Power Of Astagandha | अष्टगंधाचा रहस्यमई प्रयोग जो भाग्य बदलतो | Benefits Of Ashtakandha

0
50
Ashtagandha Ke Upay

Power Of Astagandha | अष्टगंधाचा रहस्यमई प्रयोग जो भाग्य बदलतो Benefits Of Ashtakandha

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो आपणा सर्वाना अष्टगंध माहित असेलच कि ज्याला आपण सेंदूर असे देखील म्हणतो. हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेमध्ये या अष्टगंधाला फार महत्व आहे. तसेच हा अष्टगन्ध देवी देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान प्राप्त असलेल्या गणेशाला फार प्रिय आहे. तर अश्या या अष्टगंध विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

अष्टगंध चे महत्त्व

मित्रानो अष्टगंध हे आठ प्रकारच्या गंधाना मिसळवून बनविले जाणारे गंध आहे आणि म्हणूनच यास अष्ट गंध म्हटले जाते. या गंधाचा वापर धार्मिक कार्य, पूजा, उपासना आणि लेखनात केले जाते. तंत्रानुसार वेगवेगळ्या देवतांसाठी वेगवेगळे गधाष्टक वापरली जातात. पंचदेव म्हणजे गणेश, विष्णू, शिव, दुर्गा, सूर्य हे तंत्रात प्रमुख असणारे देवता आहेत, आणि बाकी सर्व देवता त्याच्या अंतर्गत मानल्या जातात. व प्रत्येक देवा साठी हा त्याच्या मान्यतेनुसार वेगळा असा गंध वापरला जातो. आणि हे गंध म्हणजेच अष्टगंध आहेत.

Power Of Astagandha Tilak

साधारणतह आपण आपल्या रोजच्या देव पूजेतील अष्टगंध हे 8 प्रकारच्या औषधी वनस्पती किंवा सुगंधित मिश्रणाद्वारे बनविल्या जातात. या अष्टगंधात पुढील गंधांचा समावेश होतो. कुंकुम, अगर, कस्तुरी, चंद्रभाग, त्रिपुरा, गोरोचन, तमाल, जळ इत्यादी आठ पदार्थ असतात. प्राचीन काळी आपल्या हिंदू धर्मातील प्रकांड पंडितांनी, साधू संतानी ताप साधने द्वारे मनुष्याचे जीवन सुख कर व सुलभ पद्धतीने व्यातित करण्यासाठी देवी देवतांना प्रसन्न करून त्यांच्या कडून विविध पूजा, व्रत वैकल्ये व त्या करण्याची पद्धत यांची माहिती अवगत करून घेतली.

अष्टगन्ध का महत्व

आणि या ज्ञानाच्या आधारावरच त्यांनी देवी देवतांच्या पूजे मध्ये या अष्ट गंधाचा वापर करण्याचे निश्चित केले. कारण हे आठ पदार्थ सर्व ग्रह शांत करतात. त्याचा उपयोग केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम दूर होतात. मानवाचे जीवन हे ग्रह व नक्षत्रांच्या फेर्यांवर अवलंबून असते. व ज्याचे ग्रह मजबूत स्थितत असतात त्याच्या जीवनामध्ये सर्व काही समाधान कारक असते. व हे ८ अष्ट गंध देवतांना अर्पण केल्याने सर्व ग्रह मजबूत स्थितीमध्ये येतात.

अष्टगन्ध कपाळावर टिळा का लावतात

मित्रानो आपल्या घरामधील धार्मिक कार्यत, पूजेत, उपासनेत याचा उपयोग केल्यास चमत्कारीक मानसिक शांती मिळते. ताणतणाव दूर होतो. गृह क्लेश संपून जातात. अष्टगंधाच्या सुगंधात माता लाक्ष्मींचा सदैव वास असतो. तसेच अष्टगंधाच्या वापरणे आपल्या वास्तुमधील वास्तुदोष देखील दूर होतो. आपण आपल्या माथ्यावर दररोज अष्टगंधाचा टिळक लावल्यास समोरील व्यक्तींवर आपला प्रभाव वाढतो. सर्व लोकांमध्ये आपल्याला सहकार्याची भावना व्रीद्धीगत होते. त्याच बरोबर आपल्या कुंडलीतील ग्रह दोष शांत होतात. हा अष्टगंधाचा टिळा आपल्या माथ्यावर लावताना तो आपल्या कनिष्ठ बोटाने म्हणजेच करंगळीच्या बोटाने अष्टगंधाचा टिळक लावावा.

