Easy Vastu Tips For Loan | कर्ज लवकर फेडण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी करा हा उपाय Karz Mukti Vastu Upay

0
380
karz mukti upay in marathi

Easy Vastu Tips For Loan | कर्ज लवकर फेडण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी करा हा उपाय Karz Mukti Vastu Upay

मित्रांनो तुम्ही गाडीसाठी, घरासाठी, लग्नासाठी किंवा वैयक्तिक एखाद्या कामासाठी कधी ना कधीतरी कर्ज नक्की घेतलं असेल. बऱ्याचदा असे होत की आपण जे कर्ज घेतलेलं असतं, हे कर्ज फिटत नाही. कर्जाचे हप्ते नियमित जात नाहीत. कर्जाचा डोंगर वाढतच जातो, आणि मग नैराश्य येतं. डीप्रेशन येतं. बरेच जण त्यातून नको त्या गोष्टी करतात.

कर्ज, ऋण मुक्ति हेतु ऋणमोचन मंगल स्तोत्र

मित्रांनो कुटुंब उध्वस्त होतं. आज आपण या कर्जातून मुक्ती कशी मिळवावी यासाठी काही ज्योतिषी उपाय आहेत का याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो कर्ज मुक्ती साठी खरं तर तुम्ही स्वतः च प्रयत्न करणे आवश्यक असत. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे असे म्हटलेल आहे. आणि म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करा कर्ज नक्की नील होईल.

कर्ज कितीही मोठे असो करा हा उपाय

मात्र बरेच जण असे आहेत खूप प्रयत्न करत आहेत मात्र योग्य दिशा सापडत नाहीये मित्रांनो अशा वेळी आपण हा ज्योतिष उपाय नक्की करा हा उपाय हा कर्ज मुक्ती चा उपाय आपल्या कर्ज मुक्ती साठी नक्कीच मदत करेल या उपायाने आपल्याला कर्ज नील करण्यासाठी नक्कीच मदत होईल मित्रांनो अनेकांनी हा उपाय केलेला आहे, अगदी लाखो करोडो रुपयांचं कर्ज त्यांच निल झालेलं आहे. हा उपाय करताना तो पूर्ण आस्थेने आणि निष्ठेने मात्र करावा लागतो.

Karj Mukti Ke Upay In Marathi

मित्रानो यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला एक नारळ घ्यावा लागेल, होय श्रीफळ म्हणजेच नारळ घ्यावा लागेल मित्रांनो या नारळ वरती आपण स्वस्तिकचा पावन चिन्ह रेखाटायच आहे. होय स्वस्तिकच चिन्ह रेखाटायच आहे स्वस्तिक रेखाटण्यासाठी आपण कुंकू वापरायचा आहे. देशी गायीचे तूप जर उपलब्ध झालं तर मित्रांनो हे देशी गायीचे तूप घ्या नसेल तर कोणत्याही गायीचे तूप चालू शकत. तर असं हे तूप घेऊन त्यामध्ये थोडसं कुंकू टाका आणि या कुंकवाने आपण नारळा वरती, श्रीफळावरती स्वस्तिकचा चिन्ह रेखाटायच आहे. मित्रानो असे हे स्वस्तिक रेखाटल्या नंतर, एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे किंवा आपण हातात जो धागा बांधतो, असा धागा आपण बाजारातून विकत घ्या किंवा आपण रक्षासूत्र सुद्धा आणू शकता. तर हे रक्षासूत्र किंवा लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. लक्षात घ्या ज्या व्यक्तीच्या नावे कर्ज आहे, त्याच्या उंची इतका धागा आपण घ्यायचा आहे. त्याच्या उंची इतक्या लांबीचा धागा आपण घ्यायचाय, लाल धागा आणि तो या नारळावरती गुंडाळायचा आहे. मित्रांनो हा धागा गुंडाळताना अगदी व्यवस्थित गुंडाळा आणि त्यानंतर हा नारळ आपल्या देवघरासमोर आपण ठेवायचा आहे आपण देवघरासमोर बसायचं आहे आणि मनोमन या नारळास आपण प्रणाम करायच आहे, वंदन करायच आहे हात जोडायचे आहेत.

