Akshay Tritiya Lakshmi Prapti Upay | अक्षय तृतीया लक्ष्मी प्राप्ती उपाय

0
31
Akshay Tritiya Lakshmi Pujan Vidhi

Akshay Tritiya Lakshmi Prapti Upay | अक्षय तृतीया लक्ष्मी प्राप्ती उपाय

हिंदू धर्मात वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथिला खुप शुभ मानले गेले आहे. या दिवशी केलेल्या उपवास, दान आणि उपायाचे अक्षय म्हणजेच संपूर्ण फळ मिळते. यामुळेच या तिथीला अक्षय तृतीया म्हटले जाते. या वेळी अक्षय तृतीया 14 मे, शुक्रवारी आहे. मानले जाते की, या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय आणि पूजा केली तर घरात स्थाई रुपात धन-संपत्तीचा वास राहतो. या दिवशी अशा प्रकारे लक्ष्मीची पूजा करावी.

Akshay Tritiya Dhan Prapti Upay

पूजन विधि
पूजा करण्यासाठी कपड्याच्या पवित्र आसनावर महालक्ष्मीची मूर्ति स्थापित करा. महालक्ष्मीच्या मूर्ति जवळ एका स्वच्छ भांड्यात केसर युक्त चंदनाने अष्टदल कमळ बनवून त्यावर पैसे आणि दागिणे ठेवा. आता याची पुजा करा. सर्वात अगोदर पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करुन स्वतःवर जल शिंपा, तसेच निम्न मंत्र वाचून पूजा-साहित्यावर जल शिंपावे.

ऊं अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा।
य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तर: शुचि:।।

यानंतर जल-अक्षत घेऊन पूजनाचा संकल्प घ्या.

Akshay Tritiya Dhan Prapti Upay

संकल्प – आज वैशाख महिन्याचा शुक्ल पक्ष तृतीया तिथि, सोमवार आहे. मी या गोत्राचा आहे.(आपले गोत्र बोला) माझे नाव हे आहे. (आपले नाव बोला). मी श्रुति, स्मृति आणि पुराणांनुसार फळ प्राप्त करण्यासाठी आणि इच्छा पुर्ण करण्यासाठी मन, कर्म आणि वचन पापातून मुक्त, शुध्द होऊन लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी पूजा करण्याचा संकल्प घेत आहे.
असे म्हमून संकल्पाचे जल सोडा. आता डाव्या हातात तांदूळ घेऊन खालील मंत्र वाचून डाव्या हाताने ते तांदूळ लक्ष्मीच्या प्रतिमेवर सोडा.

ऊं मनो जूतिर्जुषतामाज्यस्य बृहस्पतिर्यज्ञमिमं तनोत्वरिष्टं यज्ञ समिमं दधातु। विश्वे देवास इह मादयन्तामोम्प्रतिष्ठ।।

ऊं अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन।।

आता या मंत्रांव्दारे भगवती महालक्ष्मीचे षोडशोपचार पूजन करा.

ओम महालक्ष्म्यै नमः – या मंत्राचा उच्चार करुनसुध्दा पूजा केली जाऊ शकते.
प्रार्थना – विधिपूर्व श्रीमहालक्ष्मीचे पूजन केल्यानंतर हाथ जोडून प्रार्थना करा.

सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकै-
र्युक्तं सदा यक्तव पादपकंजम्।
परावरं पातु वरं सुमंगल
नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।
भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।
ऊं महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।

प्रार्थना करत नमस्कार करा.

Akshaytritiya Lakshmi Prapti Upay

समर्पण – पूजेच्या शेवटी कृतोनानेन पूजनेन भगवती महालक्ष्मीदेवी प्रीयताम्, न मम।
हे बोलून समस्त पूजन कर्म भगवती महालक्ष्मीला समर्पित करा. तसेच जल सोडून महालक्ष्मीला घरात निवास करण्याची प्रार्थना करा.

