Guru Purnima Upay | गुरुपौर्णिमेला करा या वृक्षाची पूजा, जीवनामध्ये धन संपत्तीची वर्ष होईल

0
34
guru purnima 2021

Guru Purnima Upay | गुरुपौर्णिमेला करा या वृक्षाची पूजा, जीवनामध्ये धन संपत्तीची वर्ष होईल

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रानो आजच्या या विडिओ मध्ये आम्ही आपल्याला गुरुपोर्णिमे दिवशी करायचा एक अत्यंत साधा सोपा परंतु फारच प्रभावशाली असा उपाय सांगणार आहोत. जो उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे निवारण होऊन जाईल. जर का आपल्याला कर्ज झाले असेल, चालत व्यापार, उद्योग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असेल, किंवा आपल्याकडे रोजगाराचे साधना नसेल, किंवा आपल्या कडे नोकरी आहे पण आपले प्रमोशन होत नाहीये. तर या सर्व समस्यांसाठी हा उपाय रामबाण उपाय आहे.

मित्रानो आपल्या गुरूंच्या आशीर्वादानेच आपली सगळी कार्ये यशस्वी होत असतात. गुरूला साक्षात ईश्वराचे स्वरूप मानले जाते. जी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने गुरूंचे नामस्मरण करतो, अशा व्यक्तीला जीवनामध्ये समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, आयु याबरोबरच मोक्षाची देखील प्राप्ती होते. जिथे गुरूंची कृपा असते तिथे योग्य व्यवहार असतो, आणि जिथे योग्य व्यवहार असतो तिथे रिद्धी – सिद्धी असतात.

याच प्रमाणे जर का आपण आपल्या कुंडलीतील नऊ ग्रह पहिले तर त्यातील गुरु ग्रह हा एक सौम्य प्रकारचा ग्रह. या गुरु ग्रहाच्या महादशेमध्ये जीवनामध्ये धन, ऐश्वर्य, सुख, सम्पत्ती सौन्दर्य यांची वृद्धी होते. जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय प्राप्त होतो. मित्रानो शास्त्रामध्ये असे मानले जाते कि ज्याने जीवनामध्ये कोणालाच गुरु बनविले नाही, अशा मनुष्याला कधीच सफलता मिळत नाही. कोणतेही कार्य सुरु करण्यापूर्वी गुरुचे आशीर्वाद घेणे फार महत्वाचे असते.

तर मित्रानो अशा या गुरु शिष्यांच्या नात्याला अतूट बनविणारा पर्व म्हणजे गुरु पौर्णिमा. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो.चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.

यावर्षी २3 जुलै २०२१ रोजी गुरु पौर्णिमा साजरी केली जात आहे. या दिवशी आपण आपल्या वास्तुविक जीवनामध्ये जे कोणी तुमचे गुरु असतील, मग ते तुमचे शैक्षणिक गुरु असतील, आध्यत्मिक गुरु असतील अथवा आपल्याला उन्नतीची दिशा दाखविणारे व्यावसायिक गुरु असतील याना तर आपण निश्चितच नमन केले पाहिजे. पण खऱ्या अर्थाने जे आपल्या जीवनाचा गाडा हाकतात, ज्यांच्या कुंडलीतील मजबूत स्थानामुळे आपल्याला जीवनामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती याची प्राप्ती होते. अश्या गुरु ग्रहाची आपल्याला मनोभावे पूजा केली पाहिजे.

तर मित्रानो आजच्या या उपायांमध्ये आपल्याला करायचे काय आहे. मित्रानो आपण माहित असेल कि केळाच्या झाडामध्ये या गुरु ग्रहाचा वास असतो. केल्याचे झाड हे गुरु ग्रहाचा कारक मनाला जातो. तर मित्रानो आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी गुरु पौर्णिमेच्या दिवशी केळाच्या झाडाची पूजा आपण अवश्य करावी.
गुरु ग्रहाच्या कृपेनेच आपल्याला ज्ञान, संपत्ती, धन, ऐश्वर्य यांची प्राप्ती होत असते. त्याच बरोबर ज्यांचा विवाह होण्यास बाधा उत्पन्न होत आहेत, काही ना काही अडचणी निर्माण होत आहेत, त्यांनी तर या दिवशी केळाच्या झाडाची पूजा नक्की करावी. यामुळे विवाह कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी संपून जातील.

