Anant chaturthi 2021 | अनंत चतुर्दशी १९ सप्टेंबर २०२१ – या उपायाने दारिद्रतेचा नाश होईल आणि ७ पिढ्या राज करतील

0
43
Anant chaturthi upay

Anant chaturthi 2021 | अनंत चतुर्दशी १९ सप्टेंबर २०२१ – या उपायाने दारिद्रतेचा नाश होईल आणि ७ पिढ्या राज करतील

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचा एक फारच चमत्कारिक उपाय सांगणार आहोत. कि जो उपाय केल्याने आपल्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतील. अनंत चतुर्दशी दिवशी केल्या जाणार्या या उपायामुळे आपल्या अनंत प्रकारच्या इच्छांची पुरती होते. त्याच बरोबर आपल्या जीवनातील सर्व दुखांचा, सर्व समस्यांचे, सर्व कष्टांचे निवारण होवून जाते. आपल्या जीवनातील सर्व संकटे, समस्या, अडथळे, विघ्न समूळ संपून जातील. या उपायामुळे आपले जीवन सरळ, सुगम आणि संपन्न होवून जाईल.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो १९ सप्टेंबर २०२१ रोजी अनंत चतुर्दशी आहे, या दिवशी ज्यांच्या घरामध्ये दहा दिवसांचा गणपती बाप्पा असतो अश्या लोकांच्या गणपती बाप्पांच्या बरोबरच सार्वजनिक रित्या साजर्या केल्या जाणार्या गणेशाचेही विसर्जन केले जाते. मित्रानो अनंत चतुर्थीच्या दिवशी अनंत देवांचे पूजन केले जाते. अनंत देव हे श्रीहरी विष्णूंचे च स्वरूप आहे. भगवान श्रीहरी विष्णूंचे हे अनंत स्वरूप आपल्या आनंत इच्छा पूर्ण करणारे, अनंत मनोकामना पूर्ण करणारे आणि त्या बरोबरच या संसारामधील समस्त सुखांची प्राप्ती करून असे हे अनंत भगवंतांचे स्वरूप आहे.

अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या अनंत स्वरूपाचे पूजन करण्याचे आणि व्रत करण्याचे विधान शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. मित्रानो जर आपण या दिवशी आपण अनंताची पूजा आणि व्रत करत नसाल तर काही हरकत नाही, पण या दिवशी आम्ही काही उपाय भगवान श्री हरिना प्रसन्न करण्यासाठी, त्यांना मनविण्यासाठी काही अचूक उपाय सांगत आहोत, हे उपाय आपण अवश्य करावेत. हे उपाय केल्याने आपल्या पारिवारिक, व्यावसायिक, शारीरिक आणि शैक्षणिक अश्या सर्व समस्यांचे समाधान होवून जाते.

मित्रानो जर का आपल्याला नोकरी मिळत नसेल, किंवा नोकरी मिळाली आहे पण मनासारखी नाहीये, किंवा आपली चालू असलेली नोकरी गेली आहे, सोडावी लागली आहे. आपल्याला मनासारखी नोकरी नाही मिळाली कि आपल्याला फार अडचण होवून जाते. तर या समस्येसाठी अनंत चतुर्थीच्या दिवश आपण एक छोटासा उपाय करायचा आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून स्नानादी नित्यकर्म आटोपल्यावर, जर का आपण अनंत कलशाची स्थापना केली असेल तर त्या कलशासमोर किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्ती समोर, फोटो समोर आपण एक आसन अंथरून बसायचे आहे.

बसताना एक पांढर्या रंगाचा रुमाल आपण घ्यायचा आहे व हा रुम्माल हळदीने पूर्ण पिवळ्या कलर मध्ये रंगवून घ्यायचा आहे. आणि हा रुमाल आपण एखाद्या प्लेट मध्ये ठेवून भगवान श्रीहरी विष्णुंच्या समोर ठेवायचा आहे. एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि || ॐ नमो भागवते वासुदेवाय || या मंत्राचा एक माळ आपण जप करायचा आहे. हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीन वर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या star liv .इन या वेब साईट वर मिळून जाईल. मंत्र पुन्हा एकवेळ सांगतो || ॐ नमो भागवते वासुदेवाय || मंत्र जप करून झाल्यावर हा रुमाल आपण आपल्या जवळ ठेवायचा आहे.

