Beneficial Opportunity to investing money in Real Estate Investment Trust (REIT) | रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) मध्ये पैसे गुंतवण्याची फायदेशीर संधी

0
28
Real Estate Investment Trust
REIT

Beneficial Opportunity to investing money in Real Estate Investment Trust (REIT) | रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) मध्ये पैसे गुंतवण्याची फायदेशीर संधी

आजच्या घडीला घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता खरेदी आता आटोक्यात राहिलेली नाही. पण यावरही एक उपाय आहे. आपण खूपच कमी किमतीत मालमत्तेत गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवू शकता. होय, ‘रिट’ च्या माध्यमातून हे शक्य आहे. ‘रिट’ अंतर्गत एस आय पी सुरु करून मालमत्तेत गुंतवणूक करू शकता आणि चांगला लाभ मिळवू शकता. या ब्लॉग मध्ये आपण रिट विषयी माहिती जाणून घेऊया.

रिअल इस्टेट मालमत्तेत गुंतवणूक करण्यास सर्वच जण उत्सुक असतात. परंतु पारंपारिक माध्यमातून गुंतवणुकीचा विचार केल्यास हि बाब कठीण वाटते. कारण, एक तर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज भासते. त्याचबरोबर बिल्डर, जमिनदाराशी बऱ्याच वाटाघाटी कराव्या लागतात आणि कागदपत्री कार्यवाही देखील करणे तितकेच गरजेचे असते. पण दुसरीकडे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास वैविध्यपणा कमी राहतो. कारण त्याचे मूल्य अधिक असते आणि गुंतवणुकीत लिक़्विडीटी कमी असते. त्यामुळे मालमत्ता विक्री करणे सोपे राहत नाही आणि त्याची तुकड्यात विभागणी करणेदेखील शक्य राहत नाही. पण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. आर ई आंय टी म्हणजेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, Real Estate Investment Trust (REIT). ज्याला आपण सोप्या भाषेत रिट (REIT) असे म्हणतो. हे एक रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे माध्यम आहे. कोरोना संकट(covid-19) शेवटच्या टप्प्यात असल्याचे वाटत असेल आणि अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे वातावरण निर्माण झाले असेल तर रिट (REIT) च्या माध्यमातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर राहू शकते.

What is a REIT? | रिट म्हणजे काय?

आर ई आंय टी म्हणजेच रिट अर्थात रिअल इस्टेट प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचे एक माध्यम आहे. हे बर्याच अंशी म्युच्युअल फंडाप्रमाणेच काम करते. ज्याप्रमाणे म्युच्युअल फंड हे विविध गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून शेयर बाजार, बॉण्ड्स किंवा गोल्ड आदींमध्ये गुंतवणूक करते. त्याच प्रमाणे रिट अंतर्गत गुंतवणूकदारांचा पैसा रिअल इस्टेट मालमत्तेत गुंतविला जातो. म्हणजेच गुंतवणूकदार मालमत्तेचे मालक न होताच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा लाभ उचलू शकतात. भारतात रिट ची संकल्पना आता कोठे रुजली आहे. परंतु अन्य देशात त्याच इतिहास खूपच जुना आहे. पहिल्यांदा १९६० मध्ये अमेरिकेत त्याच प्रारंभ झाला होता. तसेच विकसित देशात रिट हा एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे. अर्थात भारतात हि संकल्पना येण्यासाठी ६० वर्षे लागली आणि आता हे सुरवातीच्या टप्प्यातच आहे. रिट नुसार रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये म्हणजे निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि हॉटेल आदींमध्ये गुंतवणूक केली जाते. भाड्याच्या रूपातून आणि भांडवलात ज्या रीतीने वाढ होते, त्यानुसार गुंतवणुकीची विभागणी केली जाते.

Means of investment | गुंतवणुकीचे माध्यम

रिट मध्ये गुंतवणुकीचे दोन माध्यम आहेत. बहुतांश रिट हे स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड असतात. त्यामुळे गुंतवणूकदार जसे इक्विटी शेयरची खरेदी करतात, त्याचप्रमाणे रिटचे शेयरदेखील खरेदी करता येऊ शकतात. भारतात सध्या तीन लिस्टेड रिट आहेत. दुसरी पद्धत म्हणजे गुंतवणूकदार ‘फंड अँड फंड ऑफ फंड स्कीम’ च्या माध्यमातून रिटमध्ये गुंतवणूक करू शकतात. फंड ऑफ फंड याचा अर्थ म्युच्युअल फंड स्कीमच्या अशा योजना कि, त्या दुसऱ्या स्कीमच्या युनिटमध्ये गुंतवणूक करतात. भारतात सध्या कोटक इंटरनॅशनल रिट फंड ऑफ फंड आहे. याचे संचालन जपान येथील सुमितोमो मितूशी ऍसेट मॅनेजमेन्ट कंपनी करते. या फंडाची गुंतवणूक सिंगापूर, हॉंगकॉंग, ऑस्ट्रेलिया यासारख्या मोठ्या देशात आहेत. तसेच सुमारे ४५ मोठ्या आणि डायव्हर्सिफाइड रिट हे यांच्या पोर्टफोलिओत आहेत. गुंतवणूकदार हे अन्य म्युच्युअल फंड योजनेप्रमाणेच आर इ आय टी फंड ऑफ फंड मध्ये एक रक्कमी प्रमाणेच एस आय पी च्या माध्यमातून गुंतवणूक करणे शक्य आहे. एस आय पी च्या माध्यमातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक होत असल्याने खूपच किरकोळ रक्कमेने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक सुरु करू शकतो.

The reason behind the investment | गुंतवणुकीमागचे कारण

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टला गुंतवणूकदारांचा पैसा अशा मालमत्तेत गुंतवावा लागतो कि, तो सहजपणे भाड्याने किंवा करारावर देण्यासारखा असतो. अशा माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नातून किमान ९० टक्के भाग गुंतवणूकदारांना लाभांशाच्या रूपाने द्यावा लागतो. कारण बहुतांश रिट हे स्टॉक एक्सचेन्ज मध्ये लिस्टेड असते आणि त्यामुळे यात लिक्विडिटीची समस्या राहत नाही. त्याच बरोबर गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय रिटमध्ये देखील गुंतवणूक करतात आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर वाढल्यास रिटर्नवर सकारात्मक परिणाम पडतो. ‘रिट’ ला फंड मॅनेजर हे सक्रिय रूपाने मॅनेज करतात आणि जर एखाद्या मालमत्तेतून कमी लाभ मिळत असेल, तर त्यास विक्री करून चांगल्या मालमत्तेत गुंतवणूक केली जाते. एका रिट फंड ऑफ फंड वर मिळणाऱ्या निव्वळ भांडवली नफ्यावरील कराचा विचार केल्यास तीन वर्षापेक्षा अधिक काळ गुंतवणूक करत राहिल्यानंतर आपण युनिटची केली तर त्यावर इंडेक्सेशनचा लाभ मिळेल आणि २० टक्के दराने लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. साधारणपणे २० टक्के दराने लॉन्ग टर्म कॅपिटल गेन हे गुंतवणूकदारांच्या उत्पन्नाला जोडले जाते आणि त्यावर गुंतवणुकीच्या एकूण उत्पन्नानुसार कर भरावा लागतो. गुंतवणूकदार आपल्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये वैविध्यापना आणण्याच्या उद्देशातून रिट फंड ऑफ फंड मध्ये गुंतवणूक करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here