Angarki Chaturthi Pooja Vidhi 2021 | २३ नोव्हेंबर २०२१ – अंगारकी संकष्टी चतुर्थी महत्त्व आणि पूजा विधी

0
23
Angarki Chaturthi 2021

२३ नोव्हेंबर २०२१ – अंगारकी संकष्टी चतुर्थी महत्त्व आणि पूजा विधी

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्व, पूजन विधी आणि या दिवशी करायच्या उपायांविषयी माहिती सांगणार आहोत.चला तर मग जाणून घेऊया अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायच्या उपायांविषयी.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो प्रत्येक महिन्यामध्ये दोनवेळेला चतुर्थी योग असतो. आणि या दोन्ही चतुर्थी भगवान श्री गणेशाला समर्पित असतात. शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणून ओळखले जाते.आणि जेव्हा ही चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखले जाते. आणि म्हणून, या दिवसाला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ असे म्हणतात.

मित्रानो गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे. या व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास ठेवला जातो आणि रात्री भोजन केले जाते म्हणजेच उपवास सोडला जातो. भोजनामध्ये समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखविला जातो. यावेळी श्रीगणेशाची पूजानही केले जाते. भक्त मंडळी घरोघरी गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन भक्तगण श्रीगणेशाचे दर्शन घेतात.

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पूजा विधि.

मित्रानो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे. यानंतर श्रीगणेशाचे ध्यान करून त्यांच्यासमोर व्रत करण्याचा संकल्प करावा. यादिवशी दिवसभर उपवास करावा. स्नानानंतर गणेशाची पूजा करावी.गणेशाच्या मूर्तीला पाणी, रोली, अक्षत, दुर्वा, लाडू, पान, अगरबत्ती अर्पण करावे. गणरायाच्या मंत्रांचा जप करावा. आपण आपल्यलाला माहित असलेल्या कोणत्याही गणेश मंत्राचा जप करू शकता किंवा आम्ही आपल्याला इथे एक बीज मंत्र सांगत आहोत. या बीज मंत्राचा आपण यथाशक्ती जप करावा. तो मंत्र आहे || ॐ गं गणपतये नमः || हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या स्टार लिव्ह .इन या वेब साईट वर मिळून जाईल. संध्याकाळी चंद्र उदयानंतर पूजा करावी.

संध्याकाळच्या पूजेनंतर अन्न ग्रहण करावं.ढगांमुळे चंद्र दिसत नसेल तर पंचगानुसार चंद्रोदयावेळी पूजा करावी संध्याकाळच्या पूजेसाठी गणेशाची मूर्ती स्थापित करावी.गणपतीची धूप, दिवा, उदबत्ती, फुलांनी पूजा करावी.प्रसादात केळी, नारळ ठेवावं.तसेच गणेशाला आवडत्या मोदकाचा नैवेदय दाखवावा.या दिवशी गूळ व तिळाचे मोदक बनवले जातात.गणेश मंत्र जप करताना काही मिनिटे ध्यान करावं आणि कथा ऐकावी.गणपतीची आरती करावी व प्रार्थना करावी.यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन त्याची पूजा करावी. चंद्राला फुले व चंदन अर्पित करावं.
चंद्राच्या दिशेने अक्षता अर्पित कराव्या.पूजा संपल्यानंतर प्रत्येकाला प्रसाद वाटप करुन अन्न ग्रहण करावं.

अंगारकी संकष्टी चतुर्थी कथा
मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ अर्थातच अंगारक याला वर दिला होता की तुझे नाव “अंगारक” हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला ‘मंगलमूर्ती” असे नाव मिळाले.

तर मित्रानो हि होती अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि पूजा विधी या विषयीची माहिती. आपण हि या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचे विधिवत पूजन आणि उपवास करून गणपती बाप्पाना प्रसन्न करू शकता व आपले जीवन सुजलाम सुफलाम बनवू शकता. विडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सुब्स्क्रिब करायला विसरू नका, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here