अष्टगंध एक दिव्य और चमत्कारिक द्रव्य

मित्रानो अष्टगंध तसे 2 प्रकारचे असतात- पहिला वैष्णव अष्टगंध आणि दुसरा शैव अष्टगंध. हा प्रकार त्याच्या तयार करण्याच्या मिश्रणातील प्रमाणानुसार मानला केला जातो.

शैव अष्टगंधः यामध्ये कुंकू, अगुरू, कस्तुरी, चंद्रभाग, गोरोचन, तमाल आणि जळ एकत्र मिसळून बनवले जाते.

वैष्णव अष्टगंध: हे चंदन, अगुरु, ह्रीवेर, कुष्ट, कुंकुम, सेव्यका, जटामांसी आणि मुर एकत्र करून बनवले जाते.

मित्रानो अष्ट गंधाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो आणि विविध कारणांसाठी कोणत्या प्रकारचा अष्टगंध बनवावा हे आपण पाहूया.
माता भगवती शक्ति साठी
चंदन, अगर, कपूर, चोर, कुंकुम, रोचन, जटामासी, कपि
भगवान श्रीहरी विष्णू साठी
चंदन, अगर, ह्रीवेर, कुट, कुंकुम, उशीर, जटामासी और मुर;
भगवान शिव शंकर महादेवा साठी
चंदन, अगर, कपूर, तमाल, जळ, कुंकुम, कुशीद, कुष्ट;
भगवान गणेशासाठी
चंदन, चोर, अगर, मृग और मृगी का मद, कस्तूरी, कपूर; अथवा
चंदन, अगर, कपूर, रोचन, कुंकुम, मद, रक्तचंदन, ह्रीवेर;
सूर्य देवा साठी
जळ, केसर, कुष्ठ, रक्तचंदन, चंदगन, उशीर, अगर, कपूर।

अष्टगंध से मनोकामना पूर्ति

मित्रानो शास्रात तीन प्रकारच्या अष्ट गंधाचे वर्णन मिळते.
शारदातिलक शास्त्रानुसार आठ पदार्थ अष्टगन्ध मध्ये वापरले जाते.
चन्दन, अगर, कर्पूर, तमाल, जल, कंकुम, कुशीत, कुष्ठ।
हे अष्टगन्ध शैव सम्प्रदाया मधील लोकाना प्रिय असते.

अष्टगंध ची संपूर्ण माहिती

दूसऱ्या प्रकारच्या अष्टगन्ध मध्ये अधोलिखित आठ पदार्थ असतात.
कुंकुम, अगर, कस्तुरी, चन्द्रभाग, त्रिपुरा, गोरोचन, तमाल, जळ आदि
हे अष्टगन्ध शाक्त व शैव दोन्ही सम्प्रदाया मधील लोकाना प्रिय आहे.

वैष्णव अष्टगन्ध च्या रूपात हे आठ पदार्थ प्रिय आहेत.
चन्दन, अगर, ह्रीवेर, कुष्ठ, कुंकुम, सेव्यका, जटामांसी, मुर।

याच प्रमाणे अन्य सम्प्रदायाच्या मता नुसार अष्टगन्ध रूप या आठ पदार्थांना मानले जाते. जे आपण रोज देव पूजेतील कार्यास वापरतो.
अगर, तगर, केशर, गौरोचन, कस्तूरी, कुंकुम, लालचन्दन, सफेद चन्दन।
हे सर्व पदार्थ कुटून चाळून अग्नि द्वारा भस्म केले जाते आणि जळा बरोबर वाटून एकत्र करून अष्टगन्ध बनविला जातो.

भाग्य जगाने वाला अष्टगंध

तर मित्रानो हि होती अष्टगन्ध विषयीची माहिती. ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुयोग्य पद्धतीने करून आपल्या कुंडलीतील ग्रह मजबूत करू शकता, आपल्या कुंडलीतील ग्रह शांत करू शकता तसेच माता लाक्ष्मींची कृपा देखील प्राप्त करू शकत. तर आपण हि दररोज सकाळी स्नानादी नित्य कर्म आटोपल्यानंतर देवाला हात जोडून मनोभावे नमस्कार करून आपल्या उजव्या हाताच्या करंगळी ने माथ्यावर अष्टगंधाचा टिळक जरूर लावा, याने आपल्याला निश्चितच फायदा होईल. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here