शिवलिंगावर बेलपत्र कसे अर्पण करावे

0
112
bel patra on shivling

शिवलिंगावर बेलपत्र कसे अर्पण करावे.

ओम नमः शिवाय, मित्रानो श्रावण महिन्यामध्ये शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या पूजा पद्धतीचा वापर करतो. त्यांना दूध, मध, जल, उसाचा रस अशा प्रकारचे पदार्थ अर्पण  करतो. त्याच प्रमाणे सगळ्यात महत्त्वाच याच्यामध्ये आहे ते म्हणजे बेलपत्र. आणि बेलपत्र महादेवला  खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही हजारो-लाखो फुले वाहिली आणि एक बेलपत्र वाहिल तर ते तुम्हाला कोटी कन्यादानाच फल प्राप्त होते. तर एक बेलपत्र वाहिल्याने कोटी कन्यादानाच फल  प्राप्त होतं. अशा पद्धतीने त्रिदलापासून ते तेरा दलापर्यंत, तेरा दल हे आपल्याला भगवंताच्या कृपे नुसार मिळाल पाहिजे, तर ते जर तुम्हाला मिळालं, जेवढं तुम्हाला जास्त दलाचं बेल मिळेल तेवढे, त्याप्रमाणात ते शिवलिंगावर वाहिल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होईल.

पण त्याच्यामध्ये त्रिदल बेलपत्र म्हणजे महादेवाचं त्रिनेत्र आहे. व ते तीन जन्माचे पाप नाश करणार आहे. त्यामुळे त्याच्या मध्ये, त्या तीन दलामध्ये , त्या तीन पत्रामध्ये महादेवाचे तीन डोळे, तीन नेत्र धारण आहेत. व हे बेलपत्र महादेवाला फार प्रिय आहे. त्यामध्ये  ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव आहेत व माता पार्वती, माता लक्ष्मी, माता सरस्वती या तीन देवी हि यामध्ये आहेत. कायक, वाचक आणि मानसिक असे पाप नाश करणारेही याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हे बेलपत्र आपण सोमवारी आणि चतुर्दशीला तोडू नये. जर तुम्ही सोमवारी किंवा चतुर्दशीला बेलपत्र तोडले आणि ते महादेवाला वाहिल्यास ते क्रोधीत होतात. त्यामुळे सोमवारी आणि चतुर्दशीला बेलपत्र तोडू नये.

म्हणून हे बेलपत्र जर तुम्हाला सोमवार लागणार असतील तर रविवारी तोडूनआणायचे आणि तोडताना सुद्धा आपण याची एकदम फांदी तोडायची नाहीये एक-एक बेलपत्र तोडून, तुम्हाला हवी तेवढी बेलपत्रे घ्यायची आहेत  व आपल्या घरी आणायची आहेत. घरी आणून त्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायच आहे. त्यातले चांगले बेलपत्र एकत्र करून, खंडित बेलपत्र, जे तुटलेले आहेत ते तुम्ही बाजूला काढायचे आहेत. आणि बेल पत्राच्या दांड्याच्या खाली एक गाठ असते ती गाठ तुम्ही बोटांनी तोडून टाकायची आहे. आणि तोडताना चाकूचा वापर करायचा नाही. ती गाठ तोडून टाका. व हे बेलपत्र आपण महादेवांना व्हायचा आहे.

त्याचबरोबर खराब बेलपत्र किंवा आपण जी देठ काढलेले आहेत, ते इतरत्र टाकून न देता एकाद्या झाडाच्या बुडख्यात टाकून द्यावीत. त्यामुळे त्याचं पावित्र्य राहत. बेलपत्र देवाला घेऊन जाताना आपण काय करतो कि, त्या झाडाचं बेलपत्र तोडतो आणि हातातून  तसेच घेऊन जातो. तर ते तसं घेऊन न जात, एखाद्या पात्रात, एकाद्या भांड्यात हे बेलपत्र घेऊन जावं. बेलपत्र देवाला वाहताना विषम संख्येत व्हायचे आहे. म्हणजे विषम संख्येत वाहताना १, ३, ५, ११, ५१, १०८. या संख्येत बेलपत्र व्हायचे आहेत . जर तुम्हाला १०८ बेलपत्र मिळाले नाहीत तर तुम्ही ५१ बेल पात्र वाहू शकता.  जर तुम्हाला 51 बेलपत्र मिळाले नाहीत तर तुम्ही 5 बेल पात्र वाहू शकता. कमीत-कमी ५ बेलपत्र शिवलिंगावर वाहावीत.

