Darsh Amavasya | दर्श अमावास्या 2021

0
45
Darsha Amavasya 2021

दर्श अमावास्या | Darsha Amavasya Date, Tithi, Vidhi Vrat Katha

पौराणिक शास्त्राप्रमाणे महाशिवरात्रीनंतर येणार्‍या या अमावास्येच विशेष महत्त्व आहे. कृष्ण पक्षातील या अमावास्येला मोठी अमावस्या, स्नान दान अमावस्या असे देखील म्हटले जाते.या दिवशी नदी स्नान आणि तीर्थक्षेत्रात स्नान-दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सर्व सुखांची प्राप्तीसाठी काही खास उपाय सांगत आहोत.

दर्श अमावस्या पितृदोष उपाय

पितृ दोष दूर करण्यासाठी अमावास्येला पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. परंतू अमावास्येला काय करावे आणि काय नाही हे स्पष्टपणे माहीत नसतं. म्हणून येथे विशेष अचूक उपाय सांगण्यात येत आहे.

Darsha Amavasya Is Good Or Bad

 1. प्रत्येक अमावास्येला दक्षिणाभिमुख होऊन दिवंगत पितरांसाठी पितृ तरपण करावे. पितृस्तोत्र किंवा पितृसूक्त पाठ करावे.
 2. प्रत्येक अमावास्येला आपल्या पितरांची आठवण काढत पिंपळाच्या झाडाला गंगाजल, काळे तीळ, साखर, तांदूळ, पाणी आणि फुलं अर्पित करावे. हे अर्पित करताना ‘ॐ पितृभ्य: नम:’ मंत्राच जपावे. नंतर पितृसूक्त पाठ करणे शुभ फळ प्रदान करतं.
 3. प्रत्येक संक्रांती, अमावस्या आणि रविवारी सूर्य देवाला तांब्यांच्या लोट्याने अर्घ्य द्यावे. लोट्यात शुद्ध पाणी, लाल चंदन, गंगा जल मिसळून ‘ॐ पितृभ्य: नम:’ हे बीज मंत्र म्हणत 3 वेळा अर्घ्य द्यावे.
 4. त्रयोदशीला नीलकंठ स्तोत्राचा पाठ करावा, पंचमी तिथीला सर्पसूक्त पाठ, पौर्णिमेच्या दिवशी श्रीनारायण कवच पाठ केल्यानंतर यथाशक्ती ब्राह्मणांना पूर्वजांची आवडती मिठाई, खाद्य पदार्थ दक्षिणेसह द्यावे. याने पितृ दोष दूर होतो आणि शुभ फळांची प्राप्ती होते.
 5. या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चं दूध, दह्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पित केल्याचे विशेष महत्त्व आहे.
 6. या दिवशी प्रभू श्रीहरी विष्णू मंदिरात पिवळ्या रंगाचे ध्वज अर्पित करावे. याने सर्व कष्ट दूर होतील आणि जीवनात सर्व शुभ घटित होईल.
 7. जर का आपला उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, आपल्याला असे वाटत असेल कि आपल्या व्यवसायाला कोणाची तरी नजर लागली आहे, नजर बाधा झाली आहे. तर आपण दर्श अमावास्येच्या दिवशी अथवा कोणत्याही शनिवारी एक लिंबू घ्या व त्या लिंबूचे चार तुकडे करा. यानंतर आपण थोडी पिवळी मोहरी, २९ काळ्या मिरीचे दाणे आणि ७ लवंग घ्या व हे सर्व आपल्या उदयोग व्यवसायाच्या जागी, ऑफिस मध्ये, कारखान्यामध्ये जिथे तुमच्या व्यवसायाची जागा असेल त्या ठिकाणी ठेऊन द्या. आणि यानंतर संध्याकाळच्या वेळी या सर्व वस्तू एका काळ्या कपड्यामध्ये बांधून एखाद्या कोरड्या विहिरीमध्ये, ज्यामध्ये पाणी नसेल अशा विहिरीमध्ये फेकून द्या, या उपायामुळे लवकरच आपला व्यवसाय भरभराटीला येईल, आपल्या व्यवसायामध्ये धनाची बरसात होईल.
 8. अमावास्येच्या संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लाल वातीचा एक गाईच्या तुपाचा दीपक लावावा व दीपक प्रज्वलित करण्यापूर्वी यामध्ये थोडे केसर टाकावे, यामुळे mata लक्ष्मी प्रसन्न होतात.
 9. अमावास्येच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा, यामुळे आपली सर्व अडकलेली कामे होऊ लागतात.
 10. करियर मध्ये प्रगती होण्याकरिता अमावास्येच्या दिवशी राती १२ वाजता थोडी काली मोहरी घेऊन आपल्या घराच्या छतावर जावे व यानंतर या मोहरीचे दाणे तीन वेळा आपल्या डोक्यावरून फिरवून आपल्या उजव्या तळहातावर ठेवावेत आणि मग हे दाणे दाही दिशांना फेकावेत. हे मोहरीचे दाणे फेकत असताना || ऊँ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः || या मंत्राचा जाप करावा. हा उपाय अर्ध्यारात्री एखाद्या टिकतीला केला तर जास्त प्रभाव देतो.
 11. अमावास्येच्या दिवशी पिवळी त्रिकोणी आकृतीची पताका विष्णू मंदिरामध्ये उंच ठिकाणी अशा रीतीने लावावी कि ती फडकत राहील. असे करण्याने आपले सर्व दुःख, समस्या, कष्ट नष्ट होतात.

अमावस्या महत्व व नियम

दर्श अमावास्येचं अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी महादेवाची कृपा असते आणि विशेष वरदान प्राप्त होतं. तर जाणून घ्या राशीनुसार कसे करावे पूजन

 • मेष- महादेवाला गूळ अर्पित करावे.
 • वृषभ- दह्याने महादेवाला अभिषेक करावे.
 • मिथुन- उसाच्या रसाने महादेवाला अभिषेक करावे.
 • कर्क- कच्च्या दुधाने आणि पाण्याने महादेवाला अभिषेक करावे.
 • सिंह- महादेवाला खिरीचं नैवेद्य दाखवावं.
 • कन्या- महादेवाला बेल पत्र अर्पित करावे.
 • तूळ- कच्च्या दुधाने महादेवाला अभिषेक करावे.
 • धनू- पंचामृताने महादेवाला अभिषेक करावे.
 • वृश्चिक- महादेवाला गुलाबाचं फुलं अर्पित करावं.
 • मकर- महादेवाला नारळ पाणी अर्पित करावे.
 • कुंभ- महादेवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करावे.
 • मीन- केशर युक्त दुधाने महादेवाला अभिषेक करावे.

Darsh Vel Amavasya 2021 Date

शास्त्रांप्रमाणे अमावस्या सुख-सौभाग्य आणि धन-संपत्ती, वैभव इतर गोष्टीसाठी विशेष मानली जाते. या दिवशी वरील सांगितलेले उपाय अमलात आणून आनंदी जीवनाचा लाभ मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here