Shubh Ank Jyotish | सर्व मनोकामना पूर्ण करणारा शक्तिशाली अंक (Marathi) शुभ अंक ज्योतिष

0
119
lucky number astrology

Shubh Ank Jyotish | सर्व मनोकामना पूर्ण करणारा शक्तिशाली अंक (Marathi) शुभ अंक ज्योतिष

१०८, अंक शास्त्रातील 108 या अत्यंत महत्त्वपूर्ण पावरफुल शक्तिशाली संख्ये विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रानो 108 या संख्येचा वापर करून खरं तर ही संख्या एका विशिष्ट स्थळी लिहून आपण आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणू शकता. आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ही मनोकामना 108 या संख्येच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करून घेता येते, अनेक लोकांना आश्चर्य वाटेल की केवळ 108 ही संख्या लिहून 108 हा अंक लिहून इच्छापूर्ती कशी करता येईल.

lucky number as per birth date

मित्रांनो या निसर्गामध्ये या प्रकृतीमध्ये इतकी रहस्य आहेत इतक्या गुप्त शक्ती लपलेल्या आहेत की तिथपर्यंत अजूनही मानवाची किंवा आधुनिक विज्ञानाची पोहोच गेलेली नाही.आधुनिक विज्ञान अजून ही तिथपर्यंत पोहोचलेलं नाही. काही वस्तू, काही पदार्थ इतके महाशक्तिशाली असतात की त्यांचा योग्य वापर केला तर त्यातून मानवाचं कल्याण अवश्य होऊ शकतं. आपण अनेक आणिक साधुसंतांना महातपस्वी पुरुषांना पाहिले असेल असेल की ज्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर अगदी अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखविलेल्या आहेत.

मित्रानो या साधू संतांकडून, या महान तपस्वी पुरुषांकडून, मुलींकडून जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टी प्राप्त होतात तेव्हा त्या पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि निष्ठेने आपण ग्रहण करायला हव्यात. हि श्रद्धा, हा विश्वास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आधुनिक विज्ञानानेही जी सकारात्मक, जी पॉझिटिव्ह एनर्जी मान्य केलेली आहे, ती पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे विश्वास. आणि या पॉझिटिव्ह एनर्जीच्या बळावरच कोणत्याही प्रकारचे उपाय हे सिद्ध होत असतात. मित्रांनो आपल्या या सर्व गोष्टी समजावून सांगण्याचा हेतू केवळ इतकाच आहे की आपण जो काही उपाय करत आहे तो उपाय, त्या उपाया प्रति आपली श्रद्धा आपला विश्वास दृढ व्हावा.

lucky number as per hindu astrology

108 ही जी संख्या आहे, मित्रांनो आपण ऐकल असेल की कोणत्याही प्रकारच्या मंत्राचा जप, जर आपण 108 वेळा केला तर त्या मंत्राची शक्ती जागृत होते व तो मंत्र स्वतः जागृत बनतो. आपण एका विशिष्ट सिद्धीच्या जवळ पोहचतो. कोणताही काम असेल, ते काम तुम्ही 108 वेळा सातत्याने केलं तर ते काम पूर्णत्वास जात. त्या कामामध्ये एक प्रकारचा सराइतपणा येतो. सायकोलॉजि म्हणजेच मानसशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेल आहे की मानवी मनाच्या ज्या भावना आहेत त्या एकशे आठ प्रकारच्या आहेत. मित्रांनो हि 108 संख्या नक्की आली कुठून.

Astrological Lucky Numbers

आपल्याला माहित असेल संपूर्ण मानवजातीच ज्योतिष शास्त्राने बारा राशींमध्ये वर्गीकरण केलेले आहे. संपूर्ण मानवजात बारा राशींमध्ये विभागलेली आहे. मेष, तुळ, कन्या, सिंह, मिथुन, अशा बारा राशी आहेत आणि या राशींवर नवग्रहांचा प्रभाव पडत असतो. जे नऊ ग्रह या सौर मंडलात आहेत. या नऊ ग्रहांचा प्रभाव या बारा राशींवर पडतो आणि त्यातून जे काही उत्पन्न होत ते आहे १०८. ती आहे १०८ हि संख्या. १२ आणि ९ चा गुणाकार आहे १०८. मित्रानो अत्यंत पॉवरफुल संख्या आणि या १०८ मध्ये १, ० आणि ९ यांची बेरीज ९ येते आणि ९ या अंकाला पूर्ण अंक मानला जातो. हा नऊ अंक मंगळ ग्रहाची संबंधित आहे.

जेव्हा जेव्हा ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत असतो उच्चस्थानी असतो तेव्हा तेव्हा मित्रांनो प्रॉपर्टी असेल मालमत्ता असेल धन पैसा असेल मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी निर्माण होते. या मंगळ ग्रहाचा मानवी शरीराशी जर आपण संबंध पाहिला तर सर्वात जवळचा संबंध आपल्या रेड बस ब्लड सेल्स लाल रक्तपेशी असतात. ज्यांना आपण रक्त असं म्हणतो किंवा जी आपली पचनसंस्था आहे, जे आपलं पोट आहे या शरीराच्या भागांवर मंगळ ग्रहाचा जबरदस्त प्रभाव असतो.

