Shatru Nashak Upay | मनातल्या मनात बोलत राहा हे शब्द, शत्रू आपोआप संपून जाईल | Shatru Pida Nashak Upay

0
261
Shatru Nashak Upay

Shatru Nashak Upay | मनातल्या मनात बोलत राहा हे शब्द, शत्रू आपोआप संपून जाईल | Shatru Pida Nashak Upay

नमस्कार मित्रानो, सध्याच्या युगामध्ये बरेच लोक त्यांच्या शत्रूंच्यामुळे त्रस्त आहेत. सध्याच्या युगामध्ये दुष्ट व्यक्ती, अत्याचारी व्यक्ती मोठ्या संख्येने आढळू लागले आहेत. बऱ्याच लोकांना एखाद्या अमुक व्यक्तीकडून नाहक त्रास सहन करावा लागतो मग ती व्यक्ती त्यांचा शेजारी असेल, ऑफिस मधला कलीग असतो, व्यवसायाच्या ठिकाणाचा प्रतिस्पर्धी असतो किंवा नात्यामधील असतो. ती व्यक्ती विनाकारण तुम्हाला शिव्या शाप देत असते. पैशांच्या मिजासकीने विना कारण आपल्याला सतावीत असतात. तत्वहीन गोष्टी करून काहीही बरळत असतात. काहींनी तर लोकांच्या मालमत्ता, संपत्ती हडप केल्या आहेत.

Shatru Nashak Upay In Marathi

तर मित्रानो हा उपाय अशा सर्व लोकांसाठी आहे जे शत्रू पीडेने त्रस्त आहेत. पण मित्रानो या उपायाचा आपण फक्त आपला स्वार्थ सध्या करण्यासाठी उपयोग करू नये, हा उपाय तेव्हांच करा जेंव्हा आपल्याकडे काही पर्याय शिल्लक नसेल. मित्रानो रामायण असेल, रामचरित्र मानस, असेल, भागवत गीता यांचा एक-एक शब्द, एक-एक चौपाई, एक-एक श्लोक सिद्ध आहेत. जेव्हाही आपल्यावर एखादे संकट येते, एखादी समस्या उद्भवते किंवा आपली एखादी इच्छा आहे, ती पूर्ण होत नाहीये, एखाद्या कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळत नाहीये. तर हर समस्येसाठी वेगवेगळे श्लोक आहेत, वेगवेगळ्या चोपाई आहेत.

Gupt Shatru Se Bachne Ke Upay

आपल्याला हे श्लोक, या चोपाइंचा फक्त पाठ करायचा आहे, त्यांचे मनन करायचे आहे. यामुळे आपल्याला लवकरच फार लाभदायक परिणाम अनुभवायला मिळेल. मित्रानो आज आम्ही अशीच एक चौपाई, एक श्लोक आपल्याला सांगत आहोत. या श्लोकाचे आपण फक्त मनन करा आणि आपण अनुभवाला कि आपल्या शत्रूची सर्व शक्ती आपोआप संपत चालली आहे. मित्रानो काही शत्रू असे असतात कि जे तुम्हाला माहित आहेत, ज्यांना तुम्ही पाहू शकता. पण अशा शत्रुंना तुम्ही पाहू शकत नाही कि जे तुमच्यात आहेत. म्हणजे ईर्षा, अहंकार, एखाद्याचे वाईट चिंतने हे देखील शत्रूच आहेत, आपले गुप्त शत्रू, जे आपल्यामध्ये असतात.

Shatru Nash Shabar Mantra

आणि या श्लोकांचा पाठ करण्याने आपल्या बाहेरील शत्रूंचा तर नाश होतोच पण आपल्यामध्ये असणाऱ्या शत्रूंचाही नाश होतो. तर मित्रानो आपण कोणत्याही शुभ दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी अथवा पौर्णिमा, एकादशी यापैकी कोणत्याही दिवशी या श्लोकाचा, या चौपाईचा एक माळ जप करावा. एक माळ म्हणजे १०८ वेळेला या श्लोकाचा, या चौपाईचा जप करावा. स्नानादी नित्यकर्म आटोपून पिवळे वस्त्र परिधान करावेत. व भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून, अगरबत्ती लावावी, त्यांना पिवळ्या रंगाची फुके अर्पित करावीत आणि हा जाप आपल्याला करायचा आहे. यासाठी तुळशीच्या माळेचा आपल्याला उपयोग करायचा आहे.

