Varuthini Ekadashi Vrat Katha 2021 | वरूथिनी एकादशी, वैशाख कृष्ण एकादशी | Varuthini Ekadashi Dhan Prapti Upay

0
42
Varuthini Ekadashi Vrat

Varuthini Ekadashi Vrat Katha 2021 | वरूथिनी एकादशी, वैशाख कृष्ण एकादशी | Varuthini Ekadashi Dhan Prapti Upay

नमस्कार मित्रानो, मित्रानो वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हंटले जाते. हि एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, सर्व पापातून मुक्त करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी एकादशी आहे. चला तर मग जाणून घेऊया वरुथिनी एकादशी चे माहात्म्य काय आहे.

Varuthini Ekadashi Lakshmi Prapti Upay

प्राचीन काली नर्मदा नदीच्या किनारी मांधाता नावाचा राजा राज्य करीत होता. तो अत्यंत दानशूर आणि तपस्वी होता. मांधाता राजा एके दिवशी जंगलामध्ये तपस्या करीत असताना अचानक तिथे एक जंगली अस्वल येते, व ते अस्वल राजाच्या पायाला चावायला लागते. परंतु राजा मांधाता एकाग्र चित्ताने आपल्या तपस्येमध्ये मग्न राहतात, आणि ते अस्वल राजा मांधाताना ओढत जवळच्याच घनदाट जंगलामध्ये घेऊन जात. त्यामुळे राजा मांधाता फार घाबरतो. पण ते त्या अस्वलावर क्रोध आणि हिंसा न करता तपस्या धर्माला अनुसरून भगवान विष्णूंची प्रार्थना करतात. करून भावाने भगवान विष्णूंना विनवितात. त्यांची विनवणी ऐकून भगवान विष्णू प्रकट होतात आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्या अस्वलाला मारून टाकतात.

वारुथिनी एकदशी सौभाग्यप्राप्ति उपाय मराठीत

पण या दरम्यान राजा मतांधाचा पाय अस्वलाने खाल्लेला असतो त्यामुळे राजा फार दुखी होतो. ते पाहून भगवान विष्णू त्याला म्हणतात हे राजा मांधाता तू दुखी होऊ नकोस, तू शोक नकरता मथुरेला जा आणि तिथे वरूथिनी एकादशी चे व्रत करून माझ्या राह अवतार मूर्ति ची पूजा कर. य व्रताच्या प्रभावाने तू पुन्हा सदृढ शरीराचा होशील. त्या अस्वलाने तुझा जो पाय खाल्ला तो तुझ्या पूर्वजन्मांच्या अपराधाचे फळ होते.

Varuthini Ekadashi Dhan Prapti Upay

भगवान विष्णूंची आज्ञा मानून राजा मांधाताने मथुरेमध्ये जाऊन श्रद्धापूर्वक वरूथिनी एकादशीचे व्रत केले. त्याच्या प्रभावाने राजा पूर्ववत सुंदर आणि संपूर्ण अंगांचा झाला. आणि याच एकादशीच्या प्रभावाने राजा मान्धाताला स्वर्गामध्ये स्थान प्राप्त झाले. जो कोणी व्यक्ती भयाने पीडित आहे, त्या व्यक्तीने वरूथिनी एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूंचे स्मरण केले पाहिजे. हे व्रत करण्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते.

वारुथिनी एकदशी सौभाग्यप्राप्ति उपाय

वरूथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्याचे भगवान विष्णू सर्व प्रकारच्या संकटापासून सौरक्षण करतात. या दिवशी भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा केली जाते. या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायांनी दुर्भाग्य दूर होऊन, धन, वैभव, सुख, संपत्ती, आरोग्य, ऐश्वर्य यांची प्राप्ती होते. चला तर मग जाणून घेऊया वरूथिनी एकादशीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायानं विषयी.

 1. वरूथिनी एकादशीच्या दिवशी पांढरे अथवा पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीचा भाग्योदय होतो.
 2. वरूथिनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल भरून भगवान विष्णूंचा अभिषेक केल्याने व्यक्तीचे दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलते. घरामध्ये खुशहाली येते.
 3. जर का आपण धनप्राप्तीची कामना करत असाल तर वरूथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या समवेत माता लक्ष्मीचेही पूजन करावे, यामुळे आपल्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतात.
 4. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे वरूथिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावे. असे करण्याने घरामध्ये सकारात्मकता वाढते. आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात.
 5. वरूथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची माळा अर्पित करावी, भगवान विष्णूंना तुळशी अत्याधिक प्रिय आहे, त्यामुळे तुळशीची माळा अर्पित करण्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.
 6. ज्यांना आपल्या उत्पनाचे स्रोत वाढवायचे आहेत अशा लोकांनी वरूथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची पाने अर्पित करावीत. कारण तुळशीच्या पानांच्या शिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. तुळशीची पाने अर्पित केल्याने त्याव्यक्तीची प्रगती होते.
 7. ज्यांचे मन अशांत राहते किंवा कोणत्याही कामामध्ये लागत नाही अशा लोकांनी वरूथिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची माळा आपल्या गळ्यामध्ये धारण करावी. असे केल्याने त्यांचे मस्तिष्क शांत राहते व कामामध्ये मन एकाग्र होते.
 8. वरूथिनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या अन्नाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला जीवनामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही.
 9. वरूथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना मनुके ज्याला आपण बेदाणे असेही म्हणतो तर ते मनुके आणि भिजवलेली चण्याची डाळ अर्पण करावी. असे करण्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते व आपली सर्व कामे पूर्ण होऊ लागतात.
 10. वरूथिनी एकादशीच्या दिवशी एखाद्या वयस्कर व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला भोजन दिल्याने पुण्याची प्राप्ती होते. यामुळे व्यक्तीवर येणारी संकटे नष्ट होतात.
 11. ज्यांच्या घरामध्ये बरकत होत नाही, अशा लोकांनी वरूथिनी एकादशीच्या दिवशी आपल्या घराच्या कोपऱ्यांमध्ये थोडी-थोडी पिवळी मोहरी ठेवावी. आणि हि कोपऱ्यांमध्ये ठेवलेली पिवळी मोहरी दुसऱ्या दिवशी आपण जाळून टाकावी. असे करण्याने घरामधील नकारात्मकता नष्ट होते. घरावरील नजर दोष नष्ट होतो.
 12. ज्या लोकांच्या लग्नामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, बाधा येत आहेत, अशा लोकांनी या दिवशी फलाहारी व्रत केले पाहिजे तसेच पिवळ्या रंगाच्या अन्नाचे भोजन केले पाहिजे व वरूथिनी एकादशीच्या कथेचा पाठ केला पाहिजे. असे करण्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. व आपल्या मनोकामनांची पूर्ती होते.

Varuthini Ekadashi Vrat Katha

तर मित्रानो हे होते वरूथिनी एकादशीचे माहात्म्य, व्रत आणि त्या दिवशी करायच्या उपायानं विषयीची माहिती. या उपायांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपण सर्वाना प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. विडिओ कसा वाटला अवश्य कळवा, धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here