लिंबू व भीमसेनी कापराच्या या प्रयोगाने पहा धनाचे दरवाजे कसे उघडतात | dhan prapti upay in marathi

0
59
lakshmi prapti ke achuk upay

लिंबू व भीमसेनी कापराच्या या प्रयोगाने पहा धनाचे दरवाजे कसे उघडतात. | dhan prapti upay in marathi

नमस्कार मित्रानो, बरेचजण म्हणतात आम्ही कैक प्रकारचे उपाय करतो, अनेक चॅनेल पाहतो, परंतु कोणताही उपाय सिद्ध होत नाही. कोणत्याही उपायाने फरक पडत नाही, तर मित्रानो आजचा हा विडिओ आपल्यासाठीच आहे. मित्रानो आजच्या या उपायाने आपल्या आयुष्यामधील धनाचे दरवाजे नक्कीच उघडतील. पण मित्रानो आपण हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने करायला हवा. आपल्या मनामध्ये या उपायांविषयी शंका असेल, अविश्वास असेल,आपण म्हणत असाल करून पाहूया, एवढे उपाय केले आणखीन एक करून पाहूया, तर या उपायाचे फळ आपल्याला मिळणार नाही.

मित्रानो जर का तुम्ही धनप्राप्तीसाठी एखादा उपाय करत असाल आणि आपल्या शरीरामधील धनप्राप्ती संदर्भातील मूळ चक्र जर जागृत नसेल तर मित्रानो आपण माता लक्ष्मीने कितीही विनवण्या करा, कितीही उपाय करा पण आपल्याला धन प्राप्त होणार नाही. आपल्या शरीरामध्ये धनचक्र हे आपल्या हातांच्या धनरेषेच्या खाली तळव्याच्या मध्यभागी असते, जवळपास दीड इंच व्यासाच्या वर्तुळाकार भागामध्ये ते असते. आणि या तिजोरीचा दरवाजा म्हणजेच आपल्या भाग्याचा दरवाजा जर बंद असेल तर तो उघडल्याशिवाय आपण कितीही मेहनत केली, तरी देखील आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार नाही.

मित्रानो एक लाख व्यक्तींपैकी कोणातरी एखाद्या व्यक्तीचा हा धनाचा दरवाजा उघड असतो. आणि एक लाखापैकी नव्याणव हजार नऊशे लोकांना हे माहीतच नाही आहे कि माझे धन चक्र इथे आहे, आणि ते उघडे आहे कि बंद आहे. आणि ज्या व्यक्तीचा धन चक्राचा दरवाजा बंद असतो त्या व्यक्तीचे धन चक्र महालक्ष्मीच्या मंत्रांचा एक करोड जप केल्यानेच उघडू शकतो. परंतु मित्रानो आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्याला एक करोड जप करणे असाध्यप्राय आहे. पण आपल्या तंत्र शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहेत कि, मनुष्याला एक करोड जप करण्याची किंवा पंचवीस वर्ष्यापर्यंत लंगोट घालून हिमालयामध्ये जाऊन तप करण्याची आवश्यकता भासणार नाही. काही क्षणामध्येच हे दरवाजे उघडले जातील असे उपाय सांगितलेले आहेत. आणि जर का हा दरवाजा उघडला गेला कि भाग्याचा दरवाजा उघडला जातो.

आपण अनेक व्यक्तींच्याकडून ऐकले असेल, कि ते म्हणतात माझ्या हाताच्या रेखा फार चांगल्या आहेत. आणि हाताच्या रेखा या हाताच्या तळाव्यामध्ये असतात. लक्ष्मीला घेण्याचे, देण्याचे, लक्ष्मीला मानविण्याचे, तिचे लाड करण्याचे हि सर्व कामे हातानेच करावी लागतात. आणि ज्या व्यक्तीचा हात लक्ष्मीला मिळविण्याचे आकर्षण प्राप्त करतो त्याच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीची कमतरता कधीही होत नाही. आणि मित्रानो आज आम्ही असा उपाय सांगत आहोत ज्या उपायाने आपल्या धनाचे व भाग्याचे दोन्ही दरवाजे उघडतील. व आपल्या आयुष्यातील शिमग्याचे दिवस हि दीपावलीच्या दिवसांमध्ये बदलून जातील. आपले संपूर्ण जीवन सफल होऊन जाईल. हा उपाय आपण अतूट विश्वासाने करायचा आहे.

