे राहावे, अशा रीतीने फोन, दूरदर्शन संच ठेवावेत.

Vastu Shastra Tips For Home

राहत्या जागेतील देवघर करताना विशेष काळजी घ्यायला पाहिजे. प्रामुख्याने हे ईशान्य-पूर्व बाजूस असणे चांगले मानले जाते. पूजाघरात मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नका. घरातल्या देव्हार्‍याला कळस नसावा. पूजास्थानाच्या अगदी खालती (खालचा मजला) किंवा वरती संंडास नसावा. पूजास्थानातील देव भग्न झालेले नसावेत, देवघरातील देवांच्या नजरा एकमेकांकडे नसाव्यात. एकापेक्षा जास्ती मूर्ती, फोटो एकाच देवाचे नसावेत. सहा इंचापेक्षा जास्ती देवांच्या मूर्तीची उंची नसावी. देवस्थानाच्या अगदी समोर शौचालय नसावे. पूजास्थानाच्या आग्नेय कोपर्‍यातच निरांजन, समई लावावी व गंगाजल ईशान्य बाजूला ठेवावे.

Vastu Shastra Upay

घरातील कर्त्या व्यक्तीने नैर्ऋत्य बाजूला असलेल्या शयनकक्षाचा वापर करावा, ईशान्यबाजूची बेडरूम मुलांना किंवा विधूर-विधवा व्यक्तींसाठी ठेवावी. बेडरूमचा व शौचालयाचा दरवाजा समोरासमोर नसावा. बेडरूममधील आरशावर झोपणार्‍यांचे प्रतिबिंब पडणे अशुभ आहे म्हणून आरशावर त्याचा ज्या वेळेस वापर नसतो त्या वेळेस पडदा टाकावा.शयनकक्षात शक्यतो पैसे ठेवण्याची जागा नको. वास्तूच्या अगदी मध्यभागी बेडरूम नको तसेच झोपताना डोक्यावर बीम नसावा. झोपण्याच्या खोलीत देवघर करू नये. मुलांनी (विद्यार्थ्यांनी) पूर्वेकडे डोके ठेवून झोपावे, तर कमावत्या व्यक्तींनी दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे, असे वास्तुशास्त्र सांगते.

घरातले शौचालय वास्तूच्या मध्यभागी चुकूनही बांधू नये. शौचालयाची दारे शक्यतो पूर्वे किंवा उत्तरेकडे असावीत, शौचाच्या वेळी पूर्वेस अथवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. वास्तुतील शौचालय वास्तूच्या ईशान्य, आग्नेय, नैर्ऋत्य कोपर्‍यात नसावे. घराची सेप्टिक टँक ईशान्य-नैर्ऋत्य भागात नसावी.

Vastu Shastra For Plot Size

घरातील फ्लॅटमधील बाथरूम शक्यतो पूर्व दिशेस असावी. त्यात हिटर, बॉयलर आग्नेय कोपर्‍यात असणे चांगले राहते. पाणी वाहून जाण्यासाठी उतार पूर्व किंवा उत्तर बाजूस असावा.स्नानगृहाच्या छतापर्यंत टाईल्स लावणे योग्य आहे. बाथरूमच्या वायव्य दिशेस धुण्यासाठी कपडे ठेवायची जागा असावी.

वास्तुशास्त्रानुसार वास्तूतील स्वयंपाकघर वास्तूच्या आग्नेय कोपर्‍यात असावे. स्वयंपाक करणार्‍या गृहिणीचे तोंड पूर्व दिशेस असणे योग्य समजल्या जाते. गॅस सिलेंडर आग्नेय कोपर्‍यात, तर पाण्याचे बेसिन ईशान्य दिशेच्या कोनात राहणे हे आदर्श मानले जाते. स्वयंपाकघरात खेळती हवा पाहिजेच म्हणून पूर्व दिशेला वगैरे खिडक्या पाहिजेच. वास्तूच्या वायव्य भागात स्वयंपाकघर नकोच. जीवनात प्रगती होत नाही. घरातील बर्नर्स (स्टोव्ह) ची संख्या विषम असावी. नैर्ऋत्य कोनात स्वयंपाकघर नसावे. कारण यामुळे घरातल्या लोकांना विविध प्रकारचे अपघात होण्याची शक्यता वाढून औषधोपचारावर खर्च वाढतो. स्वयंपाकखोलीत पिण्याच्या पाण्याचा साठा ईशान्य किंवा पूर्व दिशेलाच करावा.सामान ठेवण्याची कपाटे पश्‍चिम, नैर्ऋत्य बाजूस ठेवणे वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे.

