Home Jotish शत्रुपीडे पासून मुक्तीसाठी देवघरात दिवा लावताना बोला हे ३ शब्द

शत्रुपीडे पासून मुक्तीसाठी देवघरात दिवा लावताना बोला हे ३ शब्द

शत्रुपीडे पासून मुक्तीसाठी देवघरात दिवा लावताना बोला हे ३ शब्द

जीवन जगत असताना काही लोक आपले मित्र बनतात तर काही लोक आपले शत्रू बनतात. कधी-कधी हे शत्रू बनलेले लोक इतके बलवत्तर बनतात की आपल्याला त्यांचा त्रास होऊ लागतो यालाच आपण शत्रुपीडा असं म्हणतो. मित्रानो जेव्हा-जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं काम करता, तुमची प्रगती होऊ लागते तेव्हा ही प्रगती लोकांच्या डोळ्यात खुपते आणि मग हेच लोक तुमचे शत्रू बनतात, कधी-कधी तर तुमच्या अगदी जवळचे असणारे मित्र सुद्धा तुमच्या प्रगतीमुळे तुमचे शत्रू बनू शकतात. मित्रांनो ऑफिसमध्ये जर तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून त्रास होत असेल, बॉस चा त्रास असेल, शेजाऱ्यांचा त्रास असेल किंवा तुमच्या उद्योगधंद्यात तुमचे जे स्पर्धक आहेत त्यांच्या पासून जर तुम्हाला त्रास होत असेल तर यालाच आपण शत्रुपीडा असं म्हणतो. मित्रांनो तुमचे हे बलवत्तर झालेले शत्रू आजच्या उपायाने निष्प्रभ होतील. त्यांच बळ निघून जाईल, हा उपाय शत्रु पीडे पासून मुक्ती मिळवून देणारा आहे, आणि यासाठी आपल्याला विशेष अशी काहीच सामग्री लागणार नाहीय. हे केवळ आपण रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा प्रज्वलित करतो हा दिवा प्रज्वलित करताना हा एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे.

मित्रांनो या मंत्रातील शब्द इतके सामर्थ्यवान आहेत, ताकदवान आहेत की, तुमचे शत्रू तुमच्यापुढे गुडघे नक्की टेकतील. देवपूजा करताना आपण दिवा नक्की प्रज्वलित करत असाल, दिवा लावण्याचं कारण म्हणजे दिव्यामुळे शुभ आणि मंगल गोष्टी घडू लागतात. देवी देवता प्रसन्न होतात. खर तर दिवा आपल्याला परमात्म्याशी जोडत असतो आणि म्हणूनच कोणतेही मंगल कार्य असू द्या, त्या मंगल कार्यात दिवा हा लावला जातो. मित्रांनो सकाळ-संध्याकाळ ज्या घरा मध्ये दिवा लावला जातो, त्या घरातील वातावरण पवित्र राहत, मंगलमय बनत. मात्र आपण हा जो उपाय करणार आहोत या उपायासाठी, दिवा लावताना काही नियमांचं पालन आपण अवश्य करा. पहिला नियम मित्रांनो हा दिवा लावताना डोक्यावरती टोपी किंवा स्त्रियांनी पदर घेणे अत्यावश्यक आहे. जर टोपी नसेल तर तुम्ही रुमाल सुद्धा वापरू शकता. दुसरी गोष्ट, हा दिवा आपण जमिनीवर ठेवायचा नाहीय. तर या दिव्याला आपणा आसन द्यायचे आहे. लक्षात घ्या दिवा हा प्रत्यक्ष देवतास्वरूप मानला जातो तो एक देवतांचे स्वरूप आहे आणि म्हणून अशा दिव्याखाली आपण आसन ठेवायच आहे. हे आसन मग कोणतीही फुले असोत किंवा एखादं झाडाचं पान असो किंवा काही जर नसेल तर आपण धान्य, अक्षत, अक्षत म्हणजे न तुटलेले फुटलेले तांदूळ. मूठभर तांदूळ त्या ठिकाणी ठेवावेत आणि या तांदळाच्या ढेरी वर हा दिवा ठेवावा. मित्रांनो जे तेल आपल्याला या दिव्यामध्ये वापरायचा आहे, ते तेल आहे मोहरीचे तेल. त्याला हिंदीमध्ये सरसों का तेल असेही म्हणतात असही म्हणतात. तर आस हे मोहरीचे तेल आपण या दिव्यामध्ये टाकायचं आहे.

हा उपाय आपण शत्रू पीडेसाठी करतोय, शत्रू मुक्तीसाठी करतोय. मित्रानो जर मोहरीचे तेल नसेल तर आपण चमेलीच तेल म्हणजेच जाइच तेल सुद्धा वापरू शकता. तर असा हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो या दिव्यातली जी वात आहे, ती आपण कापसाची वात वापरणार आहोत. आणि हा दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये दोन लवंगा टाकण्यास विसरू नका होय अनेक ज्योतिषी उपायांमध्ये तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये या लवंगांचं मोठे महत्त्व आहे. दोन साबुत लवंगा आपण घ्यायच्या आहेत. साबूत म्हणजे न तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा ज्यांना फुल असेल अशा दोन लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर याच दिव्याने आपण हनुमानाची आरती करायची आहे. लक्षात घ्या तुम्ही देवापुढे तुमच्या देवघरात दिवा ठेवलेला आहे तो वेगळा असणार आहे आणि हा दिवा वेगळा असणार आहे या दिवाने आपण हनुमानाची आरती करायचे आहे आणि त्यानंतर हनुमानानं पुढे नतमस्तक होऊन आपल्या जीवनातून शत्रुपीडा नष्ट होउदे. शत्रू च्या त्रासापासून, त्याच्या जाचा पासून आपल्याला मुक्तता मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे. मित्रांनो सोबतचा एक मंत्र मी सांगत आहे या मंत्राचा हि जप आपण करू शकता. केवळ एक वेळा हा मंत्र आपण म्हणायचा आहे. हा मंत्र आहे शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा शत्रू बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण सायंकाळच्या वेळी हा मंत्र म्हणत असाल आजपासून खास करून, या शत्रुपीडे पासून मुक्ती साठी आपण या मंत्राचा जप सकाळ आणि सायंकाळच्या दोन्ही वेळा अवश्य करा. मित्रांनो दररोज हा उपाय करत चला. तुम्हाला दिसेल की तुमचे शत्रू तुमच्या पुढे नतमस्तक होतील तुमच्यापुढे गुढघे टेकतील आणि शत्रू पिढीपासून तुमचा बचाव होईल

|| ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read