lucky number astrology today

मित्रानो आजचा आपला हा उपाय सायंटिफिक आहे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला उपाय आहे. आपण एकदा हा उपाय करून पाहा, आपण हा उपाय सातत्याने करा. जोपर्यंत तुमची इच्छा तुमची मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत सातत्याने करा. बऱ्याचदा असं होत कि आपण उपाय अर्धवट करतो, एक दोन दिवस करतो आणि सोडून देतो. हा उपाय लगातार काही दिवस करून पाहतो पर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही. अगदी विश्वासाने करा. मित्रांनो हा उपाय आपण रात्री करू शकता. रात्री झोपताना, रात्री करणे शक्य नसेल तर दिवसा केला तरीही चालेल. मात्र दिवसा केल्यानंतर पाच ते दहा मिनिटे आपण अगदी ५ ते १० मिनिटे झोपण्याच्या स्थितीत म्हणजे निद्रिस्त अवस्थेत पडून राहायला हवं. रात्री केलात तर अति उत्तम आहे, नक्की काय करायचं आहे.

मित्रानो 108 ही जी संख्या आहे ती आपल्याला लिहायची आहे. ती लिहिण्यासाठी बाजारामध्ये मोहरीचं तेल मिळेल याला हिंदीत सरसों का तेल असं म्हणतात. तंत्रशास्त्रात या तेलाचा फार मोठं महत्व आहे. तर असं मोहरीचं तेल थोडंसं घेऊन या, नसेल मिळत तर चमेलीच तेल वापरलंत तरी चालेल. आणि लालभडक असणार कुंकू, बाजारामध्ये केमिकलयुक्त कुंकू सध्या मिळत आहेत त्या कुंकवाचा काही उपयोग नाही. ओरिजनल लालभडक रंगाचा कुंकू आपण घ्यायच आहे आणि मित्रांनो तांबे या धातूची छोटीशी एक काडी आपल्याला लागणार आहे.

या काडीचा उपयोग काय? तर या काडीने आपण 108 ही संख्या लिहिणार आहोत. तांबे या धातूपासून धातू पासून बनलेली काडी. हि काडी तुम्हाला तुमच्या जवळपास थोडासा शोध घ्या, हे पहा काही गोष्टी प्राप्त करायचा म्हटल्यानंतर थोडीशी हालचाल हि करायलाच हवी, तशी धावपळ करायला हवी. तांब्याची काडी अगदी सहज मिळून जाईल. तर ही तांब्याची छोटीशी काडी आपण घ्यायची आहे, आणि या काडीने आपण १०८ हा अंक लिहिणार आहोत. तांबे का? तर मित्रांनो तांबे या धातूचा संबंध सुद्धा या मंगळाशी फार जवळचा आहे.

Lucky Numbers for 12 Zodiac Signs 2021

आपण या मंगळास मजबूत बनविणार आहोत. तर मित्रानो कोणत्याही दिवशी, आठवड्यातील अगदी कोणत्याही दिवशी, शुक्ल पक्ष असो, कृष्ण पक्ष असो, कोणताही महिना असो. रात्री झोपताना आपण आपली जी नाभी आहे. नाभी म्हणजे बेंबी. आपल्या नाभीच्या खाली आपल्याला १०८ हा अंक लिहायचा आहे. हा उपाय पुरुषही करू शकतात, महिला हि करू शकतात, लहान मुलेही करू शकतात आणि वयोवृद्ध सुद्धा करू शकतात. आपल्या नाभीच्या खाली, या मोहरी तेलामध्ये थोडंसं कुंकू टाका. एका पात्रा मध्ये, एका वाटी मध्ये हे कुंकू आणि मोहरीचे तेल किंवा चमेलीच तेल अगदी व्यवस्थीत मिक्स करायचे आणि त्याच घोळ तयार करायचा आहे आणि तो घोळ तयार झाल्यानंतर, अगदी व्यवस्थीत १०८ हि संख्या लिहायची आहे.

आपल्या बेंबीच्या बरोबर खाली. मित्रांनी हि संख्या त्या ठिकाणी लिहिल्यानंतर, आपण स्वतः हि लिहू शकता किंवा दुसऱ्याकडून लिहून घेतलं तरी चालेल. लिहिल्यानंतर श्वासोच्छवासावर आपलं लक्ष केंद्रित करायचे आहे. मोठ्याने श्वास उच्छवास आपला चालू असावा. मोठा श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आणि हे करत असताना आपली जी इच्छा आहे या इच्छेचआपण स्मरण करा. जी काही तुमची इच्छा आहे, कि धन प्राप्ती व्हावी, पैसा यावा, प्रॉपर्टी व्हावी, मालमत्ता व्हावी किंवा अगदी कोणत्याही प्रकारची जी तुमची मनोकामना आहे, ती आपण सातत्याने स्मरण करत झोपी जायचय पाच ते दहा मिनिट. झोपी गेला नाही तरी चालेल मात्र शांत पडून रहा.

जर तुम्ही दिवस आहे काय करताय, तर दिवसा हा उपाय करताना आपण पाच ते दहा मिनिटे निद्रिस्त अवस्थेत झोपलेल्या अवस्थेमध्ये पडून राहा. मित्रांनी हा उपाय सलग सातत्याने काही दिवस अवश्य करा. एक, दोन, तीन आठवडे अवश्य करा. एक, दोन, तीन आठवडे सलग करून पहा आपल्याला दिसेल आपली इच्छापूर्ती होत आहे जी काही मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे. अत्यंत गुप्त अशा प्रकारची शक्ती नक्की वापरून पहा. धन्यवाद!

|| ओम लक्ष्मी नारायणाय नमो नमः ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here