रावण संहितेचे हे उपाय रातोरात आपलं भाग्य बदलतात

0
65
ravan samhita totke

रावण संहितेचे हे उपाय रातोरात आपलं भाग्य बदलतात

मित्रानो आम्ही आपल्याला आज रावण संहिते मध्ये लिहिलेले असे काही तांत्रिक उपाय सांगणार आहोत कि जे उपाय केल्याने, रातोरात तुमचं भाग्य बदलून जाईल. रावण संहितेमधील या तांत्रिक उपायांनी रातोरात आपलं भाग्य बदलून जात.

भारतीय इतिहासामध्ये रावणाला प्रकांड पंडित आणि समस्त शास्त्रांचा जाणकार असं मानलं गेलेलं आहे. रावणाने जोतिष, तंत्र-मंत्र अशा विषयांवर अनेक ग्रंथांची रचना केली होती. यातीलच एक रावण संहिता हा ग्रंथ आहे. रावण संहितेमध्ये जोतिष आणि तंत्र शास्त्राच्या माध्यमातून भविष्य जाणण्याचे कैक रहस्य सांगितलेले आहेत. या ग्रंथामध्ये मोठ्यात-मोठ्या दुर्भाग्याला हि सौभाग्यामध्ये बदलण्याचे तांत्रिक उपाय सांगितलेले आहेत. या उपायांचा परिणाम अगदी कमी कालावधी मध्ये होतो व मनुष्याचे भाग्य रातोरात बदलून जाते.

चला तर मग जाणून घेऊया रावण संहितेमधील असे काही तांत्रिक उपाय. मित्रानो रावण संहितेनुसार सर्वाना वश मध्ये करण्यासाठी, संमोहित करण्यासाठी आणि त्यांना आपल्या मनासारखे कार्य करायला लावण्यासाठी मदार वृक्षच्या ज्याला इंग्रजीमध्ये कैलोट्रिपोस जाइगैन्टिया किंवा हिंदी मध्ये आकडे का पौधा असे हि म्हणतात तर या मदरच्या झाडाची पांढरी फुले घेऊन ती सावलीमध्ये सुकवावीत. व त्यानंतर पूर्ण पणे पांढऱ्या रंगाच्या देशी गाईचे दूध घेऊन हि फुले त्या दूधसंगे वाटून घ्यायची आहेत. पिसून घ्यायची आहेत. व या पेस्ट चा आपल्याला आपल्या कपाळी टिळक लावायचा आहे. असे करण्याने त्या व्यक्तीचे समाजामध्ये वर्चस्व वाढते.

दुसरा उपाय वशीकरणासाठी,  शास्त्रानुसार दुर्वा फार चमत्कारी असते. दुर्वा म्हणजे गणेश पूजनामध्ये ज्या आपण गणेशाला वाहतो त्या दुर्वा. या दुर्वांचा वापर कैक प्रकारच्या उपायांमध्ये केला जातो. जर कोणी व्यक्ती पांढऱ्या दुर्वा

पूर्ण पणे पांढऱ्या रंगाच्या देशी गाईच्या दुधामध्ये पिसून घेईल , आणि त्याचा टिळक लावेल, तर तो कोणत्याही कामामध्ये असफल होत नाही.

जर आपण घर, समाज किंवा ऑफिसमधील लोकांना आकर्षित करू इच्छिता, तर बेलपत्र आणि बिजोरि लिंबू घेऊन ते बकरीच्या दूधसंगे पिसून घ्या व त्याचा टिळक लावा. असे करण्याने व्यक्तीचे आकर्षण वाढते. तसेच अपामार्गच्या बिया बकरीच्या दूधसंगे पिसून घ्या व त्याचा लेप बनवा. अपामार्ग हि एक भारतीय आयुर्वेदिक वनस्पती आहे. तर हा लेप लावल्याने त्या व्यक्तीचे समाजामधील आकर्षण खूप वाढते. सर्व लोक त्या व्यक्तीचे बोलणे मानू लागतात.

