Vastu Plant In Marathi | या वृक्षाचे मूळ धारण करा, ऐश्वर्य संपन्न व्हाल | Dhan Prapti Mantra Upay

0
32
Benefits Of Madar

Vastu Plant In Marathi | या वृक्षाचे मूळ धारण करा, ऐश्वर्य संपन्न व्हाल | Dhan Prapti Mantra Upay

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला गरिबी दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीना आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी रुईच्या झाडाचा एक असा प्रयोग सांगणार आहोत कि जो प्रयोग करायला अत्याधिक सोपा असला तरी याचे परिणाम फारच चत्कारिक असे आहेत.

मित्रानो गरिबी दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीना आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी रुईच्या झाडाचा प्रयोग अगदी प्राचीन काळापासून करण्यात येतो. रुईच्या झाडाला मंदार किंवा आर्क अशा विविध नावांनी महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात ओळखले जाते. आपल्या घराच्या आसपास, शेतातील बांधांवर, रस्त्याच्या कडेला हे झाड तुम्हाला नक्की दिसेल. या झाडाच्या मुळांचा वापर करून अनेक तांत्रिक क्रिया केल्या जातात.

धर्मशास्त्रानुसार रुईचे झाड हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. तसेच या झाडात देवांमध्ये प्रथमेश गणपती बाप्पा म्हणजेच श्रीगणेश वास करतात अशीही मान्यता आहे. रुईच्या झाडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात शाम रुई आणि श्वेत रुई. शाम रुई कशी ओळखणार तर याची फुले थोडीशी निळसर रंगाची असतात तर श्वेत, श्वेत म्हणजे पांढरी किंवा पांढ-या रंगाची फुले येतात आणि तांत्रिक क्रियांमध्ये श्याम आणि श्वेत यांपैकी श्वेत रुई चा वापर हा हमखास केला जातो.

आज आपण जो प्रयोग करणार आहोत, जो टोटका आपण करायचा आहे गरिबी दूर करण्याचा त्यासाठी आपल्याला श्‍वेत मांदार म्हणजेच या पांढऱ्या रुई चा फुलांचा वापर करायचा आहे. लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचे टोटके करताना, तोडगे करताना, उपाय करताना त्याची एक विशिष्ट अशी भीती असते नियम असतात आणि त्या नियमानुसार जर हे तोडके आपण केले तर त्याचं फळ आपल्याला निश्चित स्वरूपात प्राप्त होत असतात

मित्रानो आजचा हा घरातील गरिबी दूर करण्याचा टोटका अत्यंत साधा सोपा आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या जवळपास किंवा अगदी कुठेही माळरानावर असेल तरीही चालेल असं एक श्वेत म्हणजे पांढऱ्या रुईचे झाड शोधायचा आहे. जे खूप जुनं असेल कमीत कमी अकरा ते बारा वर्षाचे झाड असायला हवं. एवढ्या काळामध्ये या झाडाचे खोड असते ते अगदी मजबूत झालेलं असतं

आणि अशी मान्यता आहे की अकरा वर्षांनंतर या श्वेत रुईच्या मुळामध्ये भगवान श्री श्रीगणेशांना चा वास निर्माण होतो त्यांची प्रतिमा आपोआप त्या ठिकाणी निर्मित होते. बाजारात सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे श्वेतार्क म्हणजेच पांढऱ्या रुईच्या मुळांपासून निर्मित श्वेतार्क गणेश प्रतिमा नक्की मिळतील. पण त्या ओरिजिनल आहेत की नाहीत खरोखर त्या श्वेतार्क म्हणजे या पांढ-या रुईच्या मुळापासूनच निर्मिलेल्या आहेत याची खात्री करा आणि जर गणेश प्रतिमा असेल तर ही प्रतिमा आपण खरेदी करून चांगल्या मुहूर्तावर ती आपण आपल्या घरी घेऊन या.

आपण आपल्या घरामध्ये गणपतींची स्थापना करतो त्या वेळी जरी आपण हा उपाय केला तर अत्यंत शुभ परिणाम होतात. घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते. आजचा आपला उपाय हा श्वेतार्क गणेश प्रतिमेचा नाहीये. आज आपण पाहणार आहोत की या झाडाच्या मुळाचा तुकडा आपल्याला कशा प्रकारे करोडपती बनवू शकतो. आणि ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवत नाही मग आपण करोडपती कस बनणार.

