Saubhagya Prapti Ke Upay – दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलणारे उपाय

0
132
Saubhagya Prapti Ke Upay

Saubhagya Prapti Ke Upay – दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलणारे उपाय – सौभाग्य प्राप्ति उपाय

नमस्कार मित्रानो, कलियुगामध्ये श्री हनुमंताचा महिमा अगाध आहे. हनुमंताची पूजा, उपासना, मंत्र आणि पाठ करण्याने व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात. श्री हनुमंताचे केवळ नाव घेतल्याने भक्तांच्या सर्व समस्यांचे निवारण होऊन जाते. प्रभू श्री रामांनी भक्तांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी हनुमंतांना या वृथ्वीवरती वास करण्यास सांगितले होते आणि तेव्हापासून या कलयुगामध्ये बजरंगबली नेहमी सर्वांचे साहाय्यक झाले आहेत.

सौभाग्य प्राप्ति उपाय

मित्रानो आजच्या या युगामध्ये असे देखील लोक आहेत, कि ज्यांचे मोठ्यातले मोठे संकट देखील केवळ हनुमंताचे नामस्मरण केल्याने दूर झाले आहे. बजरंगबलीनी त्यांच्या मोठ्यातल्या मोठ्या संकटाचे निवारण केले आहे. हनुमानाच्या उपासनेनें निरोगी शरीराचा आशीर्वाद मिळतो. याचबरोबर हनुमान हे शक्ती, शांती, बुद्धी आणि भक्तीचे देवता आहेत. मित्रानो शनी हा परिश्रमाचा कारक ग्रह आहे आणि हनुमान श्रम करण्यासाठी पर्याप्त शक्ती प्रदान करतात. मित्रानो जर का हनुमान आपल्यावर प्रसन्न असतील तर शनी देव देखील स्वतः तुमच्यावर प्रसन्न होतात. यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हनुमंताना देखील पुजले जाते.

दुर्भाग्याला बदलणारे उपाय

हनुमंताचे पूजन फार पावित्र्याने करणे आवश्यक असते. यामुळे जीवनातील दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलले जाऊ शकते. मित्रानो धन आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमंताच्या समोर मोहरीच्या तेलाचा मातीचा दीपक प्रज्वलित करून हनुमान चालिसाचा पाठ करावा. हनुमंताचा फोटो घराच्या पवित्र स्थानामध्ये अशा प्रकारे लावावा कि हनुमानाचे मुख दक्षिण दिशेकडे पाहताना होईल. या उपायाने आपल्या विरोधकांना शांत करून धनाची प्राप्ती करून देतो.

Success In Life Astrology

मित्रानो मंगळवारी किंवा शनिवारी ११ पिंपळाची पाने घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व या पानांच्यावर चंदनाने किंवा कुंकवाने प्रभू श्री रामाचें नाव लिहावे आणि या नंतर हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना हि पिंपळाची ११ पाने अर्पित करावीत. असे करण्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतील. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी कुंकुम आणि चमेलीच तेल हनुमंतांना अर्पित करावे. या उपायाने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

Safalta Pane Ke Totke

प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी हनुमंतांना बनारसी पानाचा विडा अर्पीत करावा. असे केल्यामुळे हनुमंताची कृपा सदैव आपल्यावर राहते. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हा दिवा प्रज्वलित केल्या नंतर त्यामध्ये काळ्या उडदाचे तीन अखंड दाणे घालावेत. हा उपाय सातत्याने मंगळवार आणि शनिवारच्या संध्याकाळच्या वेळी करावा. यामुळे आपली सर्व कार्ये तीव्र गतीने पूर्ण होतात.

Saubhagya Prapti Mantra

हनुमान मंदिरामध्ये जाऊन एक नारळ आपल्या डोक्यावरून ७ वेळेला उतरवून घ्यावा, घड्याळाच्या कटाच्या दिशेत ७ वेळा फिरवून घ्यावा आणि यानंतर हा नारळ हनुमंताच्या समोर वाढवावा, फोडावा. या उपायामुळे आपल्या सर्व बाधा दूर होतात. मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी हनुमंतांना कुंकुम आणि तेल अर्पित करावे. जो व्यक्ती शनिवारच्या दिवशी हनुमंतांना कुंकुम अर्पित करतो त्याव्यक्तीच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतात. शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावे आणि पिंपळाच्या झाडाच्या ७ परिक्रमा काढाव्यात व यानंतर पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चाळिसेचा पाठ करावा. या पायाने शनी आणि मंगल या दोन्ही ग्रहांचे दोष दूर होतात.

Akhand Saubhagya Prapti Ke Upay

तर मित्रानो हे होते काही उपाय जे उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये हनुमंताची सदैव कृपा प्राप्त करू शकता आणि आपल्या जीवनातील दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलू शकता. विडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here