Dhan Prapti Upay शुक्रवारी तांदुळामध्ये घालून ठेवा हि वस्तू, लक्ष्मी सदैव आपल्या घरी राहील Akshaytritiya Lakshmi Prapti

0
62
Akshay Tritiya Lakshmi Prapti Upay

Dhan Prapti Upay शुक्रवारी तांदुळामध्ये घालून ठेवा हि वस्तू, लक्ष्मी सदैव आपल्या घरी राहील Akshaytritiya Lakshmi Prapti

नमस्कार मित्रानो, आज जो उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सदैव धन धान्याची भरभराट होईल, आपल्या घरामध्ये समृद्धी नांदू लागेल. आपल्या घरामध्ये कधीच धन धान्याची कमतरता भासणार नाही. आपल्या परिवाराचा मान सन्मान, प्रतिष्ठा वाढतच जाईल. शुक्रवारच्या दिवशी जर आपण संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी हा उपाय केलात तर आपल्याला याचे फारच शुभ परिणाम मिळायला लागतील.

Akshay Tritiya Dhan Prapti Upay

मित्रानो कोणत्याही शुक्रवारी आपण हा उपाय करू शकता. आणि आता येणाऱ्या १४ मे रोजी शुक्रवार तर आहेच पण या दिवशी अक्षय तृतीय देखील आहे. आणि अक्षय तृतीये दिवशी केल्या गेलेल्या उपायाचे फळ नेहमी अक्षय राहते, ते कधीही संपत नाही. या उपायाचे फळ सदैव मिळत राहते. जन्म जन्मांतरापर्यंत आपल्याला याचे फळ मिळत राहील. तर मित्रानो आपण हा उपाय अक्षय तृतीये दिवशी करू शकता अथवा कोणत्याही शुक्रवारी करू शकता. मित्रानो हा उपाय फारच साधा सोपा परंतु लाखांमध्ये एक असा उपाय आहे. आपण अगदी सहजरित्या हा उपाय करू शकता. आपल्याला करायचे काय आहे?

Akshay Tritiya Lakshmi Prapti Upay

तर मित्रानो आपल्याला एक-एक रुपयांची तीन नाणी घ्यायची आहेत. आणि याच बरोबर एक लाल रंगाचे कापड, एक लवंग आणि एक इलायची म्हणजे एक वेलदोडा घ्यायचा आहे. आपण संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी या वस्तू घ्यायच्या आहेत व या सर्व वस्तू म्हणजे तीन एक-एक रुपयांची नाणी, एक लवंग आणि एक वेलदोडा आपण त्या लाल रंगाच्या कापडावर ठेवायच्या आहेत. आणि हे कापड त्या सर्व वस्तूं समवेत आपल्या पूजा स्थानामध्ये, देवघरामध्ये ठेवायच्या आहेत व त्याला धूप दीप दाखवायचा आहे. आणि माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र, जो तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र आपण कितीही वेळेस म्हणू शकता आपल्या इच्छे नुसार अगदी ५ वेळेला, ७ वेळेला, ११, २१, ५१ किंवा १०८ वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आहे.

Dhan Prapti Che Upay In Marathi

महालक्ष्मीचे अनेक मंत्र आहेत जसे ओम श्री महालाक्ष्मि नमः, ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्री कमळवासीने नमः कोणत्याही मंत्र आपण आपल्या इच्छेनुसार म्हणायचा आहे. व आपल्याला जेवढे योग्य वाटेल तेवढा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर आपण त्याची पोटली तयार करावी म्हणजे लाल कपड्यामध्ये तीन एक रुपयांची नाणी, एक लवंग आणि एक वेलदोडा ठेऊन त्या कापडाचे सर्व काठ एकत्र जुळवून वरून लाल रंगाच्या धाग्याने बांधावेत म्हणजे त्याची पोटली तयार होईल. आणि हि पोटली आपल्याला संध्याकाळच्या वेळी आपल्या घरातील तांदळाच्या डब्यामध्ये तांदळामध्ये घालून ठेवायची आहे. तांदळामध्ये पुरायची आहे. आणि हा तांदळाचा डबा आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवायचा आहे.

Dhan Prapti Vastu Shastra

ज्या लोकांची घरे ग्राउंड फ्लोअर किंवा स्वतंत्र प्लॉट मध्ये आहेत अशा लोकांनी हि पोटली उत्तर दिशेला थोडेसे तांदूळ घेऊन जमिनीमध्ये गाडली तरी देखील चालू शकते. घडताना एक खड्डा खणावा त्यामध्ये पहिला थोडे तांदूळ घालावेत त्यानंतर पोटली व पुन्हा थोडे तांदूळ अशा पद्धतीने हि पोटली गाडावी. त्याला धूप अगरबत्ती दाखवावी. या उपायामुळे माता लक्ष्मीचा वास सदैव, जन्म जन्मांतरासाठी आपल्या घरामध्ये होईल. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव बरसत राहील, माता लक्ष्मीची कायमची कृपा आपल्याला प्राप्त होईल. जे लोक फ्लॅट मध्ये राहतात त्यांनी हि पोटली तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे, व तांदळाच्या डब्यामध्ये ठेवताना हि पोटली तांदुळामध्ये पुरून, गाडून, दाबून ठेवायची आहे. आणि हा पोटली ठेवलेला तांदळाचा डबा घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवायचा आहे.

Ghar Me Sukh Shanti Ke Upay

यासाठी आपण मोठाच डबा वापरायला पाहिजे असे काही बंधन नाही अगदी छोटासा डबा देखील आपण वापरू शकता. फक्त ती पोटली तांदळामध्ये पुरली गेली पाहिजे अश्या आकाराचा डबा असावा. डबा तांदळाने पूर्ण भरलेला असावा. असे करण्याने माता लक्ष्मी कायम स्वरूपी आपल्या घरामध्ये स्थिर रूपाने वास करू लागतील. मित्रानो फारच उत्तम उपाय आहे. हा उपाय आपण अवश्य करा. या उपायाने आपल्यावर माता लक्ष्मीची कायम स्वरूपी कृपा होईल आणि याचे फारच शुभ परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतील. आपले संपूर्ण जीवन बदलून जाईल. हा उपाय आपल्याला फक्त एक वेळच करायचा आहे, वारंवार करण्याची आवश्यकता नाहीये. तर करून पहा हा उपाय. विडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here