Karz Mukti Sathi Upay

आणि प्रार्थना करायची आहे की, आम्ही जे कर्ज घेतलं होत, हे कर्ज, या कर्जातून आमची मुक्तता होउदे. आमची कर्जमुक्ती होऊ दे . या कर्जाच्या जंजाळातून आमची आणि आमच्या कुटुंबाची मुक्तता होऊ दे अशी मनोमन प्रार्थना आपण करायची आहे. ही प्रार्थना करून झाल्यानंतर आपण जवळपास अशा कोणत्याही जलस्त्रोतामध्ये म्हणजेच नदी असेल, विहीर असेल, तलाव असेल, शक्यतो जे वाहतं पाणी आहे, त्यामध्ये आपण हा नारळ विसर्जित करावा, प्रवाहित करावा.

Karz Mukti Sathi Upay

जर तुमच्या जवळपास अशाप्रकारे कोणताही स्रोत नसेल पाणी नसेल तर मित्रांनो अशा वेळी आपण एखाद् मोठ भांड घेऊन त्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यावं आणि त्यामध्ये हा नारळ विसर्जित करावा मित्रांनो हा उपाय मंगळवारच्या दिवशी आपण करायचा आहे, होय मंगळवारचा दिवस अत्यंत अशुभ मानला जातो माता लक्ष्मी चा वार आहे तसेच हनुमंत राया चा वार आहे, हनुमानाचा वार आहे. मित्रांनो या दिवशी मोठ्यात मोठी संकट सुद्धा नील होतात.

कर्ज मुक्ति के रामबाण उपाय

आपल्या जीवनातून कायमची निघून जातात. तर मित्रानो हा उपाय आपण करायचा आहे. हा उपाय करण्याबरोबरच काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी, मित्रानो तुम्ही जर कर्ज घेणार असाल तर लक्षात घ्या मंगळवारच्या दिवशी चुकूनही कर्ज घेऊ नये. लोन घेण्यासाठी, आपण लोन घेतोय, लोन घेण्यासाठी मंगळवारचा दिवस शुभ नसतो. मंगळवारी घेतलेल लोन, कर्ज हे लवकर फिटत नाही. कर्जाचा डोंगर उभा राहतो.

Karj Mukti Ke Ramban Upay

मग प्रश्न असा आहे की लोन कधी घ्याव, कोणत्या दिवशी घ्याव. मित्रांनो बुधवारचा दिवस कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो बुधवारी घेतलेल लोन कर्ज हे लवकर निल होतं. ज्यांनी ऑल रेडी कर्ज घेतलेल आहे, अशा लोकांनी कर्जाचा हप्ता भरताना तो शक्यतो मंगळवारच्या दिवशी भरावा.

Astrology Tips For Money

मित्रानो मंगळवारच्या दिवशी जर आपण हप्ता भरला तर खूप लवकर कर्ज निल होत. तसच, जस मी प्रत्येक विडिओ मध्ये सांगतो दररोज देवपूजा करत चला. मित्रांनो अजून एक उपाय या ठिकाणी तुम्ही करू शकता. मोहरी प्रत्येकाच्या घरात असते, त्याला राई असेही म्हणतात हिंदी मध्ये, तर ही मोहरी आपण घेऊ शकता, अगदी मुठभर अशी मोहरी घ्या. ज्या व्यक्तीचे नावे कर्ज आहे त्या व्यक्तीने आपल्या हातामध्ये मुठभर मोहरी घ्यावि. आणि आपल्या घराच्या आतल्या बाजूने, होय आपल्या घराच्या आतल्या बाजूने ज्या काही चार भिंती आहेत.

Karz Mukti Hanuman Mantra

आपल्या घराच्या सभोवताली असणाऱ्या चार भिंती, त्या चार भिंतींना लागून ही थोडीशी मोहरी थोडी-थोडी करत टाकत जावी. हे एक कवच बनत. आपल्या घराला एक कवच प्रदान होतं आणि हे कवच आपलं आर्थिक संकटांपासून आर्थिक अरिष्टात पासून रक्षण करत. तर हा उपाय आपण महिन्यातून दोन महिन्यातून एकदा करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे कर्ज मुक्ती साठी उपाय नक्की करून पहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची कर्जातून लवकर मुक्तता व्हावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो .

|| ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here