Karya Siddhi Upay एक सुपारी इथे ठेवा अपयश आपल्याला स्पर्श हि करू शकणार नाही.

0
86
Mantra For Victory

Karya Siddhi Upay एक सुपारी इथे ठेवा अपयश आपल्याला स्पर्श हि करू शकणार नाही Sarva Karya Siddhi – Marathi Jyotish

नमस्कार मित्रानो कर्म बंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही आपल्याला असा उपाय सांगणार आहोत कि जो उपाय केल्याने आपल्या कोणत्याही मंगल कार्यामध्ये विघ्न येणार नाही, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळेल. जसे कोणाला मुले होण्यामध्ये अडथळे येत असतील, कोणाचा विवाह होण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील, किंवा जर का कोणी धार्मिक यात्रेला जाऊ इच्छित असेल व त्यांच्या जाण्याच्या मार्गामध्ये वारंवार बाधा निर्माण होत असतील, अथवा आपल्या एखादी पूजा किंवा धार्मिक अनुष्ठान संपन्न करायचे आहे व त्यामध्ये अडथळे येत असतील. तर अशा सर्व शुभ मंगल कार्य करण्यामध्ये आपल्याला सफलता मिळेल.

Astrology In Marathi for Sarva Karya Siddhi

आपल्याला धार्मिक यात्रेमध्ये अडचणी येत आहेत, घरातील मुलं मुलींच्या विवाह संदर्भात धावपळ करत आहेत पण काही ना काही कारणाने यश येत नाही आहे, किंवा आपल्या वंश वृद्धीमध्ये कसली ना कसली समस्या निर्माण होतेय, संतान सुखापासून वंचित आहात, वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत आहेत. पती -पत्नी, प्रेमी – प्रेमिका यांच्या जीवनामध्ये काहींना काही चढ उतार चालू आहेत. वाद विवाद होत आहेत. तर हा उपाय करण्याने आपल्या सर्व कामामध्ये येणारे अडथळे संपून आपल्याला यश प्राप्त होईल. याशिवाय या उपायाने आपल्याला देवीच्या पूजेमध्ये, व्रतामध्ये, साधनेमध्ये सफलता मिळेल.

Karya Siddhi Mantra – Marathi Jyotish

तर मित्रानो या उपायासाठी आपल्याला करायचे काय आहे?. या उपायासाठी आपल्याला एक छोटीशी सुपारी घ्यायची आहे. मित्रानो पूजेमध्ये, साधनेमध्ये सुपारीचं योगदान फार महत्वाचं असत. कोणत्याही धार्मिक पूजाविधीमध्ये आपण सुपारीचा वापर करतोच. परंतु काही विशिष्ठ अशा विधीने जर आपण या सुपारीचा उपयोग केलात तर या सुपारीने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देईल. मग आपण कोणतेही साधना करत साल, व्रत करत असाल किंवा उपवास. अथवा आपण एखादे खास काम करण्यासाठी जात असाल किंवा मिटिंग साठी जात असाल तर त्या कामामध्ये हि सुपारी आपल्याला नक्की यश मिळवून देईल. या सुपारीच्या प्रभावने आपल्या शत्रूंचा प्रभाव कमी होईल, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊन जाईल.

Yash Prapti Ke Upay by Famous Marathi Astrologer

याशिवाय आपल्या घराच्या वास्तुदोष संदर्भात आपल्याला काही समस्या असतील तर वास्तुदोषमधे देखील या सुपारीने आपल्याला लाभ मिळेल. किंवा आपण आपली एखादी प्रॉपर्टी जसे घर, जमीन जुमला याची विक्री करू पाहताय आणि त्यामध्ये जर अडचणी येत असतील, तर आपण अनुभवाला कि या उपायामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी संपून आपल्या प्रॉपर्टीची विक्री होत आहे. मित्रानो हि सुपारी एकच आहे परंतु याचे प्रयोग अनेक आहेत, फायदे अनेक आहेत. हा फारच साधा परंतु फारच कारगर असा उपाय आहे. मित्रानो हा उपाय कोणत्याही महिन्यातील चतुर्थीला किंवा बुधवारच्या दिवशी केला जाणारा उपाय आहे.

Yash Prapti Education

तर मित्रानो हा उपाय करताना कोणत्याही महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. आपण आपल्या घरातील कोणत्याही एका खोलीमध्ये सैल कपडे घालून अगदी शांत होऊन, रिलॅक्स होऊन बसायचे आहे. जमिनीवर बसू शकत नसाल तर खुर्ची किंवा सोफ्यावर देखील बसू शकता. बसताना आपल्यासमोर एखाद्या तांब्याच्या प्लेट मध्ये किंवा वाटीमध्ये एक छोटीशी सुपारी ठेवावी. मित्रानो हा विधी करताना आपण निळ्या व काळ्या रंगाची कपडे घालू नयेत. इतर कोणत्याही रंगाची चालतात. बसल्यानंतर शुक्री मुद्रा करायची आहे. शुक्री मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुढग्यावर सरळ ठेवावेत.

