Rules Of Raksha Sutra सावधान! – जर का आपण हातामध्ये धागा बांधत असाल तर हा विडिओ नक्की पहा

0
69
Benefits Of Raksha Sutra

Benefits Of Raksha Sutra सावधान! – जर का आपण हातामध्ये धागा बांधत असाल तर हा विडिओ नक्की पहा |  Significance Of Raksha Sutra

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रानो सध्य स्थितीत भारत देशामध्ये धर्माला मानणाऱ्या, देवाला मानणाऱ्या, भक्तीला मानणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप अधिक आहे. प्रत्येक व्यक्ती देवीदेवताना, ईश्वरी कृपेला मानते. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी देवाची भक्त असते. आणि त्यादेवाची आपल्यावर कृपा राहावी या भावनेतून आपण त्या देवाचा कृपाशीर्वाद मिळाल्याच्या स्वरूपामध्ये हातामध्ये धागा बांधतो. मग ती स्त्री असो व पुरुष. कोणी दुर्गामातेचा धागा बांधत, तर कोणी कशी चा धागा बांधत, कोणी महाकाल चा धागा बांधत किंवा कोणी एखाद्या पुरोहिताने हवंन करून दिलेला धागा बांधत. अश्या प्रकारे कोणता ना कोणता तरी धागा हर व्यक्तीच्या हातामध्ये असतो.

Dhaga Kontya Hatat Bandhava

आणि हा धागा आपण आपल्या हातामध्ये बांधल्यानंतर आपल्या आत्मविश्वासा मध्ये वृद्धी होते कि आपल्याला कृपा प्राप्त झाली आहे, आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला आहे. व या ध्याग्यामुळे माझे सर्व वाईट शक्तींपासून रक्षण होईल. आणि म्हणून याला रक्षा सूत्र किंवा रक्षा धागा आगर रक्षा बुटी असे देखील म्हणतात. पण मित्रानो असे जितके हि लोक असतील कि जे त्यांच्या हातामध्ये धागा बांधतात, त्यांना जर विचारले कि आपण हातामध्ये धागा का बांधता तर ते एवढेच सांगतील कि हा देवाचा प्रसाद आहे. देवाची कृपा आपल्यावर राहावी म्हणून बांधला आहे.

Lucky Bracelet For Money

परंतु जर का आपल्याला समजले कि या धाग्यामध्ये काय शक्ती लपली आहे तर आपण आश्चर्य चकित होऊन जाल. मित्रानो पूर्वीच्या काली जे साधू संत, ऋषीमुनी होते किंवा आयुर्वेदिक डॉक्टर असायचे ते त्यांच्या जवळ येणाऱ्या लोकांची नाडी परीक्षण करायचे. कोणाही व्यक्तीची नाडी धरून ते त्या व्यक्ती बद्दलची सर्व माहिती सांगत असत. नाडी परीक्षणावरून त्यांना शरीरातील रोगांबरोबरच त्या व्यक्तीचे ज्योतिष देखील समजायचे. आणि सद्याच्या काळात सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टर असूदेत किंवा ऍलोपॅथी डॉक्टर सर्वजण नाडी परीक्षण करतात.

Bracelet For Good Luck And Prosperity

आणि या नाडीच्या जागीच आपण हा धागा बांधतो ज्याला आपण देवाचा प्रसाद मानतो. मित्रानो आपली जी नाडी असते या नाडीमुळेच आपल्या संपूर्ण शरीराची ऊर्जा, शक्ती, आरोग्य, भूत-भविष्य, पाप-श्राप-ताप या सर्व गोष्टींची माहिती मिळते. जर का नाडी परीक्षण करणारी व्यक्ती हुशार असेल, तर किती जन्मापासून त्या व्यक्तीला श्राप लागले आहेत व कोणकोणते कर्म त्याने केले आहेत, कोणकोणत्या सवयी त्याला आहेत, त्याने काही चुकीचे कर्म तर केले नाही, याची माहिती तो नाडी परीक्षण करणारा व्यक्ती आपल्याला देऊ शकतो. त्या व्यक्तीबद्दलची सर्व माहिती नाडी परीक्षण करणाऱ्या व्यक्तीला समजते.

