25 November 2021 Guru Pushya Nakshatra | २४-२५ नोव्हेंबर २०२१ – गुरु पुष्य योग – महा अचूक उपाय

0
24
25 November 2021 Guru Pushya Nakshatra

२४-२५ नोव्हेंबर २०२१ – गुरु पुष्य योग – महा अचूक उपाय | Guru Pushya Yoga 2021

नमस्कार मित्रानो कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला गुरु पुष्ययोगाच्या दिवशी करायच्या उपयाविषयी सांगणार आहोत. या दिवशी केल्या गेलेल्या कोणत्याही उपायाचे, पूजन आराधनेचे फळ हे इतर दिवसांमध्ये केल्या गेलेल्या उपाय, पूजन, आराधानेच्या तेलानेत १० पटींनी अधिक मिळते. आणि त्यामुळे या शुभ मुहूर्तावर आपणही हे उपाय अवश्य करावेत व आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल बनवावे.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो आज जो उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत हा उपाय पुष्य नक्षत्राशी संबंधित उपाय आहे. नोव्हेंबर महिन्यातील २४ आणि २५ तारखेला म्हणजे बुधवार आणि गुरुवार या दोन्हीही दिवशी पुष्य नक्षत्राची तिथी असणार आहे. व या दोन्हीही दिवशी करायचे उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत. मित्रानो हे विशिष्ट उपाय खास का आहेत याच्या बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. बुधवार म्हणजे बुध देव, बुध देव म्हणजे बुध ग्रह, कि जो बुद्धीचा कारक आहे. आणि गुरुवार म्हणजे देवगुरु बृहस्पती, कि जे ज्ञानाचे कारक आहेत.

आणि या दोन्ही ग्रहांचे संतुलन एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगले असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची कमी भासत नाही. बुद्धी आणि ज्ञानाच्या जोडीने ती व्यक्ती आकाशाला हि गवसणी घालू शकते. त्याच्या जीवनामध्ये प्रगतीच्या अति उच्च शिखरावर पोहचू शकते. आणि म्हणून बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी आपण उपाय करायचा आहे. चला तर मग जाणून घेवूया या दिवशी करायच्या उपयाविषयी. हे उपाय कसे करायचे आहेत, त्यांचे परिणाम काय असणार आहेत हे आपण पाहूया.

मित्रानो पुष्य नक्षत्र तिथीचा प्रारंभ बुधवार २४ नोव्हेबर २०२१ रोजी सायंकाळी ०४ वाजून २९ मिनिटांनी होईल, जी गुरुवार २५ नोव्हेबर २०२१ रोजी सायंकाळी ०६ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. बुधवारच्या दिवशी करायच्या उपायाची वेळ असणार आहे रात्री ०९:०० ते १०:१९ मिनिटांच्या मध्ये. हा उपाय आपल्याला या वेळेच्या मधेच करायचा आहे. हा उपाय बुधवारच्या दिवशी करायच्या असल्या कारणाने हा उपाय बुध ग्रहाशी संबंधित असणार आहे. आणि बुधाग्रहाचे कारक हे श्री गणेश असतात. म्हणजे जर का आपण गणपती बाप्पांची स्तुती केलीत तर कुठेना कुठे आपला बुध ग्रह आपल्यला शुभ परिणाम द्यायला लागतो. खास करून अशा व्यक्तींच्या, कि ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह खराब अवस्थे मध्ये आहे, बुध ग्रहाचे ज्यांना अशुभ परिणाम भोगावे लागत आहेत. अशा व्यक्तींनी तर हा उपाय निश्चित केला पाहिजे.

मित्रानो बुधवारचा उपाय करायची जी वेळ आपल्याला सांगितली आहे, त्यावेळी आपण आपल्या घरातील देव्हार्यासमोर बसायचे आहे, बसताना आपले मुख उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला होईल अशा पद्धतीने बसायचे आहे. बसायच्या आधी पूर्ण सुचीर्भूत होवून म्हणजे अंघोळ करून अथवा हात पाय स्वच्छ धुवून, नवीन अथवा स्वच्छ धुतलेलं कपडे घालून बसायचे आहे. बसण्यासाठी आसन जरूर घ्यावे. यानंतर एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे. तुपाचा दिवा नसेल तर आपण तेलाचा दिवा देखील घेवू शकता. यानंतर आपण जो दिवा प्रज्वलित करत आहात, तर हा दिवा प्रज्वलित करत असताना श्री गणेशाचे ध्यान करत, त्यांच्या प्रतिमे समोर किंवा फोटो समोर अथवा आपल्याकडे श्री गणेशाची प्रतिमा किंवा फोटो नसेल तर आपण एक सुपारी घेवून ती गणेशाचे प्रतिक मानून एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून, हळद कुंकू, अष्टगंध आणि फुल वाहून स्थापित करावी व मग त्यासुपारीला श्री गणेश मानून त्याच्या समोर गणेशाचे ध्यान करत दिवा प्रज्वलित करायचा आहे.

यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा आपल्याला २१ वेळा जप करायचा आहे. तो मंत्र आहे || ॐ गं गणपतये नमः || हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीनवर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या star liv .इन या वेब साईट वर मिळून जाईल. जर का आपल्याला दुर्वा उपलब्ध होवू शकल्या तर एक दुर्वा वाहावी व एक वेळा मंत्राचा जप करावा, अशा रीतीने २१ दुर्वा वाहून २१ वेळेला मंत्राचा जप करावा. मंत्र जाप आणि दुर्वा वाहून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून गणपती अथर्वशीर्ष चा एक वेळा पाठ करायचा आहे. पाठ करून झाल्यानंतर श्री गणेशाला गुळाचा नैवेध्या दाखवायचा आहे. जोपर्यंत गणपती बाप्पांच्या समोर लावलेला दिवा जळत आहे तोपर्यंत गुळाचा नैवेध्य तेथेच राहू द्यायचा आहे व दिवा विझल्यानंतर गुळाचा प्रसाद तेथून उचलून परिवारातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचा आहे, खायचा आहे.

गणपती बाप्पांना गुळाचा नैवेद्य दाखवत असतांना जी काही आपली मनोकामना आहे, जी काही आपली समस्या आहे विघ्न आहेत, ते गणपती बाप्पांना बोलायचे आहेत कारण आपल्या समस्यांचे, कष्टांचे समाधान होवू शकेल आणि आपली मनोकामना पूर्ण होवू शकेल. तर मित्रानो अशा प्रकारे आपल्याला बुधवारच्या दिवशीचा उपाय करायचा आहे. आता आपण गुरुवारच्या दिवशी करायचा उपाय पाहूया, कारण पुष्य नक्षत्राची तिथी बुधवारच्या दिवशी हि आहे व गुरुवारच्या दिवशी देखील आहे. गुरुवारचा दिवस यासाठी देखील महत्वाचा आहे कारण यादिवशी फक्त पुष्य नक्षत्रच नाही तर सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग हे देखील या दिवशी आहेत.

मित्रानो जर का आपण पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी करणार असाल तर कोणाला गिफ्ट किंवा उपहार देण्यासाठी खरेदी करू नये, केवळ आपल्या घर परिवारासाठी किंवा स्वतःसाठी खरेदी करावी, खरेदीची शुभ वेळ आहे दुपारी १२:०१ ते ०१:३४ मिनिटांपर्यंत. या दिवशी आपण सोने, चांदी, घर, जमीन किंवा काहीही खरेदी करू शकता. पण शक्यतो अशाच वस्तूंची खरेदी करावी किज्या वस्तू आपल्या घरामध्ये राहतील, घरातून बाहेर जाणार नाहीत या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवावे. चला तर मग मित्रानो गुरुवारचा दिवशी आपल्याला कोणत्यावेळी व कोणता उपाय करायचा आहे ते?

मित्रानो गुरुवारच्या दिवशी सायंकाळी ०६:५० मिनिटापर्यंतच पुष्य नक्षत्राची तिथी असणार आहे. या दिवशी उपाय करण्याची जी वेळ आहे, ती सायंकाळी ०५:२४ मिनिटांपासून ०६:५० मिनिटांच्या मधील असणार आहे. मित्रानो गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णुंशी संबंधित असतो तसेच आपण या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या सोबत माता महालाक्ष्मींची देखील पूजा केलीत तर आपल्याला अत्याधिक लाभ प्राप्त होतो. आणि समवेत पुष्य नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग मिळाला आहे. एकंदरीत या गुरुवारच्या दिवशी करायच्या उपायाचा आपण निष्कर्ष काढला तर आपण या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लाक्ष्मिन्चेच पूजन करणार आहोत व त्यांच्याशी संबंधित उपाय करणार आहोत.

