वास्तुशास्त्रा नुसार या दिशेला घड्याळ लावल्याने नशिबाची दारे उघडतील
मित्रांनो आपल्या घरामध्ये आपण ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येक वस्तूचा प्रभाव हा घरात राहणाऱ्या लोकांवरती पडत असतो काही वस्तू शुभ प्रभाव दाखवतात तर काही वस्तू मात्र अशुभ प्रभाव दाखवतात. मित्रांनो खरे तर प्रत्येक वस्तूची एक योग्य दिशा वास्तुशास्त्रामध्ये ठरवलेली आहे. जर ती वस्तू त्या योग्य दिशेला ठेवलेली असेल तर तिच्यापासून सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होतात, शुभ प्रभाव आपल्याला दिसून येतात. उलट जर एखादी वस्तू वास्तू शास्त्रानुसार चुकीच्या दिशेला ठेवलेली असेल, तर मात्र त्या वस्तू पासून मिळणारे प्रभाव हे नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह असतात. मित्रांनो आपल्या घरामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तू म्हणजे आपल्या घरातील देवघर. आपल्या घरात असणारे घड्याळ कॅलेंडर. या काही अत्यंत महत्वाच्या वस्तू आहेत.
मित्रांनो आज आपण घड्याळाचं वास्तुशास्त्र पाहणार आहोत. मित्रांनो आपलं जीवन सुद्धा निश्चित वेळेमध्ये बांधलेला आहे आणि आपली जी वेळ आहे ही वेळ आपल्या घरात लावलेल्या घड्याळाशी खूप मोठ्या प्रमाणात कनेक्टेड असते, जोडलेली असते. तर हे घड्याळ चुकीच्या दिशेला तुम्ही लावलेला असेल तर मित्रांनो निश्चितच त्यापासून नकारात्मक परिणाम प्राप्त होतात. अनेक जणांच्या जीवनामध्ये दुर्भाग्य आपल्याला दिसून येतं. कोणतेही काम करा, त्या कामांमध्ये अपयश मिळत. कितीही मेहनत करून पैसा येत नाही यालाच आपण दुर्भाग्य असं म्हणतो. मित्रानो कदाचित तुमचही दुर्भाग्य तुमच्या घरातील घड्याळाशी जोडलेलं असू शकत. काहींच्या जीवनामध्ये अनंत प्रकारचे अडथळे येतात, कुटुंबीयांमध्ये भांडणे लागतात. घरातील लोक एकमेकांशी वैर भावाने वागू लागतात. मित्रांनो याचाही संबंध चुकीच्या दिशेला लावलेल्या घड्याळाशी असू शकतो तर जाणून घेऊया कि वास्तू शास्त्रानुसार आपण घड्याळ नक्की कोठे लावाव आणि घड्याळाशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाचे नियम कसे पाळावेत. मित्रांनो सुरुवात करू यात दक्षिण दिशे पासून. दक्षिण दिशा ही दिशा ही मृत्यूची दिशा समजली जाते. दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यम राज यांची दिशा आहे आणि म्हणून मित्रांनो आपण
या दक्षिणेच्या भिंतीवरती आपल्या घरातलं घड्याळ लावू नका. यामुळे आपल्या घरात यम देवाचा प्रभाव वाढू लागतो. घरामध्ये आकस्मिक मृत्यू सुद्धा घडून येऊ शकतात. कारण हि मृत्यूची दिशा आहे. दुसरा परिणाम म्हणजे दक्षिण दिशा ही स्थिरत्वाची आहे. स्थिरत्व म्हणजेच आपली जी काही वाटचाल चालू असते ती अचानक थांबते, आपली प्रगती थांबते, आपल्या वाटचालीमध्ये अनेक समस्या येतात, अनेक अडथळे येतात. तुम्ही पाहिले असेल की चालू काम कधी कधी थांबून जातात, कामांमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि मग अपयश पदरी पडतात मित्रांनो दक्षिण भिंतीवरती जर आपण घड्याळ लावला असेल तर त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते आपली वाटचाल थांबते. आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातील जो करता व्यक्ती असतो मग ती पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे असुदे, तर त्या कर्त्या व्यक्तीसाठी दक्षिण भिंतीवर लावलेलं घड्याळ हे अत्यंत हानिकारक ठरतं, या कर्त्या व्यक्तीचं आरोग्य वारंवार बीघडू लागत. आणि म्हणून चुकूनही आपण दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीवर घड्याळ लावू नका. मित्रांनो दक्षिणी प्रमाणेच दुसरीची दिशा आहे ती आहे पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरातील घड्याळ लावू नये. पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा आहे. आणि सूर्यास्त म्हणजे ज्या दिशेला सूर्य मावळतो ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा. मित्रांनो सूर्य मावळे म्हणजेच सूर्य बुडतो
