Indira Ekadashi 2021 | २ ऑक्टोबर २०२१ – पितृपक्ष एकादशी / इंदिरा एकादशी ला पूर्वजांच्या मुक्तीसाठी हा एक उपाय अवश्य करा

0
25
Indira Ekadashi Vrat 2021

Indira Ekadashi 2021 | २ ऑक्टोबर २०२१ – पितृपक्ष एकादशी / इंदिरा एकादशी ला पूर्वजांच्या मुक्तीसाठी हा एक उपाय अवश्य करा.

नमस्कार मित्रांनो, कर्म बंधन चानेलमध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला पितृपक्ष एकादशी दिवशी करायचा एक खास उपाय सांगणार आहेत, को जो उपाय केल्याने आपल्या पितरांना परम शांती प्राप्त होते, तसेच आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होईल आणि आपल्या जन्म जन्मांतरीचा पित्र दोष संपून जाईल, समाप्त होवून जाईल.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो तसे पाहता वर्षभरामध्ये २४ एकादशी तिथी असतात, परंतु ज्या वर्षामध्ये अधिक महिना येतो त्या वर्षामध्ये २६ एकादशी तिथी येतात. प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी असतात, एक कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी तिथी आणि एक शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी तिथी, आणि या दोन्ही हि एकादशी तिथींचे आपले-आपले महत्व धर्म ग्रंथामध्ये तसेच पुराणांमध्ये सांगितले गेले आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी, जी पितृपक्षामध्ये येते, तर या एकादशीला इंदिरा एकादशी किंवा पितृपक्ष एकादशी म्हणून ओळखले जाते.

मित्रानो पितृपक्षाचा प्रारंभ २० सप्टेंबर २०२१ पासून झाला आहे. जो ६ ऑक्टोबर २०२१ रोजी समाप्त होईल. आणि या पितृपक्षामध्ये जी एकादशी तिथी येते तिला पितृपक्ष एकादशी असे म्हंटले जाते. पितृपक्ष एकादशी हि पितरांच्या साठी सर्वात मोठा पर्व मानला जातो. मित्रानो याच महिन्यामध्ये सर्वपित्री मोक्ष आमावस्या देखील असते, परंतु पितृपक्ष एकादशी तिथीचा दिवस पितरांच्या साठी मुक्ती दायक, मोक्ष दायक दिवस मानला गेला आहे. जर का आपल्याला पितरांना तृप्त करायचे असेल, पितरांना प्रसन्न करायचे असेल, आणि आपल्या घर परिवारातील पितृ दोषाचे शमन करू इच्छित असाल, तर आंपण पितृपक्ष एकादशी तिथीला एक उपाय अवश्य केला पाहिजे.

चला तर मग जाणून घेवूया या दिवशी करायच्या उपयाविषयी. मित्रानो यावर्षी पितृपक्ष एकादशी तिथीचे महापर्व २ ऑक्टोबर २०२१ रोजी शनिवारच्या दिवशी आहे. एकादश तिथीचा प्रारंभ एक दिवस आधी म्हणजेच १ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी पितृपक्ष एकादशी तिथी सुरु होते. आणि दुसर्या दिवशी महानाजेच २ ऑक्टोबर २०२१ रोजी शनिवारच्या दिवशी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी समाप्त होते. सूर्योदय व्यापिनी आणि द्वादशी युक्त जी एकादशी असेल, ती एकादशी तिथी २ ऑक्टोबर २०२१ रोजी असेल.

या दिवशी सर्वांनी एकादशीचे व्रत केले पाहिजे. जे लोक २ ऑक्टोबर २०२१ रोजी एकादशीचे व्रत करतील, त्यांनी व्रताचे पारायण दुसर्या दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबर २०२१ रविवार रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ९ वाजे पर्यंत करावे. मित्रानो एकादशी चे महापर्व यावेळी पितृपक्ष एकादशीच्या रूपात साजरे केले जाते. या दिवशी वेशेष रुपात पितरांच्या साठी कर्म केले जातात. हि एकादशी पितरांना तृप्त करणारी आहे. मित्रानो जर का आपण अन्य एकादशीचे व्रत करत नसाल, तरी देखील वर्षातून एक वेळ आपण या पितृपक्ष एकादशी तिथीचे व्रत अवश्य केले पाहिजे. कारण जो कोणी व्यक्ती हे पितृपक्ष एकादशी तिथीचे व्रत करतो, त्याच्या मृत पूर्वजांना परम शांती प्राप्त होते.

