This Actress Trying to Come Back Television Industry : After Marriage She Loss Her Place in Industry | टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये परत येण्याचा प्रयत्न करणारी ही अभिनेत्री: लग्नानंतर तिने इंडस्ट्रीमधील आपले स्थान गमावले

0
31
Actress Mahi Vij
Actress Mahi Vij

This Actress Trying to Come Back Television Industry : After Marriage She Loss Her Place in Industry | टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये परत येण्याचा प्रयत्न करणारी ही अभिनेत्री: लग्नानंतर तिने इंडस्ट्रीमधील आपले स्थान गमावले

कधीकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली माही आज अभिनयसृष्टीत कार्यरत नाही. लग्न केल्यामुळं रातोरात तिच्या करिअरला उतरती कळा लागली.

मुंबई 1 एप्रिल: ‘कैसी लगी लगन’ (Kaisi Laagi Lagan) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली माही वीज (Mahhi Vij) ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. आज माहीचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र कधीकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली माही आज अभिनयसृष्टीत कार्यरत नाही. लग्न केल्यामुळं रातोरात तिच्या करिअरला उतरती कळा लागली. अनेक निर्मात्यांनी तिला काम देण्यास नकार दिला.

वाचाः Daily horoscope 1 April 2021 Thursday | रोजचे राशी भविष्य ३१ मार्च 2021 गुरुवार

नेमकं काय घडलं माहीच्या करिअरमध्ये?

माहीनं 2011 साली अभिनेता जय भानूशालीसोबत गुपचूप लग्न केलं. लग्न केल्यानंतर एक वर्षांनी याबाबत तिनं आपल्या चाहत्यांना सांगितलं. लग्नानंतर तिच्या वेळापत्रकार बराच बदल झाला. तिनं मालिकांमध्ये ओव्हरटाईम करणं थांबवलं. अर्थात कौटुंबीक जबाबदारी पार पाडणं हा त्यामगचा उद्देश होता. पण त्यामुळं दिग्दर्शकांसोबत तिचे खटके उडू लागले. त्यामुळं तिनं काही काळ अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जवळपास तीन वर्षानंतर तिनं बालिका वधू या मालिकेतून पुनरागमन केलं. परंतु निर्मात्यांनी तिला मुख्य भूमिका देण्यास नकार दिला. कारण तो पर्यंत नव्या अभिनेत्री प्रकाशझोतात आल्या होत्या. सतत सहाय्यक भूमिका करणं तिला आवडत नव्हतं त्यामुळं तिनं मालिकांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. कधीकाळी आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री सध्या बेरोजगार आहे.

वाचाः ८१९ रुपयांचा गॅस सिलिंडर, ११९ रुपयांत खरेदी करा, जाणून घ्या मस्त ऑफर

माहिनं २००७ साली ‘अकेला’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं ‘शू… कोई है’, ‘शुभ कदम’, ‘रिश्तों से बडी प्रथा’ यांसारख्या मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारल्या. दरम्यान ‘कैसी लगी लगन’ या मालिकेमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. मालिकांसोबतच तिनं ‘झलक दिखलाजा’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी नाईट्स’ यांसारख्या काही रिअॅलिटी शोमध्ये देखील काम केलं आहे.

वाचाः ८१९ रुपयांचा गॅस सिलिंडर, ११९ रुपयांत खरेदी करा, जाणून घ्या मस्त ऑफर

वाचाः १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रेशनकार्डसाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज

वाचाः स्मार्ट वॉशिंग मशीन लॉन्च, क्षमता १० किलो, पाहा किंमत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

या दिशेला घड्याळ लावल्याने नशिबाची दारे उघडतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here