अगदी त्याचप्रमाणे जर पश्चिम दिशेला पण घड्याळ लावलेले असेल तर त्यामुळे आपला काळ ,आपली वेळ सुद्धा बुडू शकते. वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात जर आपण ण पश्चिमेला असणाऱ्या भिंतीवरती घड्याळ लावलं तर मित्रांनो पश्चिम दिशा ही काळाची दिशा म्हणून ओळखली जाते आणि म्हणून या दिशेला आपण चुकूनही घड्याळ लावू नका. काही जणांच्या घरातील घड्याळ ही बंद पडलेली असतात एकापेक्षा जास्त घड्याळ असतात, अवश्य असावेत मात्र हि जी घड्याळ आहेत, हि चालू स्थितीत असावीत ती बंद पडलेली नसावीत. घरामध्ये जितकी घड्याळ आहेत ही सर्वच्या सर्व घड्याळ एक सारखी वेळ दर्शवणारी हवी. एक घड्याळ पुढे आणि दुसरे घड्याळ जर मागे असेल तर मित्रांनो कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रेस वाढतो, ताण तणाव वाढतो. तुम्ही या गोष्टी करून पहा. जर तुमचा विश्वास नसेल तर घरातील जी घड्याळ आहे ती मागे पुढे करुन पहा. काही दिवसातच घरातील लोकांमध्ये वादविवाद सुरू होतात विनाकारण मनावरती एक प्रकारचा ताण तणाव दिसून येतो आणि म्हणून सर्व घड्याळ समान वेळ दर्शवणारी असावीत ती बंद पडलेली अजिबात नसावेत जी घड्याळ खराब झालेले आहेत ही घड्याळ तात्काळ दुरुस्त करावीत किंवा जर ती दुरुस्त होत नसतील तर ती बाहेर फेकावित बंद पडलेली घड्याळ किंवा
फुटलेली घड्याळ, ज्याची काच फुटली आहे, अशी फुटलेली घड्याळ ही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जीचा ह्रास करतात, पॉझिटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात यामुळे कमी होते आणि लक्षात घ्या ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जीचा ह्रास होतो त्याठिकाणी निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक उर्जा प्रवेश करते आणि मित्रानो ज्या ज्या ठिकाणी नकारात्मक उर्जा असेल तिचा प्रभाव आपल्यावर ती पडून घरांमध्ये नकारात्मक गोष्टी वाढवू लागतात. आणि म्हणून ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या सोबतच वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे सुद्धा आपण घड्याळ लावू नये मित्रांनो हा दरवाजा वारंवार उघडला जातो बंद केला जातो आणि जी वस्तू वारंवार चालू किंवा बंद होते अशा वस्तू च्या पाठीमागे घड्याळ लावल्याने आपल्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात परिणामी कुटुंबातील सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य खराब होतं मनावरती विनाकारण स्ट्रेस वाढू लागतो आणि म्हणून मुख्य दरवाजाच्या पाठीमागे येऊन घरातील इतर दरवाजे, जे कधी ना कधी तरी उघडले किंवा बंद केले जातात त्यांच्या पाठीमागे आपण घड्याळ लावू नये. दरवाजा प्रमाणेच आपलं जे मुख्य गेट आहे या मुख्य गेटवर सुद्धा घड्याळ लावन हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचं मानलं जातं घड्याळाच्या आकाराबद्दल सुद्धा अनेक लोकांना शंका असते आणि खूप वास्तुतज्ञ असं म्हणतात की घरामध्ये गोलाकार घड्याळ असावं अगदी बरोबर आहे गोलाकार घड्याळ अत्यंत अशुभ मानलं जातं किंवा
जे अंडाकार घड्याळ आहे घड्याळ आहे, अंडाकार घड्याळ त्याला आपण ओव्हल शेप असं देखील म्हणतो. तर
हि अंडाकार घड्याळ सुद्धा चालू शकतात. मात्र चौकोनी आकाराचं घड्याळ घरांमध्ये आपण चुकूनही लावू नये. रंगांच्या बाबतीत वास्तुशास्त्र असे मानत की घड्याळाचा जो रंग आहे, घड्याळाचा म्हणजे त्याची जी डाईल आहे, घड्याळाच्या काट्यांच्या मागचा जो पृष्ठभाग आहे त्याला आपण डाईल असे म्हणतो. तर घड्याळयाची डाईल हि कधीही काळ्या रंगाची नसावी. काळा रंग हा मूलतः मुळात हा अशुभ मानला जातो आणि घड्याळाच्या बाबतीत हा रंग कधीही वापरू नये जे शुभ रंग आहेत त्यामध्ये सोनेरी रंग सर्वात शुभ मानला जातो होय गोल्डन कलर अत्यंत अशुभ मानला जातो त्यानंतर पिवळा रंग पांढरा रंग आणि लाल रंग हे चार रंग घड्याळ साठी अत्यंत शुभदायक मारली जातात आणि त्यातल्या त्यात सोनेरी कलर अत्यंत शुभदायक आहे मित्रांनो घड्याळामध्ये जे काटे आहेत या काट्यांच्या बाबतीत हे काटे अति तीक्ष्ण म्हणजे टोकदार नसावेत, अणुकुचीदार नसावेत. ते सौम्य असतील तर अत्यंत चांगलं. मित्रानो अनेक घड्याळांना बेल असते तर या बैल मधून कर्कश आवाज बाहेर पडता कामा नये सुमधुर आवाज सुंदर अशा प्रकारचा आवाज त्यातून बाहेर पडावा कारण कर्कश आवाज हा आपल्या घरातील स्वास्थ्य बिघडवतो आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे घड्याळ नक्की कुठे लावाव.
