Vastu For Tulsi Plant | भाग्योदयासाठी तुळशीच्या झाडाखाली उगविलेले हे रोप लगेच तोडून घ्या | Dhan Yog

0
65
Dhan Yog

Vastu For Tulsi Plant | भाग्योदयासाठी तुळशीच्या झाडाखाली उगविलेले हे रोप लगेच तोडून घ्या | Dhan Yog, Tulsi Se Bhagyoday

नमस्कार मित्रानो, आज जो उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत, हा उपाय फारच छोटा,साधारण परंतु अत्यंत गुणकारी आणि प्रचंड लाभ देणारा उपाय आहे. या उपायाने आपले घर धन धान्याने भरून जाईल. मित्रानो आपण पहिले असेल कि माता भगवंतींच्या उपासने साठी आपण घट स्थापना करतो त्या घटामध्ये आपण धान्य पेरतो आणि जेंव्हा ते बीज अंकुरूत होऊन उगवतात, त्यांनाच आपण माता भगवतीचे स्वरूप मानतो. आपण मानतो कि माता भगवतीची शक्ती यांच्यामध्ये आहे. कारण हा घट आपण तिथे स्थापित केलाय जिथे आपण माता भगवतीची पूजा करतो, मंत्र पाठ करतो. जिथे बसून आपण संकल्प केला आहे, जिथे बसून आपण भगवतीचे स्मरण केले आहे. जिथे बसून आपण भगवतीचे ध्यान केले आहे.

Tulsi Se Bhagyoday

मित्रानो जिथे बसून आपण माता भगवतीचे ध्यान करतो, त्या ठिकाणी एक अशी आभा निर्माण होते जी आभा आपण सामान्य नजरेने नाही पाहू शकत. परंतु एक अदभुद अशी शक्ती आपोआप तिथे निर्माण झालेली असते. ते ठिकाण आणि त्याच्या आजूबाजूची जागा फारच पवित्र आणि पॉवरफुल बनते.

Jyotish Upay In Marathi

तर मित्रानो आपण ऐकले असेल कि तुळशीच्या झाडाखाली आणि तिच्या आसपास कचरा करू नये, तसे केल्यास पाप लागते. का? तर जिथे देखील तुळशी असेल, पिंपळ असेल किंवा कोणतीही पूजनीय वृक्ष असेल त्याच्या आसपास स्वच्छता असणे, सजदा असणे फार महत्वाचे असते. त्या वृक्षांची आभा त्या परिसरामध्ये असते. जी त्या परिसराला शुद्ध आणि पवित्र बनविते. असे मानले जाते कि तुळशीच्या झाडाजवळ, पिंपळाच्या झाडाजवळ, कडू निंबाच्या झाडाजवळ कचरा केल्याने आपल्यालाच पाप लागते.

Vastu For Tulsi Plant

याचप्रमाणे आपल्या घरामधील जे देवी देवता असतील तिथे देखील नेहमी साफसफाई ठेवली पाहिजे, तिथे बसून शुद्ध आणि पवित्र असे मंत्र पठण, स्त्रोत्र पठण, ध्यान धारणा केली पाहिजे. असे केल्याने त्यामध्ये शक्ती जागरीत होते. आपण जर तार्किक रित्या जरी पहिले तरी आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीच्या झाड जवळ दिवा लावतो, अगरबत्तीच्या दाखवितो. आपण आपल्या श्रद्धेने तुळशी मातेला जल अर्पण करतो. म्हणजेच जेंव्हा तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ जात तेंव्हा तुमच्यामध्ये एक प्रकारची सात्विक शक्ती असते. तुमच्यामध्ये एक दैविक शक्ती असते. त्यावेळेला तुमच्या मध्ये त्या सर्व भावना असतात ज्या तुमच्या भल्यासाठी आहेत. त्या सर्व इच्छा तुमच्यामध्ये असतात, जशा कि माझं भलं होउदे, माझ्या परिवाराचे भले होउदे, माझी बिघडलेली कामे होऊदेत, माझ्या परिवाराची प्रगती होउदे, ज्या काही समस्या तुमच्या जीवनामध्ये असतील त्या समस्यांचे समाधान होण्याबद्दल तुम्ही विचार करीत असता.

Tulsi Plant As Per Vastu

म्हणजेच जेंव्हा तुम्ही तुळशीची पूजा करता, तेंव्हा एक दैविक शक्ती आपसूकच तुमच्यामध्ये विद्यमान असते. तर मित्रानो आपल्या घरामधील तुळशीचे जे झाड आहे त्याच्या आजूबाजूने कोणतेही दुसरे रोप किंवा गवत उगवले असेल, अगदी कसलेही दुसरे रोप उगविले असेल. तर मित्रानो लक्ष्यात घ्या कि ते रोप हे आपल्या इच्छांचेच रूप असेल, तुळशीच्या झाडाजवळ जर का एखादे गवत किंवा रोप जर आले असेल तर ते रोप आपल्या तमाम इच्छांना घेऊन मातीला भेदून वर आले आहे, उगविले आहे, ते रोप ते गवत आपल्या तमाम इच्छांची पूर्ती करू इच्छिते.

