एक मुखी लिंबू बनवितो करोडपती

0
1281
nimbu ke totke video

एक मुखी लिंबू बनवितो करोडपती

मित्रांनो आज एक विशेष उपाय आपण पाहणार आहोत. एक असा लिंबू कि जे अक्षरशहा धन पैसा तुमच्याकडे, तुमच्या घराकडे खेचून आणेल. तुम्ही हा लिंबू तुमच्या घरात ठेवू शकता. किंवा तुमचा जर व्यापार असेल, व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, बिझनेस असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हा लिंबू आपण ठेवू शकता.

मित्रांनो हा लिंबू इतका प्रभावशाली मानला जातो की हा लिंबू अक्षरशः पैसे खेचून आणतो. आजुबाजुकची जी शक्ती आहे हि शक्ती या लिंबामध्ये एकत्रित होते. हे शक्तीचं केंद्र बनू शकत. जर विशिष्ट पद्धतीने हा उपाय आपण केला तर.

मित्रांनो आजचा उपाय धन खेचून आणणारा, पैसा खेचून आणणारा आहे. या ठिकाणी आपल्याला बाजारातून एक असं लिंबू खरेदी करायचा आहे की जे एक मुखी असेल. मित्रांनो काही वस्तू अत्यंत दुर्मिळ असतात. दुर्लभ असतात. जस की एकाक्षी नारळ. ज्याला आपण एकाक्षी नारळ असं म्हणतो. एक मुखी नारळ. किंवा दक्षिणावर्ती शंख. मित्रानो या ज्या वस्तू असतात त्या अत्यंत दुर्मिळ असतात. अगदी त्याच प्रकारे एक मुखी लिंबू सुद्धा दुर्मिळ आहे. मात्र जर शोध घेतला, तर ते तुम्हाला अवश्य मिळून जाईल.

मित्रांनो हे एक मुखी लिंबू नक्की कसं असतं. लिंबा मध्ये दोन जाती असतात. एक नर लिंबू आणि दुसरं मादी लिंबू. मात्र ज्या लिंबात नर आणि मादी यांचा एकत्रित पणे आविष्कार झालेला असतो, थोडक्यात अर्धनारी नाटेश्वरा समान जो लिंबू असतो. असा एक मुखी लिंबू, हा एका बाजूला त्याची एक कडा थोडीशी वर आलेले तुम्हाला दिसून येईल. अगदी तुम्ही त्यावर ती हात फिरवला तरी सुद्धा तुम्हाला ती जाणवेल. समोर चित्रात तुम्हाला हा लिंबू दिसून येत आहे. मित्रांनो या लिंबास एक मुखी लिंबू असं म्हणतात.

या ठिकाणी दोन तत्त्वांचा संगम झालेला असतो. प्रकृती आणि पुरुष या ठिकाणी एकत्र आलेले असतात आणि ज्या-ज्या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात, मित्रांनो त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात धन आकर्षण सुरु होत. त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पैसा आकर्षित होऊ लागतो. आता या ठिकाणी आपण नक्की हे लिंबू खरेदी कधी करावं, इथपासून याच्या नियमांच पालन कराव लागत.

मित्रांनो हे लिंबू आपण शुक्रवारच्या दिवशी खरेदी करा. शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता, मात्र सर्वोत्तम जी वेळ आहे, ती आहे सूर्य उगवण्यापूर्वी. म्हणजेच सूर्योदयापूर्वी बारा मिनिटे. आता तुम्हाला समजणार कस की, सूर्योदय कधी आहे. तर मित्रांनो कोणत्याही पंचांगामध्ये किंवा कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईल मध्ये वेगवेगळे ॲप्स मिळतात. त्या ॲप्समध्ये, पंचांगामध्ये आपण पाहू शकता की तुमच्या गावात, तुमच्या भागात शुक्रवारच्या दिवशी सूर्य कधी उगवत आहे. सूर्योदयाची वेळ कोणती आहे. तर ती वेळ पाहून घ्या आणि त्याच्या बारा मिनिटे आधी, म्हणजे बारा मिनिटांच्या आत तुम्हाला हे लिंबू खरेदी करायचा आहे.

मित्रांनो शोधाशोध तर करावी लागेल. जर हे शक्य झालं नाही, तर सूर्योदयापूर्वी एक तास आधी सुद्धा आपण ही खरेदी करू शकता. तर तेही जमलं नाही तर मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी दुपारी बारानंतर, 12 ते 1 च्या दरम्यान सुद्धा आपण हे लिंबू खरेदी करू शकता मात्र शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा आहे.

तीन वेळा मी तुम्हाला सांगितल्या. सूर्योदयापूर्वी बारा मिनिटात, सूर्योदयापूर्वी एक तास आधी आणि दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान. मित्रांनो असा हा लिंबू खरेदी केल्यानंतर कुणालाही न सांगता, अगदी गुप्तपणे आपण हे उपाय करायचे असतात. कुणालाही न सांगता हे लिंबू आपण आपल्या घरात घेऊन यावं. घेऊन आल्यानंतर जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर त्या गंगाजलाने ते स्वच्छ धुऊन काढाव. लक्षात घ्या हे लिंबू खरेदी करताना त्या लिंबा वरती कुठल्याही प्रकारचे डाग असता कामा नयेत. कुठल्याही प्रकारचे डाग धब्बे हे असता कामा नयेत.

