Sarva Manokamna Porti Upay | जाळा हि एक वस्तू होतील सर्व ईच्छा पूर्ण | Sukh Shanti Upay, Marathi Upay Tips, manokamna purti upay

0
107
Manokamna Purti

Sarva Manokamna Porti Upay | जाळा हि एक वस्तू होतील सर्व ईच्छा पूर्ण | Sukh Shanti Upay, Marathi Upay Tips, manokamna purti upay

नमस्कार मित्रानो, कर्मबंधन चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रानो आज आम्ही एक विशिष्ट असा उपाय सांगणार आहोत जो उपाय आमवस्येच्या दिवशी केला जातो. हा उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत, कष्ट आहेत. त्या नष्ट होतात, संपून जातात. मित्रानो हा फारच विशिष्ट अशा प्रकारचा अचूक उपाय मानला जातो. आपले पूर्वज सनातन काळापासून हा उपाय करत आले आहेत. काळ ओघात आपण हा करण्यापासून दुरावलेले आहोत, कारण काहीही असो. पण प्राचीन काळापासूनच अशाप्रकारचे उपाय चालत आले आहेत.

मनोकामना पूर्ति का महाउपाय

तर मित्रानो प्रश्न असा आहे कि अमावास्येच्या दिवशी काय केले पाहिजे. मित्रानो या दुनयेतील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असते, सफलता मिळवायची असते. स्वतःला त्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर न्यायचे असते. तो आपल्या अडचणींना दूर करू इच्छितो, येणाऱ्या विघ्नना दूर करू इच्छितो. त्याच्या ज्या कमजोरी आहेत, दुर्बलता आहेत त्यांना नष्ट करू इच्छितो. शत्रूंच्यावर विजय प्राप्त करू इच्छितो. आपला उद्योग, व्यवसाय, व्यापाराला वाढवू इच्छितो. नोकरीमध्ये यशस्वी होऊ इच्छितो. दुकानदारी मध्ये यशस्वी होऊ इच्छितो.

ज्योतिष अनुसार मनोकामना पूर्ति के उपाय

तर अशा प्रकारच्या तुमच्या, आमच्या, प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा असतात. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो , बेहिशोबी प्रयत्न करत असतो. मित्रानो कर्म तर आपल्याला करावेच लागते, परंतु कर्मा बरोबर जर भाग्याचा उपयोग करून घेतला गेला, थोडा अध्यात्माचा उपयोग करून घेतला गेला, आणि या दोन्ही गोष्टी जेंव्हा एकमेकांशी जोडल्या जातात तेंव्हा आपल्या सफलतेची, यशस्वितेचे प्रमाण वाढते. आजचा हा उपाय याच संदर्भातील आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या उपायांविषयी.

Sarva Kamna Siddhi Mantra

मित्रानो जेव्हा देखील आपण एखादे कार्य करण्यासाठी जाता. आपल्याला वाटते किंवा प्रत्येक व्यक्तीला वाटते कि आपले कार्य सफल होऊ दे. दुनियेमध्ये अशी कोणती व्यक्ती आहे कि जिला असे वाटत नाही. तर जेव्हा देखील आपण एखादे कार्य करण्यासाठी जाल तेंव्हा एक खास प्रकारची विधी करायला हवी. आपल्याला असे वाटत असेल कि कोणीतरी विशेष अशी व्यक्ती आपल्या कार्यामध्ये अडचण निर्माण करत आहे, बाधा निर्माण करत आहे. तर आपल्याला या खास प्रकारच्या विधीचा उपयोग केला पाहिजे.

Sarva Karya Siddhi Yantra

आपल्याला असे वाटत असेल कि अमुक एका व्यक्तीकडून जसे आपले नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा व्यवसायातील, नोकरीतील ठिकाणच्या व्यक्ती असतील तर त्यांच्या कडूनही अडचणी येत आहेत. तेंव्हा देखील अशी खास प्रकारची विधी केली पाहिजे. आपल्याला असे वाटत असेल कि आपल्या व्यापारामध्ये शत्रुता आली आहे, प्रति द्वंद्विता आली आहे, कंपेटिशन आले आहे, व समोरील व्यक्ती आपल्याला त्रास करत आहे. तर आपण हा उपाय केला पाहिजे. तर मित्रानो आपण काय उपाय केला पाहिजे.

