Laxmi Puja 2021 | लक्ष्मी पूजनानंतर दिव्यामध्ये टाका हि वस्तू, धनाची बरसात होईल | लक्ष्मीपूजन २०२१

0
32
Laxmi Puja 2021

लक्ष्मी पूजनानंतर दिव्यामध्ये टाका हि वस्तू, धनाची बरसात होईल.

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेलमध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीना प्रसन्न करण्यासाठी आपण हर प्रकारची तयारी करत असतो, कारण असे मानले जाते कि या दिवशी माता महालक्ष्मीना शीघ्र स्वरूपामध्ये प्रसन्न करून घेवून आपले जीवन धन धान्याने परिपूर्ण बनऊ शकतो. धार्मिक माण्यतानुसार दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी या पृथ्वीवर भ्रमण करीत असतात. आणि यादिवशी आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी, जोदेखील उपाय करतो, आपल्या घरामध्ये त्यांचे आगमन होण्यासाठी, त्यांच्या स्वागताची जी देखील तयारी करतो, त्यामुळे माता महालक्ष्मी खुश होतात व शीघ्र स्वरूपात आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कृपाशीर्वाद बरसवितात.

या विदेओमध्ये आपण माता महालाक्ष्मिना प्रसन्न करण्याचे, त्यांना खुश करण्याचे, स्थायी, स्थिर धन प्राप्तीचे तीन अत्यंत साधे, परंतु चमत्कारिक उपाय पाहणार आहोत. हे उपाय आपण दिवाळीच्या दिवशी करून आपल्या जीवनामध्ये सदैव महालाक्ष्मींची कृपा प्राप्त करू शकतो. चला तर मग जाणून घेवूया दिवाळीच्या दिवशी करायच्या उपायांविषयी.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

यातील जो पहिला उपाय आहे तो म्हणजे दिव्याचा उपाय. मित्रानो दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजनामध्ये प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मींसाठी रात्रभर अखंड दीपक लावला जातो. हा दीपक आपण कोणत्याही धातूचा घेवू शकता. परंतु जर का आपण मातीचा दीपक लावला तर अति उत्तम असते. त्यामुळे शक्यतो आपण एक मातीचा मोठा दीपक आणावा. यानंतर कापसाच्या दोन वाती बनवून त्या हळदीच्या सहाय्याने पिवळ्या रंगामध्ये रंगवून घ्यायच्या आहेत. आणि या दोन वातींची एक वांत बनवून हि वांत मातीच्या दिव्यांमध्ये लावायची आहे. या नंतर मातीच्या दिव्यामध्ये ज्याला आपण पनती असे देखील म्हणतो. तर या पणती मध्ये मोहरीचे तेल घालायचे आहे.

अशा पद्धतीने आपला दिवा तयार झाल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी या दिव्यामध्ये दोन गोमती चक्र घालायचे आहेत, टाकायचे आहेत. मित्रानो हे गोमती चक्र आपल्याला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी सहजपणे मिळून जातील. आणि याची किमतही जास्त नसते, अगदी ५ ते १० रुपयामध्ये आपल्याला ते मिळून जातील. मित्रानो गोमती चक्र आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात शुभाता घेवून येते. माता महालाक्ष्मींची असीम कृपा आपल्या जीवनामध्ये घेवून येते. तर अशा पद्धतीने मातीच्या दिव्यामध्ये दोन गोमती चक्र घालून आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे.

मित्रानो हा दीपक आपण रात्रभर जाळत ठेवायचा आहे. परंतु एक गोष्ट इथे ध्यानांत ठेवा कि या दिव्यामध्ये एवढेच तेल घालावे कि ते दुसर्या दिवशी सकाळ पर्यंत संपून जाईल. दिव्यामध्ये तेल शिल्लक राहू नये. यानंतर दुसर्या दिवशी सकाळी दिव्यातील तेल संपल्यानंतर, आपण हे गोमती चक्र दिव्यातून काढून कापडाने पुसून घ्यायचे आहेत. मित्रानो लक्ष्यात ठेवा आपल्याला हा उपाय लक्ष्मी पूजन पूर्ण झाल्यानंतर करायचा आहे.

आंपण घरामध्ये लक्ष्मी पुजानासाठी जे अखंड दिवा लावता त्या दिव्यामध्ये हे गोमती चक्र टाकले तरी चालतात . सर्व प्रथम आपल्याला दीप पूजन करायचे आहे व त्यानंतर त्यामध्ये गोमातीचाक्र घालायचे आहेत. दुसर्या दिवशी सकाळी हे गोमातीचाक्र दिव्यातून बाहेर काढावेत, त्यांना व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे आणि त्यांचे विधिवत पूजन करायचे आहे. म्हणजे हळद कुंकू, फुल वाहून धूप दीप दाखवायचा आहे. पूजन करून झाल्यानंतर हे गेमातीचाक्र घेवून आपल्या घरातील कपाटामध्ये, तिजोरीमध्ये किंवा जिथे आपला कॅश बॉक्स असेल तर तिथे छोटेसे लाल रंगाचे कापड अंथरून त्यावर स्थापित करायचे आहेत. या उपायामुळे माता महालक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर स्वरुपात निवास करतात. मित्रानो हा उपाय आपण दिवाळीच्या दिवशी अवश्य केला पाहिजे.

