Home Tech Entertainment राधेः तुमचा मोस्ट वॉन्टेड भाई

राधेः तुमचा मोस्ट वॉन्टेड भाई

राधेः तुमचा मोस्ट वॉन्टेड भाई
जर परिस्थिती सुरक्षित असेल तर २०२१ च्या ईद ला राधेः तुमचा मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना असल्याचे सलमान खानने आपल्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त केलेल्या कार्यक्रमामध्ये घोषित केले. प्रभुदेवा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यावर्षी 22 मे रोजी उत्सवांच्या च्या दरम्यान राधे हा चित्रपट भारतामधील सिनेमागृहामध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला.

चित्रपटाच्या टीम ने सांगितले कि आम्ही मागील वारशाच्या ईद ला चित्रपट प्रदर्शित करण्याचे संकेत दिले होते पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यामध्ये बदल करण्यात आला व आता सर्व काही ठीक चालले तर या वर्षीच्या ईद ला हा चित्रपट आम्ही प्रदर्शित करू, पण राधे हा चित्रपट प्रदर्शित करणे महत्वाचे नसून प्रेक्षकांचे आरोग्य महत्वाचे आहे, जेंव्हा राधे चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा प्रत्येकजण चित्रपटगृहांमध्ये सुरक्षित असावा. असे चित्रपटाच्या कलाकारांनी आवर्जून सांगितले.

सलमान खान चे चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपर हिट होणारच याची खात्री निर्मात्यांना असते. जरी एखाद्यावेळी समीक्षकांनी चित्रपटावर हरकत घेतली असली तरी देखील तो चित्रपट सहजपणे १०० करोड क्लबमध्ये समाविष्ठ होतो. त्याचे चित्रपट पटकन व मोठ्या किमतीने विकले जातात, इतकेच नव्हे तर कोरोना सारख्या महामारीच्या काळात संपूर्ण मार्केटची परिस्थिती बिकट असताना देखील सलमानचे चित्रपट मोठ्या किमतीने विकले गेले आहेत.

एका वेबसाईट च्या अहवालानुसार सलमान खानने त्याच्या राधे या चित्रपटाचे हक्क झी स्टुडिओला २३० करोड रुपयांना विकले आहेत. प्राप्त सूत्राच्या माहिती नुसार सलमान खानने राधे या चित्रपटाचे उपग्रह प्रक्षेपण व चित्रपटगृह (भारत आणि परदेश ) प्रक्षेपणाचे तसेच डिजिटल व संगीताचे हक्क झी स्टुडिओला २३० करोड रुपयांना विकले आहेत, कोविड काळातील ही सर्वात मोठी डील आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये सलमान खानने राधेचे शूटिंग पूर्ण केली असून यात दिशा पटानी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन प्रभु देवा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read