Shivling Ki Puja Vidhi महादेवाच्या शिवलिंगाचे शास्त्रीय स्वरूप | Marathi | Real meaning of Shivling

0
144
best mahadev shivling

Shivling Ki Puja Vidhi महादेवाच्या शिवलिंगाचे शास्त्रीय स्वरूप | Marathi | Real meaning of Shivling

मित्रानो महादेवांना या जगाचे पिता म्हटले जाते, व संपूर्ण पृथ्वीवर महादेवाचे स्वरूप असणाऱ्या शिवलिंगाचे पूजन केले जाते. तर आज आपण या शिवलिंगाचे शास्त्रीय स्वरूप जाणून घेणार आहोत. शिवलिंगाचे शास्त्रीय स्वरूप समजावून घेतल्यास, विज्ञानातील अनु या संकल्पनेची अंतर्रचना व शिवलिंग यात साम्य आढळून येते.

संपूर्ण विश्वाला अखंड ऊर्जा पुरविणारी शक्तिकेंद्रे म्हणजेच हि शिवलिंगे होय. याना आपण ज्योतिर्लिंगे सुद्धा म्हणतो. या शिवलिंगाचे शास्त्रीय स्वरूप असे आहे कि, भगवान शंकर म्हणजे स्थाणु , स्थाणु याचा अर्थ स्थिर होय. या स्थाणु भोवती भगवान विष्णू फिरतात. भगवान विष्णू म्हणजे व्यापणारा किंवा फिरणारा होय. अशा प्रकारे भगवान शंकर भोवती भगवान विष्णू फिरतात व त्यातून निर्माण होणारी ऊर्जा म्हणजेच ब्रम्ह होय. रूपकाने भगवान विष्णूंच्या नाभीतून म्हणजे बेंबीतून ब्रम्हदेवाची उत्पत्ती होते.

शास्त्राप्रमाणे भगवान शंकर (स्थाणु ) म्हणजे न्यूट्रॉन होय. त्यांच्या जवळ निर्माण होणारा ब्रम्हा म्हणजे प्रोटॉन होय व फिरणारे भगवान विष्णू हे इलेक्ट्रॉन होय. प्रोटॉन हा धन भारित (+) तर इलेक्ट्रॉन हा ऋण भारित (-) असून भगवन शंकर भार रहित असतात, म्हणून त्यांना स्वयंभू, निर्गुण, निराकार म्हंटले आहे. भगवान शंकरांच्या जटेत गंगा आहे कारण फिरताना ऊर्जा, उष्णता निर्माण होते. स्थाणु (शिव) थंड राहावा म्हणून सतत जलधारांची आवश्यकता असते.

हि निर्माण होणारी ऊर्जा किंवा शक्ती हि E = MC square या शास्त्रीय पद्धतीने होत असते. शास्त्रशुद्ध दृष्ट्या शिवलिंगे हि उर्जाकेंद्रे असून महामृत्युंजय सारख्या मंत्राने हि ऊर्जा साधकास प्राप्त होते.
अनुची रचना : प्रोटॉन (+) ब्रम्हा, न्यूट्रॉन – स्थाणु (शिव) , इलेक्ट्रॉन (-) विष्णू
शिवलिंग : न्यूट्रॉन (शिव), प्रोटॉन (+) ब्रम्हा, इलेक्ट्रॉन (-) विष्णू

|| ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here