मित्रानो हा उपाय करून आपल्याला धन रेषेमध्ये स्निग्धता आणून, धन वैभवाचे भंडार भरण्याचा उपाय करायचा आहे. आपण कितीही मेहनत करत असाल, व्यवसायामध्ये अडचणी असतील, नोकरीमध्ये चढ उतार असेल, घरामध्ये पैसे शिल्लक राहत नसतील, एवढेच काय तर घर चालविण्यामध्ये देखील कठीणाई होत असेल, कर्ज चुकविता येत नसेल, कित्येक प्रयोग, पूजाविधी केल्यातरी घरामध्ये शांती राहत नसेल, तर मित्रानो हा उपाय या सर्व समस्यांवर रामबाण आहे. हा उपाय केल्याने आपले कल्याण होणार यात तिळमात्र देखील शंका नाही. मित्रानो काय आपण सव्वा लाख, सव्वा करोड जप करू शकाल, पण प्रकृतीने दया करून आपल्यासाठी एवढी मेहनत केल्याशिवाय लाभ प्राप्त करण्याचे उपाय सांगितलेले आहेत, जे गुप्त आणि रहस्यमयी आहेत. आणि हे रहस्य आज आम्ही उद्घाटित करत आहोत.

आपण हा उपाय बिना संकोच आपल्या सर्व मित्रांना, स्वकीयांना, आप्तेष्टाना आवर्जून सांगा कारण दुसऱ्याचंही भलं होवो हि भावना ठेवणाऱ्याचे सर्वप्रथम भलं होत. मित्रानो एक गोष्ट लक्ष्यात घ्या महालक्ष्मीचा दरवाजा तेव्हाचं उघडेल, जेंव्हा तुमच्या हाताचे धनचक्र उघडे असेल. मित्रानो आपली हातामध्ये निरनिराळ्या चक्रांचे दरवाजे आहेत. आपल्या करंगळी बोटाच्या बरोबर खाली बुध चक्राचा दरवाजा, अनामिक बोटाच्या खाली रवी चक्राचा, मधल्या बोटाच्या खाली शनी चक्राचा व पहिल्या बोटाच्या म्हणजे तर्जनी च्या खाली गुरु चक्राचा दरवाजा असतो. आपल्या अंगठ्याच्या खाली शुक्र चक्राचा दरवाजा व त्याच्या विरुद्ध बाजूला चंद्र चक्राचा दरवाजा म्हणजेच भाग्याचा दरवाजा असतो, आणि तळहाताच्या बरोबर मध्ये दीड इंच व्यासाचे धन चक्र असते. आणि हे धन चक्र जर आपल्याला उघडायचे असेल.

तर मित्रानो अमावास्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे. जर आपण अमावास्येला करत असाल तर अमावस्येदिवशी अथवा पौर्णिमेला करत असाल तर पौर्णिमेच्या दिवशी, आपण दोन रसरशीत लिंबू घ्यायाचे आहेत. व हे लिंबू अशा रीतीने कापायचे आहेत कि त्याचे वरून चार भाग होतील पण खालून तो जोडलेला असेल, त्याचे वेग-वेगळे तुकडे होता काम नयेत. म्हणजे एखाद्या फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे तो लिंबू कापून घ्या. व मग आपण थोडासा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. मित्रानो आम्ही आपल्याला भीमसेनी कापूर घ्यावयास सांगत आहोत कारण काही पदार्थांच्या मिश्रणाने एका विलक्षण अशा वातावरणाची निर्मिती होते.

जसे मध हे रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये मिसळून पिल्याने आपले वजन कमी होईल, आपण बारीक व्हाल व हेच मध रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये मिसळून पिल्याने आपले वजन वाढेल, आपण जाड व्हाल. मित्रानो मध एकाच आहे, पण ज्या वस्तू बरोबर मिसळत, त्याप्रमाणे त्याचे गुणधर्म बदलतात व ते आपल्याला जाड किंवा बारीक करत. याचप्रमाणे लिंबू मध्ये हि एका विलक्षण प्रकारची शक्ती असते. मित्रानो या लिंबाला मॅग्नेट फ्रुट म्हंटलं जात. चुंबक फळ. हे अशा प्रकारचे चुंबक फळ आहे कि आपण नजर किंवा दृष्ट देखील या लिंबानेच उतरवितो, व्यवसायाला लागलेली दृष्ट, लहान मुलांना लागलेली दृष्ट, मोठ्यानं झालेली दृष्ट आपण या लिंबानेच उतरतो. कारण हे प्रत्येक प्रकारच्या नकारात्मक उर्जेला खेचू शकत.

परंतु जेव्हा याच्या मध्ये भीमसेनी कापूर मिसळला जातो, मित्रानो भीमसेनी कापूर म्हणजे शुद्ध कापूर. बाजारामध्ये ज्या कापराच्या वड्या मिळतात त्यामध्ये मेण आणि केमिकल मिसळलेलं असत. या कापराच्या वड्या घ्यायच्या नाही आहेत. शुद्ध कापूर म्हणजेच भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. तो आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये किंवा पूजन सामग्रीच्या दुकानांमध्ये अगदी सहजरित्या मिळून जाईल. तर मित्रानो हा भीमसेनी कापूर घेऊन आपल्याला याचे चूर्ण करायचे आहे. हाताने कुस्करल्याने सहजपणे याचे चूर्ण होते. व आपला हाथ याच्या बरोबर जेवढा रगडला जाईल तेवढी आपल्या हाथामधील एनर्जी वाढते. मित्रानो भीमसेनी कापूर हि एक दैविक वस्तू आहे व ज्या घरामध्ये भीमसेनी कापूर कायम स्वरूपी असतो त्या घरामध्ये संपत्ती असतेच.

