Jaya Ekadashi Vrat | जया एकादशी व्रत – सर्व मनोकामना पूर्ती | Jaya Ekadashi Ke Upay

0
156
jaya ekadashi vrat vidhi

Jaya Ekadashi Vrat | जया एकादशी व्रत – सर्व मनोकामना पूर्ती | Jaya Ekadashi Ke Upay

मित्रानो एकादशीचे व्रत हे भगवान श्रीहरी विष्णू यांना परम प्रिय तसेच त्यांना शीघ्र प्रसन्न करणारे व्रत आहे. तसेच येणारी जया एकादशी व्रत सुद्धा खूप महत्वाची मानली गेलेली आहे. जो कोणी व्यक्ती हे व्रत व श्रीहरी भक्ती खऱ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतो त्याचे सकळ मनोरथ सिद्धीस जातात. त्याचे सर्व पाप नष्ट होतात व तो कायम स्वरूपी श्रीहरी कृपेस पात्र होते. श्रीहरी कृपा कायम त्याच्या सोबत राहते. मित्रानो जया एकादशीचे व्रत हे, प्रेत योनीतुन मुक्ती देणारे व्रत मानले गेलेले आहे. भगवन श्रीकृष्णाने युधिष्टिरास स्वतः या जया एकादशी व्रताचे महत्व सांगितले होते. जे ऐकल्याने युधिष्टिराने हे जया एकादशीचे व्रत केले होते.

Jaya Ekadashi Puja Vrat Vidhi

प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे एक वेगळेच महत्व असते. आणि जो व्यक्ती हे सर्व एकादशी व्रत विधी-विधानपूर्वक करतो त्याला सुख-समृद्धी, ऐश्वर्य आणि संतान सुख बरोबरच सर्व सुखांची प्राप्ती होते, व जीवनाच्या अंती त्याला विष्णुलोकाची प्राप्ती होऊन, श्रीहरी विष्णू चरणी स्थान प्राप्त करतो. मित्रानो शास्त्रानुसार सांगितलेले आहे कि जया एकादशीचे व्रत केल्याने भूत, पिशाच्च तसेच प्रेत योनीतुन मुक्ती मिळते. तर हे व्रत कसे करावे, या व्रताचे महत्व काय? पूजा कशी करावी, व्रताचे नियम काय? व या शुभ दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कोणता विशेष उपाय करावा, कि ज्यामुळे आपल्याला व्रताचे पुर्नफळ प्राप्त होईल व आपले एकादशीचे व्रत सुफळ संपूर्ण होईल.

Jaya Ekadashi Vrat Mahatva

चला तर मग सुरु करूया. मित्रानो एकादशीचे व्रत करताना, ते नियम पूर्वक करणे गरजेचे आहे. त्यानुसार हे एकादशीचे व्रत तीन दिवसांचे मानले गेलेले आहे. कारण एकादशी व्रत हे दशमी तिथीपासून प्रारंभ होते. त्यामध्ये दशमी तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन सात्विक भोजन ग्रहण करायचे आहे तसेच या दिवशी एकभुक्त राहायचे आहे. भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे व शक्य असल्यास या दिवशी आपण जमिनीवरच झोपायचे आहे आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचे आहे.

Jaya Ekadashi Ke Upay

दशमी तिथीला आपण सूर्यास्त होण्यापूर्वीच भोजन करून घ्यायचं आहे. सूर्यास्तानंतर भोजन करू नये. सूर्यास्ता आगोदरच आपल्याला भोजन करायचं आहे. आणि या दिवशी मसूर डाळ, कांदा, लसूण यांचं सेवन करू नये. या पदार्थांचा त्याग करायचा आहे. त्यानंतर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. स्नानादी नित्यकर्म निवृत्त व्हायचे आहे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडे गंगाजल टाकायचे आहे, सध्या माघ महिना चालू आहे, त्यामुळे आपल्याला माघस्नानाचे पुण्य प्राप्त होईल.

Jaya Ekadashi In Marathi

स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन प्रथम सूर्य नारायणास जल अर्पण करावे. म्हणजे सूर्य नारायणास अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य दिल्यानंतर सर्व प्रथम आपण पूजा स्थळी जाऊन भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करायचा आहे. व भगवान श्रीहरी विष्णूंची विधी-विधान पूर्वक पूजा करायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळे फुल आणि तुळशी पत्र आवश्य अर्पण करायचे आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुले आणि तुळशी पत्र अत्यंत प्रिय आहेत. व तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा हि अपूर्ण मानली जाते. त्यामुळे त्यांना तुळशी पत्र आवश्य अर्पण करायचे आहे. तसेच धूप-दीप लावायचा आहे. श्रीहरी विष्णूंना नैवेद्य म्हणून केळीआपण अर्पण करू शकता किंवा पिवळी मिठाई देखील अर्पण करू शकता.