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथिला अक्षय तृतीया हे पर्व साजरे केले जाते. काही ठिकाणी याला आखाजी म्हटले जाते. हिंदू धर्मात या तिथिचे विशेष महत्त्व आहे. कारण वर्षातून येणार-या 4 अज्ञात मूहूर्तांपैकी एक आहे. (अक्षय तृतीया व्यतिरिक्त देवउठनी एकादशी, वसंत पंचमी आणि भडली नवमीला अज्ञात मुहूर्त मानले जाते) यावेळी 14 मे शुक्रवार रोजी हा मुहूर्त आहे. आज आम्ही तुम्हाला अक्षय तृतीया संबंधीत काही खास गोष्टी सांगत आहोत, या खालील प्रमाणे आहेत…

Akshay Tritiya Lakshmi Pujan Vidhi

अक्षय तृतीया का आहे विशेष
हिंदू पंचागप्रमाणे वर्षाच्या दुस-या महिन्याच्या वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया म्हटले जाते. अक्षय म्हणजे कधीच नाश न होणारा, या तिथीला दान-धर्मा केल्याने कधीच नाश न होणारे फळ आणि पुण्य मिळते. यामुळेच ही सनातन धर्मात दान-धर्माची अचूक वेळ मानली जाते. या तिथीला चिरंजीवी तिथीसुध्दा म्हटले जाते. कारण ही तीथी 8 चिरंजीविपैकी एक परशुरामाची जन्म तिथी आहे. हिंदू धर्माच्या मान्यतांप्रमाणे कोणत्याही शुभ कामासाठी वर्षाच्या स्वयं सिध्द मूहूर्तांमध्ये आखाजी हा एक आहे.

Akshay Tritiya Lakshmi Pujan

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते.

Akshay Tritiya Lakshmi Prapti Totake

श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा

अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगळ कार्य मुर्हूत न बघता देखील करता येतात कारण हा दिवस शुभ असल्याचे मानले गेले आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मापर्यंत मिळत राहतं. तर आज आपण जाणून घ्या की असे कोणते काम आहे जे या दिवशी केले जाऊ शकतात आणि आम्ही आपल्याला 18 उपाय देत आहोत त्यातून आपण दोन उपाय देखील केले तरी अक्षय धन लाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील. तर बघू या काय आहेत उपाय :

1. या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे.

2. उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री, मटका, आणि पंखा दान करावा.

3. मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था बघावी. भंडारा करून गोड-धोडाचे जेवण द्यावे याने अनंत पुण्य लाभतं.

4. अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी.
6. अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फुल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी.

5. श्री विष्णुसहस्त्रनाम पाठ आणि श्री सूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते.

Akshay Tritiya Muhurt

7. आजारामुळे त्रस्त असणार्‍यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे.

8. अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्याची खरेदी शुभ ठरते.

9. नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान करावे.

10. रुग्णालयात गोड पदार्थ, पाणी आणि फळ वितरित केल्याने अनंत पुण्य प्राप्ती होते.

Akshay Tritiya Ka Mahatva

11. या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देव गुरु बृहस्पती प्रसन्न होतात.

12. विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठिण परिश्रम करेन. तसेच आई-वडील आणि गुरुंचा आशीर्वाद घ्यायला हवा. कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फळदायी ठरतो.

13. या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल. वाहन खरेदी करू शकता. किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी मुर्हूत बघण्याची गरज नाही.

14. या दिवशी छत्री दान नक्की करावे. आणि जागो-जागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी.

15. आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे.

Akshaytritiya Lakshmi Prapti

16. मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ, घंटा व इतर पूजेचं सामान दान करावे.

17. देवघरात पूर्ण 24 तास तुपाचा अखंड दिवा लावावा.

18. या दिवशी श्री रामचरितमानसमधील अरण्य काण्ड पाठ करावे. यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात. याने जन्म जन्मांतराचे पुण्य फळ प्राप्त होतं. याने रामकृपा मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here