तसेच एका बेलपत्रावर आपल्याला चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम नमः शिवाय लिहायचे आहे. बेलपत्रातील मधले जे मोठं पान आहे, त्या पानावरती ओम लिहायचे आहे. व त्या खाली असणाऱ्या दोन पानांमधील डाव्या बाजूच्या पानावर नमः लिहायचे आहे. आणि उजव्या बाजूच्या पानावर शिवाय लिहायचे आहे. तसेच हे लिहिताना बेलपत्राची जी वरची बाजू असते जी सॉफ्ट आणि चमकदार असते, त्या बाजूवर लिहायचे आहे. आणि हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करताना उलटे करून म्हणजे आपण जो ओम नमः शिवाय हा मंत्र लिहला आहे त्याचा स्पर्श शिवाच्या मस्तकावर होईल अशारितीने वाहायचे आहे.

बेल पत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा बेल पत्र अर्पण करण्याचा मंत्र आहे,|| त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधम, त्रीजन्म पापसंहारं एकबिल्वम शिवार्पणम || हा तुम्ही म्हणू शकता. किंवा महामृत्युंजय मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारे हे बेलपत्र आपण अर्पण करायचे आहे. बेलपत्र अर्पण करताना आपल्या हातानी मृग मुद्रा करायची आहे. मृग मुद्रा म्हणजे आपल्या हाताचे पहिले बोट, ज्याला आपण तर्जनी किंवा दर्शनी बोट म्हणतो ते बोट आणि करंगळी सरळ, उभे ठेवायचे आहेत. व हाताचा अंगठा आणि मधले बोट व अनामिका बोट म्हणजे रिंग फिंगर, ह्या तीन बोटांचे अग्रभाग म्हणजे पुढची टोके एकमेकांशी जुळवायची आहेत. असे केल्यानंतर आपल्या लक्षात येईल कि आपल्या हाताची रचना हरणाच्या तोंडा सारखी म्हणजेच मृग मुद्रा झाली आहे. व या मुद्रेच्या साहाय्याने बेलपत्र पकडून तो आपण शिवलिंगावर वाहायचा आहे.

मित्रानो जर का तुम्हाला बेलपत्र मिळाली नाहीत, किंवा सोमवारच्या दिवशी तुमच्या लक्षात आले कि तुम्ही बेल पत्र आदल्या दिवशी तोडलेली नाहीत व आता सोमवारच्या दिवशी वाहण्यासाठी बेल पत्र नाहीयेत. तर अशावेळी झाडाची बेलपत्र न तोडता, मित्रानो आपण शिवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे व तिथे इतर लिकांनी जी बेलपत्र शिवलिंगावर वाहिली आहेत, ती आपण घ्यावीत व ती स्वच्छ धुवून घ्यावीत आणि मग ती शिवलिंगावर वाहावीत. अशा रीतीने एक बेल पत्र आपण एक मिहिन्यां पर्यंत वापरू शकतो. हे बेलपत्र खराब होत नाही. तर मित्रानो अशा प्रकारे बेलपत्र अर्पण करून, महादेवांना प्रसन्न करून मनोवांच्छित फलप्राप्ती, धन-धान्य, आरोग्य, ऐश्वर्य, संतान प्राप्ती, संतान सुख, सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी महादेवांना बेलपत्र अर्पण करणं हे सर्वात महत्वाचे आहे. श्रावण महिन्यामध्ये तर बेल पात्र वाहने फार महत्वाचे आहे. तर मित्रानो अशा रीतीने आपण भगवान महादेवांना बेलपत्र अर्पण करून, त्यांना प्रसन्न करून घ्या. व्हिडीओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here