या एका उपायाने मातृदोष, पितृदोष व घराण्याचा दोष संपेल.
नमस्कार मित्रानो, आपल्यापैकी अनेक जणांना आपापल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रत्येकाची समस्याही सारखीच असते असे नाही. कोणाला आर्थिक समस्या असतील तर कोणाला वैवाहिक. कोणाला आरोग्यविषयीच्या समस्या असतील तर कोणाला त्यांच्या व्यवसाय, उद्योगाशी संबंधीत समस्या असतील. आपण या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील असता. काहींच्या समस्यांचे निराकरण होते, तर काही जणांना या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मार्गच मिळत नाहीत. व मग आपण अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी, ह्या समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करायला लागतात. त्यातूनच मग काहीजण जोतिष शास्त्राचा आधार घेण्याचं ठरवितात.
मित्रानो जोतिष शास्त्र हे फार उन्नत असं शास्त्र आहे. आपल्या पूर्वजांनी, अनेक साधुसंतांनी, ऋषी मुनींनी हजारो वर्षांच्या ध्यान धारणेतून, तप साधनेतून व पिढ्यान पिढ्यांच्या निरीक्षणातून भगवंताच्या कृपेने , ज्योतिष शास्त्र अवगत केलेले आहे. व तुमच्या समस्यांच्या निराकरणासाठी जोतिष शास्त्र अगदी सक्षम आहे.
पण जेव्हा आपण आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे उपाय जाणून घेण्यासाठी जोतिष विद्येशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींकडे जातो, किंवा पंडित असतील, भटजी असतील किंवा आपण ज्यांना जोतीशी म्हणतो. या व्यक्ती आपल्याला वेगवेगळ्या समस्येसाठी वेगवेगळ्या पूजा विधी करायला सांगतात. व या पूजा विधी कधी तुमच्या राहत्या ठिकाणीच करावयाच्या असतात तर कधी एकाद्या विशिष्ट धार्मिक स्थळी जाऊन करायच्या असतात.
मग आधीच अडचणीत असलेल्या व्यक्तीला त्या पूजाविधीचा खर्च, त्या धार्मिकस्थळी जाण्या-येण्याच्या खर्च, पूजेसाठी लागणारे साहित्य अशा अनेक खर्चाना तोंड द्यावे लागते.
तर मित्रानो आज आपण अशाच काही पूजा विधी, ज्या आपल्याला करण्यास सांगितलेल्या असतात, त्यांचे अगदी साधे, सोपे, अल्पखर्चात व सोईनुसार होणारे उपाय पाहणार आहोत. अनेकांना सांगितलेले असते कि तुम्हाला मातृदोष आहे, पितृदोष आहे, तुमच्या घराण्याला श्राप आहे, घराणे दोष आहे. व हा दोष घालविण्यासाठी, शांत करण्यासाठी. या-या विधी करा, या-या पूजा कराव्या लागती. तर मित्रानो आज आम्ही मातृदोष निवारण, पितृदोष निवारण व घराण्याचा दोष, हे दोष समूळ संपविण्यासाठी काही साधे, सोपे व सहजरित्या करता येणारे उपाय सांगत आहोत.
मित्रानो हे जे उपाय आज आम्ही सांगत आहोत हे उपाय, ज्यांना दोष आहेत त्यांनी तर करायचेच आहेत पण ज्यांना दोष नाहीत त्यांनीही केलेतरी चालतील. चला तर जाणून घेऊया पहिल्या दोष विषयी. मित्रानो अनेकजणांना सांगितले जाते कि तुम्हाला मातृदोष आहे. तर या मातृदोष निवारणासाठी पहिला उपाय, मित्रानो आपल्या पैकी अनेक जण कित्येकवेळा कोणत्या-नकोणत्या वेळी समुद्र किनारे गेले असतील किंवा जाणार असतील. आयुष्यामध्ये लोक एकदातरी समुद्र किनारी जातातच. तर जेंव्हा तुम्ही समुद्र किनारी जल व त्या दिवशी रविवार असेल. लक्ष्यात ठेवा त्या दिवशी रविवार असायला हवा. तर रविवारच्या दिवशी समुद्र किनारी जाताना आपल्याला एक खण आणि नारळ घ्यायचा आहे. मित्रानो खण म्हणजे दिवीची ओटी भारतात ते साहित्य. म्हणजे त्यामध्ये एक हिरवे ब्लाउज पीस असावे, एक नारळ व विड्याची पान आणि सुपारी. हि खण, हे ओटीच साहित्य आपण मातृदोषासाठी समुद्राला वाहायचे आहे. व हे ओटीच साहित्य वाहत असताना, आपण बोलायचे आहे, सर्व मातृदोष निवारणार्थ स्वाहा. सर्व मातृदोष निवारणार्थ स्वाहा असे म्हणत आपण हि ओटी समुद्राला वाहायची आहे. व आपण आणि आपल्या सोबत जर आल्या घरातील कोणी व्यक्ती तुमच्या बरोबर असतील, तर सगळ्यांनी मिळून समुद्राला नमस्कार करा. या ओटीद्वारे माझ्या घराण्यातील जेवढे मातृदोष आहेत, म्हणजे आईचे, तिच्या आईचे अशा रीतीने, या सर्व दोषांचा मी स्वाहाकार केलेला आहे. जर ब्लाउज पीस समुद्राला ना वाहता, एखाद्या गरीब स्त्रीला दिले तरी चाले. पण नारळ आणि विड्याची पान व सुपारी हे मात्र नक्की समुद्राला वाहायचे आहेत. हा उपाय आपल्याला आयुष्यामध्ये एकदाच करायचा आहे. या उपायाने आपला मातृदोष समूळ नष्ट होतो.
मित्रानो दुसरा उपाय आहे पितृदोषासाठी. मित्रानो अनेकजणांना सांगितले जाते कि तुम्हाला पितृदोष आहे. तर या पितृदोष निवारणासाठी, मित्रानो आपण सोमवारी शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि शंकराच्या मंदिरामध्ये जात असताना आपल्या भगवान शंकरांच्या पिंडीवरती, शिवलिंगावरती वाहण्यासाठी काही साहित्य घेऊन जायचे आहे. तर हे साहित्य आहे, आपण एक पांढरे कापड घ्यावे, अगदी पांढरा हातरुमाल घेतला तरी चालेल किंवा पंचा घेतला तरी चालेल. . या नंतर ११ बेल पत्र म्हणजे बेलाची पाने, बेल फळ मिळाले तर फारच उत्तम होईल. या नंतर भस्म व कपूर. हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला शिवलिंगावर वाहायचे आहे. व हे साहित्य वाहत असताना आपल्या ला भगवान शंकरांना सांगायचे आहे सर्व घराण्याचा पितृ दोष निवारणार्थ मी हा विधी करत आहे. व सर्व पितृदोष निवारणार्थ स्वाहा असे म्हणत हे साहित्य शिवलिंगावर वाहायचं आहे. व आपण आणि आपल्या सोबत जर आल्या घरातील कोणी व्यक्ती तुमच्या बरोबर असतील, तर सगळ्यांनी मिळून शिवलिंगाला नमस्कार करा.हा उपाय आपल्याला आयुष्यामध्ये एकदाच करायचा आहे. या उपायाने आपला पितृदोष समूळ नष्ट होतो.
मित्रानो तिसरा उपाय आहे घराण्याच्या दोषांसाठी. मित्रानो अनेकजणांना सांगितले जाते कि तुम्हाला घराण्याचा दोष आहे, तुमच्या घराण्याला कोणीतरी श्राप दिला आहे, तुमच्या घराण्याला कोणतातरी दोष लागला आहे. तर या घराण्याच्या दोष निवारणासाठी, मित्रानो जर काळी गाय तुमच्या पाहण्यात असेल किंवा तुमच्या परिचयाच्या एखाद्या व्यक्तीकडे काळ्या रंगाची गाय असेल. किंवा आपल्या शहरामध्ये, गावामध्ये बऱ्याच वेळा मंदिर परिसरामध्ये किंवा एखाद्या धार्मिक स्थळी गाई फिरत असतात. व त्यामध्ये एखादी काळी गाय असेल. तर त्या दिवशी काळ्या गाईला आपण पोळीचा किंवा आपल्या घरांत जे बनविलेलं असेल त्या जेवणाचा नैवेद्य दाखवा, ते जेवण त्या काळ्या गाईला खायला घाला आणि पाच प्रदक्षिणा आपण या काळ्या गाईला घालायच्या आहेत. लक्ष्यात घ्या गाय काळी म्हणजे काळीच असायला हवी, याला कसलाही अपवाद चालत नाही. या उपायाने आपल्या घराण्याला लागलेला श्राप, दोष जे काही असेल ते सर्वकाही समूळ संपून जाईल.
तर मित्रानो असे हे अगदी साधे, सोपे व सहजरित्या करता येणारे उपाय आज आम्ही आपल्याला सांगितले आहेत. कि ज्यामुळे तुम्हाला मातृदोष, पितृदोष व घराण्याचा दोष या समस्यांचे निराकरण करता येईल. नक्की करून पहा.
|| शुभम भवतु ||