पिवळ्या रंगाच लिंबू असायला हव. पिवळ्या रंगाच आणि हो हिरवा रंग कटाक्षाने टाळा. हिरव्या रंगाचा लिंबू घ्यायचा नाहीये. अगदी सोन्या समान चकाकणारं, सोन्या समान तेज कांती असणारं, असं पिवळ्या रंगाचं, डाग विरहित लिंबू आपल्याला घ्यायचा आहे. ज्याची एक कडा वरती आलेली आहे. तर मित्रांनो असं लिंबू खरेदी करून आणल्यानंतर, घरात जर गंगाजल असेल तर गंगाजलाने स्वच्छ धुवा, जर गंगाजल नसेल तर अगदी साध्यासुध्या स्वच्छ पाण्याने सुद्धा आपण ते स्वच्छ धुऊन काढू शकता. धुऊन काढल्यानंतर आपण एका स्वच्छ पाटावरती, आपण पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे. एक स्वच्छ पाठ ठेवायचा आहे. पाटावरती स्वच्छ अशा प्रकारच लाल रंगाचे वस्त्र अंथरायच आहे. आणि त्यावरती हे लिंबू आपण ठेवणार आहोत.

मित्रानो ठेवण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट आपण अवश्य करा, आपल्या उजव्या हातात हे लिंबू घ्या आणि तीन वेळा प्रार्थना करा, तीन वेळा प्रार्थना काय करणार आहोत की दिव्य ऊर्जा बनून आपण माझ्या घरात किंवा माझ्याकडे धन खेचून आणावं.आपण दिव्य ऊर्जा बनून प्रचंड प्रमाणात माझ्या घरात किंवा माझ्याकडे धन खेचून आणावं. पैसे खेचून आणावा. अशा प्रकारे तीन वेळेला आपण हि प्रार्थना करायची आहे आणि त्या नंतर लाल कपड्यावरती आपण हे लिंबू ठेवायचे आहेत.

मित्रानो ठेवल्यानंतर, आपल्या उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने, लक्षात घ्या उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने म्हणजे रिंग फिंगरने या लिंबास आपण सर्वात आधी हळद लावणार आहोत. हळद, हळद थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करा आणि त्या ठिकाणी हळदीचा एक बोट आपण लावायचा आहे. त्यानंतर थोडसं कुंकू आपण लावायचा आहे. मित्रांनो हे जे करंगळीजवळच बोट असतं, त्याला पृथ्वीतत्व युक्त बोट असं म्हणतात. पृथ्वीतत्व युक्त. आणि हे जे पृथ्वीतत्व असत, हे सुद्धा धन खेचून आणण्याचं कार्य करत. आणि म्हणून याच बोटाचा आपण वापर करायचा आहे. आणि अशा प्रकारे हळदी कुंकू लावल्यानंतर, हे लिंबू उजव्या हातात घेऊन आपण त्याला सूर्यप्रकाशात घेऊन जायचं आहे. सूर्यकिरणांमध्ये घेऊन जायचं आहे. सूर्यकिरणात घेऊन गेल्यानंतर, सूर्यकिरणात घेऊन गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी तीन वेळा प्रार्थना करायची आहे.

पुन्हा एकदा, की आपण दिव्य ऊर्जा बनवून प्रचंड प्रमाणात धन आमच्या घरात किंवा माझ्याकडे खेचून आणाव. अगदी तीच प्रार्थना जी आपण यापूर्वी केली होती. मित्रानो ऊन दाखवल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर, आपल्या घरात आपण परत यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं धन ठेवता, पैसे ठेवता, ज्वेलरी दागदागिने ठेवता, त्या ठिकाणी आपण हे लिंबू स्थापित करायचा आहे. एखाद्या स्वच्छ सुंदर कपड्यावरती. जर तुम्ही व्यापारी असाल तर कॅश बॉक्समध्ये हि ठेवू शकता. तिजोरीमध्ये ठेवू शकता, घरामध्ये कपाटात ठेवू शकता, जिथे जिथे तुम्ही धन ठेवता, ठेवत आलेला आहात त्या ठिकाणी ठेवायचा आहे.

आणि दररोज नित्य नियमाने सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळी किंवा संध्याकाळी हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन किंवा स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून मनोभावे हात जोडून दररोज तीन वेळा ही प्रार्थना म्हणायची की, माझ्यासाठी आपण धन खेचून आणा, माझ्यासाठी आपण धन, पैसा खेचून आणा. तीन वेळा प्रार्थना करायची आहे. मित्रांनो हे एक मुखी लिंबू आपल्या जीवनातील गरिबी,दरिद्रता, कंगाली दूर करील, आपल्या मेहनतीचे फळ आपणास नक्की प्राप्त करून देईल. व्हिडीओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद!

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here