Har Karya Me Safalta – Today Astrology In Marathi

आपले तळ हात आकाशाच्या दिशेला असतील असे. आणि यानंतर हाताची पाची बोटे एकत्र जुळवावीत.म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदक सारखा होईल. याला वराही मुद्रा असे देखील म्हणतात. तर मित्रानो आपण शुक्री मुद्रा करून शांत बसायचे आहे. शुक्री मुद्रा करून शांत बसल्यानंतर १० वेळेला प्राणायाम करायचे आहे. म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यावा व जितका वेळ शक्य असेल तितका वेळ श्वास रोखावा आणि मग तो सावकाश, हळू हळू सोडायचा आहे. व त्यानंतर आपल्या दोन्ही भुवयांच्या मधोमध पिंच करायचे आहे म्हणजे थोडे चिमटायचे आहे. अशा प्रकारे १० वेळेला श्वासोश्वास करावा. असे करण्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होतो. आपल्या मनावरील ताण हलका होतो. मन शांत राहते.

Yash Prapti Ka Mantra Upay – Free Astrology In Marathi

Yash Prapti Sathi Upayप्राणायाम करून झाल्यानंतर ती सुपारी आपण आपल्या उजव्या हाताच्या मुठी मध्ये घ्यावी आणि डावा हात तसाच शुक्री मुद्रे मध्ये ठेवायचा आहे. व सुपारी उजव्या हाताच्या मुठीमध्ये ठेवून भगवान गणेशाच्या एका बीज मंत्राचा आपण जप करायचा आहे. मंत्र आहे || ग्लौं || या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आपण याचा उच्चार मकार लावून करू शकता किंवा गकार लावून करू शकता. मकार लावला तर याचा उच्चार ग्लौं असा होईल आणि गकार लावला तर याचा उच्चार ग्लौं असा होईल. आपण आपल्याला हवा तसा उच्चार करू शकता.

तर मित्रानो आपण आपल्या उजव्या हातामध्ये सुपारी घेऊन शुक्री मुद्रा करून बसावे व ग्लौं ग्लौं ग्लौं ग्लौं ग्लौं या मंत्रांचा उपांशु जप करायचा आहे म्हणजे तोंडातल्या तोंडात पुटपुटत हा मंत्र जपायचा आहे. आपले फक्त ओठ हलले पाहिजेत पण आवाज बाहेर येऊ नये अशा रीतीने. या बीज मंत्रांचा आपण ५ मिनिटांपर्यंत जप करायचा आहे. जप पूर्ण झाल्यानंतर कोणाही व्यक्तीला एखादे फळ किंवा भोजन दान करावे. मित्रानो हा विधी केल्यानंतर हि सुपारी साधारण सुपारी राहत नाही. आपल्या भावना त्यादेखील वस्तू मध्ये आपण घालतो त्यावस्तूला त्या प्रभावित करत असतात मग तो दगड का असुदे.

Yash Prapti Sathi Upay

सजीव वास्तूमध्ये तर भवन घालता येऊ शकतातच पण निर्जीव वास्तूमध्ये देखील या भावना घातल्या जाऊ शकतात. आणि म्हणूनच आपल्या मंदिरामधल्या ज्या देवांच्या मूर्ती असतात त्या दगडाच्या असतात परंतु त्यांना प्राण प्रतिष्ठित करून जिवंत बनविल्या जातात, चैतन्यमय बनविल्या जातात. तर अशा पद्धतीने आपल्या भावना ग्लौं बीज मंत्राच्या आधाराने या सुपारीमध्ये सामावल्या जातात. असा पद्धतीने सुपारीमध्ये ग्लौं बीज मंत्र म्हणत विडी केल्याने हि सुपारी आपल्या सर्व कार्यावर प्रभाव टाकणारी वस्तू बनते. आपण कोणतेही कार्य करण्यासाठी जात असाल त्यावेळी आपण आपल्या घराच्या देव्हाऱ्यामध्ये हि सुपारी एखाद्या तांब्याच्या प्लेट मध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायची आहे व या सुपारीवर थोडी हळद घालायची आहे.

Sarva Karya Siddhi

आणि यानंतर ग्लौं बीज मंत्राचा जप करून हात जोडून नमस्कार करावा व आपले काम करण्यासाठी निघून जावे. कोणतेही शुभ कार्य असो, विवाह संदर्भातील बोलणे करण्यासाठी जात असाल, अगदी कोणतेही कार्य करण्यासाठी आपण जात असाल तर हा विधी करून आपण जावे. आपले काम निश्चित पूर्ण होईल, आपल्याला त्या कामामध्ये नक्की सफलता मिळेल. यानंतर पाच सहा महिन्यांनी जेंव्हा हि सुपारी खराब व्हायला सुरु होईल तेंव्हा हि सुपारी पाण्यामध्ये प्रवाहित करावी व पुन्हा कोणत्याही महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी याच विधीने नवीन बनवावी. तर मित्रानो आपण हा उपाय अवश्य करून पहा. आल्याला याचा फारच चांगला लाभ मिळेल व आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळेल. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here