Gurupushyamrut Upay | गुरुपुष्यामृत – स्थिर लक्ष्मी आणि वास्तूशुद्धी उपाय | Pushya Nakshatra Marathi

0
112
guru pushya yoga benefits

Gurupushyamrut Upay | गुरुपुष्यामृत – स्थिर लक्ष्मी आणि वास्तूशुद्धी उपाय | Gurupushyamrut Chi Mahiti

नमस्कार मंडळी, मित्रानो गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ योग आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने कोणती उपासना करायची आहे? गुरुपुष्यामृत योगावर कोणती मंत्र साधना करायची आहे. काय आहे उपासना? गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर कोणते उपाय करायचे आहेत. याची माहिती आज आपण पाहणार आहोत.

Gurupushyamrut Mahatva

मित्रानो धनिक आणि श्रीमंत लोक आपल्याकडची असलेली लक्ष्मी स्थिर करण्यासाठी, आपल्या कुटुंबामध्ये, व्यापारामध्ये नेहमीच भरभराट होण्यासाठी काय करतात याची माहिती आवर्जून आज आपण करून घेणार आहोत.

मित्रानो या शुभयोगावरती आपण धने, जे धने आपण धनत्रयोदिवशी पूजेमध्ये वापरतो, ते या शुभयोगावर लक्ष्मीचे स्मरण करून, त्यावर लक्ष्मीचा बीज मंत्र || ओम श्रीम नमः || या बीज मंत्राचे १०८ वेळा पठण करून, हे धने देवासमोर किंवा लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर, किंवा फोटो समोर ठेवायचे आहेत. व त्याबरोबर गुळ सुद्धा ठेवायचा. अर्थात दुसऱ्या दिवशी हे गुळ आणि धने आपण व घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचे आहे.

Gurupushyamrut Muhurat

सर्वात महत्वाचे म्हणजे, या धान्यावर आपण धन्वंतरीचा मंत्र देखील म्हणायचा असतो आणि तो मंत्र आहे || ओम धन धन्वन्तरये नमः || मित्रानो हा मंत्र पुन्हा सांगतो. मंत्र आहे || ओम धन धन्वन्तरये नमः || या मंत्राचा कमीत-कमी २१ किंवा १०८ वेळा पाठ करून मग आपण लक्ष्मीच्या बीज मंत्राचा पाठ करायचा आहे. लक्ष्मीचा बीज मंत्र आहे || ओम श्रीम नमः || या बीज मंत्राचे कमीत-कमी २१ किंवा १०८ वेळा पाठ करायचा आहे. या मंत्रांचा पाठ करत असताना धने व गुळ आपल्या हातात ठेवायचे आहेत, आपल्या हातात धरायचे आहेत आणि मंत्र पठण करून झाल्यावर हे धने-गुळ आपण देवासमोर ठेवून द्यायचे आहेत, देवाला अर्पण करायचे आहेत.

Gurupushyamrut Panchang Marathi

जुन्याकाळामध्ये या शुभ मुहूर्तावर शेतामध्ये, मोकळ्या जागेमध्ये, कुंडीमध्ये धने जमिनीत पेरण्याचा सुद्धा प्रघात होता. मान्यता अशी होती कि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये लक्ष्मी स्थिर होते. आत्ताच्या काळामध्येसुद्धा हा या शुभयोगावर हा अनुभव घेण्यासाठी आपण सुद्धा हा प्रयोग निश्चित करायला हवा. या शुभयोगावर माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा पाठ अत्यंत चांगल्या पदधतीने जरूर करू शकता, जे आपल्याला येतात. श्री सूक्ताचे १६ किंवा २१ पाठ सुद्धा आपण या शुभयोगावर करू शकता. महालक्ष्मीचे अष्टक, जे आपण नेहमी म्हणतो. त्याचे पाठ करू शकता.

Gurupushyamrut Benefits In Marathi

मित्रानो दुसरा महत्वाचा उपाय जो या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर केला जातो. तो म्हणजे या शुभ मुहूर्तावर आपल्या वास्तूच्या उंबरठ्याची पूजा केली जाते. आणि या शुभ योगावर आवर्जून करावी. आपला उंबरठा सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा, त्यावर हळदीने सरावयाच म्हणजेच हळदीने लेपन करून घ्यायचं . या हळदीमध्ये आपल्याला मिळालं, जर शक्य झालं तर देशी गाईचं गोमूत्र आवश्य घालायचं आहे. आणि अगदी ते नाही मिळालं तर साध्या पाण्यामध्ये हळदी एकत्र करून त्याच लेपन आपल्या उंबरठ्यावरती करायचं आहे. आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला कुंकवाचे स्वस्तिक काढायचे आहे.

Gurupushyamrut Mahiti

दरवाजाच्या बाजूला, बाहेर किंवा आतील बाजूला दोन्हीकडे राईच्या तेलाचे दिवे लावायचे आहेत. दरवाजाला फुलांचं तोरण बांधायचं आहे. अशा रीतीने वास्तूच्या मुख्य प्रवेश द्वाराचे, आपल्या घराच्या उंबरठ्याचे पूजन  हे विशेष लाभकारक मानलं जात गुरुपुष्यामृत योगावर. हे जे उपाय आटा आपण जाणून घेतले, हे उपाय गुरुपुष्यामृत योगावर शुभ मुहूर्ताच्या वेळेवर करायचे असतात.

Gurupushyamrut Upay

तर मित्रानो आपणही या गुरुपुष्यामृत योगावर हे उपाय नक्की करा. आपल्या वस्तूची वास्तूशुद्धी आणि आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये स्थिर लक्ष्मी करण्याचे हे उपाय आहेत, नक्की करून पहा. आपल्या याचे फायदे जरूर अनुभवायला मिळतील

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here