या दिवशी केळ्याच्या झाडाच्या पूजेला फार महत्त्व आहे. केळाच्या झाडाची पूजा केल्यास भगवान बृहस्पतीची आपल्याला कृपा होते. गुरू बृहस्पती हे देवांचे गुरू आहेत व ते श्रीहरी विष्णूचे रूप असल्याचे मानले जाते.आणि यामुळे केळीच्या झाडाला शुभ आणि संपन्नतेचे प्रतिक मानले जाते. जर आपल्या कुंडलीमध्ये बृहस्पती ग्रह म्हणजेच गुरु ग्रह कमकुवत असेल, तसेच लग्न कार्यात अडचणी येत असतील. गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण केळीच्या झाडाची पूजा नक्की करायला हवी. यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक संपन्नता येते.

मित्रानो जर का आपल्या दाम्पत्य जीवनात अडचणी असतील, संतान सुख मिळत नसेल तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा आपण केली पाहिजे. यामुळे कौटुंबिक क्लेश दूर होतात आणि संतान प्राप्ती होती. याच बरोबर आर्थिक समस्येने ग्रस्त असलेल्यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. नोकरी व्यवसायात अडचण असल्यास ती देखील गुरु पौर्णिमेच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने दूर होते. व्यवसाय उद्योगामध्ये भरभराट होते. ज्यांना नोकरी नसेल अश्याना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल, ज्यांना नोकरी असेल अश्याना पदोन्नती मिळेल.

तर मित्रानो गुरु पौर्णिमेच्या दिवशी केळीच्या झाडाचे पूजन कसे करावे हे आता आपण जाणून घेऊया. मित्रानो गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्मातून निवृत्त होऊन मौन व्रत धारण करावे. म्हणजे कोणाशीही बोलू नये, मौन धारण करावे. व केळीच्या वृक्षाजवळ जाऊन प्रथम केळीच्या वृक्षाला प्रणाम करून, तांब्याभर जल अर्पण करावे. मित्रानो इथे एक गोष्ट लक्ष्यात ठेवा कि, केळीचे झाड जर का आपल्या अंगणात असेल तर त्याला जल अर्पण करू नये. केळीचे झाड बाहेर कुठे तरी असेल तर त्याला जल अर्पण करावे.

gurupurnima 2021 specialयानंतर झाडाच्या मुळाजवळ हळद-कुंकू, थोडी चण्याची डाळ आणि थोडा गुळ अर्पण करावा. यानंतर थोडे अक्षत आणि फुल अर्पण करावेत. व हे सर्व करून झाल्यानंतर ।।ॐ बृं बृहस्पते नम:।। या मंत्राचा जप करत केळीच्या झाडाच्या ११ परिक्रमा काढाव्यात.हा मंत्र आपल्याला विडिओच्या स्क्रीन वर तसेच विडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आमच्या स्टार लाईव्ह . इन या वेबसाईट वर मिळून जाईल. मित्रानो जर का केळीचे झाड आपण आपल्या अंगणात लावले असेल तर त्या सोबत तुळशीचे झाड देखील निश्चित लावावे. या उपायामुळे श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि गुरु बृहस्पती यांची अस्सीम कृपा आपल्याला प्राप्त होईल. व त्यांच्या कृपेने वर्षभर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल.

आपल्या धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती, ज्ञान यांची प्राप्ती होईल व आपले जीवन सुखी आणि समृद्ध बनून जाईल. तर मित्रानो या गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण हि केळाच्या झाडाचे पूजन अवश्य करावे व आपले जीवन सुखी आणि समृद्ध बनवावे. मित्रानो विडिओ आवडला असल्या लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here