Lucky Charm Bracelet For Money

कारण आपल्या हृदयामध्ये जी शक्ती असते, हृदयामध्ये जी ऊर्जा, शक्ती, प्राण, जीवन आहे. हृदयामध्ये जितक्या प्रकारच्या पाप-श्राप दोषाचे संकलन आहे, हृदयामध्ये भविष्यात होणाऱ्या चांगल्या आणि वाईट जितक्या गोष्टी आहेत, या सर्व शक्तींचा बाहेर पडणारे जे रिफ्लेक्शन असते, प्राकट्य असते ते आपल्या हाताच्या मणिबंधावर असणाऱ्या नाडीच्या ठिकाणातून होते. आणि या ठिकाणी जर का एखादी दिव्या ऊर्जा आली तर आपल्या नदीचे जे हृदयाशी असणारे कनेक्शन आहे, त्याचा प्रभाव हृदयामधील पाप असो, श्राप असो, भविष्यामध्ये येणार ताप असो वा वर्तमान परिस्थितीमधील दुःख दरिद्रता असुदे. या सर्वाना कंट्रोल करण्याची एकमेव जागा म्हणजे आपले मणिबंध आहे.

Mens Lucky Bracelet

आणि या मणिबंधाला जर आपण ईश्वरी कृपेने भरले, आपल्या जीवनाला ईश्वरी कृपेने भरले तर जीवन सुखी आणि समृद्ध होऊन जाईल. आणि म्हणूनच हाताच्या मनगटावर धागा बांधला जातो. पुरुष हा धागा आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधला पाहिजे तर स्त्रियांनी त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर हा धागा बांधला पाहिजे. म्हणजे हा धागा आपल्या हृदयाशी कनेक्ट होईल. स्त्रियांनी हा धागा डाव्या हातामध्ये बांधावा कारण स्त्रियांच्या शरीराच्या डाव्या भागातूनच ऊर्जा संक्रमित होत असते. आणि म्हणूनच माता भगवती पार्वतीला वामांगी असे म्हंटले जाते. भगवान शंकरांच्या वाम अंगामध्ये त्यांचा निवास असतो. स्त्री हि डाव्या भागातून ऍक्टिव्ह असते तर पुरुष हा उजव्या भागातून ऍक्टिव्ह असतो.

Raksha Sutra Bandhne Ka Mantra

आणि म्हणूनच ईश्वराचा प्रसाद मानलेला तो धागा स्त्रियांनी डाव्या हातामध्ये बांधला पाहिजे व पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधला पाहिजे. मित्रानो हा धागा एखाद्या विशेष स्थानावरील असेल, एखाद्या शक्ती पिठामधील असेल, एखाद्या दिव्या स्थानावरील असेल, ज्योतिर्लिंगावरील असेल, अतिविशेष अश्या स्थानावरून आपल्याला मिळाला असेल, तर मनामध्ये कसलीही शंका न आणता निःसंशय होऊन सहृदय आपण तो धागा धारण करावा. त्याधाग्यामध्ये त्यास्थानाची ऊर्जा, जसे समुद्रातील पाण्याच्या थेंबामध्ये समुद्राचे संपूर्ण गुण असतात त्याप्रमाणे ईश्वरीय कृपा प्राप्त दिव्या शक्ती क्षेत्रापासून मिळालेल्या कोणत्याही वस्तू मध्ये ती ऊर्जा निश्चित स्वरूपात असते.

Raksha Sutra Mantra

आणि असा धागा आपल्या मनगटावर बांधल्याने आपल्याला लागलेले श्राप संपून जातात. आपले पाप नष्ट होते, आपल्यावर असणारे संकट संपून जाते, दरिद्रता नष्ट होऊन जाते आणि भविष्यामध्ये येणारे कोणतेही संकट, समस्या, दुःख या सर्वांचेही निवारण होऊन जाते. मित्रानो आपले पूर्वज हा धागा बांधायचे तेंव्हा हा धागा रेशमी असायचा. मित्रानो रेशमी हे चिरकाल आपल्याला यातून शक्ती, ऊर्जा देत राहते. नाहीतर आपण साधा धागा वापरलात आणि एखाद्या सुतक असणाऱ्या ठिकाणी गेलात किंवा एखाद्या विटाळ असणाऱ्या जागी गेलात तर ती शक्ती नाश पावते. परंतु जर का रेशमी धागा असेल तर ती शक्ती अक्षय राहते, शास्वत राहते कारण रेशमी धाग्याला कसलेही सुतक, विटाळ लागत नाही.

