रिअलमे जी टी निओ लाँच ३१ मार्च २०२१ – Realme GT Neo launch 31 march: रिअलमे जी टी निओ मध्ये 12GB रॅम आणि Dimensity 1200 प्रोसेसर

0
147
Realme GT Neo
Realme GT Neo

रिअलमे जी टी निओ लाँच ३१ मार्च २०२१ -Realme GT Neo launch 31 march: रिअलमे जी टी निओ मध्ये 12GB रॅम आणि Dimensity 1200 प्रोसेसर

हायलाइट्स:

  • Realme GT Neo स्मार्टफोन लाँच होणार
  • उद्या ३१ मार्च रोजी फोन लाँच होणार
  • फोनला चीनमध्ये सर्वात आधी लाँच करणार

नवी दिल्लीः रियलमी ३१ मार्च रोजी आपला नवीन स्मार्टफोन Realme GT Neo ला लाँच करणार आहे. फोनला कंपनी सर्वात आधी चीनमध्ये लाँच करणार आहे. लाँच आधी या स्मार्टफोनला बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर स्पॉट करण्यात आले आहे. लिस्टिंग मध्ये या अपकमिंग स्मार्टफोनसंबंधी अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. गीकबेंच लिस्टिंगनुसार, फोनचे मॉडल नंबर RMX3031 आहे. फोनला गीकबेंचच्या सिंगल कोर टेस्टमध्ये ९७५ आणि मल्टी कोर टेस्ट मध्ये ३३२० चा स्कोर मिळाले आहे.

वाचाः सूर्याच्या प्रकाशाने चार्ज होणार वायरलेस स्पीकर, किंमत १,६९९ रुपये

रियलमी GT Neo चे फीचर
गीकबेंच लिस्टिंग मध्ये रियलमीचा हा अपकमिंग स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम आणि मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसर दिला आहे. ओएस मध्ये फोन अँड्रॉयड ११ वर चिपसेटवर काम करणार आहे. कंपनीचा हा फोन 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०.९ आणि रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. कंपनी या फोनला फायनली फँटसी सोबत काही आणि कलर ऑप्शनमध्ये लाँच करू शकते.

वाचाः घरी बसून ऑर्डर करा, पेट्रोल डिझेलची दिल्ली मुंबईत होम डिलिवरी

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेराचा समावेश आहे. सेल्फीसाठी रियलमी जीटी नियो मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

वाचाः इंटरनेटचे व्यसन वाढले! लहान मुले गेमिंगच्या तर तरुणाई पॉर्नच्या विळख्यात

या फोनमध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 4500mAh ची दमदार बॅटरी मिळू शकते. फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कंपनी लिक्विड कूल्ड हीट डिस्सीपेशन, ४डी व्हायब्रेशन आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट ऑफर करू शकते. फोनचे इंटरनल स्टोरेज १२८ जीबीचे असणार आहे. या फोनची किंमत २५ हजार रुपयांच्या जवळपास असू शकते.

वाचाः ८१९ रुपयांचा गॅस सिलिंडर, ११९ रुपयांत खरेदी करा, जाणून घ्या मस्त ऑफर

वाचाः १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रेशनकार्डसाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज

वाचाः स्मार्ट वॉशिंग मशीन लॉन्च, क्षमता १० किलो, पाहा किंमत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here