Shatru Uchatan Mantra

जाप करण्यापूर्वी प्रभू श्री रामांना नमसकार करावा त्यांचे स्मरण करावे. प्रभू श्रीरामांच्या नंतर त्यांच्या सर्व भावांना देखील आपण नमस्कार करायचा आहे, सर्व भावांना स्मरण करून प्रार्थना करायची आहे. जसे भरत, शत्रुघन, लक्ष्मण. आणि या नंतर या श्लोकाचा, या चौपाईचा एक माळ जप करावा, १०८ वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दोन लवंग, थोडा गुळ आणि थोडे तूप घेऊन याची आहुती द्यायची आहे. एखाद्या भांड्यामधे गाईचे शेणकूट पेटवून किंवा कोळशाचे निखारे बनवून त्यावरती या दोन लवंग, थोडा गुळ आणि थोडे तूप यांची आहुती द्यावी. असे करण्याने हा श्लोक आपल्याला सिद्ध होतो.

Shatru Nashak Shabar Mantra

आणि मग जेंव्हा केंव्हाही तुम्ही तुमच्या शत्रूच्या सामोरे जाल किंवा तुम्हाला माहित आहे कि अमुक हि व्यक्ती तुमच्या विरोधामध्ये काम करते तेंव्हा तुम्ही हा श्लोक फक्त ५ वेळेला बोला किंवा तुमच्या मनातल्या मनात म्हणत चला. तुमच्या शत्रूची शक्ती आपोआपच संपत जाईल. त्याचा विनाश व्हायला सुरुवात होईल आणि तुमचे भले व्हायला लागेल जर तुम्ही बरोबर असाल तर. मित्रानो हा श्लोक सिद्ध करण्यापूर्वी भगवान श्री गणेश मंत्रांची एक माळ, आपल्या गुरूंची एक माळ आणि आपल्या इष्ट देवतेची एक माळ जप अवश्य करावा.आणि यानंतर हा श्लोक सिद्ध करावा. याचा आपल्याला फारच लाभकारक परिणाम अनुभवायला मिळेल.

Shatru Nashak Mantra

तर मित्रानो हा श्लोक आहे “जाके सुमिरन तें रिपु नासा। नाम सत्रुहन बेद प्रकासा॥” अर्थात ज्यांच्या केवळ स्मरणाने शत्रूचा नाश होतो. वेदांमध्ये ज्यांचे नाव शत्रुघन म्हणून प्रसिद्ध आहे. जर का सार्वप्रथम आपल्या शत्रूचे स्मरण करून त्यानंतर शत्रुघनजीचे स्मरण करून या श्लोकाचा जाप करतो, त्याच्या शत्रूचे शत्रुघनजी शत्रूच्या ह्रिदयातून, मनातून, डोक्यातून शत्रुता संपवितात किंवा शत्रू जर अत्यंत दुष्ट आणि आसुरी प्रवृत्तीचा असेल तर त्याचा विनाश करतात. मित्रानो शत्रुघन याच्या नावानेच शत्रू दूर पळून जातो. शत्रुघन याचा अर्थच असा आहे कि शत्रूंचा नाश करणारा. शत्रूचे हणण करणारा, शत्रूला मारणारा.

Sarva Shatru Nashak Mantra

या नावामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे कि जी देखील व्यक्ती या नावाचा जप करतो त्याच्या शत्रूंचा आपोआप विनाश होतो. शत्रूची सर्व शक्ती आपोआप संपून जाते. तर मित्रानो हा श्लोक आपण मनातल्या मनात जपायला सुरु करा, याचे मनन करायला सुरु करा. आपल्या शत्रूची सर्व शक्ती आपोआप संपून जाईल. विडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here