Pitru Paksha 2021 : तुमचे पूर्वज स्वप्नात येऊन काय सांगू इच्छितात किंवा कावळे काय संकेत देतात हे जाणून घ्या.

0
8
pitru paksha

Pitru Paksha 2021 : तुमचे पूर्वज स्वप्नात येऊन काय सांगू इच्छितात किंवा कावळे काय संकेत देतात हे जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो, कर्म बंधन चानेलमध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला, जर का आपले पूर्वज वारंवार, सातत्याने आपल्या स्वप्नामध्ये येत असतील, तर ते आपल्याला काय संकेत देवू पाहतायेत, आपल्याला काय सांगू इच्छितात या विषयीची माहिती पाहणार आहोत.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो श्राद्ध पक्ष 20 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे आणि 6 ऑक्टोबर तो समाप्त होणार आहे. श्राद्ध पक्ष किंवा पितृ पक्ष हा पूर्वजांना समर्पित मानला जातो. असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात आणि जेवण आणि पाण्याच्या स्वरुपात त्यांनी दिलेलं तर्पण आणि श्राद्ध ग्रहण करतात.

मित्रानो आपले पूर्वज भौतिक स्वरुपात येऊन आपल्याला काहीही सांगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत अनेक वेळा ते आपल्या स्वप्नात येतात आणि आपल्याला काही संकेत देतात. जर तुम्ही पितृ पक्षाच्या वेळी तुमच्या पूर्वजांना तुमच्या स्वप्नात पाहिले तर समजून घ्या की त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. या विदेओमध्ये आपण अशी काही चिन्हे जाणून घेणार आहोत, कि जी तुमच्या पूर्वजांचे संकेत समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.चला तर मग जाणून घेवूया कि पूर्वजांना काय सांगायचे आहे ते?

जर का तुमचे पूर्वज तुम्हाला स्वप्नामध्ये काही मागताना दिसले किंवा त्यांचे कपडे फाटलेले असतील किंवा पायात शूज किंवा चप्पल नसेल, तर तुमच्या पितरांनी मागितलेल्या वस्तूचे आपण दान करावे. यामुळे आपले पूर्वज संतुष्ट होतात.

जर का तुमचे पूर्वज तुम्हाला श्राद्ध पक्षात झाडावर बसलेले किंवा झाडाजवळ उभे असलेले दिसले किंवा खूप कमकुवत दिसले, तर याचा अर्थ ते कोणत्यातरी संकटामध्ये आहेत. अशा परिस्थितीत आपल्या पूर्वजांना दुखातून मुक्त करण्यासाठी, संकटातून मुक्त करण्यासाठी, आपण जप, तपश्चर्या आणि ध्यान-धारणा केली पाहिजे.

जर का तुम्हाला स्वप्नामध्ये, तुमचे पूर्वज खूप आनंदी दिसले किंवा तुमच्या डोक्यावर हात ठेवताना दिसले तर याचा अर्थ असा की, तुमचे श्राद्ध त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे आणि ते तुमच्यावर खूप आनंदी आहेत. तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते पृथ्वीवर आले आहेत.

जर का तुम्हाला स्वप्नामध्ये, तुमच्या घराच्या आजूबाजूला पूर्वज दिसले, तर याचा अर्थ असा होतो की कुटुंबाशी असलेला त्यांचा मोह अजूनही संपलेला नाही. अशा स्थितीत आपण पितृपक्षात रोज गाईला चपाती खायला द्यावी. मित्रानो आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी आपण काय केले पाहिजे या विषयी जाणून घेवूया.

पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृ पक्षात त्यांच्या नावाने दान केले पाहिजे. याशिवाय गीता आणि रामायनाचे पाठ पठण करावेत. असे मानले जाते की गीता आणि रामायनाचे पाठ पठण केल्याने त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती बरोबरच परम शांती प्राप्त होते.

मित्रानो पितृपक्षात कावळ्याचे महत्त्वही फार वाढते. कावळे हे पूर्वजांचे प्रतीक मानले जातात आणि या महिन्यामध्ये त्यांना जेवण देण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, जर कावळ्याने या दरम्यान तुमचा घास चाखला तर तो थेट पूर्वजांना प्राप्त होतो. हे पूर्वजांच्या आनंदाचे आणि समाधानाचे लक्षण मानले जाते. याशिवाय, पितृपक्षाच्या वेळी असे काही संकेत मिळतात जे अतिशय शुभ मानले जातात. या लक्षणांबद्दल आपण जाणून घेवूया.

पितृ पक्षात मिळणारे शुभ संकेत

जर का कावळा श्राद्ध पक्षाच्या दरम्यान चोचीत कोरडा पेंढा घेऊन जाताना दिसला तर ते धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते.

जर का कावळा घराच्या छतावर बसला असेल किंवा हिरव्या झाडावर बसला असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या घरावर पूर्वजांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या घरात सुख आणि समृद्धी नांदेल.

पितृ पक्षाच्या दरम्यान, जर का तुम्हाला तुमच्या घराभोवती कावळ्याच्या चोचेत फुले आणि पाने घेतलेले पाहिले, तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याकडून जे काही मागाल, ज्या काही तुमच्या इच्छां असतील, त्या त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील.

जर का तुम्हाला एखादा कावळा गाईच्या पाठीवर चोच चोळताना दिसला, तर तुमच्या घरामध्ये आनंदाचे आणि शुभ कार्याच्या मेजवानीचे आयोजन होण्याचे लक्षण आहे. आणि जर का कावळा डुकराच्या पाठीवर बसलेला दिसला तर त्यातून मोठ्या धन प्राप्तीचा संकेत मिळतात.

जर का तुम्हला कावळा धुळीत लोळताना दिसला, तर याचा अर्थ असा होतो की तेथे राहणाऱ्या लोकांच्या घरी लवकरच पैशांचे आगमन होईल आणि जर कावळा धान्याच्या ढिगावर बसलेला आढळला तर ते देखील आपल्या घरामध्ये समृद्धी येण्याचे प्रतीक आहे.

जर का कावळा घास ग्रहण करुन उडतो आणि विहिरीच्या किंवा नदीच्या काठावर बसतो, तर याचा अर्थ असा की आपण काही मौल्यवान वस्तू गमावू शकता. याशिवाय, आपल्यला हे कोर्ट कचेरीच्या खटल्यामध्ये विजय प्राप्त होण्याचे आणि संपत्तीमध्ये वाढ होण्याचेही लक्षण आहे.

जर का कावळा आपल्या किंया आपल्या घराच्या डावीकडून येतो आणि अन्न ग्रहण करतो, तर आपला प्रवास कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. त्याचबरोबर मागच्या बाजूने कावळा आला तर प्रवाशाला लाभ मिळतो.

तर मित्रानो हे होते आपल्या पूर्वजांकडून तसेच कावळ्या कडून मिळणार्या काही संकेत विषयीची माहिती. हे संकेत समजून घेवून आपण आपले जीवन सरळ, सुलभ आणि समृध्द बनवू शकता. विदेओ आवडला असेल तर like, share आणि subsribe करायला विसरू नका, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here