आपण पितृपक्ष एकादशी तिथीचे व्रत करून या व्रताचे संपूर्ण फळ, जर का आपल्या मृत परीजनाना समर्पित केले, तर त्यांच्या आत्म्याला परम शांती प्राप्त होते. जर आपल्या घरामध्ये कोणाही व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, आपले आई-वडील, बहिण-भावू किंवा अन्य परिजन, नातेवाईक, तर या दिवशि त्या मृत व्यक्तीच्या निमित्त, त्याच्या नावाने एकादशी तिथीचे व्रत अवश्य केले पाहिजे. ज्यामुळे त्या मृतात्म्यास परम शांती प्राप्त होईल. एकादशीचे व्रत करणार्यांनी या व्रताच्या काही नियमांचे पालन दशमी तिथी पासून द्वादशी तिथी पर्यंत केले पाहिजेत.

दशमी तिथी १ ऑक्टोबर २०२१ शुक्रवार रोजी एक वेळेला जेवण केले पाहिजे. आणि जे जेवण आपण कराल ते जेवण सात्विक असले पाहिजे. जेवणामध्ये कांदा आणि लसून यांचे सेवन करू नये. तसेच मांसाहार, अंडी, दारू यांचे देखिल सेवन करू नये. तसेच या दिवशी मसुराची डाळ खाणे देखील निषिद्ध मानले जाते. याच बरोबर दशमी तिथीच्या दिवशी भाताचे देखील सेवन करू नये. दशमी तिथीला ब्रम्हचर्य अवश्य पाळावे, तासेल या दिवशी दुसर्याच्या घरचे देखील काही खावू नये. परान्नाचे सेवन करू नये. दशमी तिथीच्या दिवशी मध देखील खावू नये. अशा प्रकारे काही नियम दशमी तिथी १ ऑक्टोबर २०२१ शुक्रवार रोजी आपण नक्की पाळावेत.

यानंतर एकादशीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर २०२१ शनिवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटेच्या ४ वाजून ३० मिनिटांनी ते ५ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान आंघोळ केली पाहिजे. आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. शक्य असतील तर पिवळ्या, लाल किवा पांढर्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत. स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान श्रीहरी विष्णूंचे विशेष पूजन करावे. श्रीहरी विष्णूंच्या समोर बसून व्रताचा संकल्प करावा. संकल्प करताना आपल्या मृत परीजनांच्या नावाचा आणि गोत्राचा संकल्पामध्ये उल्लेख करावा.

एकादशीच्या दिवशी देखील वर करणार्याने भात खावू नये तसेच घरामध्ये देखील भात करू नये. कोणत्याही स्वरुपात या दिवशी तांदळाचा वापर करू नये. या दिवशी श्राद्धाला तांदळाची खीर नकरता फलाहारी खीर बनवावी, म्हणजे तांदूळ सोडून अन्य वस्तूंपासून खीर बनवावी. या दिवशी मांसाहार, अंडी, दारू, मसुराची डाळ यांचे देखील सेवन करू नये. या दिवशी ब्रम्हचर्य व्रत आवर्जून पाळावे. या दिवशी कोटे बोलू नये, राग, चीड-चीड करू नये, वाद-विवाद, भांडन तंटे करू नयेत. एकादशी दिवशी घरातील वडीलधार्या व्यक्तींचा अपमान किंवा अनादर करू नये. एकादशीच्या दिवशी एखादा याचक किंवा भिकारी आपल्या घराच्या समोर भिक मागण्यासाठी आला तर त्याला मोकळ्या हातांनी पाठवू नये. जे शक्य असेल, त्या वस्तूचे दान अवश्य ध्यावे.

