Pimpalachya Zadache Fayde | या झाडाला ४ परिक्रमा घाला, पैसे कधीही कमी पडणार नाहीत | Benefits Of Peepal

0
63
Pimpalachya Zadache Fayde

Pimpalachya Zadache Fayde | या झाडाला ४ परिक्रमा घाला, पैसे कधीही कमी पडणार नाहीत | Benefits Of Peepal

नमस्कार मित्रानो, आज आम्ही आपल्याला असा उपाय सांगणार आहोत जो उपाय केल्याने सात जन्मांपर्यंत दरिद्रता आपल्याला शिवणारही नाही. आपल्याला पैश्यांची कमी कधीही पडणार नाही. आपले जीवन धन धान्याने समृद्ध होऊन जाईल. हा उपाय अगदी साधा सोपा परंतु अतिशय लाभ दायक परिणाम मिळवीन देणारा उपाय आहे.

Pimpalachya Zadache Mahatva, Pooja And Upay

मित्रानो सनातन हिंदू धर्म शास्त्रामध्ये आपले जीवन सुखकर करण्याचे अनेक उपाय सांगितले गेले आहेत. पण कालौघात हे या उपायांबद्दलची माहिती लुप्त होत गेली व सामान्य जनमानस या उपायांपासून वंचित राहिला आहे. तर असाच एक उपाय आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत ज्याने आपले जीवन सुखकर होईल. मित्रानो पैशाशिवाय परमार्थ साधता येत नाही याचप्रमाणे अध्यत्माशिवायही परमार्थ साधता येत नाही. व आजचा हा उपाय हा असाच अध्यात्माच्या मदतीने आपल्याले जीवन सुखकर बनवून परमार्थ साधण्याचा आहे.

Benefits Of Peepal

मित्रानो आपल्याला या उपायांमध्ये पिंपळाच्या झाडाला परिक्रमा घालून साष्टांग नमस्कार करायचा आहे. मित्रानो आपण साष्टांग दंडवत का घालतो तर ज्या देवी देवतांना आपण प्रणाम करतो त्यांच्या समोर आपली नजर, मस्तक, तण-मन झुकले जाते किंवा आपल्या अहंकाराची भावना नष्ट होऊन प्रभूच्या चरणावर समर्पित होते.

Importance Of Peepal Tree In Astrology

तसेच मित्रानो पिंपळाच्या वृक्षाला सर्व वृक्षामध्ये सर्वात पवित्र मानले गेले आहे कारण हिंदू धर्म शास्त्रानुसार स्वतः भगवान श्रीहरी विष्णू पिंपळाच्या वृक्षामध्ये निवास करतात. श्री मदभगवत गीतेमध्ये स्वतः भगवान श्री कृष्णचंद्राने आपल्या श्री मुखातून सांगितले आहे कि वृक्षामध्ये मी पिंपळ आहे, स्कंध पुराणानुसार पिंपळाच्या मुळांमध्ये श्रीहरी विष्णू, खोडामध्ये केशव, फाद्यांमध्ये नारायण, पानांमध्ये भगवान हरी आणि सर्व देवतांनी युक्त अच्युत भगवान सदैव निवास करतात.

Importance Of The Pipal Tree

मित्रानो वैज्ञानिक दृष्टीनेही पिंपळ पूजनीय आहे, कारण पिंपळ हा एकमेव असा वृक्ष आहे कि जो चोवीस तास दिवस रात्र ऑक्सिजनचे उत्सर्जन करतो. जो प्रत्येक जीवासाठी प्राणवायू म्हटलं जातो. प्रत्येक जीवधारी ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. वैज्ञानिक शोधामध्ये हे तथ्य सिद्ध झाले आहे कि ऑक्सिजन देण्याखेरीज पिंपळ वृक्षामध्ये अन्य अनेक विशेषता आहेत. जसे याची सावली थंडीमध्ये उष्णता, गरमी देते व उन्हाळ्यामध्ये शीतलता देते. आयुर्वेदानुसार याची साल, पाने आणि फळे इत्यादींमुळे अनेक प्रकारचे रोग नाशक औषधे बनविली जातात. अशा पद्धतीने वैज्ञानिक दृष्टीनेही पिंपळ पूजनीय आहे.

Why Do Hindus Worship The Peepal Tree

तर मित्रानो आजचा हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे कि कि शनिवारच्या दिवशी माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूच्या समवेत सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत पिंपळ वृक्षाच्या छायेखाली विश्रांतीसाठी येतात. म्हणून या शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्यावर स्नानादी नित्यकर्म आटोपून पिंपळ वृक्षाच्या ४ परिक्रमा काढून त्याला साष्टांग दंडवत घालावा व पिंपळ वृक्षाला आलिंगन द्यावे, त्याला स्पर्श करावा. असे केल्याने माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू या दोहोंचीही कृपा प्रपात होते व जातकांच्या जीवनामध्ये सातजन्मापर्यत दरिद्रता येत नाही.

Peepal Ke Benefits

माता लक्ष्मी आणि श्रीहरीच्या कृपेने आपले जीवन सुखी व समृद्ध होऊन जाते. आपल्या जीवनामध्ये पैश्यांची कमतरता कधीही भासत नाही. मित्रानो हा उपाय अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे, यासाठी आपल्याला कोणत्याही पूजा विधीची किंवा खर्च करण्याची गरज नाही आहे. व पिंपळाचे झाड हे देखील आपल्या देशामधील सर्व भागांमध्ये अगदी साजरीत्या आढळणारे वृक्ष आहे. त्यामुळे आपण सहजपणे हा उपाय करू शकता. तर मित्रानो हा उपाय आपण आपली साप्ताहिक चर्या असल्याप्रमाणे प्रत्येक शनिवारी करत चला. यामुळे आपल्याला माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांचा कृपाशिर्वाद प्राप्त होईल. व आपले जीवन सुखकर होऊन जाईल.

Peepal Puja Ki Vidhi

माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा आणि जलद गतीने परिणाम प्राप्त करून देणारा उपाय आहे. या उपायाचा लाभ आपण अवश्य घ्यावा. विडिओ आवडल्यास लाईक आणि शेयर जरूर करा. धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here