Jaya Ekadashi Importance

तसेच श्रीहरी विष्णूंच्या बरोबरच माता लक्ष्मीचे देखील विधी-विधान पूर्वक पूजन करायचे आहे. त्यामुळे श्रीहरी विष्णूंच्या बरोबरच माता लक्ष्मीची देखील अखंड कृपा आपल्याला लाभणार आहे. यामुळे घरात सुख-शांती व समृद्धी येईल. याच बरोबर यादिवशी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या पूजनाचे हि विधान आहे. तसेच श्रीहरी विष्णूंचे जेवढे अवतार आहेत, त्यांच्या देखील पूजनाचे यादिवशी विधान आहे. संपूर्ण पूजन झाल्यानंतर पूजास्थळी बसून भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण आवश्य करावे. ||ओम नमो भगवते वासुदेवाय || या मंत्राचा १०८ वेळा जाप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्र नाम व भगवत्गीतेचा पाठ करावा. आणि श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करावी कि पूजे मध्ये नकळत झालेल्या, जाणते-अजाणते पणाने झालेल्या चुकांबद्दल आम्हाला क्षमा करावी.

Jaya Ekadashi Mahatva

मित्रानो एकादशीच्या दिवशी खोटे बोलू नये. कोणाचेही मन दुखावू नये, कमीत-कमी बोलण्याचा प्रयत्न करावा. कोणाही विषयी वाईट बोलू नये, जेणे करून तुमचे हे व्रत सुफळ, संपूर्ण होईल. यात कसलीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच या दिवशी दानालाही विशेष महत्वाचे स्थान दिलेले आहे. त्यामुळे या दिवशी श्रीहरी विष्णूंना केळी अर्पण करायची आहेत व गरज वंताना केळी दान करायची आहेत.

Jaya Ekadashi Vrat Ka Mahatva

तसेच एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनाला देखील विशेष महत्व दिलेले आहे कारण श्रीहरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय स्वरूप मानलेली आहे. त्यामुळे यादिवशी तुळशीपूजन देखील करायचं आहे. सकाळीही करायचं आहे आणि सायंकाळच्या वेळी देखील तुळशी पूजन नक्की करायचं आहे. आणि तुळशी पूजन करताना तुळशी समोर एक तुपाचा दिवा नक्की लावावा, व तुळशी पूजन झाल्यानंतर तळाशी समोर बसून श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण अवश्य करावे. त्याच बरोबर तुळशी मंत्राचा जाप हि करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंचा स्थिरावास आपल्या घरामध्ये राहतो.

Jaya Ekadashi Vrat Vidhi

तसेच एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूस पिंपळाच्या पानावर दुधाची आणि केसरची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास आपल्या सर्व समस्यांचे निराकरण होते. आपल्या धन विषयीच्या समस्या दूर होतात. तसेच धन लाभातील अडथळे दूर होतात. व सर्व मनोकामना पुरतीस जातात. दिवसभर श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करत, रात्री शक्य असल्यास जागरण करावे. कारण एकादशीच्या व्रतामध्ये एकादशीच्या रात्री श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करत जागरण करण्याचे विधान आहे. आणि जे कोणी नामस्मरण करत, भजन करत जागरण करतात त्यांना एकादशीच्या व्रताचे अनंत पुण्यफळाचे प्राप्ती होते. नसेल तर आपल्याला शक्य होईल तोपर्यत नामस्मरण करून जागरण करावे.

Jaya Ekadashi Vrat Paran Vidhi

एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच द्वादशीच्या दिवशी व्रताचे पारण करावे. त्यासाठी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म निवृत्त व्हावे. व नंतर पूजास्थळी बसून श्रीहरी विष्णूंची पूजा आराधना करावी. यानंतर एकाद्या गरज वंतास अन्न दान करून मग आपण भोजन ग्रहण करावे व व्रताचे पारण करावे. अशाप्रकारे नियम पूर्वक एकादशीचे व्रत करावे. असे केल्याने व्रत करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पुरतीस जातात, त्याच्यावर सदैव श्रीहरी व माता लक्ष्मीची कृपा राहते. त्यांना कशाचीही कमतरता पडत नाही. पुण्य फळाची प्राप्ती होते.

Jaya Ekadashi Puja Vidhi

तसेच या एकादशीच्या शुभ व पवित्र दिवशी केलेल्या विशेष उपायाने अनंत पुण्य फळाची प्राप्ती होते. त्यादृष्टीने आपण एक महत्वपूर्ण उपाय पाहणार आहोत, जो एकादशीच्या दिवशी नक्की करायचा आहे. मित्रानो एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन श्रीहरी विष्णूंच दर्शन घ्यायचं आहे, आणि दर्शनाला जाताना सोबत पिवळी फुले, पिवळ्या फुलांचा हार, पाच जाणावी, नैवेद्य म्हणून पिवळी मिठाई आपण बरोबर न्यायची आहे. तसेच एक दिवा देखील घ्यायचा आहे. व तेल हि न्यायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर हे सर्व साहित्य पिवळी फुले, पिवळ्या फुलांचा हार, पाच जाणावी, नैवेद्य म्हणून पिवळी मिठाई श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहे.

Jaya Ekadashi Muhurat

तसेच श्रीहरी विष्णूंच्या समोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. व हात जोडून श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे, आपल्या इच्छा प्रकट करायच्या आहेत. व शक्य झाल्यास आपण यथाशक्ती गरज वंतास दान करायचे आहे. या दिवशी आपण केळीचे देखील दान करू शकता. तर मित्रानो करून पहा हा उपाय. आपल्या इच्छा नक्की पूर्ण होतील.

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here