Vastu Shastra Tips For Buying New House

जेवणाची जागा स्वच्छ असावी, भरपूर उजेड असावा. दक्षिणेकडे तोंड करून जेवण करणे योग्य नाही. कारण ही यमाची दिशा आहे. मुख्य कर्त्या माणसाने पूर्वेकडे तोंड करूनच जेवण करावे. टेबलावर नेहमी काही फळे ठेवावीत.

वास्तुशास्त्रात पंचततत्व – दिशाज्ञान हे महत्त्वपूर्ण समजले जाते. आपली राहती वास्तू लाभदायक व्हावी म्हणून सर्व खोल्यांची रचना, दिशा लक्षात घेऊनच करावी त्यामुळे पंचमहाभूतांचा निसर्गाशी समतोल राहून, त्या घरात, फ्लॅटमध्ये राहणार्‍या कुटुंबांचे सर्वांगीण कल्याण होईल, यात मुळीच शंका नाही.

Vastu Shastra For Plot

वास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींशी निगडीत असल्याने बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, यश, शांती, चैतन्य यांचा प्रत्यक्ष संबंध वास्तूशी जोडला जात असल्याने वास्तूची निवड व बांधकाम करताना नियोजन व वास्तूशास्त्रातील मूलभूत नियमांचा आग्रह धरताना बहुतेकजण दिसतात. यामागे अंधश्रद्धेचा भाग नाही, तर घर बांधतच आहोत तर वास्तूचे काही नियम पाळल्यास काय हरकत आहे, असा सरळ विचार त्यामागे असतो.
घर बांधण्यापूर्वी सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे प्लॉटची निवड. प्लॉटच्या उत्तर दिशेला किवा पूर्वेकडे मोठा वृक्ष नाही याची खात्री करतानाच दक्षिणेस खड्डा किवा विहीर नसावी याची दक्षता घ्यावी. प्लॉटचा आकार त्रिकोणी नसावा, चौरस किवा समचतुष्कोण आकार घर बांधण्याकरीता आदर्श मानले जाते.

Vastu Shastra Home Design

वाकडे- तिकडे व अनियमित आकाराच्या प्लॉटवर बांधकाम केल्यास आर्थिक हानी किवा मतभेदात वाढ होण्याची शक्यता असते. मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पूर्व दिशेकडे तोंडवळा असणारे घर शुभ मानले जाते. स्वयंपाक घर मोकळे, हवेशीर असण्यासोबतच त्यांची दिशाही लक्षात घ्यावी.

गृहिणी स्वयंपाक करताना तोंड दक्षिणेकडे नसले म्हणजे झाले. टॉयलेटसची दिशा व जागा ठरवताना विशेष खबरदारी घ्यावी. दक्षिण किवा पश्चिमेस टॉयलेट्स ठेवल्यास योग्यच. उत्तर दिशेकडील प्लॉटही उत्तम. नदी, तलाव, विहिर, झरे प्लॉटच्या पूर्वेस किवा उत्तरेस असावे. घराचा मुख्य दरवाजा किवा प्रवेशद्वार कोणत्या दिशेने असावे यावंर घराचे सौदर्य खुलण्यासोबतच इतरही गोष्टी निगडीत असतात. घराचा मुख्य दरवाजा ईशान्येस असावा.

Vastu Shastra For Home Design

अगदी दुसरा पर्यायच नसला तर पश्चिमेकडे दरवाजा ठेवण्यासही हरकत नाही. घर बांधून काही जागा शिल्लक रहावी याची दक्षता घ्यावी. उत्तर किवा पश्चिमेकडचा भाग मोकळा ठेवल्यास चैतन्यात वाढच होईल.

घर बांधताना काय काळजी घ्याल?

प्लॉट खरेदी केल्यानंतर घर बांधताना आपल्याला खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. प्लॉटच्या चारही बाजूंनी येणारे रस्ते, प्लॉटची लांबी-रूंदी, प्लॉटवर असलेली झाडे आदी गोष्टी लक्षात घेऊन घराचे बांधकाम करावे लागत असते. घर बांधताना वास्तुशास्त्राचा आधार घ्यावा लागत असतो. वास्तुशास्त्रात घर कुठे बांधावे व कुठे बांधू नये, या संदर्भात काही नियम व माहिती सांगितली आहे. ती पुढील प्रमाणे…

* ब्रह्मदेव, विष्णू, सूर्य, शिवशंकर तसेच जैन मंदिरासमोर किंवा मागील प्लॉटवर घराचे बांधकाम करू नये.