Raksha Sutra Bracelet

आणि त्यामुळेच प्राचीन काली आपल्या भारत देशामध्ये सोन्याचे कडे, ब्रेसलेट घालण्याची परंपरा निर्माण झाली कारण सोन्याला कधीही सुतक लागत नाही. म्हणून सोन्याच्या कड्याला ईश्वराच्या नावाने मंत्रित करून रक्षा सूत्राच्या रूपात घालण्याची परंपरा सर्वप्रथम भारतामध्ये चालू झाली. पण आज आपण ब्रेसलेट हे फक्त शो साठी, सौदर्य वृद्धी साठी घालत असतो. तर मित्रानो ब्रेसलेट हे फक्त शो साठी किंवा सौदर्य वृद्धी नसून, जेंव्हा देखील आपण ब्रेसलेट घालता त्यावेळी त्यासोन्यामध्ये ईश्वरीय ऊर्जा जर संकलित असेल तर ती ऊर्जा शास्वत रूपात हृदयाशी कनेक्ट राहते व आपल्यावर एखादी आपत्ती येणार असेल, आपल्यावर एखादी समस्या येणार असेल, आपल्यावर एखादा त्रास येणार असेल तर त्या आपत्तीला, त्या समस्येला हे ब्रेसलेट पहिलाच कंट्रोल मध्ये ठेवते.

Raksha Sutra Dhaga

आणि म्हणून त्याला रक्षा सूत्र, रक्षा बुटी असे देखील म्हणतात. कारण ते आपली रक्षा करते. ज्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती संपन्न आहे अश्या व्यक्ती सोन्याचे कडे घालतात किंवा चांदीचे, तांब्याचे असले तरी देखील चालते. धातू मध्ये एक प्रकारची विद्युत शक्ती असते, जी शरीराच्या विभिन्न भागापर्यंत पोहचते. आणि असे कडे ईश्वरीय मंत्रांनी परिपूर्ण असेल तर ते कडे पूर्ण रूपाने रक्षेची प्रथम शक्ती बनते. आजकाल आपण कोणत्याही दुकानातून कडे विकत घेतो व ते तसेच आपल्या हातामध्ये धारण करतो. परंतु हे कडे घेतल्यानंतर सर्वप्रथम त्याला कोणत्याही शक्तिशाली क्षेत्रामधील मंदिरामध्ये दैवाच्या चरणावर ठेवून, त्याची पूजा करून मगच धारण केले पाहिजे.

Raksha Sutra Banane Ka Tarika

तर मित्रानो आज आम्ही आपल्याला असा जबरदस्त शक्ती देणारा उपाय सांगत आहोत, कि जो उपाय करून हा धागा आपण आपल्या हातामध्ये बांधला तर आपला कोणी केसही वाकडा करू शकणार नाही. तर यासाठी आपल्याला करायचे काय आहे तर. कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी किंवा शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी. म्हणजे महिना ३० दिवसांचा असेल तर शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी आणि महिना ३१ दिवसांचा असेल तर शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ओरिजिनल रेशमी धागा कमीत कमी ३ फूट होईल इतका घ्यायचा आहे.

Kalava Raksha Sutra

मित्रानो आपण जर का अशांत असाल, काळजीने त्रस्त असाल तर आपण पांढऱ्या रंगाचा रेशमी धागा घ्यावा. जर का आपल्याला बळ हवे आहे शक्ती हवी आहे, आपल्यामध्ये आकर्षण शक्ती हवी आहे. सर लोक आपल्याकडे प्रभावित व्हावे व आपल्याशी जोडले जावे तर आपण लाल रंगाचा रेशमी धागा घ्यावा. जर का आपण इष्ट देवतेची कृपा, देवी देवतांचा आशीर्वाद, देवतांची कृपा मिळवू इच्छित तर आपण पिवळ्या रंगाचा रेशमी धागा घ्यावा. जर का आपल्याला ज्ञान हवे असेल, अभ्यासात प्रगती करू इच्छित असाल, परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ इच्छित असाल किंवा मोठ्या पदावर जाऊ इच्छिता किंवा नोकरीमध्ये प्रमोशन हवे असेल,किंवा आपल्याला आपला व्यापार, उद्योग, धन वाढवायचे असेल तर आपण हिरव्या रंगाचा रेशमी धागा घ्यावा. हिरवा धागा धन वाढविण्यासाठी पूर्ण कारगर असतो. आणि जर का आपण एखाद्या संकटापासून त्रस्त असाल, किंवा कोना शत्रूपासून त्रासात असाल, किंवा समस्येने घेरलेले असाल, घरामध्ये भूत प्रेताचा उपद्रव आहे किंवा कोणी ना कोणी आपल्याला त्रास देताच असत तर आपण काळ्या रंगाचा रेशमी धागा घ्यावा.

