Datta Sadhana | दत्त महाराजांकडे काही मागायचे असल्यास कोणत्यावेळी मागावे

0
61
Datta Sadhana

Datta Sadhana | दत्त महाराजांकडे काही मागायचे असल्यास कोणत्यावेळी मागावे | Datta Upasana

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओ मध्ये आम्ही आपल्याला दत्त महाराजांकडे काही मागायचे असल्यास, आपली मनोकामना, आपली इच्छा बोलायची असल्यास, कोणत्यावेळी दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जावे व आपली मनोकामना दत्त महाराजांकडे मागावी या विषयी माहिती सांगणार आहोत.

मित्रानो दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याचे काही नियम आहेत व दत्त संप्रदायामध्ये हे नियम कटाक्षाने पाळले जातात, या नियमांचे पालन केल्याने दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व आपल्या सर्व मनोकामना महाराजांच्या कृपेने पूर्ण होतात. मित्रानो ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्र्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला, सती अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्व फार आहे. आणि म्हणूनच तो अयोनीसंभव मानला जातो. इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.

या अवतारात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय. प्रभू श्री राम, भगवान श्री कृष्ण इ.अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे. हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्रीसद्गुरुंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक “श्री गुरुदेव दत्त”असा यांच्या नावाचा जयघोष करतात.

श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त” या स्वरुपात आहेत. श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेषात व स्वरुपात म्हणजेच अवधूत, फकीर, मलंग, वाघ इ. दर्शने दिली आहेत. दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पध्दतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही. औदुंबरतळी वस्ती,जवळ धेनु व श्र्वानाचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य. स्वत: दत्तात्रेय हे निस्सिम देवीभक्त होते.

“त्रिमुखी” किंवा “एकमुखी” दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच “दत्तपादुका”ची ही पूजाअर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते. श्री दत्तात्रेय हे शरणगत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धाऊन येतात. भूत-प्रेत-पिशाच्चे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाहीत. जोपर्यँत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यँत दत्तात्रेय अज्ञानान्धकारात त्यास सदैव मा र्गदर्शन करीतच राहतील.

तंत्रसाधनेतील अलौकिक कर्तृत्वामुळे दत्तात्रेयांना श्रीगुरू हे स्थान प्राप्त झाले. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी योगसाधना व गुरुसंस्थेची महनीयता ही दत्तात्रेयांची दोन प्रमुख वैशिष्ट्ये. नाथसांप्रदायिकांच्या मते दत्तात्रेय ही ‘योगसिद्धी’ प्राप्त करून देणारी देवता आहे. शाक्तपंथाच्या तंत्रसाहित्यात दत्तात्रेयांचे स्थान सर्वश्रेष्ठ असून यांना त्रिपुरसुंदरीच्या उपासनेचे प्रवर्तक मानले आहे. त्रिपुरारहस्याचे विवेचन करणारी अष्टादशसहस्त्री ‘दत्तसंहिता’ दत्तात्रेय प्रणित असून ‘दत्तात्रेय तंत्र’ नामक ग्रंथ शाक्तपंथात प्रमाणभूत मानला गेला आहे.

दत्तोपासनेत सर्वत्र प्रचलित असलेले ‘दत्तात्रेय वज्र कवच स्तोत्र’ शाक्तांच्या ‘रुद्रयामल तंत्रा’तील आहे. या सर्व बाबींचा विचार करून काही संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे, की इसवी सनाच्या प्रारंभी त्रिपुरोपासक शाक्त उपासनेच्या क्षेत्रात दत्तात्रेयाची निर्मिती झाली असावी. कदाचित या तंत्रप्रणालीचा प्रवर्तक दत्तात्रेय नामक कोणी महान सिद्धपुरुष असावा आणि त्याचेच पुढे पुराणांच्या अंतिम संस्कारांच्या काळी दत्त दैवतात रुपांतर झाले असावे.

साधुंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ठ होय! इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.

पादुका हे शिव आणि शक्ति यांचे प्रतीक असणे अन् नमस्कार करतांना त्रास होऊ नये; म्हणून पादुकांच्या खूंटयांवर डोके नठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे.

‘डावी पादुका ही शिवस्वरुप आणि उजवी पादुका ही शक्तिस्वरुप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ति आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ति होय. पादुकांच्या अंगठयातून पादुकांच्या खूंट्या आवश्यकते प्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ति बाहेर पडत असते. ज्या वेळी आपण पादुकांच्या अंगठयावर डोके टेकवून नमस्कार करतो,त्या वेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ति न पेलवल्याने त्रास होऊ शकतो यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठयावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर (जेथे संतांच्या पायांची बोटे येतात), तेथे टेकवावे.

श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे.

श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त सांप्रदायात गुरूपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता.

अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा तीशक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे.

दत्त महाराजांना सत्यसंध असं म्हटलेलं आहे, संध किंवा संधा म्हणजे काय तर प्रतिज्ञा! दत्त महाराजांची प्रतिज्ञा काय आहे तर माझा जो भक्त आहे त्याचा मी उद्धार करणारच. आता उद्धार कसा तर या मायामय संसाराचा फोलपणा क्षणोक्षणी पटवून देऊन. भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी अशी त्यांची बिरुदावली आहे. आता भक्तवत्सल असल्याने अगदी ममतेने भक्ताला काय हवे काय नको ते पाहतात. जे जे मनी इच्छावे ते ते भगवद कृपे पावावे असे वचन आहे

तर मित्रानो चला तर म जाणून घेवूया कि दत्तमंदिरामध्ये दत्त दर्शनासाठी केंव्हा जावे व कोणत्यावेळी आपली मनोकामना दत्त महाराजांना सांगावी. मित्रानो दुपारी २:३० मिनिटा नंतर दत्त मादिरामध्ये दत्त दर्शनासाठी जावू नये. आपल्याला एखादी मनोकामना दत्त महाराजांच्या कडे मागायची असेल तर ती अभिजित मुहूर्तावर मागावी, म्हणजे सकाळी ११:४० मिनिटे ते १२:२० मिनिटे या वेळेमध्ये दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जावे व आपली मनोकामन पूर्ण करण्याची विनंती करावी.

असे करण्याचे कारण म्हणजे या वेळेस दत्त महाराज भेक्षेसाठी जातात व त्यामुळे दत्त महाराजांकडे दयेची भिक मागण्यासाठी, मुक्तीच्या आशेने येणारे भूत, पिशाच्च, प्रेत योनी मध्ये असणारे आत्मे यांना वाटते कि दत्त महाराज तर या वेळेला इथे नाहीयेत, मग त्यांना त्यावेळेत तिथे काय मिळणार आणि म्हणून ते त्यावेळेत तिथे येत नाहीत. व या वेळेमध्ये आपण आपली मनोकामना दत्त महाराजाकडे मागीतल्या मुले महाराजान्कडील सर्व चागले ते आपल्याला मिळेल.

तर मित्रानो हि होती दत्त महाराजाच्या विषयीची माहिती व त्याच्या दर्शनाला जाण्याची आणि आपली मनोकामना पुरती ची याचना बोलण्या विषयीची माहिती. आपणही या वेळेमध्ये दत्त दर्शनाला जावून दत्त कृपेचा अवश्य लाभ घ्या. विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here