Manokamna Porti Ke Upay

मित्रानो आपल्याला एक भोजपत्र घ्यायचे आहे व त्या भोजपत्रावर काही विशिष्ट असे लिहून त्या भोजपत्राला अमावास्येच्या दिवशी एक खास प्रयोग करून जाळायचे आहे. चला तर मग जाणून घेऊया हा प्रयोग कसा करायचा आहे आणि त्याचा उपयोग कसा करतात. मित्रानो यासाठी आपण सैल, ढिले ढाले कपडे घालून एखादया शांत रूम मध्ये बसावे, जर जमिनीवर बसता येत नसेल तर खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसावे. अगदी रिलॅक्स होऊन बसायचे आहे. व आपल्या समोर एक छोटेसे काळ्या रंगाचे कापड अंथरावे व त्यावर तांब्याची थाळी ठेवावी. यानंतर आपण एक भिजपत्र घ्यावे.

Dhan Prapti Mantra Upay

मित्रांनो भोजपत्र हे एक वृक्षाची साल असते. जे हिमालय पर्वत राजीतील वृक्ष आहे. याचे वैशिष्ट्य असे असते कि जर यावर काही लिहिले तर कित्येक वर्षे हे लिहिलेले पुसले जात नाही. ते आपल्याला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये अगदी सहज मिळून जाईल. भोजपत्र मिळविण्याचा प्रयत्न करा आणि जर का नाहीच मिळाले तर आपण साधारण कागद देखील घेऊ शकता, पांढऱ्या रंगाचा. तर मित्रानो आपण एक भोजपत्र घेऊन त्यावर निळ्या पेनाने एक बीजमंत्र लिहायचा आहे. लक्षात ठेवा बीजमंत्र हा निळ्या पेनानेच लिहायचा आहे.

Sukh Shanti Che Upay

आणि हा बीज मंत्र आहे || क्रीं || मित्रानो आपण || क्रीं || हा बीज मंत्र भोजपत्रावर किंवा पांढऱ्या कागदावर निळ्या पेनाने लिहायचा आहे. मित्रानो हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिपशनमद्ये किंवा आमच्या स्टारलाईव्ह डॉट इन (starliv.in) या वेब साईट वर मिळून जाईल. क्रीं बीज मंत्र लिहून हे बोजपत्र आपल्यासमोर जी तांब्याची प्लेट आपण ठेवली आहे त्या प्लेटमध्ये हे भोजपत्र ठेवायचे आहे. भोजपत्र प्लेटमध्ये ठेवल्यानंतर शुक्री मुद्रा करायची आहे. शुक्री मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुढग्यावर सरळ ठेवावेत. आपले ताल हात आकाशाच्या दिशेला असतील असे. आणि यानंतर हाताची पाची बोटे एकत्र जुळवावीत. म्म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदक सारखा होईल. याला वराही मुद्रा असे देखील म्हणतात. तर मित्रानो आपण शुक्री मुद्रा करून शांत बसायचे आहे.

Vastu & Jyotish Tips

शुक्री मुद्रा करून शांत बसल्यानंतर १० वेळेला प्राणायाम करायचे आहे. म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यावा व जितका वेळ शक्य असेल तितका वेळ श्वास रोखावा आणि मग तो सावकाश, हळू हळू सोडायचा आहे. अशा प्रकारे १० वेळेला श्वासोश्वास करावा. असे करण्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होतो. आपल्या मनावरील ताण हलका होतो. मन शांत राहते. असे प्राणायाम केल्यानंतर आपण पुन्हा पेन घ्यायचा आहे. पेन निळ्या शाईचाच घ्यावा. व जिथे आपण क्रीं लिहिले आहे त्याच्या खाली लहान अक्षरांमध्ये आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहावी. आपली जी काही इच्छा असेल ती लिहावी.

Manokamna Puri Karne Ke Upay

मित्रानो एक वेळच्या प्रयोगामध्ये आपण एकच इच्छा लिहावी. एकच इच्छा लिहिणे चांगले मानले जाते. तेंव्हा हि काही आपली अगदी खास अशी इच्छा आहे, जी आपल्या जीवनाची टर्निंग पॉईंट आहे, ज्यमुळे आपल्या जीवनाची दिशा बदलून जाईल अशी इच्छा लिहावी, ज्या इच्छेमुळे आपल्या जीवनामध्ये फार मोठे परिवर्तन येऊ शकते अशी इच्छा. अशी इच्छा या भोजपत्रावर लिहावी. समाज कि मला माझ्या जीवनामध्ये हि गोष्ट करायची आहे व त्यासाठी मला या गोष्टींची आवश्यकता आहे. मला माझ्या जीवनामध्ये मनपसंद जोडीदाराची गरज आहे. याप्रमाणे जीकाही आपली इच्छा असेल ती लिहावी.