एकादशीच्या दिवशी जर का आपल्या घरामध्ये अचानक सुतक लागले तर त्यावेळी आपण व्रत आवश्य करू शकता परंतु देवाचे पूजन किंवा स्पर्श करू नये. स्त्रियांना एकादशी दिवशी मासिक धर्म आल्यास त्यांनी देखील व्रत अवश्य करावे , व्रताच्या सर्व नियमांचे पालन करावे परंतु देवाचे पूजन किंवा स्पर्श करू नये. मित्रानो पितृ एकादशी दिवशी करायचा सर्वोत्तम फलाहार हा कलाकन्दचा मानला गेला आहे. या शिवाय दुधापासून बनविलेले पदार्थ देखील आपण खावू शकता. याच प्रमाणे फळाचे देखील सेवन आपण करू शकता. या दिवशी ज्या देखील पदार्थाचे आपण सेवन करणार असाल तो बनविताना त्यामध्ये हळदीचा वापर करू नये, तसेच पदार्थ बनवून झाल्यानंतर सर्व प्रथम त्यावर एक तुळशीपत्र ठेवून श्रीहरी विष्णुना नैवेद्याच्या रुपात अर्पण करावा आणि मग तो ग्रहण करावा.

या दिवशी स्त्रियांनी अंघोळ करताना डोक्यावरून अंघोळ करावी, कारण केस न धुता स्नान करणे हे अपूर्ण स्नान मानले जाते. या दिवशी जो व्यक्ती पितरांच्या साठी कर्म करतो, त्याचे पितर अत्याधिक प्रसन्न होतात. एकादशीच्या दिवशी भगवान लक्ष्मी नारायणांचे जे विशेष पूजन आपण करतो, तर ते पूजन देखील आपल्याला पितरांच्या साठी करायचे आहे. मित्रानो पितृ एकादशी आपल्या मृत पितरांसाठी सर्वात मोठी एकादशी मानली जाते. आणि म्हणून जर का आपण या दिवशी पितरांचे श्राध्द करणार असाल, तर त्यासठी आपण घराच्या दक्षिण देशेला पिठाचा एक चौकोन बनवावा आणि या चोकोनावर एखादा पाट किंवा चौरंग ठेवावा. व या पाटावर लाल किंवा पांढर्या रंगाचे कापड अंथरून त्यावर आपल्या पितरांचा फोटो स्थापित करावा.

म्हणजे पितरांचे मुख उत्तर दिशेला होईल आणि त्यांची पाठ दक्षिण दिशेला होईल. व जो व्यक्ती पितृ श्राद्ध करणार आहे त्याचे मुख दक्षिण दिशेला म्हणजे पितरांच्या फोटोकडे होईल. अश्याप्रकारे पितरांच्या फोटोची स्थापना करावी. एकाहून अधिक पितर असतील तर त्यांचे देखील फोटो आपण तिथे ठेवू शकता. यानंतर आपण एक दिवा प्रज्वलित करावा. हा दिवा लावताना तिळाच्या तेलाचा लावला तर सर्वोत्तम मानले जाते. अथवा आपण तुपाचा किंवा अन्य तेलांचा दिवा देखील लावू शकता. यानंतर एखाद्या ताटामध्ये थोडी फुले, अखंड तांदूळ, कुंकू, चंदन घ्यावे. मित्रानो यादिवशी पितराना तांदूळ वाहिन्याचा दोष लागत नाही. पण जर का आपण तांदूळ वाहू इच्छित नसाल तर तील किंवा जव देखील वाहू शकता.