सांगितलेल्या वेळेमध्ये आपण आपल्या घरातील देव्हार्यासमोर बसायचे आहे, बसताना आपले मुख उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला होईल अशा पद्धतीने बसायचे आहे. बसायच्या आधी पूर्ण सुचीर्भूत होवून म्हणजे अंघोळ करून अथवा हात पाय स्वच्छ धुवून, नवीन अथवा स्वच्छ धुतलेलं कपडे घालून बसायचे आहे. बसण्यासाठी आसन जरूर घ्यावे, सर्वप्रथम एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तूप गाईचे असेल तर अति उत्तम अथवा आपण साधारण तूप देखील वापरू शकता. नसेल तर आपण तेलाचा दिवा देखील लावू शकता. दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्व प्रथम भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा २१ वेळेला जाप करायचा आहे. तो मंत्र आहे || ॐ नमो भगवते वासुदेवाय || हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीनवर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या star liv .इन या वेब साईट वर मिळून जाईल.

२१ वेळा जप करून झाल्यानंतर तिथेच बसून विष्णू सहस्त्र नामाचा एकवेळा पाठ करायचा आहे. विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करून झाल्यानंतर महालक्ष्मी मातेच्या मंत्राचा २१ वेळा जप करायचा आहे. तो मंत्र आहे || ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः || हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीनवर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या star liv .इन या वेब साईट वर मिळून जाईल. जप करून झाल्यानंतर तिथेच बसून श्री सूक्ताचा एक वेळा पाठ करावा. हे सर्व करून झाल्यानंतर पिवळ्या रंगाची फळे किंवा पिवळ्या रंगाच्या मिठीचा नैवेद्य श्री हरी विष्णुना दाखवावा व माता लक्ष्मीना आपण खिरीचा नैवेध्या दाखवावा किंवा निदान साखरेचा नैवेद्य माता लक्ष्मीना दाखवावा.

श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर, आपण थोडे अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, हे तांदूळ तुटलेले, फुटलेले नसावेत. अखंड तांदुळाच घ्यायचे आहेत, व पुजानामध्ये आपल्याकडून कळात नकळत काही चूक झाली असेल, काही कमी राहीली असेल तर ती कमी पूर्ण करण्यासाठी देवाकडे क्षमा प्रार्थना करून, या अखंड तांदुळाच्या माद्यमातून ती कमी पूर्ण करण्यासाठी ते अक्षत एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेट मध्ये ठेवून देवाला समर्पित करून देवासमोर ठेवून द्यावेत. आणि हाथ जोडून मनोभावे जी काही आपली समस्या असेल, जी काही आपली मनोकामना असेल, विघ्न असतील, अडथळे असतील तर यासर्व गोष्टी श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीना सांगायच्या आहेत, बोलायच्या आहेत.

व आपली मनोकामना पूर्ण करण्याची, आपल्या समस्यातून मुक्ती देण्याची प्रार्थना करायची आहे. जोपर्यंत श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीच्या समोर लावलेला दिवा जळत आहे तोपर्यंत नैवेध्य तेथेच राहू द्यायचा आहे व दिवा विझल्यानंतर प्रसाद तेथून उचलून केवळ आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचा आहे, खायचा आहे. कोणाही बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देवू नये. मित्रानो हा यासाठी महत्वाचा आहे, कारण बुधवार आणि गुरुवार म्हणजे बुध देव आपल्या बुद्धीशी जोडलेले आहेत, आणि गुरुवार म्हणजे देवगुरु बृहस्पती आपल्या ज्ञानाशी जोडलेले आहेत. आणि जेंव्हा बुद्धी आणि ज्ञान एकमेकांशी जोडले जातात, तेंव्हा व्यक्ती त्याच्या जीवनातील हरप्रकारच्या ध्येयाला साध्य करून घेतो.

तर मित्रानो हे होते पुष्य नक्षत्रावर करायचे उपाय. आपणही हे उपाय करून आपल्या जीवनातील हर प्रकारचे ध्येय साध्य करू शकता. व आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल बनवू शकता. विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subsribe करायला विसरू नका, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here