मित्रानो आता आपण दिवाळीच्या दिवशी करायचा दुसरा उपाय पाहूया. यासाठी आपल्याला एक छोटेसे गुलाबी रंगाचे कापड किंवा गुलाबी रंगाची चुनरी घ्यायची आहे. यानंतर आपण जर का आपल्याकडे चांदीचे नाणे असेल तर असे चांदीचे नाणे किंवा मग आपण साधारण नाणे देखील घेवू शकता. पण चांदीचे नाणे अति उत्तम असते. कारण माता लाक्ष्मींचा वास हा चांदी या धातूमध्ये असतो. मित्रानो एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवावी कि धनत्रयो दिवशी आपण सोने खरीदी करा किंवा नाही पण एक चांदीचे नाणे नक्की खरेदी केले पाहिजे. आपल्याला जितक्या रकमेचे नाणे घेणे शक्य असेल त्यानुसार एखादे नाणे अवश्य घेतले पाहिजे.

तर मित्रानो आपल्याला एक गुलाबी रंगाचे कापड आणि एक चांदीचे नाणे घ्यायचे आहे, व दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करते वेळी हे गुलाबी कापड माता लाक्ष्मींच्या चरणाजवळ ठेवून त्यावर चांदीचे नाणे ठेवायचे आहे. यानंतर या नाण्याची विधिवत पूजन करायचे आहे. हे कापड आणि नाणे रात्रभर आपल्याला माता लाक्ष्मींच्या समोरच ठेवायचे आहे. व दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा माता लाक्ष्मींचे व या नाण्याचे विधिवत पुजन करून आपण ते नाणे तेथून उचलायचे आहे. व त्याच गुलाबी कपड्यामध्ये ते नाणे बांधायचे आहे. यानंतर हे नाणे आपल्या धन ठेवण्याच्या जागेवर ठेवायचे आहे. मित्रानो नाणे बधायाचे कापड गुलाबी रंगाचेच असायला हवे. माता लक्ष्मीना गुलाबी रंग फार प्रिय असतो. शक्य झाले तर गुलाबी रंगाचे रेशमी कापड घ्यावे.

याचे विधिवत पूजन करावे. कापडावर थेडे अत्तर शिंपडावे. व हि पोटली एकाद्या प्लेट मध्ये किंवा वाटीमध्ये ठेवून आपल्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये किंवा गल्ल्यांमध्ये ठेवावी. पोटली ठेवण्यासाठी चांदीचे पात्र वापरले तर फारच उत्तम असते. मित्रानो हा जो उपाय आपण करत आहोत याला धनाचे पात्र असे म्हणतात. व जर का हे धनाचे पात्र आपण आपल्या घरामध्ये ठेवले असेल तर घरामध्ये धनाची बरसात होते. मित्रानो जर का आपल्याकडे पोटली ठेवण्यासाठी पात्र नसेल तर आपण फक्त पोटली देखील धन ठेवण्याच्या जागी ठेवू शकता. पण पोटली बनविताना अशा पद्धतीने बनवावी.

यानंतर मित्रानो आपण तिसरा उपाय पाहूया. माता महालाक्ष्मींचा हा एक अचूक उपाय आहे. यासाठी आपल्या एक लाल रंघाचे छोटेसे कापड घ्यायचे आहे. व या कपड्यामध्ये मोजून ११ लक्ष्मी कवड्या घ्यायच्या आहेत. कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला लक्ष्मी कवड्या अगदी सहजपणे मिळून जातील. तर आपल्याला ११ लक्ष्मी कवड्या एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये घ्यायच्या आहेत. आणि या कवड्या लक्ष्मी पूजनाच्या वेळी माता लाक्ष्मींच्या समोर ठेवायच्या आहेत. लक्ष्मी माते समोर या ११ कवड्याचे विधिवत पूजन करायचे आहे. हळद, कुंकू, फुल, धूप, दीप दाखवून पंचोपचार पद्धतीने त्यांचे पूजन करायचे आहे. यानंतर दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा या कवड्यांचे विधिवत पूजन केल्यानंतर त्याच लाल रंगाच्या कपड्या मध्ये या ११ कवड्या बांधून आपल्याला याची पोटली तयार करायची आहे व हि पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या वर लटकवायाची आहे.

मित्रानो हि पोटली ज्या घराच्या दरवाज्यावर लटकवलेली असते त्याघारामध्ये माता लाक्ष्मींचे आगमन झाल्यानंतर त्या पुन्हा कधी तेथून निघून जात नाहीत. त्या घरामध्ये त्या स्थिर स्वरूपात निवास करतात.
माता महालक्ष्मी सदैव अशा घरामध्ये विराजमान असतात. अशा घरामध्ये धनाची कमतरता कधीही भासत नाही. तर या दिवाळीला आपण हि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वर ११ लक्ष्मी कवड्यांची पोटली अवश्य बांधा. या उपयामुले आपल्या जीवनात, आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात शुभाता येईल. आपल्यावर धनाची बरसात होईल. व आपले जीवन ऐश्वर्य संपन्न होवून जाईल.

मित्रानो विदेओ आवडला असेल तर like, share आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here