Daily horoscope 5 april 2021: राशीभविष्य ५ एप्रिल २०२१ सोमवार

0
56
Daily horoscope 5 April 2021 Monday
Daily horoscope 5 April 2021 Monday

Daily horoscope 5 April 2021 Monday | रोजचे राशी भविष्य ५ एप्रिल 2021 सोमवार

मेष : राशीच्या दहाव्या स्थानातील कर्म केंद्रात असलेला चंद्र तुम्हाला इच्छित फळ देणारे असेल. मुलांबाबत ज्या काही समस्या असतील त्यांचे सुद्धा निराकरण होईल. आज सर्वांचा पाठींबा तुम्हाला मिळेल. एखाद्या कामाबाबत राजकीय दृष्ट अडचण निर्माण होऊ शकते काळजी घ्या. ५५% नशिबाची साथ आहे.

वृषभ : राशीच्या नवव्या स्थानात असलेला चंद्र तुमचे प्रियजन किंवा नातेवाईकांना शारीरिक कष्ट असल्याचे सुचवतो. अनावश्यक खर्च व विनाकारण विवादापासून लांब राहा. संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत प्रियजनांसोबत भेटीगाठीचे सुख मिळेल. ५४% नशिबाची साथ आहे.

मिथुन : राशीच्या आठव्या स्थानात असलेला चंद्र प्रियजनांसोबत अंतर्विरोधाची स्थिती निर्माण करण्याची शक्यता आहे. तुमचा वेळेप्रमाणे कामे पूर्ण होण्यात अडचणी येतील. हवामान सुद्धा अनुकूल नसेल. परंतु मकर राशीचा बृहस्पती संध्याकाळच्या वेळी मनाला आनंद देऊन जाईल. मोठ्या प्रमाणात धन प्राप्ती झाल्याने मनोबळ वाढेल. ५९% नशिबाची साथ आहे.

कर्क : राशीत मकर चा बृहस्पती आणि सातव्या स्थानात असलेला चंद्र तुमच्या मान-सन्मानात वाढ करेल. शत्रूंचे मनोबल ढासळेल. घरगुती व चांगल्या लोकांशी ताळमेळ वाढेल. व्यवसायात नोकर व भागीदारांकडून चांगले वातावरण मिळेल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत पाहुण्यांच्या आगमनाने खर्चात वाढ होईल. ५८% नशिबाची साथ आहे.

सिंह : मकर राशीचा चंद्र व सहाव्या स्थानातील गुरु शुभ व्यववहार व कीर्तीत वाढ करेल. भाग्योदयात अडचण, धन धर्मात वृद्धी, शत्रूच्या आणि विरोधकांचा हस्तक्षेप इत्यादी अडचणी असूनसुद्धा संध्याकाळपर्यंत सर्वत्र विजय मिळवाल. ६०% नशिबाची साथ आहे.

कन्या : एखाद्या गोष्टीबाबत मानसिक तणाव असेल. मुलांकडून काळजीचे वातावरण असेल. या व्यतिरिक्त कफ आणि पित्तासंबाधी रोगांमुळे शारीरिक कष्ट होण्याची शक्यता आहे. एवढे असूनसुद्धा व्यवसायात लाभ व बायकोचे सहकार्य मिळाल्याने आत्मविश्वासात वाढ होईल. ६१% नशिबाची साथ आहे.

तूळ : चौथ्या स्थानात चंद्र आसल्याने अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. प्रियजनांची साथ आणि इच्छित सुख-समाधान मिळेल. संध्याकाळी मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्या. अन्यथा आरोग्याच्या तक्रारीत वाढ होईल. ६७% नशिबाची साथ आहे.

वृश्चिक : मुलांच्या बाजूने चिंतेचे वातावरण असेल. मुलांना शारीरिक कष्ट झाल्याने तुम्ही अस्वस्थ असाल. जागा बदलण्याचा योग प्रबळ आहे. आर्थिक लाभ होईल परंतु लाभापेक्षा अधिक खर्च झाल्याने मन दुःखी असेल. शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. सावधान राहा. ५२% नशिबाची साथ आहे.

धनू : द्वितीय स्थानात असलेला गुरु तुम्हाला शारीरिक कष्ट आणि आर्थिक बळ देईल. चांगल्या लोकाची भेट झाल्याने अधिकारी वर्ग तुमच्या बाजूने असतील. योग्य मार्गाने उत्पन्नात वाढ होईल परंतु खर्च अधिक असेल. रात्री अध्यात्मिक कार्यात किंवा देवदर्शनाची संधी मिळेल. ६९% नशिबाची साथ आहे.

मकर : भावंड व व्यापारात सहकाऱ्यांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद-विवादाने तुम्ही अस्वस्थ राहाल. संध्याकाळी संपत्ती लाभ तसेच बायकोकडून सहकार्य मिळाल्याने आनंद होईल. ५३% नशिबाची साथ आहे.

कुंभ :आज व्यासायात लाभ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे व्यवसाय भागीदारांकडून काळजी वाढेल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत यात्रेचे योग आहेत. नोकरदार वर्गासाठी अचानक आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबाबरोबर आनंदी वातावरण असेल. ८०% नशिबाची साथ आहे.

मीन : आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तणावापासून बचाव करण्यासाठी नम्रतेने काम करणे आवश्यक आहे. नोकरी करत असाल तर तुमच्या कामात व अधिकारात वाढ होईल. त्यामुळे इतर सहकाऱ्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. ६६% नशिबाची साथ आहे.

-आचार्य कृष्णदत्त शर्मा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here