Home Remedies for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी घरगुती उपचार

0
32
Home Remedies for Weight Loss
Home Remedies for Weight Loss

Home Remedies for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी घरगुती उपचार

आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि वजन घटवण्यासाठी पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन करणं आवश्यक आहे. वजन घटवण्यासाठी उपयुक्त असलेले कित्येक पौष्टिक पदार्थ तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरामध्येही सहजरित्या आढळतील. ज्यांचे मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. यापैकीच एक रामबाण उपाय म्हणजे मेथीचे दाणे. मेथीच्या छोट्याशा दाण्यांमध्ये पोषण तत्त्वांची मात्रा भरपूर असते आणि यातील घटक शरीरातील अतिरिक्त चरबी (Weight Loss) कमी करण्यासाठी लाभदायक आहेत.

आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांवर उपाय म्हणून मेथीच्या दाण्यांचा उपयोग शतकानुशतके केला जात आहे. यामध्ये औषधी गुणधर्मांचाही साठा आहे. मेथीमध्ये फायबर, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण अधिक असते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या दाण्यांचे सेवन केल्यास वजन घटण्यास मदत मिळते.
(फोटो सौजन्य: istock by getty images)

​​वजन घटवण्यासाठी लाभदायक आहे मेथी?

मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात असते. पचनप्रक्रिया सुरळीतपणे होण्यासाठी हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो आणि यामुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातात. याव्यतिरिक्त रक्तातील शर्करेची पातळी देखील संतुलित राहते आणि शरीरावर आलेली सूज सुद्धा कमी होते. दाण्यांमध्ये आढळणारे पोषक घटक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित स्वरुपात मर्यादित प्रमाणात मेथीच्या दाण्यांचे सेवन करावे.

​मोड आलेले मेथीचे दाणे

​मोड आलेले मेथीचे दाणे
​मोड आलेले मेथीचे दाणे

नाश्त्यामध्ये किंवा भूक लागल्यास मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांचे सेवन करणं आरोग्यासाठी लाभदायक असते. संशोधनातील माहितीनुसार मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांमध्ये पोषण तत्त्वांची मात्रा अधिक असते आणि ते पचनासही हलके असतात. यामध्ये आरोग्यास फायदेशीर असणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट्सचाही साठा भरपूर असतो. शरीराला जास्ती जास्त फायदे मिळावेत, यासाठी मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांचं सकाळच्या वेळेस रिकाम्या पोटी सेवन करावे.

​मेथीचे दाणे आणि मध

​मेथीचे दाणे आणि मध
​मेथीचे दाणे आणि मध

वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे आणि मधाचे सेवन एकत्रित स्वरुपातही केले जाऊ शकते. मधातील औषधी घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरावर आलेली सूज देखील कमी होते. महत्त्वाचे म्हणजे मधामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. मेथीचे दाणे वाटून पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. यानंतर मिश्रणाचे सेवन करावे.

​मेथीचा चहा

​मेथीचा चहा
​मेथीचा चहा

शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी मेथीचा चहा पिणे देखील लाभदायक मानले जाते. कपभर पाण्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे, आवश्यकतेनुसार दालचिनीची पावडर, साखर आणि आले मिक्स करा. सर्व सामग्री पाच मिनिटांसाठी उकळा. यानंतर चहा गाळा व प्या. आले आणि दालचिनीतील घटक वजन घटवण्याचे व सूज कमी करण्याचे कार्य करतात.

​सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथीच्या दाण्यांचे पाणी

मेथीच्या दाण्यांचे पाणी
मेथीच्या दाण्यांचे पाणी

वजन घटवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांचे पाणी पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. चमचाभर मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी पाण्यासह मेथीचे दाणेही उकळा. यानंतर पाणी गाळा व प्या. या पेयामुळे आपले पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. यामध्ये कॅलरीज प्रमाणच नसल्यानं वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सकारात्मक परिणामांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मेथीच्या दाण्यांचे सेवन करावे.

वाचाः Daily horoscope 1 April 2021 Thursday | रोजचे राशी भविष्य ३१ मार्च 2021 गुरुवार

वाचाः ८१९ रुपयांचा गॅस सिलिंडर, ११९ रुपयांत खरेदी करा, जाणून घ्या मस्त ऑफर

वाचाः १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रेशनकार्डसाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज

वाचाः स्मार्ट वॉशिंग मशीन लॉन्च, क्षमता १० किलो, पाहा किंमत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

मोरपंख घरामध्ये आवर्जून ठेवावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here