Daily horoscope 4 April 2021 Thursday | रोजचे राशी भविष्य ४ एप्रिल 2021 रविवार

0
51
Daily horoscope 5 April 2021 Monday
Daily horoscope 5 April 2021 Monday

Daily horoscope 4 April 2021 Thursday | रोजचे राशी भविष्य ४ एप्रिल 2021 रविवार

मेष :मेष राशीतील व्यक्तींसाठी आज मंगलकार्यात सहभागी होण्याचा दिवस आहे.समाजात शुभ कामांसाठी पैसे खर्च केल्याने तुमच्या किर्तीत वाढ होईल.त्याचबरोबर व्यापार करणाऱ्या व्यक्तींची एखादी खास डील संध्याकाळी ५ वाजेपर्यंत फायनल होऊ शकते.राज्याकडून विशेष सन्मान प्राप्त होऊ शकतो.भौतिक विकासासाठी चांगला योग आहे. ८०% नशिबाची साथ आहे.

वृषभ : वृषभ राशीतील व्यक्तींचे सर्व लक्ष आज नव्या योजनांवर राहील. एखाद्या देवस्थानास भेट दिल्यास मन प्रसन्न होईल. कायदेविषयक वादात विजय तसेच स्थानपरिवर्तनाची योजना यशस्वी होऊ शकते. अडचणी असतानाही दिवसाच्या उत्तरार्धात तुमच्या पराक्रमात वाढ होईल.कुटुंबात हर्ष व मंगलमय परिवर्तन होईल आणि मनोरथ सिद्ध होईल.कामाच्या ठिकाणीही तुम्हाला अनुकूल वातावरण तयार होईल. तसेच तुमचे सहकारीही तुम्हाला मदत करतील. ७५% नशिबाची साथ आहे.

मिथुन : मिथुन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस फार रचनात्मक राहील.म्हणजे आज एखादे रचनात्मक काम पूर्ण करण्यामध्ये तुमचा पूर्ण दिवस जाऊ शकतो.नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सर्वात आवडते काम करण्याची आज संधी मिळेल.सहकाऱ्यांच्या मदतीमुळे आज तुम्हाला विश्रांती घेण्यास मदत मिळेल.संध्याकाळपर्यंत एखादी विशेष जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते.कुटुंबाकडून उत्तम सहकार्य लाभेल. ८८% नशिबाची साथ आहे.

कर्क : कर्क राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस फारच सृजनात्मक आहे. मन लावून जे काही काम कराल त्यात त्वरित यश मिळेल.अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील.महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल.कामाच्या ठिकाणी तुमच्या विचारांना अनुकूल वातावरण तयार होईल.तसेच सहकाऱ्यांची सोबतही लाभेल.रात्रीच्या वेळी एखाद्या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. ९०% नशिबाची साथ आहे.

सिंह : सिंह राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस फारच धावपळीचा राहील.परंतु धर्म-अध्यात्म यांच्या लिखाण-वाचनासाठी वेळ काढणे फायद्याचे ठरेल.कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. रात्रीचा वेळ मंगलमय कामात घालवाल. ५५% नशिबाची साथ आहे.

कन्या : आज आपल्या बोलण्याचालण्यात संयम आणि सावधानता बाळगणे गरजेचे आहे.आजूबाजूच्या माणसांसोबत वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते.नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने काम करा.रात्री परिस्थितीत सुधारणा होईल. ५७% नशिबाची साथ आहे.

तूळ : आजचा दिवस तूळ राशीतील व्यक्तींसाठी लाभदायक आहे.आज तुमच्या कामाशी संबंधित सर्व वादविवाद नाहीसे होतील.नवीन योजनेवर काम सुरू कराल.संपत्तीच्या बाबतीत कुटुंबातील सदस्य किंवा इतर व्यक्तीं अडचणी निर्माण करतील. ६७% नशिबाची साथ आहे.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूपच बलशाली ठरेल.दिवसभर लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील.त्यामुळे सतत कार्यशील राहा.कुटुंबामध्ये सुख-शांती आणि स्थिरता अनुभवाल.नोकरीधंद्यात काही नाविण्य आणू शकलात तर भविष्यात त्याचा फायदा होईल.कामामध्ये नवीन उत्साह जाणवेल. ८९% नशिबाची साथ आहे.

धनू : आजचा दिवस सतर्कता बाळगण्याचा आहे.व्यापाराच्या बाबतीत थोडी जोखीम उचलल्यास मोठा फायदा होऊ शकतो.रोजच्या कामांव्यतिरिक्त इतर नवे काम करू शकता.जवळच्या एखाद्या व्यक्तीसाठी पैश्यांची सोय करावी लागू शकते.नवीन संधी तुमच्या आसपासच आहे.तिला ओळखणे हे तुमच्याच हातात आहे.
५२% नशिबाची साथ आहे.

मकर : आजचा दिवस सामान्य आहे.भागीदारीमध्ये केलेल्या व्यापारात भरपूर फायदा मिळेल.घरातील रोजची कामे हातावेगळी करण्यासाठी आज उत्तम संधी आहे.आपल्या अपत्यासंबंधीत एखादा मोठा निर्णय आज तुम्हाला घ्यावा लागू शकतो.इमानदारीने वागा व नियमांचे पालन करा.एकाच वेळी अनेक कामे हाती घेतल्याने व्यस्ततेत वाढ होईल. ६८ नशिबाची साथ आहे.

कुंभ : आजचा दिवस आपल्या आरोग्यासंबंधित सावधानी बाळगण्याचा आहे.ऋतूतील बदलांमुळे शीतोष्ण विकार उत्पन्न होऊ शकतात.खाण्यापिण्यात हलगर्जीपणा करू नका.व्यापाराच्या बाबतीत दिवस सुखात जाईल.घाईगडबडीत एखादी चूक होऊ शकते त्यामुळे विचारपूर्वक काम करा. ५८% नशिबाची साथ आहे.

मीन : आजचा दिवस लाभदायक ठरेल.व्यापारात जोखीम उचलणे फायद्याचे ठरेल.आपले धैर्य आणि मृदू स्वभाव यामुळे समस्यांवर मात करता येऊ शकते.आपल्या बुद्धीचा वापर करून तुम्ही त्या सर्व गोष्टी मिळवू शकता ज्या मिळवण्याची तुमची इच्छा आहे.एखाद्या संकटग्रस्त व्यक्तीची मदत करणे लाभदायक ठरेल.
७५% नशिबाची साथ आहे.

– आचार्य कृष्णदत्त शर्मा.

धन प्राप्तीसाठी घरात या ठिकाणी ठेवा तुरटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here