Zodiac Bracelets Gold

मित्रानो शांतीसाठी पांढरा धागा, शक्ती, वशीकरण, आकर्षण शक्तीसाठी लाल धागा, इष्टकृपा, ईश्वर कृपेसाठी,लक्ष्मी कृपा यासाठी पिवळा धागा, धनवृद्धी, व्यापारवृद्धी, कार्य सफलता यासाठी हिरवा धागा आणि रक्षेसाठी, शत्रुभय निवारणासाठी आणि सर्व प्रकारच्या तंत्र बाधेपासून वाचण्यासाठी काळा धागा घ्यावा. तर अश्या प्रकारे आपल्याला हवा असलेला धागा आपण घ्यावा व शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी किंवा शुक्ल पक्षातील चाथूर्तीच्या दिवशी एक तर सकाळी लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळच्या वेळी म्हणजे ६:३० ते ७३० या वेळेमध्ये हा धागा आपण आपल्या हातामध्ये घ्यावा व आपल्या कुलदेवीसमोर किंवा कुलदेवासमोर बसावे व आम्ही इथे एक मंत्र आपल्याला सांगत आहोत. त्या मंत्राचा १०८ वेळा जप करून या धाग्याला एक गाठ मारायची आहे.

Good Luck Bracelet For Guys

व याचा प्रमाणे सलग २७ दिवस त्याच वेळेला म्हणजे आपण सकाळी हा विधी करत असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळच्या वेळी स्नानादी नित्यकर्म आटोपून या मंत्राचा १०८ जप करून रोज एक याप्रमाणे २७ दिवसात २७ गाठ या धाग्याला मारायच्या आहेत. रोजची एक गाठ मारून झाल्यावर तो धागा आपण आपल्या इष्ट देवतेच्या चरणाजवळ ठेवायचा आहे व दुसऱ्या दिवशी परत घेऊन मंत्र जप करून दुसरी गाठ मारायची आहे. याप्रमाणे २७ दिवस हा विधी करायचा आहे. जर का आपण हा विधी सोन्याच्या ब्रेसलेट वर करत असाल तर आपण मंत्र जप झाल्यावर एक ५ मिनिटे ते ब्रेसलेट देवाच्या चरणाजवळ ठेवावे व नंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यावे. व दुसऱ्या दिवशी परत अश्याच प्रमाणे विधी करावा. या प्रकारे २७ दिवस हा विधी आपण करावा.

Good Luck Bracelet

मित्रानो हा उपाय शुक्ल पक्ष्याच्या तृतीय किंवा चतुर्थीला सुरु करून २७ गाठ धाग्याला मारायच्या आहेत, व एक गोष्ट इथे लक्ष्यात ठेवा कि २७ व्या दिवशी आमावश्या असली पाहिजे. ज्यादिवशी आपण शेवटची म्हणजे २२७ वि गाठ माराल त्यादिवशी आमावश्या असली पाहिजे, त्यामुळे आपण कॅलेंडर मध्ये पाहताना पहिला अमावास्येचा दिवस पहा व तेथून २७ दिवस मागे शुक्ल पक्षातील तृतीय किंवा चतुर्थी असेल असा महिना या विधीसाठी निवडावा. जर का आपण यापूर्वी एखादे सोन्याचे, चांदीचे किंवा तांब्याचे कडे वापरता व त्यावर हा विधी करायचा असेल तर ते कडे आधी स्वच्छ धुवून त्याला धूप दीप दाखवून त्याची पूजा करावी व मग या विधीसाठी त्याचा वापर करावा.

Lucky Charm Bracelet

२७ दिवस या कड्यावर किंवा धाग्यावर हा विधी करून मग तो आपल्या हातामध्ये धारण केल्याने ते कडे किंवा तो धागा शास्वत स्वरूपात आपल्याला धन देणारा, शक्ती देणारा, टाकत देणारा, आपले प्रत्येक काम पूर्ण करणारा, आपले पूर्ण स्वरूपात रक्षा करणारा दिवा कडा बनतो, दिव्य धागा बनतो. तर मित्रानो पहिल्या दिवशी हा विधीची सुरवात करताना आपल्या कुलदेवतेला, इष्टदेवतेला प्रार्थना करावी कि हे ईश्वर, हे प्रभू आपल्या कृपेने माझे सदैव रक्षण होऊदे. माझ्या घर परिवारामध्ये शांती राहूदे, माझे प्रत्येक कार्य सफल होऊदे, माझ्यामध्ये संस्कार, सद्गुण, श्रेष्ठता वाढूदे, मला गरिबांची दुखी माणसांची सेवा करता येऊदे, हर प्रकाराने मी आपला प्रिय बनो असा मला आशीर्वाद द्यावा. आशय प्रकारे दररोज २७ दिवस हि प्रार्थना आपल्या कुलदेवाला करावी.