मित्रांचा पूर्ण विश्वासाने आपण काही गोष्टी केल्या तर त्याचे फळ आपणास नक्की मिळतं, करोडपती देखील. आपण त्याहीपेक्षा श्रीमंत ऐश्वर्यसंपन्न बनवू शकता. आपण करायचं काय आहे आपण आपल्या जवळपासच्या पांढऱ्या रुईच्या झाडाचा शोध घ्यायचा आहे. हा उपाय आपल्याला रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्राला करायचा आहे, यासाठी एखाद्या कॅलेंडर मधील पंचांग आपण पाहू शकता. आणि ज्या रविवारच्या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र असेल तर अशा शुभ संयोग असेल,

आपण त्याच्या एक दिवस आधी या झाडाजवळ जायच आहे. रुईच्या झाडाला मनोभावे हात जोडायचे आहेत व प्रार्थना करायची आहे. त्या ठिकाणी जाताना आपल्या घरातलं तांब्याभर पाणी घेऊन जायच आहे. लक्षात घ्या आपल्या घरातल तांब्याभर पाणी सोबत हळदी कुंकू, थोड्या अक्षता, फुले घेऊन गेला तरी चालेल. तर ही सर्व सामग्री घेऊन आपण रुईच्या झाड जवळ जायचे आहे. रुईच्या झाडाला पाणी, हळद कुंकू, अक्षत, फुले वाहायची आहेत.

आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करायचे आहे की हे आपले जे मूळ आहे ते आमच्‍या घरी, आमच्या वास्तूमध्ये घेऊन जात आहोत. आमच्या सोबत घेऊन जात आहोत आमच्या जीवनात आपण प्रवेश करावा आणि आमच्या घरात जी काही दरिद्रता आहे, गरिबी आहे, कंगाली आहे, अलक्ष्मी आहे ती दूर करण्यासाठी आम्हाला साह्य करावे मदत करावी. आपल्या कृपेने आमच्या घरात लक्ष्मीचा वास व्हावा, आमचं घर धनधान्याने स्वयंपूर्ण व्हावे.
आम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे रविवारी पुष्य नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर आपल्याला आमच्या घरी घेऊन जाण्यास नक्की येऊ त्यावेळी आपण आमच्या सोबत येण्याची कृपा करावी अनेक लोक म्हणतील की झाडाला आहे आपण कसं बोलू शकतो.

मित्रांनो जगदीश चंद्र बोस खूप मोठे वैज्ञानिक होऊन गेले, शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी असा शोध लावला होता की झाडांनासुद्धा, वनस्पतींना सुद्धा भावना आहेत आणि त्यामुळे जर आपण विज्ञानवादी असाल तर प्रत्येक गोष्टीकडे एका चिकित्सक वृत्तीने नक्की पहात असाल, तर या ठिकाणी अंधश्रद्धा वगैरे कोणत्याही गोष्टी नाहीत. झाड सजीव आहे त्याच्यामुळे जीव आहे, चेतन आहे आणि आपण अशाप्रकारे जेव्हा त्या झाडास प्रार्थना करतो आवाहन करतो तर मित्रांनो हे आवाहन शक्यतो आदल्या दिवशी सायंकाळी म्हणे सूर्यास्त समयी आपण करावं.

आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाबरोबर स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण या श्वेतार्क वनस्पती जवळ जावं आणि या वनस्पतीला कोणत्याही प्रकारे नुकसान न पोहोचवता तिच्या मुळाचा छोटासा तुकडा आपण कट करून, तोडून आपल्यासोबत घेऊन यावा. आपल्या घरी घेऊन आल्यानंतर घरात गंगाजल असेल तर त्या गंगाजलाने हा तुकडा व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. गंगाजल नसेल तर अगदी साध्या पाण्याने तरी हा तुकडा स्वच्छ केला तरीही चालेल. त्यानंतर एका लाल रंगाच्या कपड्याच्या वरती हा तुकडा आपण ठेवायचा आहे आणि एक तावीज आपल्याला लागेल.जो आपण दंडावरती धारण करतो किंवा गळ्यामध्ये धारण करतो.

असा एक ताबीज आपल्याला लागणार आहे, जर तुमच्याकडे ताबीज नसेल तर काळजी करू नका, आपण त्या लाल रंगाच्या कपड्यात व्यवस्थित गुंडाळून, मात्र गूंडाळण्यापूर्वी पूर्वी त्याला धूपदीप दाखवावा, एक दिवा प्रज्वलित करा, दोन अगरबत्ती लावा, मनोभावे प्रार्थना करा की आपण आमच्या घरात प्रवेश केला आहे. घर धनधान्याने परिपूर्ण व्हावे, आम्ही ऐश्वर्यसंपन्न व्हावं अशी प्रार्थना कर आणि लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकता.

मात्र आमचा सल्ला असेल की तिजोरीमध्ये ठेवण्याऐवजी आपण ताबीज मध्ये तो तुकडा घालावा आणि हा ताबीज आपल्या उजव्या दंडावरती धारण करावा. महिला असतील, पुरुष असतील त्यांनी उजव्या दंडावरती हा ताबीज आपण धारण करावा. जी व्यक्ती हा ताबीज हातात धारण करते तिच्याकडे लक्ष्मी ओढली जाते, खेचली जाते. म्हणून मनोभावे हा उपाय करून पहा. विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here