आणि जेंव्हा देखील आपण एखाद्या नोकरीच्या इंटरविव साठी जाणार असाल तेंव्हा हा रुमाल आपल्या सोबत आपल्या खिश्यामध्ये ठेवून जायचे आहे. या उपायामुळे आपल्यला भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने इंटरविवमध्ये नक्की यश मिळेल व आपल्या मनासारखी नोकरी आपल्याला मिळून जाईल. मित्रानो जर का आपल्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या निर्माण झाल्या असतील, पती पत्नीचे एकमेकांशी पटत नसेल, वारंवार खटके उडत असतील, तर या समस्येचे निवारण करण्यासाठी अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण दोन केळी आणि दोन हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत. आणि हे दोन केळ आणि दोन वेलदोडे भगवान विष्णुना समर्पित करायचे आहेत.

पती पत्नी दोघांनी मिळून हा उपाय केलात तर फारच उत्तम आहे. केळी आणि वेलदोडे भगवान श्रीहरी विष्णुना समर्पित केल्यानंतर पती पत्नी दोघांनी मिळून भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जप करून झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे कि हे ईश्वर आमच्या दोघांचे संबंध मधुर, प्रगाढ आणि प्रेमाने भरलेले असावेत. एवढे करून झाल्यानंतर आपण वाहिलेले केली आणि वेलदोडे तेथून उचलावेत व त्यातील एक केळ आणि एक वेलदोडा पतीने खायचा आहे व एक केळ आणि एक वेलदोडा पत्नीने खायचा आहे. या उपायामुळे आपले संबंध मधुर होवून जातील, स्थिर होवून जातील, आपल्यामध्ये असणारी भांडणे संपून जातील.

मित्रानो जर का आपली आपल्या आई वडिलांशी भांडन होत असेल, आई वडिलांशी पटत नसेल तर अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शाबु दाण्याची खीर बनवावी आणि हि खीर बनवीत असताना यामध्ये साखर नघालता त्यामध्ये खडी साखर आणि किशमिश घालून हि खीर बनवावी. व भगवान श्रीहरी विष्णुना या खिरीचा भोग लावावा, नैवेद्य दाखवावा. आणि एका मंत्राचा जप करावा, तो मात्र आहे || श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा || या मंत्राचा आपण एक माळ जप करायचा आहे. हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीन वर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या star liv .इन या वेब साईट वर मिळून जाईल.
मंत्र पुन्हा एकवेळ सांगतो || श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा || मंत्र जप करून झाल्यानंतर हाथ जोडून प्रार्थना करायची आहे कि आपले आणि आपल्या आई वडिलांचे संबंध मधुर, प्रगाढ आणि स्थिर होवू देत. या उपायामुळे आपल्या मनोकामाना नक्की पूर्ण होतील आणि आपले आपल्या आई वडिलांशी असणारे संबंध कायमचे चांगले होवून जातील.

मित्रानो जर का आपल्या मुलांचे अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा शिक्षणामध्ये त्यांना मेहनत करून देखील अपेक्षित यश प्राप्त होत नसेल, तर अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांना ज्या देखील पुस्तकाचा ते अभ्यास करतात, ते पुस्तक घेवून श्रीहरी विष्णुंच्या समोर बसायला सांगावे. आणि त्यांनि त्याच्या हाताने पुस्तकाच्या पहिल्या पानावर हळदीने एक स्वस्तिक चे चिन्ह काढावे. आपण या पुस्तका बरोबर एक लाल रंगाचा पेन देखील ठेवू शकता. तर हे पुस्तक आणि पेन भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणाजवळ ठेवावे व यानंतर || ॐ नमो भागवते वासुदेवाय || या मंत्राचा एक माळ जप करून भगवान श्रीहरी विष्णुना प्रार्थना करावी कि माझ्या बुद्धीला स्थिर करावे, माझ्या शिक्षणामध्ये प्रगती होवूदे, यश प्राप्त होवूदे.

