Audumbar upay | औदुंबराची हि एक वस्तू नेहमी जवळ ठेवा, अडलेली सर्व कामे त्वरित पूर्ण होतील.

0
358
Audumbar Vrat Vidhi And Katha

Audumbar upay | औदुंबराची हि एक वस्तू नेहमी जवळ ठेवा, अडलेली सर्व कामे त्वरित पूर्ण होतील.

भूत-प्रेत बाधा निवारण, ग्रह दोष निवारण, कर्ज मुक्ती, मनोकामना पूर्ती, संतती प्राप्ती, मानसिक शांतता, कलह निवारण.

नमस्कार मित्रानो, कर्मबंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रानो आज आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत. ज्या केवळ एका उपायाने आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे निवारण होऊन जाईल. आपल्या जीवनातून समस्या संपून जातील. व माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते. या उपायामुळे जर का कोना व्यक्तीला बाधा जाहली असेल, असलीतरी अनामिक अशी भीती वाटत असेल तर त्याचे निवारण होते, हि वस्तू धारण करणाऱ्याचे ग्रह दोष निवारण होते, कर्ज मुक्तीच्या कामनेने हि वस्तू धारण केल्यास कर्जातून मुक्ती मिळते, त्याच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होते.

Audumbar Vrat Vidhi And Katha

संतती प्राप्ती साठी हा उपाय फारच गुणकारी आहे, तसेच हि वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील कलह, भाडं तंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळते. मित्रानो हे सर्व चमत्कारिक फायदे औदुंबर वृक्षाचे आहेत. मग अशी कोणती गोष्ट औदुंबर वृक्षामध्ये आहे कि जे धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळतात. मित्रानो आजच्या या विडिओ मध्ये आम्ही आपल्याला औदुंबर वृक्षाच्या एका अशा गोष्टीबद्दल सांगत आहोत कि जी वस्तू आपण धारण केल्याने आपली अडलेली सर्व कामे तुरंत व्हायला लागतील.चला तर मग जाणून घेऊया आजच्या उपायांविषयी.

Audumbar Puja Kashi Karavi

मित्रानो पौराणिक कथेनुसार हिरण्य कश्यपू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूनी नरसिंहाचा अवतार घेतला होता. जेंव्हा हिरण्य कश्यपूने प्रल्हादाला विचारले कि कुठे आहे तुझा देव तेंव्हा प्रल्हाद म्हणाला कि देव चरा चरामध्ये आहे. हे ऐकून हिरण्य कश्यपूने तिथे असणाऱ्या औदुंबराच्या लाकडाच्या खांबाला लात मारली आणि त्याच क्षणी तो खांब फोडून नरसिंह भगवान प्रकट झाले. व त्यांनी हिरण्य कश्यपूला त्याच्या राजवाड्याच्या चौकटीवर दाबून धरून त्याचे पोट फाडले. परंतु हिरण्य कश्यपूच्या पोटामध्ये असणाऱ्या कलीकुंड विषामुळे भगवान नरसिंहाच्या नखांमध्ये प्रचंड दाह व्हायला लागला, त्यावेळी माता लक्ष्मींनी तिथेच जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान नरसिंहाना त्यांची नखे त्या फळामध्ये खुपसायला सांगितली.

Audumbar Tree Puja Benefits

औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे भगवान नरसिंहाच्या नखातील दाह शमला व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला कि माझा व माता लक्ष्मीचा वास सदैव औदुंबर वृक्षमध्ये असेल. याचप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहाचे अवतार आहेत. व त्यांनी जेंव्हा अवतार कार्यामध्ये पंचांगंगा कृष्णा संगमावर अमरापूर या गावी वास्तव्य केले, तेंव्हा ते नदीकाठच्या औदुंबर वृक्षाखाली बसून तप करायचे. तिथे तप करताना ६४ योगिनी त्यांच्या पूजन साठी त्या वृक्षखाली येत असत. व जेंव्हा नृसिंह सरस्वतींनी अमरापूर सोडण्याचा निर्धार व्यक्त केला, तेंव्हा त्या ६४ योगिनींनी महाराजांना विनंती केली कि त्यांनी येथून जाऊ नये, त्यावेळी नरसिंह सरस्वतींनी सांगितले कि काळजी करू नका मी सदैव या औदुंबर वृक्षामध्ये राहीन. माझा वास या वृक्षाच्या मुळामध्ये कायम राहील. आपण जेंव्हा हि माझे स्मरण कराल तेंव्हा मी आपल्याला दर्शन देईन.