पितरांना चंदनाचा टिळक लावावा, पांढरे चंदन त्यांना अत्याधिक प्रिय असते. यांनंतर पितराना गंध, अक्षत, फुल वाहावे, फुलांचा हार फोटोला घालावा, व नैवेद्य दाखवावा. या दिवशी फालाहाराचाच नैवेद्य पितराना दाखवावां. फळापासून बनविलेल्या पदार्थांचा नैवेध्या आपण दाखवू शकता. यानंतर एखाद्या भांड्यामध्ये किंवा हवन कुंडामध्ये अग्नी प्रज्वलित करून गुळ आणि तुपाने हवन केले पाहिजे. या हवासामागरी मध्ये आपण तील आणि जव हे देखील वापरू शकता. त्यांची आहुती देवू शकता. मित्रानो या दिवशी केला जाणारा सर्वोत्तम असा एक उपाय कि ज्यामुळे सर्व पित्र प्रसन्न होतात, आणि तो उपाय आहे गुळ आणि तिळाचे पिंड दान.

जो व्यक्ती पितृ एकादशीच्या दिवशी त्याच्या पितरांच्या साठी गुळ आणि तिळाचे पिंड दान करतो, त्याचे पितर त्याच्या अत्यंत प्रसन्न होतात आणि त्याला शुभ आशीर्वाद प्रदान करतात. तर यासाठी आपल्याला करायचे काय आहे तर, आपण काळे किंवा पांढरे यापैकी ज्या रंगाचे तीळ मिळतील, ते तीळ आपण घ्यायचे आहेत, कमीत कमी १०० ग्राम तीळ आणि १०० ग्राम गुळ आपल्याला यासाठी घायचा आहे. यानंतर गुळ फोडून त्याचा व्यवस्थित चुरा करावा, बारीक करावा व त्यामध्ये हे तीळ मिसळावेत. आपल्याला हवे असल्यास थोडेसे कच्चे दुध आपण या मिश्रणावर शिंपडू शकता. तसेच थोडे दही देखील शिंपडू शकता. तसेच अगदी किचीतशी साखर आणि तूप देखील आपण यात घालू शकता.

बाकीच्या सर्व वस्तू यासाठी अनिवार्य नाही आहेत, फक्त तीळ आणि गुळ या वस्तू अनिवार्य आहेत. यासर्व वस्तू एकत्र मिसळून एक गोळा आपल्यला बनवायचा आहे. पिंडीच्या आकाराचा किंवा चेंडूच्या आकाराचा एक गोळा आपण बनवायचा आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताच्या तळातामध्ये थोडे पाणी आणि हा गोळा ठेवायचा आहे, त्याच्या सोबत जर का आपल्याकडे कुशा नामक गावात असेल तर ते देखील या गोल्यासोबत थोडे घ्यायचे आहे व आपल्या पितरांचे नाव आणि गोत्राचे उच्चारण करायचे आहे. जर का तुम्हाला तुमच्या पितरांच्या साठी हे पिंड दान करायचे असेल तर सर्वपित्र असा उच्चार करावा. सर्व पितरांचे स्मरण करत आपण हे पिंड अंगठ्याच्या बाजूने हात वाकवून फोटोसमोर सोडायचा आहे.

स्थापित करायचा आहे. अश्या प्रकारे आपण पिंड दान केल्याने, आपल्या पितराना परम शांती प्राप्त होते तसेच त्यांची तृप्ती देखील होते. गुळ आणि तिळाचे जे पिंड असते त्याला आपले पितृ फारच प्रसन्नतेने ग्रहण करतात. त्याचा स्वीकार करतात आणि आपल्या परीजानाना शुभ आशीर्वाद आणि शुभ फळे प्रदान करतात. मित्रानो आपण जे गुळ आणि तिळाचे पिंड दान केले आहे ते त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी,म्हणजे सूर्यास्ताच्या आधी किंवा दुसर्या दिवशी सकाळी, दोन्ही पैकी कोणत्याही वेळी गाईला खायला घालायचे आहे. जर का आपल्या घरामध्ये किंवा आसपास गाय उपलब्ध नसेल तर आपण एखाद्या तलावातील किंवा विहिरीतील माश्यांना देखील हे पिंड खायला घालू शकता.

मित्रानो आपणही या पितृपक्ष एकादशी ला हा उपाय अवश्य करून पहा, या उपायामुळे आपल्या पितराना परम शांती लाभून ते प्रसन्न होतील व आपल्याला शुभ आशीर्वाद नक्की प्रदान करतील. मित्रानो विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here