या उपायामुळे आपल्याला नक्की आपल्या शिक्षणामध्ये यश प्राप्त होईल, शिक्षणामध्ये प्रगती होईल, आपले अभ्यासात मन लागेल. आपली बुद्धी आपला साथ देईल, परीक्षेमध्ये अपेक्षित यश संपादन होवून जाईल.

मित्रानो जर का आपला व्यवसाय, उद्योग आपल्या मनासारखा चालत नसेल तर, अनंत चतुर्थीच्या दिवशी चंदन आणि केशर एकत्र करून त्याचा टिळक भगवान श्रीहरी विष्णुना लावावा. व त्यानंतर स्वतःला देखील हा टिळक लावावा. यानंतर आपण एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे व त्यावर पाच वेळेला लाल रंगाचा धागा ज्याला आपण कलावा असे देखील म्हणतो तर हा कालावां पाच वेळेला नारळावर गुंडाळून बांधायचा आहे. आणि या कलाव्याच्या धाग्या सोबत एक रुपयाचे नाणे देखील नारळावर बांधायचे आहे. आणि हा नारळ भगवान श्रीहरी विष्णुना समर्पित करायचा आहे.

यानंतर भगवान श्रीहरी विष्णुच्या समोर आसनावर बसून स्वच्छ मनाने, आपल्या व्यापार उद्योगाशी संबंधित येणाऱ्या समस्या बोलत || ॐ अनंताय नमः || या मंत्राचा एक माळ जप करावा. हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीन वर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या star liv .इन या वेब साईट वर मिळून जाईल. मंत्र पुन्हा एकवेळ सांगतो || ॐ अनंतायनमः || यानंतर आपली मनोकामना श्रीहरी विष्णुना सांगून तो नारळ घ्यायचा आहे, आणि आपल्या व्यवसायाच्या जागी ठेवायचा आहे. या उपायामुळे भगवान श्रीहरी विष्णुंची अपार कृपा आपल्या उद्योग व्यवसायावर होवून जाईल, व आपला व्यापार, उद्योग व्यवसाय भरभराटीला येईल.

मित्रानो जर का आपल्यला काही शारिरिक कष्ट असेल, शरीरामध्ये काहीतरी व्याधी निर्माण झाली असेल, आणि त्याचा आपल्याला खूप त्रास सहन करावा लागत असेल, तर अनंत चतुर्थीच्या दिवशी अनंत कलशावर किंवा भगवान श्रीहरी विष्णुना १४ अंजीर अर्पित करावेत व नंतर हे १४ अंजीर आपण आपण सेवन करावेत, खावेत. या उपायामुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली व्याधी हळू हळू संपून जाईल. आपल्या तब्येतीमध्ये सुधार व्हायला लागेल. मित्रानो जर का आपल्याला वाटत असेल कि घरातील वातावरण नेहमी प्रेमपूर्वक असावे, घरामध्ये कधी क्लेश कलह होवू नये, भांडन तंटे होवू नयेत,

तर अनंत चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी कापरामध्ये थोडे लाल चंदन आणि केशर मिसळून या कापराची धुनी संपूर्ण घरामध्ये द्यावी. यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता निघून जाईल. घरातील वातावरण सौहार्द पूर्ण बनेल, एकमेकाच्यामध्ये ताळ मेळ बनेल. तर मित्रानो आपणही या अनंत चतुर्थीच्या दिवशी हे उपाय अवश्य करा. या उपायांनी आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण होवून जाईल. आपले जीवन सफल, सुगम, संपन्न आणि सुखी बनून जाईल.मित्रानो विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here