Achanak Dhan Prapti Ke Yog

जे काही लिहायचे ते आपली मर्जी. परंतु लिहायचे निळ्या पेनानेच आहे. जर का आपलं कोणी शत्रू आहे, ज्याच्या मुळे आपल्या जीवनामध्ये समस्या निर्माण होत आहेत. तर त्या व्यक्तीचे नाव देखील आपण लिहू शकता. लिहून झाल्यावर हे भोजपत्र किंवा पांढरा कागद पुन्हा प्लेट मध्ये ठेवायचा आहे. व मागे सांगितल्याप्रमाणे पुन्हा शुक्री मुद्रा करून क्रीं बीज मंत्राचा जप करायचा आहे. जितका वेळ आपल्याला वाटेल तितकावेळ आपण जप करायचा आहे. मित्रानो आपण याचा उच्चार हवं तर क्रीम असा करू शकता किंवा क्रिन्ग असाही करू शकता. आपल्याला जसा आवडेल तसा आपण याचा उच्चार करावा.

safalta pane ke upay

मित्रानो हा फक्त एक दिवसांचाच प्रयोग आहे. या मध्ये आपल्याला माळा घेण्याची आवश्यकता नाहीये, पण किमान १०८ वेळा जाप होईल इतक्या वेळ पर्यंत तरी जप करावा. यापुढे आपण कितीही जप करू शकता. हा जप आपल्याला उपांशु पद्धतीने करायचा आहे. म्हणजे मंत्र मोठ्याने न म्हणता तोंडातल्या तोंडात पुटपुटत हळू आवाजात म्हणायचा आहे. हा प्रयोग आपण कोणत्याही अमावास्येच्या दिवशी, ग्रहणाच्या दिवशी, रविपुष्य नक्षत्राच्या दिवशी अथवा शनिवारच्या दिवशी करू शकता. हा प्रयोग करण्याची वेळ संध्याकाळी सूर्यास्तानंतरची आहे. सूर्यास्तानंतर आपण हा प्रयोग करणे अति उत्तम असते. नाहीतर आपण दिवसा कधीही करू शकता.

sarv manokamna aur iccha purti

हा उपाय करून झाल्यावर एखाद्या व्यक्तीला भोजन दान करावे किंवा काहीही खाण्या-पिण्याची वस्तू दान करावी, पण पैसे दान करू नयेत. आणि पैसे दान करायचेच असतील तर एखाद्या मंदिराच्या दानपेटी मध्ये दान करावेत. यानंतर मित्रानो आपण बीज मंत्र लिहिलेले भोजपत्र हातामध्ये धरावे व डोळे मिटून क्रीं बीज मंत्राचा जप करत त्याला आग लावावी. आग लावून ते भोजपत्र परत प्लेटमध्ये ठेवावे. ते पूर्ण जळून झाल्यावर त्याची राख एखाद्या झाडाखाली टाकावी. इकडे तिकडे पडू देऊ नये. मित्रानो आपण जेंव्हा असे करता, आपण समजून चला कि, जो संकल्प आपण केला आहे, ज्या मनोकामनेसाठी आपण हे कार्य केले आहे. त्यागोष्टी १० पटीने अधिक तीव्रतेने काम करायला लागतात.

Manokamana purti mudra

हा प्रयोग अमावास्येला तर नक्की केलाच पाहिजे. हा प्रयोग आमावस्येला केल्याने याचा अत्याधिक प्रमाणात लाभ मिळतो. मित्रानो भोजपत्र हे सर्वात चांगला कागद मनाला जातो. परंतु जर का भोजपत्र मिळाले नाही तर सामान्य कागदावर करा. साध्या कागदावर देखील आपल्याला तोच परिणाम मिळेल. आपण अनुभवाला कि आपण त्यादेखील मनोकामनेसाठी हा उपाय केला आहे त्या मनोकामने संदर्भातील कामे व्हायला लागली आहेत. हा उपाय एक वेळच करायचा आहे पण जर आपल्याला पुन्हा करायचा असेल तर पुढील अमावास्येच्या दिवशी पुन्हा करू शकता. या प्रयोगाला आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल

Wish Fulfillment MANTRA

आपण हा उपाय अवश्य करावा. आपल्याला याचा फारच चांगला लाभ मिळेल. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here