Sacred Threads On Hand Benefits Of Raksha Sutra

dhaga kontya hatat bandhavaप्रार्थना करून झाल्यावर एखादे असं अंथरून त्यावर बसावे. व बसताना आपल्याला हळव्या असलेल्या रंगाचा धागा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन बसावे किंवा कडे असेल तर कडे घेऊन बसावे. आम्ही इथे सांगितलेल्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. मंत्र आहे || ॐ कुलदेवता इष्टदेवता रक्षतु || या मंत्राचा आपण १०८ वेळा जप करायचा आहे. मंत्र पुन्हा एकवेळ सांगतो || ॐ कुलदेवता इष्टदेवता रक्षतु || हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीन वर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिपशनमद्ये किंवा आमच्या स्टारलाईव्ह डॉट इन (starliv.in) या वेब साईट वर मिळून जाईल. मंत्र जप करताना जप मोजण्यासाठी जप कॉउंटर वापरू शकता किंवा डाव्या हाताच्या बोटांचा वापर करू शकता अथवा अन्य कश्याही प्रकारे आपण १०८ जप मोजू शकता.

Ram Raksha Sutra

मित्रानो आपल्या उजव्या हातामध्ये तो धागा धरून किंवा कडे धरून आपल्याला हा १०८ वेळा मंत्र जप करायचा आहे. मंत्र जप करत असताना धूप दीप जळत असला पाहिजे. व जप करून झाल्यावर त्या धाग्याला एक गाठ मारायची आहे. गाठ मारून झाल्यावर कुलदेवतेला नमस्कार करून तो धागा आपल्या कुलदेवासमोर ठेवून द्यायचा आहे व दुसऱ्या दिवशी परत याचा प्रकारे असे २७ दिवसामध्ये २७ गाठ मारायच्या आहेत. २७ दिवस हा धागा कुलदेवतेच्या चरणावर ठेवणे हे फार विशेष महत्वाचे आहे.

Kala Dhaga On Hand

२७ वि गाठ मारून झाल्यानंतर हा धागा कुलदैवते समोर ठेवावा आणि कुलदेवतेला एखादे फुल अर्पण करून धूप दीप दाखवून नैवेद्य अर्पण करावा. यानंतर कुलदेवतेला प्रार्थना करावी कि या रक्षा सूत्रामध्ये आपण विराजमान व्हावे, आपण राख बनून सदैव माझ्या सोबत राहावे, माझ्या प्रत्येक कार्याला सफल करावे, मझ्यावरचे प्रत्येक विघ्न संपवून टाकावे, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करावी, माझ्या जीवनाला सफल बनवावे अशी प्रार्थना करून आपल्या घरातील ज्या व्यक्तीला आपण श्रेष्ठ मानता किंवा एखाद्या वडीलधाऱ्या वक्तीकडून हा धागा किंवा ब्रेसलेट आपल्या हातामध्ये बांधून घ्यावा.

Raksha Kavach

आपण हा धागा गळ्यामध्ये देखील बांधू शकता. पण हा धागा हातामध्ये बांधणे सर्वश्रेष्ठ असते कारण हातामध्ये बांधल्याने याची शक्ती हृदयापर्यंत जाते. मित्रानो हा धागा आपले दारिद्रतेपासून, संकटांपासून रक्षण करतो. पैसे येण्याच्या मार्गातील अडथळे दूर करतो. कार्यामध्ये येणारी विघ्ने संपवून कार्यामध्ये यश देतो, शत्रू पासून रक्षण करतो. तर मित्रानो आपण हि हातामध्ये धागा बांधत असाल किंवा ब्रेसलेट घालत असाल तर आपण हि हा विधी करून धागा किंवा ब्रेसलेट घालावे. आपल्याला याचे फारच चमत्कारिक आणि अदभुद परिणाम अनुभवायला मिळतील. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here