औदुंबर झाडाचे महत्व

तर मित्रानो या औदुंबर वृक्षामध्ये भगवान नरसिंह व माता लक्ष्मी यांचा वास तर असतोच याच्या बरोबर भगवान नरसिंहाचा अवतार असणारे नृसिंह सरस्वती महाराजांचाही वास असतो. तसेच मित्रानो औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मनाला जातो.व शुक्र ग्रह हा धन, संपत्ती, ऐश्वर्य यांचा कारक आहे. ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती यांची कधीही कमतरता भासत नाही. याच बरोबर मित्रानो या वृक्षामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांचाही वास असल्यामुळे गुरु बलवान होतो. व ज्याचा गुरु बलवान असतो त्याच्या कोणत्याही कामामध्ये कसलाही अडथळा येत नाही.

औंदुबर पूजा का?

तर मित्रानो आपल्याला करायचे काय आहे तर. आपण हा उपाय कोणत्याही शुभ मुहुर्तावरील शुक्रवारी, रवी पुष्य योगावर किंवा गुरूपुष्य योगावर करू शकता. आपण जेंव्हा केंव्हाही हा उपाय करणार असाल त्याच्या एक दिवस आधी औदुंबर वृक्षाजवळ जाऊन प्रार्थना करायची आहे. म्हणजे समजा आपण हा उपाय शुक्रवारी करणार असाल तर गुरुवारच्या दिवशी आपण औदुंबर वृक्षजवळ जाऊन त्याला थोडे पिवळे तांदूळ अर्पण करावेत. पिवळे तांदूळ म्हणजे हळदीने रंगविलेले. तर असे थोडे पिवळे तांदूळ, थोडे जल, एखादे पिवळे फुल अर्पण करावेत. औदुंबरला अगरबत्ती दाखवावी व मनोभावे प्रार्थना करावी कि मी आपले मूळ नेण्यासाठी उद्या येत आहे. तरी आपण कृपाकरुन माझ्यासोबत यावे व आपला कृपाशिर्वाद मला द्यावा.

Audumbar Puja Kashi Karavi

व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म आटोपून औदुंबराचे मूळ घेऊन यावे. या मुळाचा अगदी छोटासा तुकडा कापून घेऊन यावे. मूळ घेऊन आल्यावर या मुळाला गंगाजल अथवा स्वच्छ पाण्याने साफ करावे. यानंतर हे मूळ आपल्या देव घरामध्ये किंवा एखाद्या पाटावर पिवळे वस्त्र अंथरून त्याच्यावर थोडी चण्याची डाळ ठेवावी व या चण्याच्या डाळीवर हे मूळ ठेवून त्याची विधिवत पूजा करावी. पूजा करून झाल्यावर या मुळाला मनोभावे प्रार्थना करावी कि जी काही आपली अडलेली कामे असतील, संकटे असतील, ग्रह दोष असतील, संतान प्राप्तीची इच्छा असेल, कर्जातून मुक्तता हवी असेल, धन प्राप्तीची कामना असेल. तर आपल्या सर्व समस्या संपून आपली कामे त्वरित व्हावीत. आपल्यावर व आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहावी.

Audumbar Tree Importance

आणि यानंतर आपण हे मूळ जर का आपल्या देवघरामध्ये ठेवू इच्छित असाल तर एखाद्या चांदीच्या किंवा स्टीलच्या डबीमध्ये कुंकू घालून त्या कुंकवामध्ये हे मूळ घालून ठेवावे, व दररोज नित्य नियमाने याला दिवा अगरबत्ती दाखवावी. आणि जर का आपण हे मूळ आपली शरीरावर धारण करणार असाल तर एखाद्या चांदीच्या ताइता मद्ये किंवा पांढऱ्या कापडाचा ताईत बनवून त्यामध्ये ठेवून धारण करावी.

Audumbar Zadache Mahatva

मित्रानो या उपायामुळे आपल्या ज्या काही मनोकामना असतील, इच्छा असतील त्या पूर्ण व्हायला लागतील. आपली अडलेली कामे पूर्ण व्हायला लागतील. आपल्यावर व आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीच्या कृपेने धन प्राप्तीचे मार्ग उघडतील. भूत प्रेत बाधा राहणार नाही. कर्जातून मुक्तता मिळेल. घरातील भाडं तंटे वितंड वाद संपून शांती प्रस्थापित होईल. एक विलक्षण शांती आपल्याला लाभेल. प्रत्येक कामामध्ये आपल्याला सफलता मिळाया लागेल. हा उपाय आपण अवश्य करून पहा. आपल्याला याचा नक्की लाभ होईल. या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये एक जबरदस्त असे परिवर्तन येईल. व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here