Naral kharab honyache sanket | देवाला वाढविलेला नारळ खराब निघणे शुभ असते कि अशुभ | Coconut in Pooja

0
76
Naral kharab honyache sanket

Naral kharab honyache sanket | देवाला वाढविलेला नारळ खराब निघणे शुभ असते कि अशुभ | Coconut in Pooja

नमस्कार मित्रांनो, बऱ्याचदा देवाला फोडलेला नारळ खराब निघतो. याचा अर्थ काय? यातून देव आपल्याला नक्की कोणते संकेत देत असतात. मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की कोणत्याही शुभ कार्यात नारळ हा अत्यावश्यक असतो. असं म्हणतात की जर नारळ असेल तर आपली सर्व कामे शुभ होतात. नारळ हे प्रत्यक्ष माता लक्ष्मीच एक रूप आहे, म्हणूनच नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं. मित्रांनो कोणतीही पूजा असू द्या, त्या पूजेमध्ये नारळ हा अत्यावश्यक असतो. असं म्हणतात की नारळाचा वापर केल्याने आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होते. माता लक्ष्मी प्रसन्न होते.

देवपूजा करताना नारळ खराब निघणे

तुम्हाला माहीत असेल की, नवरात्रात आपण मातेच्या विविध रूपांना नारळ अर्पण करत असतो. मित्रांनो मात्र कधी-कधी पूजा करताना, आपण जेव्हा नारळ फोडतो तेव्हा हा नारळ खराब निघतो, सडलेला निघतो. आणि अशावेळी आपण घाबरून जातो. बऱ्याच जणांना वाईट वाटतं. काही जणांना वाटत कि हा देवाचा कोप तर नाही? देव आपल्यावरती अप्रसन्न तर झालेले नाहीत. मित्रांनो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, की हिंदू धर्मानुसार नारळ खराब निघणे, नारळ सडलेला निघणे ही गोष्ट अशुभ अजिबात नाही. नारळ खराब निघाल्याने आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अनिष्ठ गोष्टी अजिबात घडणार नाहीत.

नारळाशी निगडित काही खास गोष्टी

आणि म्हणून आपण वाटून घेता कामा नये. मित्रांनो नारळ खराब निघणे ही एक शुभ गोष्ट आहे. नारळ खराब जेव्हा निघतो, तेव्हा देवाकडून आपल्याला काही संकेत मिळत असतात. मित्रांनो हे संकेत समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आपला हिंदू धर्म, आपला जो सनातन धर्म आहे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या मान्यता आहेत. आणि म्हणून आपण बऱ्याचदा चुकीची माहिती आपल्याला मिळते आणि मग आपला गैरसमज होतो आणि मग आपल्या मध्ये भीतीचं वातावरण पसरतं. मित्रांनो नारळ जर खराब निघाला तर तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका आणू नका, मन भयभीत करू नका.

नारळ फोडा विघ्ने सोडा

मित्रांनो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जर तुम्ही देवपूजेत फोडलेला नारळ खराब निघाला, तर असं म्हणतात की देवाने स्वतःच तो प्रसाद म्हणून ग्रहण केलेला आहे. हिंदू धर्मामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. अनेक पुराणांमध्ये सुद्धा या गोष्टीचे उल्लेख आहेत, की नारळ खराब निघणे म्हणजे त्या देवतेने हा प्रसाद स्वतःच भक्षण केलेला आहे. आणि म्हणून जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील, काही मनोकामना असतील, तर मित्रांनो या इच्छा, या मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहेत असा याचा अर्थ असतो. एखाद्य तुमचं अडलेलं काम, की जे खूप दिवसांपासून अडलेलं आहे. ते काम पूर्णत्वास जात नाहीये.

Vastu Tips Coconut

तर मित्रांनो जर तुमची इच्छा असेल की हे काम पूर्ण व्हावं, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याचे योग येणार आहेत. आणि म्हणून आपण दुःखी होऊ नका. मित्रांनो हा देवाचा आशीर्वाद आहे, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना. मित्रांनो मग प्रश्न असा आहे कि नारळ चांगला निघाला तर काय? मित्रांनो चांगला नारळ निघणे याचा अर्थ असा होतो, की तुमची देवपूजा देवास मान्य आहे. मात्र या ठिकाणी एक चूक आपल्याकडून होते, की आपण नारळ तर फोडतो. मात्र तो केवळ स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबीयांसाठी खाण्यासाठी वापरतो प्रसाद म्हणून.

Dev puja and Coconut

मित्रांनो अशा वेळी आपण आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा मंदिरामध्ये जे कोणी उपस्थित आहेत, अशा सर्वांना हा नारळ वाटून द्यावा. तर मित्रांनो मला आशा आहे की इथून पुढे जेव्हा जेव्हा तुमच्या देवपुजेमध्ये तुम्ही नारळ फोडाल आणि हा नारळ खराब निघेल तेव्हा तुम्ही दुःखी न होता हा दैवीय कृपा प्रसाद आहे हे समजून जाल. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here