तिसरा उपाय गाडलेले धन मिळविण्यासाठी. जर आपल्याला असे वाटते कि कुठल्यातरी विशिष्ट अशा जागी गाडलेले धन आहे आणि आपण ते धन प्राप्त करू इच्छिता, तर हा उपाय करा. गाडले गेलेल्या धनाचे दर्शन होण्याचा विधी अशा प्रकारचा आहे. एखाद्या शुभ दिवशी या मंत्राचा जाप हजारोंच्या संख्येत करा. मंत्र आहे || ओम नमो विघ्नविनाशाय निधी दर्शन कुरु कुरु स्वाहा || मंत्र पुन्हा एकदा सांगतो || ओम नमो विघ्नविनाशाय निधी दर्शन कुरु कुरु स्वाहा || मंत्र सिद्ध झाल्यानंतर ज्या ठिकाणी धन गाडलेले आहे असे आपल्याला वाटते त्या स्थानावर , त्या ठिकाणी आपण धोतऱ्याचे बी,  हलाहल, पांढरी गुंजा, गंधक, मैनसील, घुबडाची विष्टा आणि शिरीष वृक्षाचे पाच अंग ज्याला आपण (शिरस, शिरीस, चिचोळा) असेही म्हणतो. या सर्वगोष्टी आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानांमध्ये मिळून जातील. तर या सर्व वस्तू आपण सम प्रमाणात घ्यायच्या आहेत आणि या वस्तू मोहरीच्या तेलामध्ये म्हणजेच सरसोच्या तेलामध्ये शिजवायचा आहेत. यानंतर ह्या सामग्रीने गाडलेले धन शंकित  असलेल्या जागेवर धूप-दीप लावून ध्यान करा. असे करण्याने त्या जागेवरील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती तिथून नाहीश्या होतील. भूत-प्रेतांचे भय समाप्त होईल. साधकाला जमिनीमध्ये गाडलेले धन दिसायला लागेल. लक्ष्यात ठेवा तांत्रिक उपाय करताना, कोणत्याही तज्ज्ञ जोतिष्याचा सल्ला जरूर घ्यावा नाहीतर हानी देखील होऊ शकते.

चौथा उपाय अचानक, जलद धन प्राप्त करण्यासाठी. जर कोना व्यक्तीला धन प्राप्त करण्यामध्ये सारखे अडथळे येत असतील तर त्याने हा उपाय करायला हवा. हा उपाय ४० दिवसांपर्यंत सातत्याने केला पाहिजे. हा उपाय आपण आपल्या घरामध्येच करू शकता. उपायावर धन प्राप्ती मंत्राचे दर-रोज १०८ वेळा जप करायचा आहे. या मंत्राचा जप नियमित केल्याने काही दिवसातच महालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि आपल्या धन प्राप्तीच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर होतील. मंत्र आहे. || ओम सरस्वती ईश्वरी भगवती माता क्रां क्लीं, श्रीं श्रीं मम् धनं देही फट स्वाहा ||

पाचवा उपाय अडकलेले धन मिळविण्यासाठी. कोणत्याही शुभ मुहूर्ताला किंवा कोणत्याही शुभ दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे व स्नानादी नित्य कर्मातून निवृत्त होऊन, कोणत्याही पवित्र नदीच्या किंवा जलाशयाच्या किनारी जायचे आहे. व तिथे एखाद्या शांत आणि एकांत स्थानी एखाद्या वृक्षाखाली चामड्याचे आसन अंथरावे, आणि या आसनावरती बसून धन प्राप्ती मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप आपल्याला २१ दिवसापर्यंत करायचा आहे. मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षच्या माळेचा उपयोग करावा. २१ दिवसांमध्ये अधिकाधिक संख्येत या मंत्राचा जप करावा. जसे हा मंत्र सिद्ध होईल तसे आपल्यासाठी धन प्राप्तीचे योग्य बनायला लागतील. मंत्र आहे || ओम ह्रीं श्रीं क्लीं नम: ध्व: ध्व: स्वाहा ||

