Astrology For Shubh Sanket – चांगली वेळ येण्यापूर्वी ईश्वर देतात हे ५ संकेत | Good Time Astrology

0
134
ishwar kripa ke sanket

Astrology For Shubh Sanket – चांगली वेळ येण्यापूर्वी ईश्वर देतात हे ५ संकेत | Good Time Astrology

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कुणासाठी वाईट. कधी-कधी आपण म्हणतो ना, माझी माझीही वेळ येईल. वेळेवर कोणाचेही बंधन नाही. कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेळ आल्यास, त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते. तुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंतीतून गरिबीकडे येताना बघितलेच असेल. मग आपण म्हणतो वेळे पुढे कोणाचे काही चालत नाही. काय परिस्थिती होती यांची, आणि आज कशी वेळ आली यांच्यावर.

Jyotish For Good Time In Marathi

अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचे जीवन बालपण, तरुणपण व म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच आहेत. जी व्यक्ती बालपण खूप कष्टात काढते, त्यांचे प्रौढ-पण मजेत जाते. तर ज्यांचे बालपण खूप आनंदात व मजेत गेलेले असेल, ज्या वस्तूकडे बघितले; ती वस्तू लगेच मिळाली असेल. त्यांचा उतार काळ कष्टाचा जातो. याला काही अपवादही असतात पण ते क्वचितच. आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचे बालपण खूप कष्टात व दुःखात गेले असते. प्रत्येकाला कधी सुख तर कधी  दुःख हे पचवावेच  लागते. प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत राहते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात.

Best Time Period In Horoscope

जर तुम्ही लक्ष दिले, तर या इशाऱ्यांना समजून घेऊन, तुमच्या जीवनात  घडणाऱ्या चांगल्या घटनांनविषयी जाणू शकता. या संकेतांमुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत आला आहे. दुःखाचा व कष्टाचा आता नाश होणार आहे. कधी-कधी आपण सकाळी उठलं की आपल्याला खूप फ्रेश व उत्साही वाटते.

Astrology Time

आपल्या अचानक खूप आनंदी असल्यासारखे वाटते, किंवा आरशात आपले तोंड पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक व एक प्रकारची लाली पसरलेली दिसते. हे या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे व तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल काही व्यक्ती यावर विश्वासही ठेवणार नाहीत.

Good Time Today As Per Astrology

परंतु पशुपक्षी हे चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात. जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळीचे निशाणी आहे आणि जर एखाद्या माकडाने अचानक आंबा खाऊन त्याचे कोई जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ सुरू होत आहे असा याचा अर्थ होतो. मग घरात धनधान्य ची बरकत येते. असे समजा की भगवंताने तुमच्यावर कृपा केली आहे आता तुम्हाला धनप्राप्ती होईल हा या गोष्टीचा इशारा आहे, की आता तुमचे  सर्व चांगलेच  होणार.

Good Time Astrology

जर सकाळी-सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास, आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. तर समजून जा की तुमच्या चांगल्या वेळीची  सुरुवात झाली आहे. जर तुम्ही सकाळी-सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात व एखादे लहान बालक तुम्हाला खळखळून हसताना दिसले तर हे सुद्धा भगवंता द्वारे आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे, जर घराबाहेर पडल्यानंतर प्रथम दर्शनी आपण पहिले कि एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे.

Durbhagya Ko Saubhagya Me Badalne Ke Upay

आज ज्या कामात हात टाकाल ते नक्कीच पूर्ण होईल व आपल्याला सफलता मिळेल. असे हे काही संकेत आहेत जे आपल्याला चांगल्या वेळेची पूर्वसूचना देतात. जर तुमच्या बरोबर हि असे काही होत असेल तर तुम्हाला आता कुठल्याही प्रकारची चिंता करण्याचे काहीही कारण नाही कारण तुमच्यासाठी स्वतः भगवंत इशारे देत आहेत, की तुमचे आता चांगलेच होईल व ज्यांच्या मागे स्वतः भगवंत आहे,  त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो.

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here