Devshayani Ekadashi 2021 | आषाढी एकादशीला या झाडाला घाला एक तांब्या पाणी, लक्ष्मी सदैव घरामध्ये वास करेल.

0
81
devshayani ekadashi puja vidhi

Devshayani Ekadashi 2021 | आषाढी एकादशीला या झाडाला घाला एक तांब्या पाणी, लक्ष्मी सदैव घरामध्ये वास करेल.

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रानो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला आषाढी एकादशी दिवशी करायच्या एका उपाय विषयी माहिती सांगणार आहोत. हा उपाय अत्यंत सोपा परंतु फारच चमत्कारिक असा उपय आहे. या उपायाने आपल्यावर व आपल्या कुटुंबावर सदैव श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपाशिर्वाद राहील.

मित्रानो २० जुलै २०२१ रोजी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. या आषाढी एकादशीला देव शयनी एकादशी असे देखील म्हंटले जाते. कारण या एकादशीच्या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू तसेच सर्व देव शयन करण्यासाठी निद्रिस्थ अवस्थेमध्ये जातात. या काळामध्ये सर्व देवी देवता चार महिन्यांसाठी निद्रिस्थ अवस्थे मध्ये जात असल्या कारणाने या चार महिन्यांमध्ये चतुरमास पर्व मनवाला जातो.

म्हणजे चार महिने सर्व देवी देवता निद्रिस्थ अवस्थे मध्ये असल्या कारणाने वाईट शक्तींचे प्राबल्य वाढते, भक्तांचे रक्षण करण्यासाठी देवी देवता उपलब्ध नसल्या कारणाने सर्वानी हि चार महिने व्रत वैकल्ये, उपवास, ध्यान, जप इत्यादीमध्ये घालविण्याचा प्रघात आहे. आणि म्हणूनच या चार महिन्यात साधू संत लोक देखील भ्रमण न करता एका ठिकाणी वास्तव्य करून देवाचे ध्यान करतात. यानंतर चार महिन्यांनी देव उठनी एकादशीला सर्व देव निद्रिस्थ अवस्थेमधून जागृत होतात.

तर मित्रानो या देवशयनी एकादशीला श्री विष्णू निद्रिस्थ अवस्थे मध्ये जाण्यापूर्वी विविध पद्धतीने त्यांचे पूजन करून , उपवास करून त्यांची कृपा प्राप्त केली जाते. या दिवशी म्हणजे आषाढी एकादशी दिवशी आपल्या मनोकामना पूर्तीसाठी आपण वेगवेगळे उपाय करू शकता. मित्रानो या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म आटोपून घराच्या कोणत्याही एका स्त्रीने घराचा उंबरा हळद मिश्रित पाण्याने धुवून घ्यावा. असे करण्याने माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंचे आगमन आपल्या घरामध्ये निश्चितच होईल.

याच बरोबर लक्ष्मी प्राप्तीची जर आपली मनोकामना असेल तर श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मी सहित पंचोपचार पूजन करून त्यांना पिवळी फुले, जमल्यास पिवळी वस्त्रे व पिवळ्या व्यंजनांचा जसे मिठाई, बेसनाचे लाडू, पिवळी फळे यांचा भोग लावावा. जर का आपल्याला फार कर्ज झाले असेल व त्या कर्जातून आपली सुटका होत नाहीये किंवा कर्ज फेडण्याचा कोणताही मार्ग आपल्याला दिसत नाहीये, पैशांची अरेंजमेंट होत नाहीये, तर या दिवशी कर्ज फेडीच्या मनोकामनेसाठी पिंपळाच्या वृक्षाजवळ जाऊन त्याला हळद कुंकू वाहावे, तुपाचा दिवा लावावा व एक तांब्या पाणी अर्पित करावे.

Ashadhi Ekadashi Mantraaमित्रानो पिंपळाच्या वृक्षामध्ये श्रीहरी विष्णूंचा वास असतो. व या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. व त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होऊन आपण कर्ज मुक्त नक्की व्हाल. तसेच माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू याचा सदैव स्थिर स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास्तव्य व्हावे यासाठी आषाढी एकादशी दिवशी संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावावा आणि त्याच बरोबर तुळशीला ११ प्रदक्षिणा घालाव्यात व || ओम नमो भगवते वासुदेवाय नमः|| या मंत्राचा कमीत कमी १०८ वेळा जप करावा.

अशाच प्रमाणे आषाढी एकादशी दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये केसर मिश्रीत दूध घेऊन श्री हरी विष्णूंचा अभिषेक केल्याने श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होते. या दिवशी जमत असल्यास उपवास करावा व दुसऱ्या दिवशी पारायण करून उपवास सोडावा असे केल्याने जातकाच्या सर्व पापांचे क्षालन होते.

आषाढी एकादशी दिवशी श्रीहरी विष्णूंना तुळशीची दोन पाने तरी नक्की अर्पण करावीत यामुळे त्यांची कृपा सदैव आपल्यावर बरसात राही. व जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मी आपसूकच असतात. घरामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये, दुकानात बरकत येण्यासाठी आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करताना त्यांच्या समोर विड्याच्या पानांवर ११ रुपये ठेवावेत व दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर ते आपल्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीत अथवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवावेत. पाकीट, तिजोरी , गल्ला नेहमी भरलेले राहील.

तर मित्रानो आपण हि आषाढी एकादशी दिवशी श्रीहरी विष्णूंचे व माता लक्ष्मीचे पूजन करून हे उपाय अवश्य करावेत. या उपायांनी आपल्या जीवनातील समस्या, दुःख, अडचणी , त्रास यांचा नक्की निपटारा होईल. विडिओ आवडल्यास लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here