सहावा उपाय देवतांचे कोशा-अध्यक्ष कुबेराची संपत्ती प्राप्त करण्यासाठी. जर आपण देवतांचे कोशा-अध्यक्ष कुबेराच्या कृपेने विपुल धन, संपत्ती मिळवू इच्छिता, तर हा उपाय करावा. उपाययानुसार या मंत्राचा जप आपल्याला तीन महिन्यांपर्यंत करायचा आहे. दर रोज मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे, मंत्रजप करताना आपल्या जवळ धनलक्ष्मी कवडी ठेवावी. जेंव्हा तीन महिने पूर्ण होतील, तेव्हा हि कवडी आपल्या तिजोरीमध्ये किंवा  जिथे आपण पैसे ठेवता, तिथे हि कवडी ठेवावी. या उपायाने आयुष्यभर आपल्याला पैश्यांची कमतरता भासणार नाही. मंत्र आहे || ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय, धन धन्याधिपतये धन धान्य समृद्धि मे देहि दापय स्वाहा ||

सातवा उपाय, दिवाळीच्या रात्री हा उपाय करायचा आहे. या उपायाने एका वर्षातच घरातील  धनाचे भांडार भरतील. यासाठी एखाद्या शुभ मुहूर्तावर, जसे दिवाळी, अक्षय तृतीया किंवा होळी च्या रात्री हा उपाय केला गेला पाहिजे. दिवाळीच्या रात्री हा उपाय श्रेष्ठ फळ देतो. या उपायानुसार दिवाळीच्या रात्री, कुंकवाने किंवा अष्टगंधाने थाळी किंवा आपण ज्याला ताट अथवा प्लेट म्हणतो. तर या थाळीवर हा मंत्र लिहायचा आहे. व या मंत्राचा जप करायचा आहे. स्वच्छ आसन अंथरून घ्या, व या आसनावर बसून रुद्राक्षच्या माळेने किंवा कमळ गट्ट्याच्या माळेने  मंत्र जप करावा. मंत्राची संख्या कमीत-कमी १०८ असायला हवी. आणि जास्तीत जास्त आपल्या श्रद्धेनुसार करू शकता. या उपायाने महालक्ष्मीचीकृपा आपल्या घरावर बरसेल. मंत्र आहे || ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी, महासरस्वती मम् गृहे आगच्छ आगच्छ ह्रीं नमः ||

आठवा उपाय अफाट संपत्ती प्राप्त करण्यासाठी. जर आपल्याला असे वाटते कि दही दिशातून आपल्याला पैसे मिळावेत. दशॊ-दिशातून संपत्ती आपल्याकडे यावी तर हा उपाय करावा. हा उपाय दिवाळीच्या दिवशी करायला हवा. दिवाळीच्या दिवशी विधी विधानपूर्वक महालक्ष्मीचे पूजन करावे व रात्री लवकर झोपायला जावे. आणि आंथरुणामध्ये पडल्यानंतर या मंत्राचा जप करावा. मंत्र जप करून झाल्यावर दाही दिशांना दहा-दहा वेळा फुंकर मारावी. या उपायाने साधकाला दिशांनी पैश्याची प्राप्ती होते. व झोपून जा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा. झोपेतून जगल्यानंतर लगेच पलंगावरून उतरू नका. प्रथम या मंत्राचा १०८ वेळा जप करा. मंत्र आहे  || ओम नमो भगवती पद्म पद्मावती ओम ह्रीं ओम ओम पूर्वाय दक्षिणाय उत्तराय आश पुरय सर्वजण वश्य कुरु कुरु स्वाहा ||

मित्रानो मंत्र कसलेही असोत, हसे वैदिक असोत, शाबर असोत किंवा तांत्रिक असोत सर्वामध्ये श्रद्धेला फार महत्व आहे. तर आपल्या इष्ट देवावर आणि मंत्रांवर पूर्ण श्रद्धा ठेवून हे उपाय केले तर निश्चितच आपल्याला याचे पूर्ण फळ प्राप्त होईल. तर रावण संहितेतील काही दुर्लभ व अचूक उपाय आम्ही याठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. नक्की करून पहा.

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here