हे चूर्ण कापलेल्या लिंबूंमध्ये व्यवस्थित भरायचे आहे. जसे आपल्या घरामध्ये भरली वांगी करताना त्यामध्ये सारण भरले जाते, अगदी त्याप्रमाणे हे चूर्ण लिंबूमध्ये भरायचे आहे. अशा दोन लिंबूंमध्ये आपल्याला हे चूर्ण भरायचे आहे. मित्रानो पुरुष असुदे वा स्त्री असुदे, ज्याला इच्छा आहे कि माझे धन चक्र जागृत होउदे, आणि जेव्हा कधी हि मी हाथ पुढे करेन तेव्हा धनाचं गाठोडं माझ्या हाथामध्ये येऊन पडावं, त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही. तर यंत्रणो लिबांमध्ये भीमसेनी कापूरचे चूर्ण भरल्यानंतर, दोन्ही होतं मध्ये हे लिंबू एक-एक घेऊन, हे लिंबू एक-दोन मिनिटे दाबून धरा. म्हणजे लिंबाच्या रसामध्ये चूर्ण व्यवस्थित मिक्स होईल. आणि मग लिंबाचा जो कापलेला भाग आहे म्हणजे लिंबाच्या पाकळ्यांच्या वरच्या टोकाच्या बाजूने हे लिंबू आपल्या दोन्ही हातांच्या तळहातावर ठेवा व घट्ट दाबून राहा.

अशा प्रकारे हे लिंबू पकडून आपल्याला कमीत कमी अर्धातास व जास्तीत जास्त एकतास बसायचे आहे. आपल्याला जाणवेल कि तळहातामध्ये काही विशेष प्रकारची शक्ती प्रवाह करत आहे. आपल्या तळहाताखालील भागांमध्ये आपल्या नासा फडफडायला लागल्याचे आपल्याला जाणवेल. मित्रानो हा उपाय केल्याने जो दरिद्रतेचा तरंग आपल्या शरीरामध्ये आहे. ते तरंग हे लिंबू खेचून घेतात. आणि लिंबू व भीमसेनी कापराची मिश्रित शक्ती आपला धनाचा जो दरवाजा बंद आहे, ज्याला धनचक्र असे म्हणतात, ज्याला वेल्थ चक्र असे म्हणतात, या चक्राने उघडायला लागते. तर मित्रानो आपल्याला हा उपाय कोणत्याही आमावस्येला किंवा पौर्णिमेला करायचा आहे. हा उपाय एकदा केल्याने हि आपल्या धनाचे दरवाजे उघडतील.

पण जर का आपण हा उपाय आमावस्या-पौर्णिमा, आमावस्या-पौर्णिमा असे सतत बारा वेळा केलात तर कमीत कमी एकहजार आठशे पूर्वजन्मांपासूनचे पहिल्यापासून बंद असलेले सगळे धनाचे दरवाजे उघडायला लागतात. दोन्ही हातामध्ये हे लिंबू घट्ट पकडून ठेवल्याने, हे लिंबू पूर्णपणे तुमच्यातील दारिद्रतेला खेचून घेतो. आपल्याला जाणवेल कि एक अदभुद शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करीत आहे व आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत आहे. हा उपाय करताना आपल्याला जाणवेल कि याचे प्रभाव आपल्या नसांमधून जाऊन आपल्या गळ्यापर्यत प्रभाव करत आहे. यामुळे आपल्या बोलण्यामध्ये विशेष प्रभाव निर्माण होतो. तुम्ही स्वतःला बलवान बनल्याचे प्रतीत करायला लागाल.

मित्रानो हा उपाय करताना शक्यतो दुपारी १२ वाजता करण्याचा प्रयत्न करा कारण दुपारी १२ वाजता दुपाररच्या होर्यामध्ये हे अधिक प्रभावशाली होते. परंतु जर आपल्या कामाला जायचे असेल, ऑफिसला जायचे असेल तर आपण हा उपाय सकाळी उठल्यावर केला तरी चालेल. मित्रानो हा उपाय करून झाल्यावर जे लिंबू आहेत ते एखाद्या झाडाच्या बुंध्याखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावेत. इकडे तिकडे टाकू नयेत कारण या लिंबूने तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा खेचून घेऊन शुभ ऊर्जा तुमच्यामध्ये घातलेली असते. हे लिंबू विसर्जित करून मग आंघोळ करा व मग देवाला नमस्कार करून तुमच्या कामाला सुरवात करा.

तर मित्रानो अशा या लिंबू व भीमसेनी कपूरच्या प्रयोगाने आपल्या धनाचे चक्र जागृत करून महालक्ष्मीची कृपा नक्की मिळविता येते. हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की करून पहा. महालक्ष्मी कृपेने आपल्या आयुष्यात धन, संपत्ती, ऐश्वर्य यांची भरभराट होवो हीच प्रार्थना. धन्यवाद.

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here