guru pushya yoga 2021 | २५ नोव्हेंबर २०२१ – गुरु पुष्य योग – लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हे अचूक उपाय

0
23
gurupushyamrut yoga

२५ नोव्हेंबर २०२१ – गुरु पुष्य योग – लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हे अचूक उपाय | guru pushya yoga 2021

नमस्कार मित्रानो कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला गुरु पुष्यगाचे शुभ मुहूर्त, महत्व आणि आणि या दिवशी करायच्या उपयाविषयी सांगणार आहोत. या दिवशी केल्या गेलेल्या कोणत्याही उपायाचे, पूजन आराधनेचे फळ हे इतर दिवसांमध्ये केल्या गेलेल्या उपाय, पूजन, आराधानेच्या तेलानेत १० पटींनी अधिक मिळते. आणि त्यामुळे या शुभ मुहूर्तावर आपणही हे उपाय अवश्य करावेत व आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल बनवावे.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो गुरुवार २५ नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु पुष्य योग आला आहे. यंदाच्या वर्षीचा हा चौथा गुरु पुष्य योग आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये २७ नक्षत्रांचा उल्लेख केला गेला आहे. मित्रानो पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येते, तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते. या नक्षत्रातील प्रमुख देवता बृहस्पती देव आहेत. कि जे सर्व देवतांचे गुरु आहेत. मित्रानो गुरु पुष्य योग हा ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने, जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात. जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला गुरु पुष्य योगामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल आणि सर्व कार्ये सहजपणे पूर्ण होतील.

मित्रानो गुरुवार आणि पुष्य नक्षत्राने बनलेला हा शुभ संयोग अनेक शुभ योग घेऊन येत आहे. या दिवशी चंद्र त्याच्या स्वत: च्या राशीत आहे. त्याच बरोबर सर्वार्थ सिद्धि आणि अमृत सिद्धी नावाचे योगही या दिवशी होत आहेत. ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढते आहे. या दिवशी रवि योगासह अमृत योग असेल. हे सर्व दुर्मिळ योग एकाच दिवसात एकत्र येणे आपल्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्यामुळे हजारो जन्मापर्यंत याचे फळ आपल्याला मिळत राहते. या योगामध्ये व्यवसायात पैशांची गुंतवणूक किंवा नवीन कामाचा फायदा नेहमीच होतो. तथापि, विवाह सोहळ्यासारखे कार्य या योगात केले जात नाहीत कारण ब्रह्माजींचा शापही या योगामध्ये आढळतो.

गुरुपुष्य योग मुहूर्त

गुरु पुष्य योग सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांपासून प्रारंभ होईल तो संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असेल.

यादिवाशीचा अभिजीत मुहूर्त सकाळी ११:२३ मिनिट ते दुपारी १२:०६ मिनिटांपर्यंत असणार आहे.
यादिवाशीचा अमृत काल मुहूर्त सकाळी ११:४८ मिनिट ते दुपारी ०१:३४ मिनिटांपर्यंत असणार आहे
यादिवाशीचा विजय मुहूर्त दुपारी ०१:३६ मिनिट ते दुपारी 0२:१५ मिनिटांपर्यंत असणार आहे
यादिवाशीचा गोधूलि मुहूर्त सायंकाळी 0४:५७ मिनिट ते सायंकाळी 0५:२१ मिनिटांपर्यंत असणार आहे
यादिवाशीचा सायाह्न संध्या मुहूर्त सायंकाळी 0५:०८ मिनिट ते सायंकाळी 0६:२७ मिनिटांपर्यंत असणार आहे

मित्रानो गुरुपुष्य योगाचे महत्त्व असे आहे. गुरुवारच्या दिवशी, भगवान श्रीहरी विष्णूंच्या समवेत बृहस्पती देवाची देखील पूजा केली जाते. बृहस्पती ना सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते. तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत. आणि म्हणूनच शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव असतो. व या दोघांमध्ये सामंजस्यही आहे. शुभ योगाच्या दरम्यान या दोघांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी गुरुपुष्य योग हा सर्वोत्तम दिवस असतो. २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शुभ योगामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे आणि तिच्या सर्व उपायांनी सर्व समस्या दूर करणे विशेष मानले जाते. चला तर मग जाणून घेवूया गुरुपुष्य योगामध्ये करायच्या उपयाविषयी.

मित्रानो २५ नोव्हेंबर २०२१ रोजी येणाऱ्या गुरु पुष्य योगाच्या दिवशी महालक्ष्मीला मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मी नारायणांची पूजा करा. व एका विशिष्ट अशा मंत्राचा आपल्यला जप करायचा आहे, तो मंत्र आहे ||ॐ श्रीं ह्रीं दारिद्रय विनाशिन्ये धनधान्य समृद्धि देहि देहि नम: || हा मंत्र जप आपल्याला कमळ गत्त्याच्या माळेने करायचा आहे. कमीत कमी एक माळ म्हणजे किमान १०८ वेळा तरी या मान्राचा जप करायचा आहे. शुभ योगामध्ये या लक्ष्मी मंत्राचा जप केल्याने संपत्ती प्राप्तीचे योग आपल्या जीवनामध्ये तयार होतात.

मित्रानो गुरु पुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिकचे चिन्ह काढावे तसेच घरामध्ये दक्षिणावर्ती शंखची पूजा करावी. दक्षिणावर्ती शंखला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो. असे केल्याने लवकरच आपले एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतात.

मित्रानो दुकान किंवा व्यवसाय,उद्योग, व्यापाराच्या टिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यास जीवनामध्ये संपत्ती व समृद्धी मिळते. असे केल्याने व्यवसायाला गती मिळते. आर्थिक संकटे दूर होतात. नोकरी मिळविण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरु पुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा आपण अवश्य करावी.

मित्रानो पारद लक्ष्मी बरोबरच आपण या दिवशी एकाक्षी नारळाची देखील पूजा करू शकता. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. या नारळाची विधिवत पूजा केल्याने घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही तसेच घरातील धन-धान्याचीही वाढ होते.

मित्रानो गुरु पुष्य योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारीक असे कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करू शकता. कनकधारा स्तोत्रेचा निर्माते हे आदि शंकराचार्य आहेत. त्यांनी या स्तोत्राचे पठण करून पैशांचा पाऊस पाडला होता. नियमितपणे या दोन्ही गोष्टींचे पठण केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये वैभव आणि संपत्ती यांची प्राप्ती होते, तसेच त्याच्या शत्रूंपासून त्याला मुक्ती देखील मिळते.

तर मित्रानो हे होते गुरु पुष्य योगावर लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचे काही महत्वाचे उपाय. आपणही या दिवशीच्या दुर्मिळ योगामध्ये हे उपाय करून आपले जीवन संपन्न आणि सफल नक्की बनवू शकता. विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here