Never Help These 3 Types Of People | या तीन लोकांची भलाई कधीही करू नका | Chanakya Niti

0
39
Never Help These 3 Types Of People

Never Help These 3 Types Of People | या तीन लोकांची भलाई कधीही करू नका | Chanakya Niti

नमस्कार मित्रानो, आज आम्ही कर्म बंधन चॅनेलच्या माध्यमातून एक नवीन व्हिडीओ घेऊन येत आहे. मित्रानो नेहमी आपल्याला सांगितले जाते कि दुसऱ्याचे भले केले पाहिजे, ज्यामुळे ईश्वर आपले देखील भले करतो. परंतु याला काही अपवाद आहेत. आर्य चाणक्यांनी अशा तीन प्रकारच्या लोकांबद्दल सांगितले आहे कि ज्याचे भले केल्याने आपल्याला दुःख प्राप्त होण्याची संभावना अधिक असते. आचार्य चाणक्यांच्या नीती नुसार आपण या तीन प्रकारच्या व्यक्तींपासून अंतर राखून राहिले पाहिजे, दूर राहिले पाहिजे.

Never Forget Three Types Of Peoples

यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, दुष्ट स्वभावाच्या स्त्रीचे भरन – पोषण करणे. जर का एखादी स्त्री चरित्रहीन आहे, कर्कश आहे, दुष्ट आहे, दुष्ट म्हणजे वाईट स्वभावाची असेल तर तिचे भरन – पोषण करणाऱ्या पुरुषाचे सुखाची प्राप्ती होत नाही. अशा स्त्रीला फक्त धनाचा मोह असतो. सज्जन पुरुष आगर अशा स्त्रीच्या संगतीमध्ये राहिला तर त्याला समाजामध्ये आणि घर परिवारामध्ये अपयश आणि बेइज्जती प्राप्त होते. जी स्त्री धर्माच्या मार्गावरून भटकते ती स्वतःच तर पाप करतेच पण दुसऱ्यालाही पापाचे भागीदार बनविते. यामुळे सज्जन पुरुषाला अशाप्रकारच्या कोणत्याही स्त्रीशी कसलाही संबंध ठेवले नाही पाहिजेत.

Murkh Vyakti Ke Lakshan

दुसरा क्रमांकावर आहे, मूर्ख शिष्यला उपदेश देणे. आचार्य चाणक्य सांगतात कि जर का कोणी एखादी स्त्री किंवा पुरुष मूर्ख असेल तर त्यांना उपदेश करू नयेत. आपण मूर्ख माणसाला ज्ञान देऊन त्याचे भले करू पाहतो, परंतु त्याला ते समजत नाही. बुद्धिहीन लोक ज्ञानपूर्ण गोष्टींच्यासाठी व्यर्थ तर्क वितर्क करतात. ज्यामुळे आपलाच वेळ वाया जातो. मूर्ख लोकांना समजवायला गेल्याने आपल्यालाच मानसिक तणाव सहन करावा लागतो. त्यामुळे अशा लोकांपासून दूरच राहिले पाहिजे.

Murkh Logo Ki Pahchan

तिसऱ्या क्रमांकावर आहे, जी व्यक्ती अकारणच दुखी राहते. आचार्य चाणक्य म्हणतात कि जो व्यक्ती ईश्वराने दिलेल्या संसाधनांनी आणि सुखानी संतुष्ट न होता व्यर्थच विलाप करत राहतात, दुखी राहतात, अशा व्यक्तीं बरोबर राहिल्याने आपल्यालाही दुःख प्राप्त होते. समजदार व्यक्तीला जे मिळते तो त्यामध्येच संतुष्ट होतो. समाधान मानतो व प्रसन्न राहतो, आनंदी राहतो. अकारण दुखी राहणारे लोक दुसऱ्याच्या सुखांमध्ये हि ईर्ष्येचा भाव ठेवतात व त्यांना दोष देत राहतात. ते स्वतः कसलाही प्रयत्न करत नाहीत व दुखी बनून राहतात.

How To Stay Positive

अशाप्रकारे ईर्ष्येचा भाव ठेवणारे व अकारण च दुखी राहणाऱ्या लोकांपासून दूर राहण्यातच आपली भलाई असते. तर मित्रानो प्रत्येकाने या तीन प्रकारच्या व्यक्तींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे. अशा व्यक्तींचे भले करायला जाऊन आपल्या आयुष्यामध्ये दुःखाला, मानसिक त्रासाला आमंत्रण देऊ नये. विडिओ आवडल्यास लीके आणि शेयर जरूर करा, धन्यवाद….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here