* घर बांधताना उत्तर, पूर्व व इशान्य दिशेला अधिक जागा सोडावी. घराच्या छताचा उतारही उत्तर किंवा इशान्य दिशेला केला पाहिजे. घरातील नळ किंवा घराबाहेर केलेली बोअरवेल ईशान्य किंवा नैऋत्य दिशेच्या कोपर्‍यातच पाहिजे.

* खिडक्या पूर्व व उत्तर दिशेला जास्त प्रमाणात ठेवल्या पाहिजेत. दक्षिण दिशेला खिडक्या ठेवू नये. ईशान्य कोपर्‍यात स्वयंपाक खोली ठेवावी. आउट हाऊस नेहमी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला व गाडी ठेवण्याचे शेड पूर्व किंवा उत्तर दिशेला बनवले पाहिजे.

Vastu Shastra Ke Anusar Home Plan

घराचा मुख्य दरवाज्याचेही काही नियम आहेत…

* घराच्या मुख्य दरवाज्यासमोर रस्ता नसावा. दरवाज्यासमोर रस्ता असल्यास आपल्या विकासात बाधा येते.

* दरवाज्यासमोर मोठे झाड असल्याने घरातील मुले नेहमी आजारी पडतात.

* दरवाज्यासमोर नेहमी पाणी वाहते ठेवल्याने नेहमी आर्थिक नुकसान होत असते.

* दरवाज्यासमोर मंदिर असेल तर घरात कधीच सुख नांदत नाही.

* घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्तंभ (खांब) असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडतात.

* जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा खोलगट भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष व्यसनाधीन व नेहमी दु:खात बुडालेला असतो.

* घरासमोर रस्ता, मंदिर असेल तर घरासमोर अधिक जागा सोडल्याने दोष नाहीसे होतात.

* घराचे मुख्य प्रवेशद्वार घरातील इतर दरवाजापेक्षा मोठे असावे.

अंकावरून मिळकत व खर्च ओळखा!

नवीन घर बांधण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी ते आपल्या कसे फायदेशिर ठरेल, हे पाहणे आवश्यक आहे. तसेच आपली मिळकत व होणार खर्च याचे गुणोत्तर काढले पाहिजे.

मिळकत कशी काढाल: सगळ्यात आधी घराचे क्षेत्रफळ काढावे. काढलेल्या क्षेत्रफळाला आठाने भाग द्यावा. जी संख्‍या बाकी राहत असेल त्याला मिळकत समजावी. जर बाकी राहिलेली संख्‍या 1, 3, 5, 7 ह्या पैकी असेल तर घर आपल्याचा सुख, समृध्दी देणारे ठरेल तर 0, 2, 4, 6, 8 ह्या पैकी संख्या बाकी राहत असेल तर हे घर अशुभ ठरू शकते. अशा घराच्या ‘बिल्ट अप एरीया’मध्ये परिवर्तन करता येऊ शकते.

Vastu Shastra For Flat Number

खर्च कसा काढाल: घराचे क्षेत्रफळाला आठाने गुणून त्याला 27 ने भाग द्यावा. ही संख्‍या आपल्या घराचे गृह नक्षत्र दर्शवते. या संख्‍येला पुन्हा आठाने भाग भाग दिल्याने बाकी उरलेली संख्‍या म्हणजे ‘खर्च’. जर खर्चापेक्षा मिळकतीची संख्या अधिक निघाली तर आपण खरेदी किंवा बांधत असलेले नवीन घर आपल्यासाठी शुभ मानले जाते. जर मिळकत व खर्चाची संख्या सारखीच निघाली तर या घरात आपली उन्नती कदापी शक्य नाही, असे समजावे. अशा घराच्या बांधकामात परिवर्तन करणे आवश्यक असते.

उदाहरण :
मिळकत अशी काळावी-
एका घराचे क्षेत्रफळ 997 वर्गफूट आहे. या घराची मिळकत अशी काढता येईल.

997 या संख्येला आठाने भागले तर 7 बाकी राहते.
7 ही संख्या मिळकत समजावी. घर आपल्यासाठी शुभ आहे.

खर्च असा काळावा-
क्षेत्रफळ – 997 वर्गफूट
997 या संख्येला 8 ने गुणावे. 7976 ही संख्या येते.
7976 या संख्येला 27 भागावे. बाकी 11 येते

वर पाहिलेल्या उदाहरणामध्ये मिळकती पैक्षा खर्चाची संख्या मोठी आली. त्यामुळे घर आपल्यासाठी अशुभ ठरणार आहे. अशा घरात व्यक्तीची उन्नती होत नाही. नवीन घर खरेदी करताना किंवा बांधताना सगळ्या गोष्टीचा विचार करणे आवश्यक असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here