Tulsi Plant Vaastu

तर आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला पाहायचे आहे कि आपल्या घरामध्ये तुळशीच्या झाडाजवळ, तुळशीच्या कुंडीमध्ये असे एखादे छोटे-मोठे रोप उगविले आहे, तेथे वाढत आहेत. तर आपण त्याला प्रार्थना करायची आहे कि आपण माझ्या घरामध्ये प्रवेश करावा, माझ्या घरामधील धन स्थानामध्ये आपण प्रवेश करावा, आणि तिथे राहून आपण माझ्या पूर्ण परिवाराला शुभ आशीर्वाद द्यावेत, माझ्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. एक दिवस आधी आपण हि प्रार्थना करावी. त्या रोपाला अगरबत्ती लावावी, थोडे जल अर्पण करावे. थोडे तांदूळ अर्पण करावेत.

Tulsi Plant Positive Energy

आणि यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ते रोप मुळासकट काढावे अगदी जमिनीच्या आतून मुळासकट बाहेर काढावे , व हे रोप घेऊन आपल्या घरामध्ये यायचे आहे. घरामध्ये आल्यानंतर त्या रोपाला आपण स्वच्छ पाण्याने धुवायचे, त्याला साफ करायचे आहे. साफ करून झाल्यावर या रोपाला आपल्याला आपल्या पूजास्थानावर किंवा देवघरामध्ये ठेवायचे आहे. पूजास्थानी हे रोप ठेवल्यानंतर त्याला हळद, कुंकू वाहावे, तुपाचा दिवा लावावा व धूप अगरबत्तीच्या दाखवावी. आणि यानंतर आपण त्या रोपाला आपण प्रार्थना करायची आहे. माझ्या या-या समस्या आहेत, मी या समस्यांनी घेरले गेलो आहे, आपण माझ्या या समस्यांचे समाधान करावे. माझ्या जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण होउदे.

Dhan Yog In Astrology

ज्या काही आपल्या समस्या असतील त्या तुम्ही या रोपासमोर बोलायच्या आहेत. असा विचार करू नका कि मी या छोट्याश्या रोपाला प्रार्थना कशी काय करू? सीतामातेने देखील रावापासून सौरक्षण करून घेण्यासाठी एक छोटासा तुकडाच उचलला होता व त्या तूआकड्याने माता सीतेचे रावणापासून रक्षण केले होते. मित्रानो आपल्या भावनेमध्ये शक्ती असते, आपल्या श्रद्धेमध्ये आपल्या विश्वासामध्ये असते. ज्या वस्तूला जेवढे महत्व द्याल ती वस्तू तेवढीच पॉवरफुल बनते आणि आपल्या जीवनामध्ये तसा परिणाम दर्शविते. तर आपल्याला अशा रीतीने या रोपाची पूजा करायची आहे.

Best Direction For Tulsi Plant

पूजा करून झाल्यानंतर आपण हवं तर हे रोप आपल्या पाकिटामध्ये ठेऊ शकता अथवा आपल्या धन स्थानी ठेऊ शकता. जिथे आपल्याला योग्य वाटेल अशा ठिकाणी ठेऊ शकता. जर आपल्याला वाटते कि आपल्या घरावर, आपल्या परिवारावर आपल्या शत्रूने काही नकारात्मक प्रयोग केला आहे तर तुम्ही हे रोप तुमच्या घराच्या मुख्य चौकटीच्या वर बांधू शकता.

Tulsi Vrindavan Vastu Shastra

हे रोप आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपण कुठेही हे रोप ठेऊ शकता. जर पिवळे कापड नसेल तर आपण पिवळा कागद हि वापरू शकता. पिवळा कागद हि नसेल तर पांढऱ्या कागदाला हळदीमध्ये पाणी मिसळून पिवळे करून घ्या व त्यामध्ये हे रोप ठेवा. मित्रानो हा उपाय आपण अवश्य करून पहा. आपण अनुभवाला कि याचा लाभ फारच उत्तम नव्हे तर अत्यंत उत्तम प्रकारे आपल्याला मिळत आहे. यामुळे आपल्या जीवनामध्ये फारच चांगले परिवर्तन येईल. मोठे परिवर्तन येईल. मित्रानो या उपायाचे परिणाम अगदी तीवर गतीने प्राप्त होतात व जास्तीत जास्त ७ दिवसांच्या आत याचे लाभ आपल्याला मिळायला लागतात.

Tulsi Vastu Shastra In Marathi

सात दिवसांमध्ये हे रोप आपला कमाल दाखवते. आणि आपल्या इच्छांची पूर्ती करते. याचा लाभ आपल्याला नक्की होईल. विडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here