मित्रांनो शुभ परिणाम घडवून आणण्यासाठी भाग्योदय होण्यासाठी आपलं नशीब चमकवण्यासाठी आपण घड्याळ लावताना, तीन दिशा मी या ठिकाणी सांगत आहे, कोणत्याही दिशेला आपण घड्याळ लावू शकता जशी आपली गरज आहे त्याप्रमाणे आपण दिशा निवडा आपण एकदा लावलेला घड्याळ हे वारंवार बदलू सुद्धा शकता. जशी आपली गरज पडेल गरज निर्माण होईल त्या प्रकारे मित्रांनो पहिली शुभ दिशा आहे पूर्व दिशा पूर्व दिशेचे वैशिष्ट्य असं की पूर्व दिशेला जर आपण घड्याळ लावलं पूर्व दिशा म्हणजे पूर्व दिशेला ची भिंत आहे त्या भिंती वरती जर आपण घड्याळ लावल, तर मित्रांनो त्यामुळे वातावरण शुभदायक बनत. वातावरणामध्ये शुभता येते. आपल्या घरामध्ये सर्व शुभ गोष्टी घडू लागतात आणि घरातील लोकांमध्ये प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढीस लागतं आणि म्हणून पूर्व दिशा ही सुखाची दिशा आहे आपल्या घरामध्ये सुख सौभाग्य आणणारी दिशा आहे. दुसरी दिशा आहे ती आहे उत्तर दिशा ज्यांना व्यापारामध्ये नोकरीमध्ये प्रचंड प्रगती करायचे आहे ज्यांना भरपूर धन संपत्ती हवी आहे, त्यांनी उत्तर दिशेला घड्याळ लावाव, कारण उत्तर दिशेला लावलेलं घड्याळ हे आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे नवनवीन युग निर्माण करतात आपल्याला अशा अनेक संधी चालून येतील, कि ज्या संधींचा
आपण अचूक वापर केला तर आपली प्रगती निश्चित होईल आणि मित्रांनो तिसरी दिशा आहे ती आहे ईशान्य दिशा ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या दरम्यानची यांच्यामधली दिशा. तर मित्रांनो या ईशान्य कोपऱ्यावर जर आपण घड्याळ लावलं तर आपल्या घरातील जो पैसा आहे तो निष्कारण खर्च होत नाही विनाकारण खर्च होत नाही. कधी-कधी असं होत कि नको त्या गोष्टींवर पैसा खर्च होतो. घरामध्ये वारंवार लोक आजारी पडतात किंवा इतर अशा काही घटना घडतात की पैशाला वाट फुटते, पैशाला पाय फुटतात तर तुमच्या घरातली हि पैसा अशा प्रकारे विना कारण बाहेर जात असेल तर मित्रांनो ईशान्य दिशेला आपण घड्याळ लावून पहा पैसा घरामध्ये टिकून राहील पैसा टिकून राहील तर मित्रांनो घड्याळ यासंबंधी आपल्या अजूनही काही शंका असतील प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट मध्ये अवश्य विचारा प्रत्येक कॉमेंट्स विचार करून एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी लवकरच आणला जाईल तर व्हिडिओ आवडला तर कृपया लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या कर्म बंधन या मराठी यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका याबरोबरच धन्यवाद!
||ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ||