Ashadhi Ekadashi 2021 आषाढी एकादशीला करा हे उपाय आणि पहा चमत्कार Ashadhi Ekadashi Vrat, Mahatva, Katha, Mahima, Vidhi ani Upay

0
212
Ashadhi Ekadashi 2021

Ashadhi Ekadashi 2021 आषाढी एकादशीला करा हे उपाय आणि पहा चमत्कार Ashadhi Ekadashi Vrat, Mahatva, Katha, Mahima, Vidhi ani Upay

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विडीओ मध्ये आपण आषाढी एकादशी दिवशी केल्या जाणार्या पूजा विधी व्रत व उपायांविषयी जाणून घेणार आहोत. मित्रानो महाराष्ट्रात ‘आषाढी एकादशी’ला विशेष असे महत्त्व आहे. या निमित्ताने निघणाऱ्या ‘पंढरपूर वारी’ला मोठी परंपरा आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला ‘महाएकादशी’ किंवा देव शयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशी हे भगवान विष्णूचे व्रत आहे. या दिवशी विष्णू रुपी विठ्ठालाची पूजा-पार्थना केली जाते. यंदा आषाढी एकादशी मंगळवार, 20 जुलै २०२१ रोजी आहे. या निमित्ताने राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरची चालत वारी करतात. मात्र हा मोठा सोहळा यंदाही कोविड-19 संकटामुळे रद्द करण्यात आला आहे.

Ashadhi Ekadashi Mahatva

वर्षभरात येणाऱ्या एकादश्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशा महत्त्वाच्या मानल्या जातात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो. या एकादशीला देव झोपतात. म्हणून या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हटले जाते. चातुर्मासात देव झोपलेले असल्यामुळे माणसाने स्वत:च्या संरक्षणासाठी या काळात व्रतं, उपवास, भजन-कीर्तन करण्याची पद्धत पाडली असावी. त्याचबरोबर या काळात पावसाळा असल्याने आरोग्याच्या दृष्टीने बेताने आहार घेणे केव्हाही उत्तमच. म्हणूनच पचायला जड असे पदार्थ टाळून उपवासाची परंपरा पडली असावी.

Ashadhi Ekadashi Upvas

संत तुकाराम, नामदेव, जनाबाई, ज्ञानेश्वर सर्वांनी ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग सांगितला. तो म्हणजे नामस्मरण. दैनंदिन काम करताना मुखाने पांडुरंगाचे नाव घ्यावे, अशी शिकवण संतांनी जनमानसांत रुजवली आणि विठ्ठलभक्तीची परंपरा महाराष्ट्रात सुरु झाली. तसंच समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतं. यास ‘पंढरीची वारी’ असं म्हटलं जातं. यात सामिल होणारे सगळे ‘वारकरी’.

Ekadashi Vrat Mahatva

आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकाणांहून संतांच्या पालख्या घेऊन वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला जातात. हातात टाळ, मृदंग, खाद्यांवर भगवी पताका, डोक्यावर तुळस अशा वेशात सर्व भेदभाव विसरुन वारकरी वारीत सामिल होतात. मुखाने विठुरायाचा गजर सुरुच असतो. आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेऊन वारीची सांगता होते. या दिवशी अवघ्या महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो.

Ekadashi Mahiti

देवशायनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूचा निद्रा कालावधी सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी असेही म्हणतात.

देवशयनी एकादशीचे व्रत खूप प्रभावी मानले जाते. भगवान विष्णूचा निद्रा कालावधी देवशायनी एकादशीच्या दिवसापासून सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी एकादशी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेनंतर येते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार देवशयनी एकादशीचे व्रत दरवर्षी जून किंवा जुलै महिन्यात येते.

Ekadashi Mahatva

देवशायनी एकादशीच्या चार महिन्यांनंतर भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागी होतात. हिंदु दिनदर्शिकेनुसार चार महिन्यांचा आत्मसंयम कालावधी असलेल्या चातुर्मास देवशयनी एकादशीपासून सुरू होतो. यावर्षी देवशयनी एकादशी 20 जुलै 2021 रोजी आहे.

देवशयनी एकादशीचे महत्व

भगवान विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर चार महिन्यांपर्यंत मांगलिक कार्य केले जात नाही. निसर्गात या चार महिन्यांत सूर्य, चंद्र आणि निसर्गाचं तेज कमी राहते. या काळात शुभ शक्ती कमकुवत असतात. त्यामुळे केलेल्या कार्याचे परिणाम देखील शुभ प्राप्त होत नाहीत. म्हणूनच या चार महिन्यांत म्हणजेच चतुर्मासात संत आणि महात्मे एकाच ठिकाणी राहतात आणि जप, तपश्चर्या व पूजा अर्चना करतात. असे मानले जाते की चातुर्मासात सर्व धाम ब्रज येथे येतात. त्यामुळे या काळात ब्रज यात्रा खूप शुभ माणली जाते.

देवशयनी एकादशी 2021 शुभ मुहूर्त (Devshayani Ekadashi 2021 Timings)

देवशयनी एकादशी मंगळवार 20 जुलै 2021 रोजी आहे.
एकादशी आरंभ तिथी =19 जुलै 2021 रोजी रात्री 9:59 वाजता
एकादशी समाप्ती तिथी = 20 जुलै 2021 रोजी सायंकाळी 07:17 वाजता
पारण तिथीच्या दिवशी द्वादशी समाप्तीची वेळ = सायंकाळी 04:26 वाजता

Ashadhi Ekadashi Mahatva

द्वादशीलाच व्रत पारण करणे महत्त्वाचे (Devshayani Ekadashi 2021)
एकादशीच्या व्रताच्या समाप्तीला पारण म्हणतात. एकादशीचे व्रताच्या पुढील दिवशी सूर्योदयानंतर पारण केले जाते. द्वादशीची तिथी संपण्यापूर्वी एकादशी व्रताचे पारण करणे फार महत्वाचे आहे. जर सूर्योदयाच्या अगोदर द्वादशी तिथी संपली असेल तर एकादशी व्रताचे पारण सूर्योदयानंतरच होते. द्वादशी तिथीमध्ये पारण न करणे हे पाप करण्यासारखे आहे.

आषाढी एकादशीला करायचे उपाय

एकादशीला भगवान विष्णूंना केशर मिसळलेल्या दुधाने अभिषेक करावे. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते.

एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा.

धन वृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढर्‍या मिठाईचे नैवेद्य दाखवावे. नैवेद्यात तुळस असावी. याने विष्णू प्रसन्न होतात.

या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे. याने कामातील अडथळे दूर होतील.

या दिवशी पिवळे कपडे, पिवळे फळं आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या. याने देवाची कृपा होते.

एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ऊँ वासुदेवाय नम: या मंत्राचा उच्चार करत 11 प्रदक्षिणा घालाव्या. असे केल्याने घरामध्ये सुख-शांती राहते आणि संकट टळतात.

या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीविष्णूचा अभिषेक करावा. असे केल्याने धन वृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा. पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते.

Ekadashi Vrat Vidhi

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे. पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे. याने धन लाभ होण्याची शक्यता असते.

तर मित्रानो हि होती २० जुलै २०२१ रोजी साजरी केल्या जाणार्या आषाढी एकादशी व्रताची संपूर्ण माहिती व त्या दिवशी केल्या जाणार्या उपायांची माहिती. आपणही या दिवशी हे उपाय अवश्य करा व आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी बरोबरच भगवान विष्णू आणि माता लाक्ष्मींची कृपा प्राप्त करून घ्या. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here